इम्रान खान मराठी बायोग्राफी || Imran Khan Biography in Marathi

इम्रान खान  मराठी बायोग्राफी || Imran Khan Biography in Marathi 

इम्रान खान  यांची ओळख – Imran Khan Introduction 

आज आपण जाणून घेणार आहोत the legend of arban music, द किंग ऑफ अर्बन मूसिक साँग the one अँड only इम्रान खान यांच्या विषयी. आज आपण इम्रान खान यांची संपूर्ण बायोग्राफी बघणार आहोत. नुसतं सॉंग्स च नाव ऐकून आणि इम्रान खान हे नाव ऐकून आपल्या सगळ्यांच्या समोर येतो तो 2009, 2010 चा पिरेड चालला असेल.

इम्रान खान  मराठी बायोग्राफी || Imran Khan Biography in Marathi

इम्रान खान  यांचा जन्म आणि शिक्षण – Birth and Education of  Imran Khan 

इमरान खान यांचा जन्म 28 मे 1984 रोजी नेदरलँड या देशातील हेग या शहरात झाला. इम्रान खान यांनी आपले शालेय व कॉलेज चे शिक्षण नेदरलँड देशातील हेग या शहरातूनच पूर्ण केले. इम्रान खान यांचे वडील हे 1970 साली पाकिस्तानातून नेदरलँड मध्ये शिफ्ट झाले होते.पाकिस्तानतील पंजाब येथे असणाऱ्या गुजरान वाला या शहरात ते राहायचे आणि या शहरात सर्रास पणे पंजाबी बोलले जाते.

इम्रान खान  यांची गाण्याची सुरवात – The Beginning of Imran Khan’s Songs 

इम्रान ला अगदी बालपणापासूनच गाण्याची आवड होती. 2005 साली त्यांची भेट त्यांच्या जुना मित्र शाहीद मजर याच्यासोबत झाली. इम्रान यांनी आपल्या गाण्याचे कौशल्य शाहीद ला दाखवले आणि तो फार इम्प्रेस झाला.  त्यानंतर त्यांनी पाकिस्तानातील लाहोर या शहरात यायचे ठरवले. पाकिस्तानातील त्या काळातील सर्वात पॉप्युलर असणारी म्युझिक प्रोडक्शन टीम सोबत काम चालू केले. दिवस-रात्र दोन महिने काम केल्यानंतर इम्रान खान यांनी आठ सॉंग्स बनवले.ज्यावेळी गाण्याचे फायनल हेलिंग चालू होते आणि गाण्याचे फायनल प्रोडक्शन चालू असताना इम्रान यांनी ती गाणी ऐकली त्यावेळी इम्रान यांनी ते गाणे रिलीज करण्याच्या टाळले आणि सर्व त्यांचा प्रोग्राम कॅन्सल केला. कारण इम्रान यांना स्वतःला वाटत होते की त्यांचे हे गाणे त्यांच्या करिअरच्या सुरुवातीलाच त्यांच्याविषयी निगेटिव्ह फीडबॅक देतील म्हणून त्यांनी सर्व गोष्टी कॅन्सल केल्या, आणि ती आठ गाणी रिलीज करण्याची कॅन्सल केली. तसेच 2006 साली ते पाकिस्तान मधून नेदरलँडला परत आले आणि काही काळानंतर 2006 मध्ये ते युके ला गेले. त्या ठिकाणी देखील ते एक सिंगल सॉंग बनवण्यासाठी गेलेले होते.तिथे देखील मागच्याच किश्याची पुनरावृत्ती झाली. संपूर्ण गाणं रेकॉर्ड झालं, मिक्सिंग झाले आणि ज्यावेळी फायनल प्रोडक्शन चालू होते त्यावेळी देखील इम्रान यांनी गाणी ऐकून ते गाणे ऐकून रिलीज करण्याचे कॅन्सल केले. त्यांना ते गाणे आवडले नव्हते. 

इम्रान खान यांनी  रिलीज केलेले गाणी - Songs released by Imran Khan

काही दिवसांनी इम्रान खान यांची त्यांचा जुना मित्र असलेला फिक्रत सोबत हॉलंड या शहरात भेट झाली. इमरान यांनी मागे घडलेले दोन किस्से आणि फीक्रतला सांगितले आणि त्यानंतर फिक्रात यांनी इम्रान खान यांना एक टर्कीस म्युझिक प्रोडूसर रणई यांच्यासोबत भेट घालून दिली.आणि खूप चर्चेनंतर आणि खूप music ऐकल्यानंतर इम्रान खान यांना शेवटी कळाले की हेच ते म्युझिक होते जे मागील कइक वर्षांपासून आपण शोधत होतो आणि त्यांनी लगेचच रनई यांच्यासोबत मिळून काही महिन्यात नी नचले हे गाणे बनवले आणि हे गाणे प्रेस्टिज रेकॉर्डने 27 जून 2007 साली रिलीज केले. इम्रान खान यांचा डेब्युट साँग म्हणून नी नचले  या गाण्याकडे पाहिले जाते. आणि इथूनच सुरुवात झाली ती अर्बन music industry च्या रिवोळूषण ला. आणि सगळीकडे नी नचले या गाण्याची चर्चा झाली.

 पण पाहिजे तेवढी प्रसिद्ध हे गाणे झाले नाही, आणि शेवटी तो दिवस उजाडला तो म्हणजे आज पासून 13 तेरा वर्षांपूर्वीचा तो स्पेशल दिवस 12 जुलै 2009.12 जुलै 2009 या दिवशी इम्रान खान यांचा ऍम्प्लिफायर  नावाचे एक गाणे रिलीज झाले .आणि या गाण्याने बघता बघता एकाच आठवडे मध्ये दोन मिलियन व्ह्यू मिळवल्या त्याकाळी म्हणजेच 2009 साली शक्यतो कोणीच जास्त इंटरनेट वापरत नव्हतं. आणि त्यावेळी दोन मिलियन व्ह्यू एका वीक मध्ये भेटणं म्हणजे खूप मोठी गोष्ट होती.जो पल्ला ऍम्प्लिफायर या गाण्याने पार केला. आणि बघता बघता आशिया खंडातील सर्व रेल्वे स्टेशनवर आणि टीव्ही चॅनेलवर ऍम्प्लिफायर हे गाणे नंबर वन पोझिशनला आले .घराघरात, बस स्टँडवर, रिक्षा, टेम्पो, कॉलेजचे कट्ट्यांवर, मोठमोठ्याने ही गाणी वाजू लागली.तसेच वेगवेगळ्या समारंभामध्ये देखील एंपलीफायर या गाण्याची चर्चा होऊ लागली. इम्रान खान या नावाला एका रात्रीत या गाण्याने स्टार बनवले आणि आज 2022 मध्ये या गाण्याला 480 मिलियन पेक्षा जास्त views आहेत ,आणि त्यानंतर इम्रान खान यांचा आणखीन एक गाणं आलं 30 ऑगस्ट 2009 रोजी इम्रान खान यांच बेवफा हे गाणे आले, आणि त्या वेळची आशिक मंडळी, प्रेम भंगी मंडळी ,प्रेमात बुडालेली मंडळी होती त्या सर्वांच्या मनाला साजेसे गाणे त्यावेळी आले. हे गाणे सर्वसामान्य व्यक्तीने म्हणजे ज्याचे दूर दूर पर्यंत प्रेमाचा काही संबंध नाही आला अशा जरी व्यक्तीने ऐकले तरी हे गाणे ऐकताना असा फील येतो की मला प्रेमात खूप मोठा सदमा भेटलेला आहे. हीच या गाण्याची खरी जादू आहे. आणि आज देखील या गाण्याची जादू सर्वांवर आहे. या गाण्याने खूप लवकर शंभर मिलियन व्ह्यू पूर्ण केले .आणि बेवफा गाण्याला आज 205 मिलियन पेक्षा जास्त व्ह्यू युट्युब वर आहेत. हीच ती 2 गाणी आहेत ज्यातून अख्या जगाला इम्रान खान या नावाचा परिचय झाला आणि इम्रान खान या व्यक्तीची ओळख देखील झाले.

इम्रान खान यांच्या गाण्यांचे किस्से - Stories of Imran Khan's songs

एंपलीफायर आणि बेवफा या गाण्यांचे अननोन किस्सा आहे तो आपण जाणून घेणार आहोत. ऍम्प्लिफायर हे गाणे इम्रान खान यांनी एका तासात लिहिलेले होते.

जेव्हा आपल्या मित्रांना बोलताना गड्डी संडे भेजा हे शब्द त्यांच्या मुखातून पडले त्यावरून त्यांना सर्व गाणं सुचलं आणि ते आपल्या स्टुडिओमध्ये गेले आणि आधी एक तासाच्या आतच एंपलीफायर हे पूर्ण गाणे लिहिले होते. हे फार कमी लोकांना माहिती आहे. तसेच बेवफा गाण्याच्या बाबतीत देखील एक किस्सा आहे.आज सर्वेकडे इथून मागच्या पिरेडमध्ये बाली हनी सिंग वापरायचे त्याला आपण हनी सिंगचे बाली म्हणायचो. परंतु इम्रान खान  ची बाली आहे ती 2009 साली आलेल्या बेवफा या गाण्यांमध्ये वापरली होती आणि हनी सिंग यांनी 2011 साली त्यांचा 11 11 11 रोजी म्हणजे इंटरनॅशनल व्हिलेजर्स हा अल्बम लाँच झाला त्यात ही बाली घातली होती आणि तिथूनच ती कंटिन्यू वापरण्यास सुरुवात केली आणि त्या बाली ला हनी सिंगचे बाली म्हणत होते. परंतु ती इम्रान खान यांनी सर्वप्रथम वापरलेली होती.

इम्रान खान  यांनी रिलीज केलेले अल्बम - Albums released by Imran Khan

इम्रान खान यांनी 2009 मध्येच त्यांचा डेब्युट अल्बम अनफॉरगेटेबल रिलीज केला होता ज्या त्यांचे ऍम्प्लिफायर आणि बेवफा आणि मी नचले या गाण्याचे रिमिक्स मिळून टोटल तीन गाण्याचे रिमिक्स मिळून टोटल 15 गाणी होती.अनफॉरगेटेबल हा अल्बम त्याच्या नावाप्रमाणे आज देखील 2022 मध्ये अनफॉरगेटेबल ठरलेला आहे, आणि इथून पुढे कित्येक वर्ष अनफॉरगेटेबल राहील.आजही त्या सर्व गाण्यांची जादू सर्वांवर कायम आहे. इम्रान खान यांच्या अन्फरगेटेबल अल्बम मधे एंपलीफायर, बेवफा, आजावे माहिया,हे गर्ल ,पहिली वार ,चक्क ग्लास, नजर ,सुपरस्टार ,गोरा गोरा रंग ,बाउन्स बिल्लो ,नी नचले रिमिक्स, फोटी प्रा, नाही चलेगा ,नही रहना, आणि कोट्या गुसेंदा फियर अशी टोटल 15 गाणी होती. ब्रिट येशियान टीव्ही म्युझिक अवार्ड्स मध्ये बेस्ट अल्बम हा पुरस्कार अनफॉरगेटेबल या अल्बमला भेटला होता. यात संपूर्ण अल्बमची इतकी क्रेज होती की इमरान खान यांनी यूएसए आणि ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड टूर देखील केलेली होती. एवढी सर्व जगात इम्रान खान यांची गाण्यांची चर्चा होती.

इम्रान खान यांचे स्वतःचे आय के रेकॉर्ड - Imran Khan's own IK record

2011 साली  इम्रान खान यांनी प्रेस्टिज रेकॉर्ड सोडले आणि स्वतःच रेकॉर्ड लेबल काढले ते म्हणजे आय के रेकॉर्ड्स आणि त्यांनी तब्बल चार वर्षाच्या गॅप ने 2013 साली सॅटिस्फाय हे गाणे काढले आणि काही काळाने या गाण्याने सर्वीकडे क्रेझ झाली आणि ह्या गाण्याने आपले एक वर्चस्व निर्माण केलं. टिक टोक व्हिडिओच्या बॅकग्राऊंड मुळे हे गाणं अचानक चर्चेत आले होते.हे गाणे इम्रान खान यांच्या आजपर्यंतच्या सर्वात जास्त चाललेले गाणे आहे या गाण्याला आज 2022 मध्ये 720 मिलियन पेक्षा जास्त views आहेत. इम्रान खान यांनी बॉलीवूड मध्ये एकच गाणे गायलेले आहे .आणि ते देखील त्यांचे डेबिट सॉंग आहे इम्रान खान यांनी 2015 साली आलेल्या तेवर या चित्रपटातून लेट सेलिब्रेट हे गाणे गायले होते. या गाण्यासाठी खुद्द बोनी कपूर ,संजय कपूर आणि अनिल कपूर यांनी इम्रान खान यांच्याकडे स्पेशल रिक्वेस्ट केली होती. त्यांनी या गाण्यासाठी पहिली मीटिंग दुबईमध्ये घेतली तर इम्रान खान यांच्या दुसऱ्या मीटिंगसाठी ते थेट नेदरलँडला इम्रानच्या स्टुडिओमध्ये गेले. तेथे त्यांची चर्चा झाली आणि त्यानंतरच इम्रान खान यांनी हे गाणे गाण्यासाठी तयार झाले. इम्रान खान हे एका वर्षात एकच गाणं करतात. त्यांनी लेट सेलिब्रेट या गाण्यानंतर इमॅजिनरी, हॅट्रिक, जिन्ना,प्रेसिडेंट ,ट्रॉली, नाईट रायडर, एम ओ बी, डी डोन्ट लाईक इट आणि आत्ताच एक फेब्रुवारी 2022 रोजी लेटेस्ट आलेले ऑन माय वे हे गाणे गायलेली आहेत. 

इम्रान खान यांच्या मोस्टली व्हिडिओज मध्ये लेम्बोर्गिनी असते .तसेच त्यांच्या काही गाण्यांमध्ये विशेष प्रकारचे प्राणी देखील असतात. प्रेसिडेंट ट्रॉली या गाण्यांमध्ये एक हातात दोन घड्याळ घालण्याची त्यांची स्टाईल देखील फेमस झाली होती. इम्रान खान यांना बॉलीवूड मधून खूप ऑफर्स आल्या त्यांच्या एंपलीफायर ,बेवफा आणि आणखीन काही गाण्यांसाठी खुद्द शाहरुख खान ,अक्षर कुमार आणि बॉलीवूडच्या खूप मोठ्या प्रोडक्शन कंपन्यांनी त्यांना मागणी घातली होती की आम्हाला पण तुमच्या गाण्यांची राइट्स द्या.परंतु इम्रान खान यांनी सर्वांना साफ नकार दिला आणि या गाण्यात मी माझी सर्व मेहनत टाकलेली आहे हे मी तुम्हाला नाही देऊ शकत असे त्यांचे स्पष्ट मत होते.

इम्रान खान यांचे सोशल मीडिया आणि फॅन्स - Social media and fans of Imran Khan

इम्रान खान हे सोशल मीडिया साइटवर फार कमी ऍक्टिव्ह असतात. त्यांना इंस्टाग्राम वर 436 के म्हणजे चार लाख 36 हजार फॉलोवर्स आहेत. तर फेसबुक वर त्यांच्या पेजला 1.1 मिलियन फॉलोवर्स आहेत. अशा या अर्बन म्युझिकच्या बादशहाला दीपस्तंभ परिवाराकडून खूप शुभेच्छा. तसेच येणाऱ्या काळात इम्रान खान आपल्याला  त्यांच्या गाण्यातून एंटरटेन करत राहतील यासाठी त्यांना खूप खूप सदिच्छा.


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने