चिकूपिकू १ ते ८ वयोगटातील मुलांचे लाडके मराठी मासिक (ChikuPiku Storybook for Kids)

ChikuPiku-Marathi-Kids-Storybook

चिकूपिकू एक ते आठ वयोगटासाठी मराठी मासिक.

वेगाने बदलणाऱ्या तंत्रज्ञानाने ,आजच्या काळात मुलांचा 'टच'स्क्रीनशी संबंध अधिक आणि पुस्तकांशी असलेला 'टच' मात्र कमी झालेला दिसून येतो. त्याचबरोबर पालक आणि मुलांमधील संवाद देखील कमी झालेला आढळून येतो. मुलांमध्ये वाचनाची आणि पुस्तकांची आवड निर्माण करण्यासाठी तसेच पालक आणि मुलांमधील संवाद मजेदार आणि सोपा होण्यासाठी 'चिकूपिकू' हे १ ते ८ वयोगटातील मुलांसाठीचे लाडके मराठी मासिक. 

चिकूपिकू मासिकाचे वार्षिक मेम्बरशिप घेण्यासाठी आताच चिकूपिकू वेबसाईट ला भेट द्या आणि चिकूपिकू मासिकातील गोष्टी, कविता,कला आणि विविध अॅक्टिव्हीटीज अशा वेगवेगळ्या माध्यमातून मुलांमध्ये शिकण्याची उत्सुकता आणि विचार करण्याची क्षमता वाढवण्यास मदत होते. 

मराठीतून गोष्टी कशासाठी ? 

१ ते ८ या वयोगटातल्या मुलांचा भाषाविकास फार जोमाने होत असतो. बाळ जन्मापासून आईची भाषा ऐकत असतं. घरातील, परिसरातील भाषा ऐकत असतं. या भाषेशी त्याची विशेष जवळीक (connect) असते. मुल इंग्रजी माध्यमाच्या शाळेत जात असले तरी मातृभाषेत सांगितलेल्या गोष्टींमुळे भावनिक विकास साधला जातो. हे लक्षात घेऊन अंकातल्या बहुतेक गोष्टी मराठी भाषेत आहेत. यातून त्यांना नवे शब्द माहीत होतात.

चिकूपिकू मासिकात काय वाचाल? 

चिकूपिकू : एकमेकांना मदत करणाऱ्या, सोबतीने मज्जा-मस्ती करणाऱ्या चिकू आणि पिकू यांच्या मैत्रीची ही गोष्ट.

फिशिरा : समुद्राखालच्या पाण्यातल्या जगाची सफर घडवणारी ही फिशिरा. कुठलीही अडचण आली,  संकट आले की मित्रांच्या सोबतीने त्याचा सामना करणारी साहसी फिशिरा आणि तिच्या मित्रांची ही गोष्ट. 

हातांची जादू  :मुलांना स्वतःच्या हाताने गोष्टी तयार करण्याचा अनुभव मिळतो आणि त्यामुळे त्यांची सर्जनशीलता वाढण्यास मदत होते. त्यातून कल्पनाशक्ती सुधारण्यास उपयोग होतो.

आर्टिस्ट कट्टा :  देश-विदेशातील विविध प्रकारच्या चित्रकारांच्या चित्रशैलीची यातून मुलांना ओळख  होते.  या चित्रकारांची चित्रं बघून मुलांना तसे चित्र काढण्याचा प्रयत्न करून बघता येतो.

नेचर आणि मी : मुलांना निसर्गतील गमतीजमती  

माऊ आणि बाऊ :  मुलांना  स्वच्छता आणि चांगले आरोग्य  ठेवण्यासाठी कोणत्या छोट्या छोट्या गोष्टी करायला हव्या  हे शिकवणाऱ्या माऊ आणि बाऊची गमतीदार गोष्ट.

चिमणी चित्र :  छोट्या छोट्या चित्रांमधून,  रेखाटन, रंग क्रियेमधून  मुलांची कल्पनाशक्ती वाढविणारी ही ऍक्टिव्हिटी.

सायन्स सैर : विविध शास्त्रज्ञांची माहिती आणि विज्ञानातील गमतीजमती

झाडी गोडी : झाडांचे अनेक प्रकार आपण बघतो ,पण काही ठराविक झाडेच आपल्याला माहिती असतात . झाडी गोडी मधून निरनिराळ्या झाडांची वैशिष्ट्ये जाणता येती

जादूचा रुलाम :  मुलांमधील भाषिक बुद्धिमत्ता वाढवण्यासाठी मदत करणाऱ्या या गोष्टीतून  मुलांना  उलट्या पूलट्या शब्दांमधल्या गमती जमती खेळून बघता येतील.

क्युरियस कुबो : मुलांच्या डोक्यात असंख्य प्रश्न सतत येत असतात आणि त्याची उत्तरे मिळवण्याची उत्सुकता ही लागलेली असते . असेच काही अचंबित करणारे प्रश्न आणि त्याची उत्तरे क्युरियस कुबोमध्ये वाचता येतील.

मूल प्रश्न : ह्या सदरात पालक आणि मुलांसंदर्भातील अनेक समस्यांनाची उत्तरं आपण जाणून घेऊ शकतो.

ChikuPiku-Storybook-Photos

चिकूपिकूचे  इतर उपक्रम : ChikuPiku Events

पालकांची शाळा : मुलांसह पालकांसाठी पण चिकूपिकूचे उपक्रम असतात. त्यातील  एक ‘पालकांची शाळा’. ह्या कार्यशाळेत मुलांशी संवाद कसा साधायचा व त्यांच्या दृष्टिकोनातून विचार कसा करता येऊ शकतो हे जाणून घेता येते आणि ह्याचे मार्गदर्शन घडते. 

नाटुकली : छोट्या नाटकांमधून मुलांसोबत गप्पा गोष्टी आणि खेळ हे नाट्यस्वरूपात सादर केले जातात ज्यामुळे  योग्य आणि प्रोत्साहन देणारे संदेश दिले जातात.

हातांची जादू : ह्या कार्यशाळेत एक पालक एक मूल असे जोडीने छान छान प्रयोग शिकता येतात. मुलं वस्तु, खेळणी बनवण्यास शिकतात.

चिकूपिकू कार्निव्हल : मुलांना केंद्रस्थानी ठेवून आखणी केलेल्या या कार्निव्हलमध्ये खेळ,गाणी-गोष्टी,कार्यशाळा, पपेट शो आणि भरपूर गमती जमती असतात.


चिकूपिकू ऑडिओ स्टोरीज | ChikuPiku Audio Stories

Chikupiku-audio-storybook

काही मुलांना वाचायला तर काही मुलांना गोष्टी ऐकायला आवडतात. मासिकातल्या गोष्टी तुम्ही वेबसाइट वर ऐकू शकता. ऐकल्याने मुलांच्या लक्षात राहण्यास मदत होते. गोष्टी ऐकण्याचा परिणाम बोलण्यावरही होतो,मुलांना शब्द आणि त्यांचे उच्चार अधिक ठळक पद्धतीने समजू शकतात. गोष्टी ऐकण्यात मुलांना गुंतवले की त्यांची एका जागी बसण्याची क्षमता आणि एकाग्रताही वाढते. मुलांचा स्क्रीन टाईम कमी व्हावा आणि त्यांच्या बौद्धिक प्रक्रियांना योग्य वळण लागावं यासाठी ही महत्वाची गोष्ट आहे. 

अंकाबरोबरच www.chikupiku.com या १ ते ८ वयातल्या मुलांसाठीचा platform दिवसेंदिवस बहरतो आहे. 

मुलं आणि पालकांनी एकत्र मिळून चिकूपिकू नक्की वाचा.

-देवश्री तुळशीबागवाले

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने