गौरी कुलकर्णी मराठी बायोग्राफी || Gauri Kulkarni Biography in Marathi

गौरी कुलकर्णी   मराठी बायोग्राफी || Gauri Kulkarni Biography in Marathi 

गौरी कुलकर्णी   यांची ओळख – Gauri Kulkarni Introduction 

नुकती स्टार प्रवाह वरील चालू झालेले अबोली या मालिकेतील मुख्य पात्र साकारत असणारी अबोली म्हणजेच तुमची आमची सर्वांची लाडकी गौरी कुलकर्णी यांची आहे. गौरी कुलकर्णी यांच्या विषयी काही माहिती. गौरी कुलकर्णी आपल्या पहिल्या सिरीयल पासूनच अक्षरशः महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचले होत्या. गौरी यांचे अबोली ही दुसरी सिरीयल आहे.गौरी यांच्या विषयी थोडक्यात संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत.

गौरी कुलकर्णी   मराठी बायोग्राफी || Gauri Kulkarni Biography in Marathi

गौरी कुलकर्णी यांचा जन्म आणि शिक्षण – Birth and Education of  Gauri Kulkarni 

गौरी कुलकर्णी यांचा जन्म 3 एप्रिल 2001 रोजी महाराष्ट्र राज्यातील अहमदनगर या जिल्ह्यात झाला. गौरीने आपले शालेय शिक्षण हे भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूल अहमदनगर येथून पूर्ण केले. तर तिने आपले अकरावी आणि बारावीचे शिक्षण हे प्रेम राज सारडा कॉलेज अहमदनगर येथून पूर्ण गेले आहे. आणि सध्या गौरी कुलकर्णी ही आपल्या ग्रॅज्युएशनचे शिक्षण हे सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटी मधून पूर्ण करत आहे. गौरी कुलकर्णी यांच्या वडिलांचे नाव हे सुहास रामचंद्र कुलकर्णी आहे व त्यांच्या आईचे नाव आहे शिल्पा सुहास कुलकर्णी असे आहे.

गौरी कुलकर्णी यांची अभिनय कारकिर्दीची सुरुवात - Gauri Kulkarni Acting Acting Career

गौरी कुलकर्णी यांना अगदी बालपणापासूनच अभिनेत्री व्हायची होते. त्या शाळेत असताना नेहमी शाळेतील स्नेहसंमेलन कार्यक्रमात हुरहूरीने भाग घेत होत्या. गौरी कुलकर्णी यांनी खूप साऱ्या चित्रपटांमध्ये बालकलाकारांच्या भूमिका साकारलेल्या आहेत. भरपूर लोकांना वाटते की रांजण हा गौरी कुलकर्णी यांचा पहिला चित्रपट आहे, परंतु गौरी कुलकर्णी यांनी आपल्या अभिनय कारकीर्दीची सुरुवात ही अवघ्या वयाच्या सहाव्या वर्षीच करून टाकली होती. 2007 साली आलेल्या निरोप हा मराठी चित्रपट गौरी यांचा पहिला चित्रपट होता .तब्बल त्यानंतर दहा वर्षांनी गौरी कुलकर्णी यांनी रांजण या मराठी चित्रपटात काम केले आणि गौरी कुलकर्णी यांना फार ओळख मिळाली. तसेच मधल्या काळामध्ये गौरी यांनी रियावत हा 2012 साली आलेला चित्रपट आणि राजेश खन्ना यांचा शेवटचा चित्रपट रियासत सर 2014 साली आला. यामध्ये छोटीशी भूमिका केलेली होती ती देखील एक बालकलाकाराचीच होती. तसेच गौरी कुलकर्णी यांना आठवा चित्रपट पदार्पण पुरस्कार हा रांजण या चित्रपटासाठी भेटला होता. त्यांना सर्वोत्कृष्ट बालकलाकार अभिनेत्री यासाठी  हा पुरस्कार भेटला होता.

गौरी कुलकर्णी यांना सर्वात खतरनाक ओळख भेटली ती त्यांच्या पदर पणातूनच. त्यांचा टीव्हीवरील पहिल्या मालिकेतून त्यांना महाराष्ट्राच्या अगदी घराघरात ओळख मिळाली आणि गौरी कुलकर्णी हे नाव अक्षरश संपूर्ण घराघरात पोहोचले ते म्हणजे गौरी कुलकर्णी यांनी 2019 साली आलेल्या झी युवा वरील ऑलमोस्ट सुफळ संपन या मालिकेतून आपल्या टीव्ही क्षेत्रात पदार्पण केले. त्यांची ही पहिलीच मालिका होती.या मालिकेतील  त्यांचे सई हे पात्र अक्षरशः लोकांनी डोक्यावर उचलून घेतले आणि गौरी कुलकर्णी यांची भूमिका ही घराघरात प्रसिद्ध झाली. या मालिकेचे तब्बल 400 पेक्षा जास्त भाग प्रसारित झाले ,आणि गौरी कुलकर्णी हा चेहरा सगळ्यांच्या ओळखीचा आणि जिव्हाळ्याचा चेहरा होऊन गेला.

गौरी कुलकर्णी यांचे प्राणी वरील प्रेम - Gauri Kulkarni's love for animals

गौरी कुलकर्णी या प्राणिमित्र देखील आहेत.गौरी यांना प्राण्यांची विशेष आवड आहे .त्यांना कधी सेटवर किंवा सेटच्या बाहेर, रस्त्यावर चालताना कुत्रा ,मांजर दिसला तरी ते त्यांना खाऊ घातल्याशिवाय पुढे जात नाही. गौरी यांच्याकडे लॅब्रॉडॉग प्रजातीचा एक कुत्रा आहे. त्याचे नाव हे मर्फी आहे आणि त्या मर्फी ला त्या एका घरातील ऐका सदस्याप्रमाणे वागवतात.

गौरी कुलकर्णी यांची नवीन चालू असलेली मालिका - New Ongoing Serial by Gauri Kulkarni

गौरी यांना वयाच्या 18 व्या वर्षीच अफाट प्रसिद्ध भेटली. गौरी कुलकर्णी आपल्याला आता स्टार प्रवाह वरील अबोली या मालिकेतून दिसणार आहेत.त्यात त्यांच्यासोबत प्रसिद्ध अभिनेते सचित पाटील आणि सर्वत्र म्हाळसादेवी म्हणून प्रसिद्ध झालेल्या सुरभी हांडे या देखील आहेत. 23 नोव्हेंबर पासून स्टार प्रवाह वर चालू झालेली अबोली ही मालिका यातील मुख्य पात्र असलेली अबोली हिच्या भोवती फिरते. अबोली ही प्रेक्षकांना सध्या फार आवडत चाललेली आहे. अबोली ही अडकत अडकत बोलते तिच्या या निरागस बोलण्याने प्रेक्षकांच्या मनात अगदी हळवे असे घर केलेले आहे आणि तिचे ते एक्स्प्रेशन आणि तिचे कोमल मन बघून प्रेक्षक फार अबोलीच्या म्हणजेच गौरी कुलकर्णी यांच्या प्रेमात पडत आहेत.

गौरी कुलकर्णी यांचे सोशल मीडिया वरील  फॅन्स - Gauri Kulkarni's fans on social media

गौरी कुलकर्णी या सोशल मीडिया साईटवर प्रचंड ऍक्टिव्ह असतात .त्यांना इंस्टाग्राम वर सध्या 51.3 के म्हणजे 51 हजार 300 फॉलोवर्स आहेत. तर फेसबुक वर त्यांना 132 के म्हणजे एक लाख 32 हजार फॉलोवर्स आहेत तर असा होता तुमची आमची सर्वांची लाडकी सई म्हणा किंवा अबोली म्हणा म्हणजेच गौरी कुलकर्णी यांची बायोग्राफी.


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने