उत्कर्ष शिंदे मराठी बायोग्राफी || Utkarsh Shinde Biography in Marathi

उत्कर्ष शिंदे मराठी बायोग्राफी || Utkarsh Shinde Biography in Marathi 

उत्कर्ष शिंदे यांची ओळख – Utkarsh Shinde Introduction 

आज आपण बिग बॉसच्या घरातील अशा एका व्यक्तीविषयी अशा एका सदस्या विषयी जाणून घेणार आहोत की ज्यांना आपल्या संपूर्ण श्यातआयुश्यात कधी प्रसिद्ध होण्याची गरज पडली नाही.अगदी ते त्यांच्या जन्मापासूनच फार प्रसिद्ध आहेत आणि त्यांच्या आडनावामुळे महाराष्ट्रात अशी एकही जागा नाही की ज्यांना कोणी ओळखत नाही, ते म्हणजे तुमचे आमचे सर्वांचे लाडके महाराष्ट्राचे लोक गायक, डॉक्टर उत्कर्ष शिंदे हे होय.  

डॉक्टर उत्कर्ष शिंदे हे एक गायकच नसून एक डॉक्टर आहेत, एक गायक आहेत, ऐक अभिनेता आहे,एक म्युझिक कंपोजर आहेत आणि एक लेखक देखील आहेत. आपल्या दैनंदिन आयुष्यात ते सगळ्या प्रकारच्या भूमिका पार पडतात. अगदी कोविड काळात देखील त्यांनी त्यांचा डॉक्टरकीचा पेशापेशा विसरला नाही आणि लागेल ती मदत सर्वांना केली.तसेच प्रल्हाद शिंदे फाउंडेशन, प्रल्हाद शिंदे चारिटेबल ट्रस्ट च्या मार्फत देखील त्यांनी सर्वांना वाटेल तेवढी मदत केली.

आज आपण उत्कर्ष शिंदे यांच्या विषयी बालपणीपासून ते आत्ता बिग बॉस च्या घराबिग बॉस च्या घरापर्यंतचा प्रवास,सर्व गोष्टी जाणून घेणार आहोत.तसेच डॉक्टर की नंतर कसे वळाले ते पुन्हा एकदा कलाक्षेत्राकडे हे देखील आज आपण जाणून घेणार आहोत.

उत्कर्ष शिंदे मराठी बायोग्राफी || Utkarsh Shinde Biography in Marathi

उत्कर्ष शिंदे यांचा जन्म आणि शिक्षण – Birth and Education of  Utkarsh Shinde

डॉक्टर उत्कर्ष शिंदे यांचा जन्म 11 जानेवारी 1986 रोजी महाराष्ट्र राज्यातील मुंबई या शहरात झाला. .उत्कर्ष यांचे मूळ गाव हे महाराष्ट्रातील पुण्याजवळील पिंपरी चिंचवड हे आहे. उत्कर्ष यांनी आपले शालेय शिक्षण एमटीएस खालसा हायस्कूल गोरेगाव वेस्ट मुंबई येथून पूर्ण केले.उत्कर्ष यांनी आपले डॉक्टरकीचे शिक्षण हे पद्मश्री डॉक्टर डी वाय पाटील होमिओपॅथिकल मेडिकल कॉलेज अँड रिसर्च सेंटर पुणे येथून पूर्ण केले.

तसेच पुढील शिक्षण उत्कर्ष यांनी लंडन आणि वर्जीनिया येथून पूर्ण केले. उत्कर्ष हे अति उच्चशिक्षित असून त्यांनी बी एच एम एस म्हणजेच बॅचलर इन होमी ओपीथिकल मेडिकल आणि सर्जरी हे डिग्री डॉक्टर डी वाय पाटील होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड रिसर्च सेंटर पुणे येथून घेतलेली आहे. 

उत्कर्ष यांनी पोस्ट ग्रॅज्युएशन कोर्स इन होमिओपॅथी ही डिग्री लंडन युनिव्हर्सिटी मधून घेतली आहे. त्याचप्रमाणे पीजीडीईएस म्हणजेच पोस्ट ग्रॅज्युएशन इन डिप्लोमा इन एनवोर्मेन्ट सायन्स ही डिग्री लॉंग वूड युनिव्हर्सिटी व्हर्जिनिया युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका येथून घेतलेले आहे. 

उत्कर्ष हे फार हाय क्वालिफाईड आहेत,एकदम मल्टी टॅलेंटेड पर्सन आहेत.उत्कर्ष हे बुद्धी जमला फॉलो करतात व ते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले कर या पक्षाचे सदस्य देखील आहेत.


शिंदे शाही घराणे - Shinde royal family

 आपल्या सर्वांना माहिती आहे की उत्कर्ष यांचे शिंदेशाही घराणे हे किती लोकप्रिय आहे.उत्कर्ष यांच्या आजोबांचे नाव स्वर सम्राट प्रल्हादजी शिंदे आहे. प्रल्हादजी यांचे भक्ती गीते आज देखील 2021 मध्ये तेवढ्याच आनंदाने आणि तेवढ्याच भावनेने ऐकले जातात .तसेच प्रल्हादजींनी त्याकाळी वंचित शोषित कष्टकरी समाजावर होत असलेले अन्याय आपल्या गीतांमधून सर्वांसमोर मांडले होते .

उत्कर्ष यांच्या वडिलांना संपूर्ण महाराष्ट्र ओळखतो महाराष्ट्रात असे एखादे गाव, शहर, तालुका, पाडा नाही जिथे आनंद शिंदे हे नाव कोणाला माहिती नाही असा एक देखील व्यक्ती महाराष्ट्रात नसेल की ज्याला आनंद शिंदे हे नाव माहिती नाही. उत्कर्ष यांच्या आईचे नाव नेहा शिंदे असून त्या आनंद शिंदे यांच्या अर्धांगिनी आहेत व सध्या गृहिणी आहेत.

उत्कर्ष यांना दोन भाऊ देखील आहेत त्यांच्यापैकी एक आदर्श शिंदे हे फार प्रसिद्ध गायक असून, हर्षद शिंदे सध्या बिझनेस सांभाळतात. आदर्श शिंदे हे महाराष्ट्रातील युवा रॉकस्टार आणि चित्रपटांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात गायन करतात. उत्कर्ष शिंदे हे विवाहित असून त्यांनी डॉक्टर स्वप्नजा नरवाडे शिंदे यांच्याशी 2016 साली लग्नगाठ बांधली.


उत्कर्ष शिंदे यांचे प्राणीवरील प्रेम - Utkarsh Shinde's love for animals

उत्कर्ष हे सध्या फार चर्चेत आलेले आहेत ते म्हणजे कलर्स मराठी वरील बिग बॉस मराठी सीजन तीन च्या माध्यमातून. ते या शोमध्ये सहभागी झालेले आहेत आणि आज देखील या शोमध्ये उत्तम रित्या खेळत आहेत.सगळ्या टास्कमध्ये अगदी आवर्जून आणि मन लावून भाग घेतात.उत्कर्ष यांच्याकडे ऑडी A8 आणि टाटा नॅनो नेक्सन या दोन कार्स आहेत. तसेच उत्कर्ष हे हाडाचे प्राणिमित्र असून उत्कर्ष यांना प्राण्यांची फार लगाव आहे आणि त्यांना प्राणी फार आवडतात.

उत्कर्ष यांच्याकडे दोन पग या जातीचे जिंगल आणि जिनी ही कुत्री आहेत. तसेच नेपोलियन मेपटिक्स प्रजातीची कुत्र देखील असून त्याचे नाव ज्याज आहे. तसेच त्यांच्याकडे एक पोपट आहे आणि एक केशू नावाचे कासव देखील आहे.उत्कर्ष कुठेही बाहेर गेलेले असले तरी फोनवरून चौकशी करतात की त्यांचे प्राणी मित्र कसे आहेत ,तसेच कुठल्याही शोवरून किंवा कुठल्याही शूटिंग वरून आल्यावर पहिल्यांदा ते आपल्या प्राण्यांना वेळ देतात, एवढा त्यांना प्राण्यांविषयी माया आहे.

