ओंकार राऊत मराठी बायोग्राफी || Omkar Raut Biography in Marathi

ओंकार राऊत मराठी बायोग्राफी || Omkar Raut Biography in Marathi 

ओंकार राऊत यांची ओळख – Omkar Raut Introduction 

आज आपण मराठीतील अशा एका अभिनेता विषयी बोलणार आहोत ज्यांचे काय बोलतो भाई, एक लिमिट्स असे डायलॉग चर्चेत राहिले आणि लोकांनी ते लक्षात ठेवले. ते म्हणजे तुमचे आमचे सर्वांचे लाडके ओंकार राऊत. आज आपण मल्टी टॅलेंटेड ओंकार राऊत यांची संपूर्ण बायोग्राफी बघणार आहोत. आपल्या सर्वांना माहिती आहे की ओंकार राऊत हे कौशल्यपूर्ण अभिनेते आहेत. त्याच जोडीने कॉमेडी देखील ते तुफान करतात. फार कमी लोकांना माहिती आहे की ते दिग्दर्शन आणि लेखक देखील करतात. अशा या बहुरंगी व्यक्तिमत्त्वाची आज आपण बायोग्राफी बघणार आहोत.

ओंकार राऊत मराठी बायोग्राफी || Omkar Raut Biography in Marathi

ओंकार राऊत यांची माहिती – Omkar Raut Information 

नाव(name)

ओंकार राऊत

जन्म नाव 

ओंकार 

जन्म(born)

9 ऑगस्ट 1990

जन्मस्थान( birthplace)

दादर, मुंबई, महाराष्ट्र

वय(age)

33

वडिलांचे नाव ( father's name)

-

आईचे नाव ( mother name)

-

शिक्षण 

बीकॉम

वैवाहिक स्थिती 

अविवाहित

कार्यक्षेत्र

अभिनेता, दिग्दर्शक,लेखक

टीव्ही मालिका 

फ्रेशर्स,फुलपाखरू

चित्रपट

टाइमपास ,टाइमपास थ्री, लॉकडॉऊन 

वेबसिरिज 

काळे धंदे

ओंकार राऊत यांचा जन्म आणि शिक्षण - Birth and Education of Omkar Raut

ओंकार राऊत यांचा जन्म महाराष्ट्र राज्यातील मुंबई शहरातील दादर येथे 9 ऑगस्ट 1990 रोजी झाला. ओंकार यांनी आपले शालेय शिक्षण आयएएस जॉर्ज इंग्लिश मीडियम स्कूल येथून पूर्ण केले.तसेच त्यांना काही कारणास्तव आपली शाळा मधे बदलावी लागली. त्यांनी आपले राहिलेले पुढील शिक्षण व्हीएन सुळे गुरुजी इंग्लिश मीडियम स्कूल येथून पूर्ण केले. ओंकार राऊत हे उच्चशिक्षित असून त्यांनी आर जी रुपारेल कॉलेज येथून आपले कॉलेजचे शिक्षण पूर्ण केले आहे. ओंकार यांनी बीकॉम ही पदवी घेतलेली आहे.

ओंकार राऊत यांच्या कारकिर्दीची सुरुवात - The beginning of Omkar Raut's career

 कॉलेजमध्ये असतानाच वेगवेगळ्या एकांकिका स्पर्धेत ओंकार भाग घेऊ लागला. नाटकाचे लेखन करणे, दिग्दर्शन करणे, वेगवेगळे संवाद लिहिणे ही सगळी बहुरंगी कामे तो करू लागला.ओंकार यांनी मिथक या संस्थेसोबत खूप कामे केलेली आहेत. एकांकिका स्पर्धेमध्ये मिथक हे नाव खूप मोठे आणि मानाचे आहे.


ओंकार राऊत यांचा पहिला चित्रपट - Omkar Raut first film 

ओंकार राऊत यांच्या आयुष्याला कलाटणी भेटली ती 2014 साली आलेल्या मराठीतील सुपरहिट ब्लॉकबस्टर चित्रपट टाइमपास यामुळे. टाईमपास या चित्रपटातून ओंकार यांनी आपल्या अभिनय कारकीर्दीची सुरुवात केली व मराठी चित्रपट सृष्टीत दमदार डेब्यूट केला. यात त्यांनी कोंबड्या हे पात्र साकारले होते. यातील त्यांचं एक लिमिट्स हा डायलॉग प्रेक्षकांच्या चांगलाच लक्षात राहिला. या चित्रपटाने तब्बल 33 कोटींची बक्कळ कमाई केली होती.

ओंकार राऊत यांनी दिग्दर्शन आणि कामे केलेली नाटके - Dramas directed and acted by Omkar Raut

कोणी एकेकाळी

चल तुझी सीट पक्की

ओंकार राऊत यांनी मधल्या काळात भरपूर नाटके चे दिग्दर्शन आणि भरपूर नाटकांचे लेखन केले होते. त्यापैकी कोणी एकेकाळी या नाटकाचे दिग्दर्शन देखील ओंकार राऊत यांनीच केले होते आणि हे नाटक त्यावेळी खूप गाजले होते. खुद्द सन्माननीय राज साहेब ठाकरे यांनी या नाटकाचे कौतुक केले होते. तसेच या नाटकाला झी नाट्य गौरव मध्ये तब्बल सात नॉमिनेशन भेटले होते. सर्वत्र ओंकार यांचे कौतुक झालेले होते. 

