गश्मीर महाजनी मराठी बायोग्राफी || Gashmeer mahajani Biography in Marathi

गश्मीर महाजनी मराठी बायोग्राफी || Gashmeer mahajani Biography in Marathi 

गश्मीर महाजनी यांची ओळख – Gashmeer mahajani Introduction 

आज आपण मराठी चित्रपट सृष्टीतील एका हँडसम हंक अभिनेते विषयी जाणून घेणार आहोत. जो की बॉलीवुड टॉलीवूड अभिनेतांना आपला डान्स, आपला लूक्स, आपली मस्क्युलर बॉडी आणि आपल्या अभिनयाच्या जोरावर टक्कर देतो, तो म्हणजे मराठमोळा चॉकलेट बाय गश्मीर महाजनी.  

आज आपण गश्मीर महाजनी यांच्या आयुष्याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत एक अभिनेता, एक दिग्दर्शक ,एक कोरिओग्राफर ,एक डान्सर तसेच एक अभिनेता कसा होता गश्मीर महाजनी यांचा बहुरंगी प्रवास आज आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.

गश्मीर महाजनी मराठी बायोग्राफी || Gashmeer mahajani Biography in Marathi

गश्मीर महाजनी यांचे जीवनचरित्र - Biography of Gashmir Mahajani

नाव(name)

गश्मीर महाजनी

जन्म नाव 

गश्मीर महाजनी

जन्म(born)

8 जून 1985

जन्मस्थान( birthplace)

पुणे,महाराष्ट्र

वय(age)

37

वडिलांचे नाव ( father's name)

रवींद्र महाजनी

आईचे नाव ( mother name)

माधूरी महाजनी

भाऊ बहिण 

-

वैवाहिक स्थिती 

विवाहित

कार्यक्षेत्र

अभिनेता,डान्सर

टीव्ही मालिका 

इमली

चित्रपट

हंबीरराव मोहिते, धर्मवीर

वेब सिरीज 

श्रीकांत बसिरी

गश्मीर महाजनी  यांचा जन्म आणि शिक्षण – Birth and Education of Gashmeer mahajani

गश्मीर महाजनी यांचा जन्म महाराष्ट्र राज्यातील पुणे या शहरात 8 जून 1985 रोजी झाला. गश्मीर ने आपले शालेय शिक्षण पुण्यातील अभिनव विद्यालय हायस्कूल येथून पूर्ण केले, तर त्यांनी आपले कॉलेजचे शिक्षण हे पुण्यातील बीएमसीसी कॉलेज येथून पूर्ण केले.वयाच्या सतराव्या वर्षी आपल्या कॉलेजमधील एका नवविध्यार्थी गश्मीर होते जे त्यावेळी प्राप्तिकर भरत होते ते का बरं आणि कसे ते आपण जाणून घेणार आहोत.

गश्मीर महाजनी  यांचे कुटुंब - Family of Gashmir Mahajani 

गश्मीर महाजनी यांचे नाव ऐकताच महाजनी या नावामुळे आपल्या डोळ्यासमोर रवींद्र महाजनी हे उभे राहतात. ज्यांना मराठीतील सर्वात देखना नट असे म्हटले जात होते.गश्मीरही अगदीच आपल्या वडिलांप्रमाणेच आहेत ,मराठीतील अगदी देखण्या अभिनेत्यांमध्ये गश्मीर यांचा समावेश होतो.  गश्मीर यांच्या आईचे नाव माधूरी महाजनी असून त्या गृहिणी आहेत. 

गश्मीर महाजनी यांना अभिनयाची आवड - Gashmir Mahajani is fond of acting

गश्मीर यांना अभिनयाचे बाळकडू हे घरातूनच आपल्या वडिलांमार्फत मिळत होते. त्याचप्रमाणे गायनाचे आवड आणि व्यायामाची सवय ही देखील त्यांना आपल्या वडिलांमुळेच लागले. गश्मीर यांना अभिनेता बनायचे होते परंतु लहानपणीस काही वाईट प्रसंग त्यांच्यावर आले आणि त्यांच्या आयुष्याला काही कलाटणी देणाऱ्या गोष्टी घडल्या, त्या आलेल्या काही संकटांमुळेच गश्मीर यांनी आपल्या गरजे पोटीच आपल्या अभिनय कारकीर्दी ला लवकर सुरुवात केली.

गश्मीर महाजनी हे एका मुलाखतीमध्ये सांगत होते की गश्मीर जेव्हा पंधरा-सोळा वर्षाचे होते तेव्हा त्यांच्या घरावर अरिष्ठ आले होते. त्यांचे पुण्यातील घर हे सील केले होते. त्यांच्या वडिलांचा व्यवसाय हा पूर्णपणे बुडाला होता. घरावर फार मोठे आर्थिक संकट देखील आलेले होते ,म्हणूनच त्यांनी वयाच्या सोहळ्या वर्षी जीएमआर डान्स अकॅडमी चालू केली आणि हे अकॅडमी दोन-तीन वर्षातच नावारूपाला आली. वयाच्या 21व्या वर्षी त्यांनी इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी चालू केली, आणि या सर्व व्यवसायाच्या माध्यमातूनच त्यांनी आपल्या असलेले कर्ज फेडले.

बीएमसीसी कॉलेजमध्ये प्राप्तिकर भरणार ते एकमेव विद्यार्थी होते,म्हणूनच आपण मागे म्हटलं. आज देखील कश्मीर महाजन यांची डान्स अकॅडमी खूप जोरात चालू आहे. संपूर्ण मराठी इंडस्ट्री मध्ये ते एकमेव असे अभिनेते आहेत ज्यांची स्वतःची डान्स अकॅडमी आहे.


गश्मीर महाजनी  यांची अभिनय कारकिर्दीची सुरुवात - The beginning of acting career of Gashmir Mahajani

 कश्मीर महाजनी यांनी आपल्या अभिनयाची कारकीर्दीची सुरुवात ही मराठी रंगभूमीवरून केली. दादाची गर्लफ्रेंड हे त्यांचे पहिले व्यावसायीक नाटक होते. 

गश्मीर महाजनी  यांचे चित्रपट - Films by Gashmeer Mahajani

गश्मीर महाजनी यांनी आपल्या चित्रपटातील डेब्युट हा 2010 साली आलेल्या हिंदी चित्रपट मुस्कुरा के देख जरा या चित्रपटापासून त्यांनी बॉलीवूड डेब्युत केला. पुढे गश्मीर यांनी नसरुद्दीन शहा यांच्याकडे काही काळ अभिनयाचे प्रशिक्षण घेतले आणि अभिनयाचे धडे घेतले आणि तब्बल चार वर्षे पृथ्वी थेटर साठी त्यांनी काम केले, यात आपल्यात असलेले सर्व अभिनयाचे, डायरेक्शनचे, लेखनाचे,नृत्याचे सुप्त गुण त्यांनी सादर केले.

त्यानंतर उजाडले ते 2015 हे वर्ष. याच वर्षी मराठी चित्रपट सृष्टीला भेटलं त्यांचा हँडसम हँग चॉकलेट बॉय हिरो अर्थातच तो म्हणजे गश्मीर महाजनी. महाजन यांचे 2015 साली तब्बल दोन चित्रपट आले ,आणि हे दोन्ही चित्रपट सुपर डुपर ही ठरले.

त्यात पहिला म्हणजे कॅरी ऑन मराठा या चित्रपटापासून गश्मीर महाजनी यांनी मराठी चित्रपट सृष्टीत दमदार डेब्युट केला आणि याच वर्षी गश्मीर महाजनी यांचा आणखीन एक चित्रपट आला तो म्हणजे सुपर डुपर हिट देऊळ बंद हा चित्रपट अगदी सर्व प्रेक्षकांनी डोक्यावर घेतला होता.

आपल्या दुसऱ्याच मराठी चित्रपटापासून म्हणजेच देऊळ बंद या चित्रपटापासून गश्मीर महाराजांनी यांचा सेपरेट एक मोठा चाहता वर्ग एक फॅन बेस निर्माण झाला. देऊळ बंद या चित्रपटाने तब्बल वीस कोटी पेक्षा जास्त व्यवसाय केला.

 कश्मीर महाजनी यांनी आत्तापर्यंत कान्हा, वनवे तिकीट, मला काहीच प्रॉब्लेम नाही, बोनस ,एक राधा एक मीरा या चित्रपटांमध्ये कामे केलेली आहेत.

त्याचप्रमाणे 2022 यावर्षी देखील गश्मीर महाजनी यांचे तब्बल तीन चित्रपट प्रदर्शित झाले. एक म्हणजे विशू आणि बाकी दोन चित्रपट म्हणजे 2022 सालचे मराठीमधील ब्लॉकबस्टर चित्रपट ते म्हणजे सरसेनापती हंबीरराव मोहिते आणि धर्मवीर.

 या दोन्ही चित्रपटांमध्ये गश्मीर महाजनी यांचे अत्यंत महत्त्वाची भूमिका आहे आणि आपल्या अभिनयाची छाप देखील त्यांनी या चित्रपटांमार्फत सोडलेली आहे. या चित्रपट देखील 2022 मधील मराठीतील टॉप बिझनेस करणारे चित्रपट ठरले आहेत. 

गशमीर महाजनी यांनी बॉलीवूड मधे आपला कमबॅक केला तो 2016 साली आलेल्या डोंगरीकर राजा या चित्रपटापासून. ह्या चित्रपटात त्यांनी ऐका आयटम सॉंग च्या दरम्यान बॉलीवूडची मादक queen असलेली सनी लियोनी यांच्यासोबत स्क्रीन देखील शेअर केलेली आहे. 

गश्मीर महाजनी यांनी  केलेले चित्रपट - Films by Gashmeer Mahajani

मुस्कुरा के देख जरा.

कॅरी ऑन मराठा.

देऊळ बंद.

कान्हा.

वनवे तिकीट

मला काहीच प्रॉब्लेम नाही

बोनस 

एक राधा एक मीरा 

विशू

सरसेनापती हंबीरराव मोहिते

धर्मवीर

गश्मीर महाजनी  यांच्या हिंदी मालिका - Hindi serial by Gashmeer Mahajani

गश्मीर महाजन यांनी 2018 साली आलेल्या अंनजान स्पेशल क्राईम युनिट्स डिस्कवरी जीत चैनल वरील हिंदी मालिकेतून आपला हिंदी मालिका क्षेत्रात पदार्पण केले. 2019 साली आलेल्या मल्टीस्टार पाणीपथ यात गश्मीर महाजन यांनी जाकोजी शिंदे ही भूमिका साकारली होती. हा काश्मीर महाजनी यांचा तिसरा बॉलीवूड चित्रपट होता आणि ह्या चित्रपटाचे आणखी एक विषय बाब म्हणजे रवींद्र महाजनी आणि कश्मीर महाराजांनी या दोन्ही पिता पुत्रांनी प्रथमच एका चित्रपटातून सोबत स्क्रीन शेअर केली होती.

गश्मिर यांनी स्टार प्लस वरील इमली हिंदी मालिकेतून हिंदी मालिका क्षेत्रात आपले पुनरागमन केले होते. त्यांचे पुनरागमन खूप दणक्यात झाले. इमली यातील त्यांची आदित्य कुमार त्रिपाठी ही भूमिका प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतली .2020 पासून चालू झालेली ही मालिका 2022 मध्ये देखील चालू आहे आणि या मालिकेचे साडेचारशे पेक्षा जास्त भाग प्रदर्शित झाले आहेत. एमली या मालिकेतून गश्मीर महाजनी यांचा सेपरेट फॅन बेस तयार झाला आहे.

 गश्मीर महाजन यांना हिंदीतील मोठमोठ्या प्रोजेक्टच्या ऑफर देखील येत आहेत. गश्मीर महाजनी यांनी 2018 साली आलेल्या प्रेमा तुझा रंग कसा या मालिकेतून मराठी मालिका क्षेत्रात पदार्पण केले. मराठीत प्रथमच त्यांनी होस्ट म्हणून काम केले आहे आणि याच मालिकेच्या दुसऱ्या सीजनमध्ये देखील गश्मीर महाजनीच होस्ट होते. 

गश्मीर महाजनी  यांचे डिजिटल डेब्युत - Gashmir Mahajani's digital debut

गश्मीर महाजन यांनी आपल्या डिजिटल क्षेत्रातील डेब्यूट म्हणजेच ओटीटी हा 2020 साली आलेल्या सोनी लिव्ह ऍप वरील श्रीकांत बसिरी या वेब सिरीज मधून केला. या त्यांनी श्रीकांत म्हात्रे हे पात्र साकारले आहे.लवकरच याचा दुसरा पार्ट देखील येणार आहे.

तसेच त्यांचे मिक्स प्लेयर वाली जखम ही वेब सिरीज देखील लवकरच प्रदर्शित होणार आहे.

गश्मीर महाजनी  यांचे लग्न - Marriage of Gashmir Mahajani

गश्मीर महाजनी यांनी आपल्या बालपणीची मैत्रीण गौरी देशमुख यांच्याशी २८ डिसेंबर २०१४ रोजी लग्न गाठ बांधली. गश्मीर आणि गौरीला एक छान गोंडस मुलगा देखील आहे, त्याचे नाव वियम महाजनी असून त्याच्यासोबत चे भारी भारी फोटो आणि व्हिडिओज गश्मीर आणि गौरी आपल्या इंस्टाग्राम अकाउंट वर शेअर करत असतात. गश्मीर महाजनी यांनी डान्स ार डान्स महाराष्ट्र डान्स, लिटल मास्टर या रिलेटेड शोमध्ये जज चे काम केले आहे. त्याचबरोबर सोनाली कुलकर्णी या देखील त्यांच्यासोबत जज म्हणून होत्या.

गश्मीर महाजनी  यांचे सोशल मीडिया अकाऊंट - Social media account of Gashmir Mahajani

गश्मीर महाजनी हे सोशल मीडियावर प्रचंड ऍक्टिव्ह असतात. त्यांना इंस्टाग्राम वर 266 के म्हणजे दोन लाख 66 हजार फॉलोवर्स आहेत तर त्यांच्या फेसबुक पेजला 300 के म्हणजे तीन लाख फॉलोवर्स आहेत. अशा या फिटनेस प्रेमी आणि टॅलेंटेड तसेच उत्कृष्ट हँडसम हँग अभिनेत्याला आपल्या दीपस्तंभ परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा आणि खूप सदिच्छा.


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने