शिवानी नाईक मराठी बायोग्राफी || Shivani Naik Biography in Marathi
शिवानी नाईक यांची ओळख - Shivani Naik Introduction
आज आपण आप्पी आमची कलेक्टर या मालिकेतून मराठी मालिका क्षेत्रात दमदार पदार्पण करणारी अभिनेत्री शिवानी नाईक यांच्या विषयी माहिती जाणून घेणार आहोत. मोठमोठ्या एकांकिका स्पर्धा, नाट्य स्पर्धा त्यांमधून आपल्या दमदार अभिनयाने मानाचे पुरस्कार पटकावणारी शिवानी नाईक यांची बायोग्राफी आज आपण बघणार आहोत.
शिवानी नाईक यांची माहिती - Shivani Naik
information
जन्म
नाव (Born Name) |
शिवानी
नाईक |
जन्म(born) |
10ऑक्टोंबर 1995 |
जन्मस्थान(
birthplace) |
छत्रपती संभाजी नगर,महाराष्ट्र. |
वय(age) |
27 |
नाटक
|
मॅट्रिक,आता कसं करू,अखंड,पाझर,रंगबावरी |
चित्रपट
(Film) |
सफरचंद |
मालिका(serial) |
अप्पी आमची कलेक्टर |
वैवाहिक
स्थिती |
अविवाहित |
कार्यक्षेत्र |
अभिनेत्री |
शिवानी नाईक यांचा जन्म - Shivani Naik Born
शिवानी
नाईक यांचा जन्म 10ऑक्टोंबर 1995 रोजी महाराष्ट्र राज्यातील छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात
झाला.शिवानी नाईक यांना एक मोठी बहीण आहे. तसेच शिवानी यांना एक छोटा भाऊ देखील आहे.
शिवानी यांना त्यांच्या अभिनय कारकीर्दीसाठी आई-वडिलांनी खूप सपोर्ट केला.वडिलांवर
शिवानी चे विशेष प्रेम आहे.
शिवानी नाईक यांनी केलेली नाटके - Shivani Naik drama
मॅट्रिक
आता कसं करू
अखंड
पाझर
रंगबावरी
शिवानीने
अनेक एकानकीकांमध्ये कामे केलेले आहेत.त्याप्रमाणे एकांकिका स्पर्धा,नाट्य स्पर्धा
मधून आपल्या अभिनयाची छाप सोडलेली आहे.एकच वाडा नाट्य वाडा या नाट्यनिर्मिती संस्थेसोबत
शिवानीने अनेक नाटके केलेली आहेत.त्याचप्रमाणे नाट्य मल्हार या संस्थेसोबत देखील तिने
अनेक कामे केलेली आहेत.शिवानीने मॅट्रिक, आता कसं करू, अखंड, पाझर रंगबावरी या गाजलेल्या
नाटकांमध्ये कामे केलेली आहेत.
शिवानी यांना मालिके मधे काम करण्याची संधी - Shivani Naik serial chance
अहमदनगर
महाकरंडक या स्पर्धेत अंतिम फेरी दरम्यान अभिनेत्री, दिग्दर्शक, निर्माता असणाऱ्या
श्वेता शिंदे यांनी एक घोषणा केली. या स्पर्धेत सर्वोत्कृष्ट अभिनेत्री जी व्यक्ती
ठरेल ती त्यांच्या आगामी मालिकेमध्ये मुख्य अभिनेत्री म्हणून संधी देणार आहेत असे त्यांनी
सांगितले आणि अहमदनगर महाकरंडक या स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरली ती शिवानी
नाईक, आणि श्वेता शिंदे यांनी आपला शब्द पाळला. त्यांनी आपल्या येणाऱ्या वज्र प्रोडक्शन
च्या झी मराठीवरील मालिकेत त्यांना स्थान दिले.
शिवानी नाईक यांची मालिका - Shivani Naik serial
झी
मराठीवरील अप्पी आमची कलेक्टर या मालिकेतून मराठी मालिका क्षेत्रात शिवानी यांनी पदार्पण
केले. अप्पी आमची कलेक्टर ही शिवानी नाईक यांची पहिलीच मालिका.तसेच शिवानी नाईक यांचा
लवकरच सफरचंद हा चित्रपट येणार आहे.याचा पहिलं पोस्टर देखील आणि प्रोमो देखील रिलीज
झालेले आहे. मराठी चित्रपट सृष्टीत सफरचंद या चित्रपटापासून त्या लवकरच डेब्यूट करणार
आहेत.
शिवानी
नाईक यांच्या त्यांच्या रंग बावरी या नाटकासाठी तब्बल सहा पुरस्कार हे वैयक्तिक भेटले
होते. तसेच शिवानी नाईक या ढोल वादक आहेत.त्यांना वादनाची प्रचंड आवड आहे छत्रपती संभाजीनगर
येथील जय हिंद ढोल पथकात त्या आवर्जून वाजवण्यासाठी जातात.
अप्पी आमची कलेक्टर या मालिकेमधील भूमिका-
शिवानी
आपल्या भूमिकेविषयी सांगताना म्हणतात की ही भूमिका जबरदस्त प्रेरणादायी असणाऱ्या एका
मोठी संकल्पना ऊराशी बाळगून अनेक अडचणींवर मात करून ,आपलं ध्येय साकारणाऱ्या मुलीची
भूमिका आहे. ही भूमिका करताना प्रचंड आनंद होत आहे.
सोशल मीडिया - social media
शिवानी
नाईक या सोशल मीडियापासून कोसो दूर आहेत.शिवानी नाईक यांना सध्या इंस्टाग्राम वर सोळाशे
फॉलोवर्स आहेत. तर त्यांच्या फेसबुक वर अकाउंट देखील नाही.
शिवानी नाईक आपल्या नवीन मालिकेत अपीची भूमिका साकारत
आहेत.आप्पी आपल्या वडिलांच्या रिक्षात बसून आपल्या पुढचा अभ्यास करताना आपल्याला दिसत
आहे.शिवानी नाईक यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी, पुढील आयुष्यासाठी आणि त्यांच्या
नवीन मालिकेसाठी आपल्या दीपस्तंभ परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा आणि खूप सदिच्छा.