गोल्डबीज म्हणजे काय? || What is Gold BeES in Marathi? How to Invest in it?

गोल्डबीज म्हणजे काय? || What is Gold BeES in Marathi? How to Invest in it?

तुम्ही म्हणाल नक्की नीफ्टीबीज, बँकबीज, गोल्डबिज यापैकी नक्की काय घेऊ, तर असे आहे जर तुम्ही निफ्टीबीज आणि बँकबीज यामध्ये जर पैसे लावत असाल तर त्याबरोबरच तुम्ही गोल्डबीज सुद्धा घेत चला याचं कारण काय, जेव्हा निफ्टी बीज आणि बँक बीज खाली पडतील तेव्हा तुमचा पोटपोलीओ गोल्डबीज सांभाळतील. तुम्हाला होणारी नुकसान जे आहे ते थोडे फार प्रमाणात गोल्डबिज मधून भरून निघेल.

what is gold bees in marathi

एक सेक्टर मायनस मध्ये गेला तर दुसऱ्या सेक्टर मार्केटला सपोर्ट देतो. तशाच प्रकारे तुमच्या  पोटपोलीओ ला सुद्या गोल्डबिज चा सपोर्ट मिळेल. पण पुन्हा एकदा सांगतो तुमची गुंतवणूक कमीत कमी पाच वर्षांसाठी हवी ,त्यापेक्षा जास्त वर्षानसाठी असेल तर उत्तमच.आणि एक रकमी पैसे तुम्ही यामध्ये टाकू नका त्यापेक्षा थोडे थोडे पैसे यामध्ये गुंतवत चला. नाही तर आजच खूप प्रमाणात खूप प्रमाणात buy कराल आणि नंतर मायनस मध्ये गेल्यानंतर पैसा पाण्याने सांगितले म्हणून दोष देत बसाल. आता गोल्डबीज तर buy कराल पण जे buy करताय ते नक्की काय आहे हे पण समजून घेतले पाहिजे.

गोल्डबीज हा सुद्धा निफ्टीबीज आणि बँकबीज प्रमाणे एक ईटीएफ आहे जो गोल्ड मध्ये गुंतवणूक करतो.आता सोन्यात तुम्ही लॉन्ग टर्म गुंतवणूक करून तुम्हाला फायदा होईलच याची शाश्वती तुम्हाला नसते, म्हणूनच तुम्ही फक्त गोल्ड बीज लॉन्ग टर्म साठी घेऊ नका त्यापेक्षा गोल्ड बीज हे निफ्टी आणि बँकबीज ला सपोर्ट म्हणून तुम्ही विकत घेऊ शकता.

जे लोक नियमितपणे ट्रेडिंग करतात त्यांना हेजिंग ही टर्म माहिती असते. म्हणजे एक कॉल घेतला तर त्याच्या विरुद्ध दिशेचा put घेऊन आपली रिस्क तुम्ही कमी करत असता. जसे ट्रेडिंग मध्ये हेजिंग केलं जात तसेच गुंतवणूक मध्ये हॅजिंग केले तर काय वाईट आहे.जर तुम्हाला शॉर्ट टर्म मधे लॉस दिसला तर तुमचा लॉस कमी करण्यासाठी याचा नक्कीच फायदा होतो.

What is Gold BeES?

गोल्ड बीज म्हणजेच nippon इंडियाचा ETF हे सर्वांना माहीतच आहे याला पर्याय म्हणून एचडीएफसी, कोटक, आयसीआयसीआय यांचे सुद्धा गोल्ड एटीएफ आहेत आणि आपण निफ्टी आणि बँक बीज जेव्हा बघितले होते तेव्हा ते Nippon चे पाहिले होते त्यामुळे गोल्डबीज देखील आपण त्यांचेच पाहुयात.

गोल्डबीज या फंड ची सुरुवात मार्च 2007 साली झाली होती. यामध्ये 98.64 टक्के होर्डिंग हे गोल्डचे असते. या फंडणे मागे दहा वर्षांमध्ये 4.56% परतावा दिलेला आहे.याच कॅटेगरी चा मागील दहा वर्षाचा परतावा 4.25 टक्के इतका आहे. हा फंड चालू झाल्यापासून त्यांनी 5.73 टक्के परतावा दिलेला आहे.

जरी तुम्हाला एक रकमी गुंतवणूक यामधे करायची असेल तरी त्याला पर्याय म्हणून तुम्ही sovereign gold bonds स्कीम आहेत त्यामध्ये गुंतवणूक करू शकता.sovereign gold bonds ही स्कीम भारत सरकार द्वारा चालवली जाते.

sovereign gold bonds म्हणजे काय, ते कसे विकत घ्यायचे हे प्रश्न पडले असतील. हे आपण नंतर पाहणार आहोत. गोल्डबीज आणि ETF मध्ये गुंतवणूक करण्याचे अनेक फायदे आहेत. जसे की हा एटीएफ लिक्विड फंड आहे, त्यामुळे कधीच विकत घेताना किंवा विकताना तुम्हाला लिक्विडिटी ची समस्या येत नाही. तुम्ही बाजारातून सोने विकत घेण्यापेक्षा गोल्ड बिज विकत घेऊ शकता. हे घेतल्यावर ते कुठे ठेवायचे, तसेच चोरीला गेले तर काय याची काळजी तुम्हाला अजिबात स्तवणार नाही. डिजिटल स्वरूपात मध्ये तुमच्या डिमॅटला हे गोल्डबीज सुरक्षित असते.यामध्ये तुम्ही कधीही बाय किंवा सेल सुद्धा करू शकता. तसेच तुम्ही हा एटीएफ तुम्ही ब्रोकर account वरून विकत घेत असल्यामुळे तो इतर स्टॉक प्रमाणे तुम्ही तुमच्या पोर्टफोलिओ मध्ये तुम्ही ट्रॅक करू शकता. पण गोल्डबीज विकत घेण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तुमचे डिमॅट अकाउंट असणे आवश्यक आहे.

जर तुम्ही ब्रोकर अकाउंट मधून विकत न घेता एसआयपी केले तरी तुम्हाला एक्सप्रेस रेशो कमी राहतो. यामध्ये कुठलाही एक्झिट लोड नसल्यामुळे तुम्ही कधीही तुम्ही जी गुंतवणूक केलेली आहे ती रक्कम तुम्ही काढून घेऊ शकता.

 

गोल्ड बीज वर टॅक्स किती लागतो? - Tax on Gold BeES

गोल्डबीज चे भारतातील टॅक्सेशन जे आहे ते equity म्युच्युअल फंडा सारखा होतो.एक वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी म्हणजे शॉर्ट टर्म साठी तुम्हाला गेन मिळाला असेल तर त्यासाठी पंधरा टक्के टॅक्स लागतो. हेच लॉंग टर्म साठी तुम्हाला दहा टक्के टॅक्स लागतो. लॉंग टर्म कॅपिटल गेन जर एक लाख रुपयांपर्यंत असेल तर त्यावरती टॅक्स लागत नाही.त्यापेक्षा जास्त टॅक्स असेल तर त्यावरती टॅक्स तुम्हाला लागेल.

 डिव्हिडंट वर तुम्हाला तुमच्या टॅक्स लॅब नुसार टॅक्स तर लागतोच त्याशिवाय वर्षाला मिळणारा डिव्हिडंट हा पाच हजार रुपये पेक्षा जास्त असेल तर त्यावर तुम्हाला दहा पर्सेंट tds सुद्धा कापला जातो. तर ही होती गोल्डबीज बद्दल तुम्हाला हवी असणारी सर्व माहिती.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने