अमेय वाघ बायोग्राफी || Amey Wagh Biography Marathi
आज
मराठी चित्रपट सृष्टीतील अशा एका ऑलराऊंडर अभिनेता विषयी जाणून घेणार आहोत जो सर्व
क्षेत्रात काम करतो आणि जिथे जिथे तो काम करतो तिथे त्याची व त्याच्या अभिनयाची छाप
नक्कीच सोडतो. ज्याच्या वागण्यात आहे एक वेगळाच स्वाग तो म्हणजे आपल्या सर्वांचा अमेय
वाघ.
आज आपण अमेय वाघ यांच्या विषयी जाणून घेणार आहोत.अमेय वाघ यांनी आजपर्यंत नाटक, मालिका, चित्रपट ,वेब सिरीज, शॉर्ट फिल्म्स, अँकरिंग आणि युट्युब अशा सर्व क्षेत्रात आपल्या अभिनयाची छाप सोडलेली आहे. सध्या अमेय वाघ यांचे नाव भलत्या चर्चेत आहे. नेहमीच वेगवेगळे प्रयोग करणारे अमेय वाघ यांनी आंनखिन एक भलताच खतरनाक प्रयोग केलेला आहे.
मराठी
चित्रपट सृष्टीतील पहिला झोंबी पट म्हणजे पहिला झोंबिंवर आधारित चित्रपट यामध्ये अमेय
वाघ यांनी काम केलेले आहे आणि त्यांच्या अभिनयाची चर्चा ही सर्वत्र होत आहे. आज आपण
अमेय वाघ यांच्या बालपणीपासून ते अभिनय होण्यापर्यंतच्या सर्व गोष्टी पाहणार आहोत.
Amey Wagh Biography Marathi, Lifestyle,
Birthdate, BirthPlace, Education, Career, Hero, Acting, Television Career,
Family, Wife, Girlfriend, Social Media
अमेय वाघ जन्म आणि शिक्षण – Amey Wagh Birth and Education
अमेय
वाघ यांचा जन्म महाराष्ट्र राज्यातील पुणे या शहरात 13 नोव्हेंबर 1987 रोजी झाला. अमेय
यांनी आपले शालेय शिक्षण हे पुण्यातील पक्रेसेंट हायस्कूल येथून पूर्ण केले तर आपले
कॉलेजचे शिक्षण त्यांनी बीएमसीसी कॉलेज पुणे येथून पूर्ण केले आहे. अमेय यांनी बीकॉम
डिग्री देखील घेतलेली आहे.
अमेय वाघ अभिनय कारकिर्दीची सुरुवात – Amey Wagh Acting Career
अमेय
यांना अगदी लहानपणापासूनच आयुष्याचे व्हिजन क्लिअर होते. त्यांना अभिनेता व्हायचे होते
हे त्यांनी अगदी लहानपणापासूनच ठरवलेले होते. ते शाळेत असताना आपल्या उन्हाळ्याच्या
सुट्टीत ते वेगवेगळ्या बाल नाटकात वेगवेगळ्या रंगभूमीवर ते काम करत असे.
आपल्या
बालपणीच्या आठवणींना उजाळा देत अमेय नेहमी सांगतात की त्यांच्या एक्टिंग च्या करिअरला
त्यांच्या आई-बाबांनी फार सपोर्ट केला. त्यांच्या आई-बाबांमुळे च ते आज इथ पर्यंत पोचू
शकले आणि एक अभिनेता होऊ शकले. लहान असताना कुठलाही नाटकाला जाताना किंवा कुठल्याही
ऑडिशनला जाताना अमेय त्यांच्या आई-वडिलांसोबत त्यांच्या बाईकवर ट्रिपल सीट जात असे
हे देखील त्यांनी आवर्जून सांगितले.
अमेय वाघ चित्रपट कारकिर्दीची सुरुवात – Amey Wagh Film Career
भरपूर
लोकांना वाटते की अमेय यांनी आपल्या चित्रपट कारकिर्दीची सुरुवात ही 2013 साली आलेल्या
पोपट या मराठी चित्रपटापासून केली होती परंतु हे सत्य नसून अमेय यांनी आपल्या अभिनयाची
कारकीर्दीची सुरुवात ही 2008 साली आलेल्या जोशी की कांबळे या मराठी चित्रपटापासून केली
होती. त्यानंतर अमेय यांनी लगेच आईचा गोंधळ हा देखील मराठी चित्रपट केलेला होता. त्यानंतर
मात्र 2009 साली आलेल्या शाहरुख खान आणि इरफान खान यांच्या बिल्लू या सुपरहिट चित्रपटापासून
अमेय यांनी हिंदी चित्रपट सृष्टीत पदार्पण केले.
अमेय
ने आतापर्यंत मराठीमध्ये पोपट, शटर, घंटा, मुरांबा,फास्टर फेणे, गर्लफ्रेंड, धुराळा
,जग्गू अँड जुलियन सुपरहिट असलेला झोंबिवली हे चित्रपट केलेले आहेत.त्यापैकी मुरंबा
या चित्रपटातून अमेय वाघ यांनी प्रथमच मुख्य लीड रोलची भूमिका साकारली होती. तसेच या
चित्रपटात त्यांच्यासोबत माधवी भिवटे ,मिथिला पालकर यादेखील होत्या.
मीथिला
पालकर आणि अमेय वाघ यांची ऑन स्क्रीन जोडी जेवढी हिट ठरली त्यापेक्षा जास्त त्यांची
ऑफलाईन्स केमिस्ट्री जास्त हिट ठरली.
त्यांच्या
अफेअरच्या चर्चा हे दिवसा गणिक वाढतच होत्या आणि त्यांच्या अफेरच्या चर्चांना अक्षरशा
उधाण आलेले होते. अमेय यांनी हिंदीमधील अय्या या चित्रपटापासून आपली ओळख निर्माण केली
आणि त्यानंतर त्यांनी हायझॅक या हिंदी चित्रपटात देखील काम केले.तसेच अमेय यांनी आणखी
एक हिंदी चित्रपटात काम केलेले आहे आणि तो हिंदी चित्रपट लवकरच येणार आहे त्याचे नाव
म्हणजे गोविंद नाम मेरा.
अमेय
वाघ टेलिव्हिजन यश- Amey Wagh Television Career
अमेय
वाघ हे नाव महाराष्ट्रात घराघरात पोहोचले ते वर्ष होते 2015 साल. 2015 साली आलेल्या
दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेत त्यांनी साकारलेली कैवल्य कारखानिस ही भूमिका अक्षरशा
प्रेक्षकांनी डोक्यावर उचलले. त्यानंतर अमेय यांनी दिल दोस्ती दुनियादारीचा सीजन दोन
म्हणजेच दिल दोस्ती दुबारा यात साहिल ही भूमिका साकारली. अमेय यांनी आतापर्यंत या दोनच
मालिकेतून कामे केलेली आहेत.
अमेय वाघ वेब सिरीज – Amey Wagh Webseries
काहीतरी
वेगळे करावे या विचारातून अमेय वाघ यांनी कास्टिंग काऊच विथ अमेय अँड निपुण ही वेब
सिरीज काढली. या सिरीजमुळे आम्ही हे फार प्रकाश झोट्यात आला.यात मोठ मोठ्या कलाकारांनी
हजेरी लावली आणि या वेब सिरीजचा ते भाग बनले.तसेच 2017 आलो आलेली बॉयगिरी ही सिरीज
देखील अमेय यांनी केली आणि 2019 साली अमेय वाघ झळकले ते मच अवेटेट वेब सिरीज ऑफ इंडिया
सक्रेड गेम च्या सिजन 2 मध्ये ते झळकले.त्यानंतर ब्रोचारा आणि 2020 ची सगळ्यात पॉप्युलर
आणि सगळ्यात दमदार वेब सिरीज असूर यामध्ये देखील त्यांनी काम केलेले आहे. तसेच लवकरच
येणाऱ्या असूर टू मध्ये आपल्याला अमेय वाघ दिसतील. तसेच त्यांनी एम एक्स प्लेयर आणि अल्ड बालाजीने बनवलेल्या
कारटेल या सिरीज मध्ये देखील त्यांनी काम केलेले आहे.नुकतीच प्रदर्शित झालेली सोणी
लाईव्ह वरील कारखानिसंची वारी यात देखील अमेय
वाघ यांची खूप छान भूमिका आहे. आणि सगळ्यात मोठी वेब सिरीज ही त्यांची फेब्रुवारी महिन्यात
2022 मध्ये येत आहे ती म्हणजे तीहमानशू धुलिया यांनी बनवलेली ग्रेट इंडियन मर्डर ही वेब सिरीज चार फेब्रुवारीला
येणार आहे आणि यामध्ये अमेय वाघ यांची महत्त्वाची भूमिका आहे.
आपल्या
सर्वांनाच माहिती आहे की अमेय वाघ यांना रंगभूमीवर म्हणजेच नाटकात काम करायची फार आवड
होती. अमेय वाघ यांनी आज पर्यंत सायकल ,दळणवळण ,गेली 21 वर्ष ,नटसम्राट, द गव्हर्मेंट
इन्स्पेक्टर ,कटार काळजात घुसली ,लिव्हरमेंट आणि सर्वात गाजलेले लोकप्रिय नाटक म्हणजे
अमर फोटो स्टुडिओ या नाटकांमध्ये काम केलेले आहे.आम्ही वाघ यांना बेस्ट अॅक्टर लीड
रोल याचा फिल्मफेअर पुरस्कार देखील त्यांच्या मुरंबा या चित्रपटासाठी भेटलेला आहे.
अमेय वाघ लग्न – Amey Wagh Marriage & Wife
मुरंबा
चित्रपटातील त्यांची नायिका असलेली मिथिला पालकर या दोघांच्या अफेअरच्या चर्चा अक्षरशा
उधाण आनलेले होते. परंतु अमेय भाग यांनी अचानक एक बॉम्ब टाकला. अमेय वाघ यांनी फेसबुकच्या
पोस्टच्या माध्यमातून सर्वांचे लक्ष वेधून घेतले ते म्हणजे तेरा वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये
असलेली त्यांची गर्लफ्रेंड साजिरी देशपांडे यांच्यासोबत ते लवकरच विवाहात अडकणार आहेत.
आणि अखेर 2 जुलै 2017 साली अमेय वाघ यांनी साजरी सोबत आपली लग्न गाठ बांधली.तसेच अमेय
वाघ यांनी अमर फोटो स्टुडिओ या नाटकाचे दोन प्रयोग होते त्याची संपूर्ण कमाई ही सी
एम रिलीफ फंडात डोनेट केलेली आहे.
अमेय वाघ यूट्यूब चॅनल – Amey Wagh Youtube Channel
अमेय
वाघ हे एक युट्युब वर देखील असून त्यांचा एक स्वतःच एक युट्युब चॅनेल आहे. त्याचे नाव
म्हणजे “वाघ चा स्वाग (Wagh cha Swag)” या चॅनलला आजवर 47.7 K सब्सक्राइबर म्हणजे
47 हजार 700 सबस्क्राईब असून यावर आतापर्यंत 25 व्हिडिओ अपलोड केलेले असून या चॅनेलला
टोटल views हे 21 लाख आहेत.
अमेय वाघ होस्ट केलेले शो -Amey Wagh as a Host
अमेय
वाघ हा चांगला अभिनेता तर आहेच तर चांगला उत्तम असा होस्ट देखील आहे. अमेय वाघ यांनी
आजपर्यंत खूप शो होस्ट केलेले आहेत. त्यापैकी झी मराठी अवॉर्ड, सुपर डांसर महाराष्ट्र,फिल्मफेअर
मराठी अवॉर्ड,मिसेस अन्नपूर्णा, टू म्याड इत्यादी शो त्यांनी यशस्वी रित्या होस्ट केलेले
आहेत. तसेच प्रसिद्ध युट्युब चॅनेल भडीपा म्हणजे भारतीय डिजिटल पार्टी याचा देखील अमेय
वाघ ऐक भाग आहेत.
अमेय वाघ सोशल मीडिया आणि फॅन्स – Amey Wagh Social Media & fans
अमेय
वाघ सोशल मीडियावर प्रचंड ऍक्टिव्ह असतात त्यांना सध्या इंस्टाग्राम वर 508 के म्हणजेच
पाच लाख आठ हजार फॉलोवर्स आहेत.मराठीतील पहिला झोंबी चित्रपट म्हणजेच झोंबिवली यात
त्यांनी केलेल्या अभिनयाचे विशेष कौतुक होत आहे . यात त्यांनी सुधीर ही भूमिका साकारलेली
आहे आणि हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात धुमाकूळ घालत आहे .अमेय वाघ यांना पुढील वाटचालीसाठी
दीपस्तंभ परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा आणि असेच वेगवेगळे प्रयोग आणि चित्रपट तुमच्याकडून
बघायला भेटू हीच तुमच्याकडून अपेक्षा.