उत्कर्ष शिंदे यांनी गायलेली गाणी - Songs sung by Utkarsh Shinde

 उत्कर्ष यांना आजपर्यंत असंख्य गाणी गायलेली आहेत. त्या संपूर्ण गाण्यांची लिस्ट वाचली तर आपल्या चित्रपटाच्या length एवढे होईल.त्यांचे भरपूर असे भीम गीते प्रसिद्ध आहेत त्यापैकी भीम जयंती 125, गणपतीची गीते, भीमा तू ये पुन्हा, भीमजी का दिवाना, भिमाजीची पोर आली मैदानात , कोरोणा काळात गाजलेलं मला कोविड योद्धा म्हणा, तसेच तू ग लावून निघाली लिपस्टिक, तुजविण प्रिय मी,आई आहे स्वर्ग बाबा आहेत दरवाजा ही उत्कर्ष शिंदे यांची अत्यंत गाजलेली गाणी आहेत.


 उत्कर्ष शिंदे आणि आदर्श शिंदे यांनी 2014 साली आलेल्या प्रियतमा या चित्रपटात प्रथमच एकत्र गाणे गायले होते.उत्कर्ष शिंदे यांना 2015 साली बेस्ट सिंगर ऑफ द इयर हा पुरस्कार नाशिकच्या सातव्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल मध्ये भेटला होता. उत्कर्ष हे 2015 साली विजयानंद म्युझिक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे डायरेक्टर झाले होते.ही कंपनी त्यांच्या शिंदे परिवाराने स्थापन केलेली आहे. 

उत्कर्ष यांनी पावर आणि फुंकर या मराठी चित्रपटांसाठी म्युझिक कंपोज देखील केलेले आहे.2015 साली उत्कर्ष यांना अतुल्य गौरव सन्मान हा पुरस्कार देण्यात आला होता.

वाढदिवस साजरा करण्याची पद्धत - A way to celebrate a birthday

 उत्कर्ष शिंदे यांचा वाढदिवस साजरा करण्याची पद्धत बघून संपूर्ण मराठी चित्रपट सृष्टीच नाही तर आपल्यासारखे जन सर्वसामान्य माणसे देखील त्यांच्या प्रेमात पडतील एवढी भारी त्यांची पद्धत आहे. उत्कर्ष आपला वाढदिवस दरवर्षी अंध आणि अनाथ मुलांसोबत साजरा करतात. या दिवशी ते त्या मुलांना भरपूर चांगले जेवण आणि नवीन कपडे असतात. 

उत्कर्ष शिंदे आपला वाढदिवस रत्नचंद मानव कल्याण ट्रस्ट भोसरी येथे साजरा करतात. उत्कर्ष शिंदे हे स्वर सम्राट प्रल्हाद शिंदे चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष देखील आहेत. कोरोना काळात त्यांनी या ट्रस्टच्या माध्यमातून त्यांनी असंख्य मदत कार्य केले होते ,तसेच जे ढोलकी वादक ,तबला वादक जे वाद्य वाजवणारे लोक आहेत त्यांना रोकड पैसे देखील दिलेले होते, आणि त्यांच्या घरचे सर्व वस्तू देखील या ट्रस्टच्या माध्यमातून उत्कर्ष शिंदे व शिंदे शाही घराण्याने पाहिले होते.

उत्कर्ष शिंदे यांचे बिग बॉस मराठी मधील खेळ - Utkarsh Shinde's game in Bigg Boss Marathi

बिग बॉस मराठी मुळे उत्कर्ष शिंदे यांचे नाव पुन्हा एकदा फार चर्चेत आलेले आहे. उत्कर्ष शिंदे बिग बॉसच्या घरात फार सीताफिने खेळत आहेत. आपल्या संपूर्ण टास्कमध्ये ते पूर्ण बळ लावत आहेत, तसेच संपूर्ण युक्तीने ते त्यांचा टास्क पूर्ण करत आहे आणि बाहेर प्रेक्षकांच्या मनात उत्कर्ष यांच्या विषयी न्यूट्रल भावना आहे म्हणजे ते चुकले तरी प्रेक्षक त्यांना ओरडत देखील असतात आणि ते बरोबर खेळले की प्रेक्षक त्याची बाजू देखील उचलून घेतात. तर अशा मल्टी टॅलेंटेड माणसाला, मल्टी टॅलेंटेड व्यक्तीला आपल्या दीपस्तंभ परिवाराकडून पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा

तर असा होता एक अभिनेता, एक गायक ,एक म्युझिक कंपोजर, एक लेखक असणाऱ्या डॉक्टर उत्कर्ष शिंदे यांचा प्रवास.


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने