NSE आणि BSE म्हणजे काय? || What is NSE and BSE? In Marathi

NSE आणि BSE म्हणजे काय? || What is NSE and BSE? In Marathi

भारतात 2 मोठे स्टॉक एक्सचेंज आहेत.एक आहे NSE आणि दुसरा आहे BSE.

NSE म्हणजे नॅशनल स्टॉक एक्सचेंज आणि

BSE म्हणजे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज.

What is NSE and BSE in Marathi

आपल्यातील आता काही जणांना आता प्रश्न पडला असेल की नेमकं स्टॉक एक्सचेंज म्हणजे काय,स्टॉक एक्सचेंज म्हणजे अशी एक जागा असते तिथे स्टॉक ची खरेदी आणि विक्री होते.स्टॉक एक्सचेंज मध्ये बॉण्ड्स,corrancy, कॉमोडेतिज, डिटी,शेअर्स, स्टोकस, फ्युचर,ऑपशन,यासारख्या गोष्टीवर ट्रेड केले जातात.यासाठी कंपनी स्टॉक एक्सचेंज ला लिस्टड असं गरजेचे असते.2016 च्या अखडेवारी नुसार भारतातील ऐकून 24 स्टॉक एक्सचेंज आहेत,यामध्ये  नॅशनल स्टॉक एक्सचेंज,बॉम्बे स्टॉक एक्सचेंज,कोलकाता स्टॉक एक्सचेंज,जयपूर स्टॉक एक्सचेंज,हे काही आघाडी चे स्टॉक एक्सचेंज आहेत.

 

गमतीचा भाग म्हणजे 1982 साली पुणे शहरात देखील पुणे स्टॉक एक्सचेंज सुरू झाली होती.पुणे cb ने निर्णय दिल्यामुळे 2015 साली पुणे स्टॉक एक्सचेंज बंद झाली.सुरू झाले तेव्हा 1982साली पुणे स्टॉक एक्सचेंज केवळ 5 वर्षी ची मुदत दिली होती,परंतु त्यांची कामगिरी चांगली होत असताना त्यांना CB ने त्यांना वेळोवेळी मुदत वाढ दिली,पण CB 1 हजार कोट टर्न ओव्हर रुपयेची अट घातल्यामुळे पुणे स्टॉक एक्सचेंज ला ह्यातून बाहेर पडावे लागेल.कारण टर्न ओव्हर चया मानाने PSE चा टर्न ओव्हर खूपच कमी होता.

NSE आणि BSE दोन्ही मुंबई मध्ये आहेत,BSE ची स्थापना प्रेमचंद्र रॉय यांनी 1875 साली केली होती,आशियातील सर्वात पहिला आणि जुना स्टॉक एक्सचेंज म्हणून BSE कडे पाहिलं जात.जुन्या काळात सगळे ट्रेडर्स एक जागा ठरवून  सगळे invester,traders एकत्र येत असत,आणि शेअर्स ची खरेदी विक्री करत असत.बॉम्बे स्टॉक एक्सचेंज सध्या मुंबई च्या दलाल स्ट्रीट वर आहे.BSE च जून नाव द नेटिव्ह शेअर अँड स्टॉक ब्रोकर असोसिएशन अस होत.1986 मध्ये BSE ने ऐकूव्हिटी इंडेक्स सेन्सेक्स ची सुरवात केली. 10 वेगवेगळ्या क्षेत्रातील30 कंपनीच्या यामध्ये समावेश करण्यात आला.सेन्सेक्स सह BSE चे अजून महत्त्वाचे इंडेक्स म्हणजे, बीएसई 100,बीएसई 200,बीएसई500,बीएसई मिडकॅप, बीएसई स्मॉल कॅप, बीएसई पीएसयु,बीएसई ऑटो,बीएसई फार्मा,बीएसई एफ एम सीजी,बीएसई मेटल, हे देखील आहेत.BSE हे जगातील सगळ्यात महागड्या स्टॉक एक्सचेंज मध्ये पहिल्या10 नंबर मध्ये येतंय.BSE मध्ये एकविडीटी,इक्विडीटी डेरेवटीव्ही,कामोडेटीव्ही,करशी डेरेवटीव्ही स सर्व्हिसेस दिल्या जातात.