त्याचबरोबर चल तुझी सीट पक्की ह्या सुपरहिट नाटकाचे दिग्दर्शन देखील ओंकार राऊत यांनीच केले होते. 

ओंकार राऊत यांच्या मालिका - Serial by Omkar Raut 

फ्रेशर्स

फुलपाखरू

सौभाग्यवती


ओंकार राऊत यांनी 2017 साली आलेल्या झी युवा वरील फ्रेशर्स या मालिकेतून आपला मराठी मालिका क्षेत्रात पदार्पण केले. यात त्यांनी धवल मिटगावकर ही पात्र साकारले होते आणि यातील त्यांचा डायलॉग काय होलतो भाई हा देखील फार प्रेक्षकांनी लक्षात ठेवलेला होता. तरुणाईने फ्रेशर्स ही मालिका अक्षरशः डोक्यावर घेतली होती.

त्यानंतर ओंकार राऊत आपल्याला दिसले ते झी युवा वरी एका सुपरहिट मालिकेमध्ये. ओंकार राऊत यांना लघोलघ आपली दुसरी मालिका भेटली ती म्हणजे झी मराठी वरील सुपरहिट मालिका फुलपाखरू. यामध्ये त्यांनी रॉकी हे पात्र साकारले होते.त्यानंतर लॉकडाऊनच्या काही काळानंतर ओकार राऊत आपल्याला हे सोनी मराठीवरील तू सौभाग्यवती हो या मालिकेत एका छोट्याशा भूमिकेत दिसले.

 

ओंकार राऊत यांची कॉमेडी कार्यक्रम एन्ट्री - Comedy program entry of Omkar Raut 

त्यानंतर त्याच चॅनेल वरील म्हणजे सोनी मराठीवरील महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमात ओंकार राऊत यांची एन्ट्री झाली.आणि बघता बघता ओंकार राऊत हे संपूर्ण महाराष्ट्राच्या घराघरात प्रसिद्ध झाले. याच मालिकेने त्यांना ग्रँड सक्सेस दिले. महाराष्ट्राच्या हास्य जत्रेतील त्यांचे गाण्याची मैफिल आणि देवदूत हे प्रहसन प्रेक्षकांना फार आवडते.

ओंकार राऊत यांचे चित्रपट - Omkar Raut movies 

टाईमपास

लॉकडाऊन

टाईमपासचा ३

ओंकार राऊत यांचे 2022 मध्ये तब्बल दोन चित्रपट आले.आठ वर्षांच्या प्रदीर्घ ग्याप नंतर ओंकार राऊत यांनी चित्रपटसृष्टीत पुनरआगमन केले ते लॉकडाऊन या चित्रपटातून. यात त्यांच्यासोबत प्राजक्ता माळी, रुचिरा जाधव आणि अंकुश चौधरी होते. त्यात त्यांनी अंकुश चौधरी च्या भावाचा रोल केलेला होता.

तसेच 2022 मध्ये ओंकार यांचा आणखीन एक चित्रपट आला आणि यामुळे ओंकार राऊत यांची खूप चर्चा झाली,ती एका त्यांच्या जुन्या डायलॉग मुळे तो म्हणजे एक लिमिट्स. पुन्हा एकदा आपल्याला टाईमपासचा तिसरा भागात ओंकार राऊत हे पाहायला भेटले आणि कोंबड्या हे पात्र साकारताना दिसले. या त्यांचा एक लिमिट्स हा डायलॉग पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला.

ओंकार राऊत यांचा डिजिटल क्षेत्रातील डेब्युट - Omkar Raut's debut in the digital sector

ओंकार राऊत यांनी आपला डिजिटल क्षेत्रातील डेब्युट हा 2019 साली आलेल्या काळे धंदे या वेब सिरीज मधून केला. यात त्यांच्यासोबत नेहा खान आणि महेश मांजरेकर हे देखील काम करत होते .

ओंकार राऊत हे आपल्याला youtube वर देखील वेगवेगळ्या चॅनेल मध्ये बघायला भेटतात ओंकार राऊत यांनी आपली सोसळ वाहिनी म्हणजेच असो वा या यूट्यूब चैनल साठी देखील काम केलेले आहे. तसेच त्यांनी मिथक मुंबई या यूट्यूब चैनल साठी देखील काम केलेले आहे फार कमी लोकांना माहिती आहे की ओंकार यांचे टोपण नाव हे राजदीप आहे. त्यांचे लहानपणीचे भरपूर मित्र हे आज राजदीप याच नावाने हाक मारतात.तसेच आपल्या लहानपणी ओंकार यांनी कथक डांस देखील प्रशिक्षण घेतले आहे. 

ओंकार राऊत यांचे सोशल मिडिया अकाऊंट - Omkar Raut's social media account

ओंकार राऊत हे सोशल मीडिया साइटवर प्रचंड ऍक्टिव्ह असतात ओंकार यांना इंस्टाग्राम सोशल साइटवर 37.8 के म्हणजे 37 हजार 800 फॉलोवर्स आहेत. तसेच फेसबुकवर त्यांना 8000 पेक्षा जास्त फॉलोवर्स आहेत. अशा या अभिनेत्यांना अभिनेता, लेखक, दिग्दर्शक असणाऱ्या बहुरंगी अभिनेत्याला आपल्या दीपस्तंभ परिवाराकडून पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि खूप सदिच्छा.


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने