अजय पुरकर बायोग्राफी || Ajay Purkar Biography Marathi
आज आपण अशा एका अभिव्यक्ती विषयी जाणून घेणार आहोत जो की एक दर्जेदार अभिनेता तर आहेच त्यासोबतच उत्तम गायक देखील आहे .तसेच ते वकील क्षेत्र देखील काम करत होते.ऐतिहासिक भूमिका म्हटले की त्यांचे वेगवेगळे भूमिका आपल्या समोर उभे राहतात आणि सध्या महाराष्ट्रभर पावनखिंड या चित्रपटापासून त्यांच्या सगळीकडे जोरदार चर्चा चाललेली आहे.ते म्हणजे अजय पुरकर.
आज आपण अजय पुरकर यांच्या विषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. ऐतिहासिक भूमिका म्हटले की आपल्या डोळ्यासमोर अजय पुरकर हे नाव उभे राहते .अजय पुरकर यांनी आपल्या दर्जेदार अभिनयातून आजवर अनेक ऐतिहासिक भूमिकाना न्याय दिलेला आहे.आज आपण जाणून घेऊया अजय पुरकर यांच्या वकिलीपासून ते अभिनेता होण्यापर्यंतचा संपूर्ण प्रवास.
Ajay Purkar Marathi Charitra, Ajay Purakar Marathi information, Ajay Purkar Lifestyle, Ajay Purkar AKA Bajiprabhu Deshpande, Pavankhind Bajiprabhu Actor Name
जन्म आणि शिक्षण – Ajay Purkar Birth and Education
अजय पुरकर यांचा जन्म 16 सप्टेंबर 1976 रोजी महाराष्ट्र राज्यातील पुणे या शहरात झाला.त्यांचे वडील हे बँकेत नोकरीला असल्याने त्यांनी आपले सुरुवातीचे शिक्षण हे मुंबई येथे घेतले. परंतु आपल्या आईच्या आजारपणामुळे पुन्हा ते आपल्या आईजवळ पुण्यात आले, व त्यांनी आपले शालेय शिक्षण हे सेट दगडू राम कटारिया हायस्कूल पुणे येथून पूर्ण केले. तसेच आपले कॉलेजचे शिक्षण त्यांनी एमइएस गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्स पुणे येथून पूर्ण केले. आणि आपल्या वकिलाचे शिक्षण हे सिम्बॉल्सिस लॉ कॉलेज येथून पूर्ण केले आणि एलएलबी ही डिग्री घेतलली.
गाण्याची आवड – Ajay Purkar Singing Hobby
अजय यांना अगदी बालपणापासूनच अभिनयाची आणि गाण्याची प्रचंड आवड होती.शाळेत असतानाच इयत्ता आठवी पासूनच त्यांना आपल्या अभिनयाची आवड जडली होती. आपल्या गाण्याच्या आवडीविषयी सांगताना अजय म्हणतात की त्यांच्या आईला गाण्याची प्रचंड आवड होती आणि त्यांच्या आईला गाणे शिकवण्यासाठी त्यांचे आजोबा त्यांच्या घरी येत असे म्हणूनच अगदी बालपणापासूनच अजय पुरकर यांच्यावर गाण्याचे संस्कार झाले.गाण्याचा एक क्लास त्यांनी बराच काळ केल्यानंतर त्यांनी पाच वर्ष पुण्यातच राम माटे यांच्याकडे गाण्याची तालीम घेतली. त्यानंतर त्यांच्या वडिलांसोबतच तब्बल पंधरा वर्षे काम करत असणारे पंडित विजय सरदेशमुख जे की पंडित कुमार गंधर्वचे शिष्य देखील होते, त्यांच्याकडे अजय पुरकर यांनी गाणे शिकले. त्यानंतर अजय यांनी एलएलबी चे शिक्षण घेतल्यानंतर आपली पुढील शिक्षण एलएलएम ला देखील सुरुवात केली, आणि त्यासोबतच ते वेगवेगळ्या गाण्यांचे, सुगम संगीताचे आणि शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम घेऊ लागले.परंतु यामधे त्यांच्यामध्ये जो दडून बसलेला अभिनेता होता हा मात्र अस्वस्थ होता.परंतु हा अभिनेता फार काळ आत्स्वस्त राहिला नाही आणि त्यांनी आपल्या अभिनयाचा जलवा हा सर्वांना दाखवलाच.
अभिनय कारकिर्दीची सुरुवात – Ajay Purkar Acting Career
अजय पुरकर यांनी आपल्या चित्रपट कारकीर्दीची सुरुवात ही 2008 साली आलेल्या कदाचित या मराठी चित्रपटापासून केले होते.या चित्रपटात त्यांनी पोलीस इन्स्पेक्टर ची भूमिका साकारली होती .त्यांच वकिलीचा पेशा खूप चांगला चालला होता ,परंतु वकिली करायची की अभिनय करायचा या त्यांचा फार चल बीचाल होत होता आणि कुठला निर्णय घ्यावा हे देखील त्यांना समजत नव्हते.त्यानंतर उजाडले ते 2009 हे वर्ष . 2009 साली असंभव या मालिकेसाठी अजय पुरकर यांना एक रोलची ऑफर आली. या मालिकेत त्यांनी इन्स्पेक्टर वालझरवार हे पात्र निभावले .आणि या मालिकेत त्यांचा डेब्यू झाला यातूनच त्यांनी मराठा मराठी मालिका क्षेत्रात पदार्पण केले .आणि असंभव या मालिके साठी त्यांना पदार्पणातच झी मराठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार देखील भेटला.ही मालिका प्रचंड गाजली त्यानंतर त्यांनी गुंतता हृदय हे यात देखील एका डिटेक्टिव्ह ची भूमिका साकारली होती. आता मात्र अजय यांना खूप कॉन्फिडन्स आला होता आणि त्यांनी आपले संपूर्ण लक्ष हे अभिनय क्षेत्राकडे वळवले.
अजय
पारकर यांनी आपल्या हिंदी चित्रपटाचा डेब्युट 2012 साली आलेली फरारी की सवारी या चित्रपटातून
केला. तसेच त्यानंतर त्यांनी 1 वर्षातच आपला पुढील हिंदी चित्रपट अल्गी 2013साली प्रदर्शित
झाला आणि यात त्यांनी देखील उत्तम भूमिका साकारली होती. अजय पुरकर यांनी 2013 साली
सारेगमप च्या कलाकार पर्वात देखील भाग घेतला होता. आणि यात ते आंतीम फेरीत देखील पोहोचले
होते. याचवर्षी त्याच घाशीराम कोतवाल हे पहिले वहिले व्यावसायीक नाटक देखील आल होत.तसेच
अजय पूरकर यांनी 2021साली आलेल्या सोनी मराठी वरील singing Star या कार्यक्रमात देखील
भाग घेतला होता.हा कार्यक्रम सेम 2013साली आलेल्या सारेगमप या कलाकार परवसारखास सारखाच
होता.यात देखील वेगवेगळ्या सेलिब्रिटी नी गाण्याचे कौशल्य दाखवले होते.
टीव्ही मालिका आणि पिक्चर – Ajay Purkar Television and Movies
अजय पूरकर यांनी आजवर भरपूर टीव्ही मालिका मधे कामे केलेली आहेत. तू तिथे मी,अस्मिता,तू माझा सांगाती,सख्या रे आणि अलिकडीलच राजा राणी ची ग जोडी, ज्ञानेश्वर माऊली,मुलगी झाली हो या मालिका मधून आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे. अजय यांनी आजवर प्रेमाची गोष्ट, संघर्ष,बंदी शाळा, बालगंधर्व, भाई व्यक्ती की वल्ली,मुळशी पॅटर्न,फर्जंद, फत्तेशिकास्त आणि आता महाराष्ट्रात धडाक्यात चालू असलेला पावनिंड या प्रसिद्ध मराठी चित्रपटातून कामे केलेली आहेत. यामधील त्यांचे फर्जंद, फत्तेशिकास्त आणि पावनिंड यातील येईतीहासिक भूमिका प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलेल्या आहेत.तसेच मुळशी पॅटर्न या चित्रपटात त्यांनी साकारलेली शिंदे बिल्डर या भूमिकेचे देखील प्रेक्षकांनी फार कौतुक केलेले होते.
अजय पूरकर यांनी मराठी रंगभूमीवर देखील भरपूर नाटके केलीली आहेत. त्यामधे धाई अक्षर प्रेम के, कोड मंत्र,सांगाती सोबदर,नांदी आणि ऑपरेशन जटायू ही त्यांची काही गाजलेली नाटके. 2021 मधे आलेल्या कोलार बॉम्ब आणि द पॉवर या हिंदी चित्रपटात देखील अजय यांनी कामे केलेली आहेत.हे चित्रपट थेटर मधे प्रदर्शित न होता डायरेक्ट डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाले होते त्यामुळे हा त्यांचा डिजिटल क्षेत्रातील डेब्यूट असे देखील म्हणतात येईल. तसेच अजय यांनी द रायकर केस या वेब मधे देखील काम केलेले आहेत.
लग्न आणि फॅमिली – Ajay Purkar Marriage and Family
अजय पुरकर यांनी मेधा पुरकर यांच्याशी आपली लग्न गाठ बांधली. मेधा या शिक्षिका असून मेधा पुरकर आणि अजय पुरकर यांना एक मुलगी देखील आहे व तिचे नाव सई पुरकर असून ती आता आपले शिक्षण पूर्ण करत आहे. अजय यांच्याकडे माया नावाची पमलियान प्रजातीची कुत्री देखील आहे आणि ते मायाला आपल्या घरच्या सदस्या प्रमाणे वागवतात. व घरातील ऐक सदस्यच मानतात. अजय पुरकर यांना अभिनया सोबतच गाण्याची प्रचंड आवड आहे हे आपल्या सर्वांना माहीतच असून आपल्या रिकामी वेळात अजय यांना गाण्याचा रियाज करण्यास,पुस्तके वाचण्याची देखील प्रचंड आवड असून ते कधीकधी स्वयंपाक देखील करतात. तसेच त्यांची जी बुलेट बाईक आहे तिची देखील फावल्या वेळात ते काळजी घेतात आणि तिची निगा राखतात.
सोशल मीडिया साईट – Ajay Purkar Social Media Life
अजय यांना सोशल मीडिया साइटवर जास्त इंटरेस्ट नसून ते सोशल मीडिया साइटवर फार कमी अक्टिव असतात. आणि त्यांची 3/4 अकाउंट असून पण त्यांचं सद्या एक अकाउंट Instagram वर आहे व त्याला 6.7 के followers म्हणजे 6 हजार 700 followers आहेत. अजय यांनी लॉकडॉऊन च्या काळात पाच चा चहा हा कार्यक्रम देखील ऑनलाईन चालू केला होता आणि या कार्यक्रमाला प्रचंड सेलिब्रिटी नी आणि वेगेगळ्या स्टार्स नी गर्दी केलेली होती आणि त्यात सहभाग देखील घेतला होता. हा कार्यक्रम देखील फार चाललेला होता.
पावनखिंड
या चित्रपटातून अजय यांनी बाजीप्रभू देशपांडे यांची भूमिका साकारली आहे. संपूर्ण महाराष्ट्रात
सद्या अजय पुरकार या नावाची चर्चा होत असून अजय यांनी बाजीप्रभू यांची भूमिका इतकी
खरोखर साकारली आहे की जसे की बाजीप्रभूच अजय यांच्या मधे अवतरले असून किंव्हा बाजीप्रभू
च आपल्या समोर सक्षात युद्ध करत आहेत असे वाटत आहे.
तर
असा होता एक अभिनेता, एक गायक आणि एक वकील असलेल्या अजय पुरकर यांचा प्रवास.