 

BSE मध्ये 7400 पेक्ष्या जास्त कंपन्या लिस्टड आहेत.BSE च्या नंतर तब्बल 120 वर्षांनी NSE ची स्थापना झाली.NSE च कार्यालय बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स मध्ये आहे.NSE सुरवात जरी 1992 साली झाली असली तरी त्याच कामकाज खऱ्या अर्थाने 1994 साली सुरू झाले.1995 आणि 1996 मध्ये निफ्टी फिफ्टी या इंडेक्स ची NSE ने सुरवात केली.निफ्टी फिफ्टी मध्ये तगड्या 50 कंपन्या चा समावेश होता.निफ्टी च्या अन्य इंडेक्स समावेश होता निफ्टी नेक्स्ट 50,निफ्टी 500,निफ्टी मिडकॅप 150,निफ्टी स्मॉलकॅप 250,निफ्टी मिडस्मॉलकॅप 250,यांच्या समावेश होतो.NSE लवकरच आपला ipo घेऊन येणार आहेत आणि त्याची ते घोषणा देखील लवकरच करतील.

NSE मध्ये 1790 पेक्ष्या जास्त कंपन्या लिस्टड आहेत.NSE जगाच्या महत्वाच्या आणि महागड्या स्टॉक एक्सचेंज मध्ये 11 वा नंबर लागतो.NSE स्थापने नंतर ट्रेडिंग ची सगळी प्रोसेस कॉम्पुटर रिझड करण्यात आली.खूप वर्षां पूर्वी शेअर विक्री साठी खूप वेळ जात होता.अगदी सहा सहा महिने देखील जात होते.पण NSE च्या स्थापने नंतर काही मिनिट ते काही सेकडांत खरेदी विक्री होत आहे.BSE इतकी जुनी कंपनी असून देखील त्यांनी कॉम्पुटरीज्ड होण्यासाठी नकार दिला होता,परंतु NSE नंतर ते सुद्धा कॉम्पुटरीज्ड झाले.NSE आणि BSE यांनी CB चे नियम लागू होतात.म्हणजेच सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया. CB ची स्थापना भारत सरकारने केली,स्टॉक मार्केट मध्ये काही वर्षानी पूर्वी काही चुकीच्या गोष्टी घडल्या होत्या,त्यांना पायबंद घालण्यासाठी सरकारने CB ची स्थापना केली.34 ते 35 वर्ष आधी म्हणजे1988 साली CB ची स्थापना झाली.CB च मुख्यालय सुद्धा मुंबई मध्ये आहे.बँकेवर नियंत्रण ठेवण्यासाठी जस RBI काम करत तस स्टॉक एक्सचेंज वर नियंत्रण ठेवण्यासाठी CB काम करत.

BSE आणि NSE च मार्केट कॅपिटलईझेशन (NSE and BSE Market Capitalization)

मार्केट कॅपिटल लाईझेशन म्हणजे स्टॉक एक्सचेंज मध्ये लिस्ट झालेल्या सर्व कंपन्या ची शेअर्स ची ऐकून किंमत NSE ची सद्याची मार्केट कॅपिटल लाईझेशन 199 ट्रेलियन रुपये वरती इतकी आहे.BSE कॅपिटल लसिझेशन 266 ट्रीलियन रुपये च्या वर गेलेली आहे.BSE ची अधिकृत वेबसाईट bseindia.com ही आहे. आणि NSE ची अधिकृत वेबसाईट nseindia.com आहे.BSE चा नरीदेशांक सेन्सेक्स म्हणून ओळखला जातो. तर NSE चा निर्देशांक हा निफ्टी म्हणून ओळखला जातो.असे हे NSE आणि BSE आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने