अक्षय मुडावदकर बायोग्राफी | Akshay Mudawadkar Biography Marathi

अक्षय मुडावदकर बायोग्राफी | Akshay Mudawadkar Biography Marathi

भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आणि अशक्य हे शक्य करतील ते स्वामी, हे दोन शब्द आपल्या कानावर पडल्यास लहान, मोठे, थोर कोणाच्याही कानावर हा शब्द पडल्यास एक छबी डोळ्यासमोर उभी राहते ती छबी म्हण,जे श्री स्वामी समर्थ यांची. आज आपण कलर्स मराठी वरील जय जय स्वामी समर्थ या मालिकेत स्वामींची भूमी का साकारणाऱ्या अभिनेत्याविषयी जाणून घेणार आहोत. ते अभिनेते म्हणजे अक्षय मुडावदकर. अक्षय यांच्या विषयी आज आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.

अक्षय मुडावदकर बायोग्राफी | Akshay Mudawadkar Biography Marathi

Akshay Mudawadkar AKA Swami Samarth information Marathi, colors marathi Swami samarth Actor marathi biography, Akshay Mudavadkar Information in marathi, Biography, family Life, Career, Education, Wife, Girlfriend, BirthDate

अक्षय यांचा परिवार देखील स्वामी भक्त आहेत. त्यांची आजी देखील स्वामींची सेवेकरी आहे आणि स्वामींची मोठी भक्त आहे. अक्षय यांना हा रोल भेटन्या मागे स्वामींचीच कृपा आशीर्वाद होता हे आपण जाणून घेणार आहोत. अक्षय यांच्या एक्टिंग ची जरी ही सुरुवात असली तरी अक्षय यांनी एक गोष्ट त्यांच्या इंटरव्यू मध्ये सांगितले आहे. की मी भविष्यात कितीही मोठा झालो किंवा कितीही मोठमोठे रोल केले तरीही स्वामींची भूमिका ही माझ्यासाठी स्पेशल असणार आहे आणि माझ्या आयुष्यात केलेली सर्वात भारी भूमिका हीच असणार आहे.

 

अक्षय मुडावदकर जन्म आणि शिक्षण

अक्षय मुडावदकर यांचा जन्म 11 सप्टेंबर 1987 रोजी महाराष्ट्र राज्यातील नाशिक या शहरात झाला.अक्षय यांनी आपले शालेय शिक्षण आणि कॉलेजचे शिक्षण देखील नाशिक मधूनच पूर्ण केले. अक्षय हे एकुलते एक असले तरी त्यांचा मावस भाऊ आणि मावस बहीण हे त्यांच्यासोबत अगदी लहानपणापासूनच नाशिकत वाढले.अक्षय म्हणूनच नेहमी म्हणतात की सख्खे चुलत मी काही मानत नाही मला एक भाऊ आणि एक बहीण आहेत असे म्हणतात.

 

अक्षय मुडावदकर करियर ची वाटचाल

अक्षय यांचे कॉलेजचे शिक्षण पूर्ण होताच पुढील करिअरसाठी अक्षय हे मुंबईला गेले. अक्षय यांनी अनेक राज्य नाट्य स्पर्धांमध्ये भाग घेतलेले आहेत.  तसेच त्यांना वेगवेगळे पुरस्कार देखील भेटलेले आहेत. अक्षय यांना महाराष्ट्र  कामगार कल्याण मंडळाचा 65 वा राज्यस्तरीय पुरस्कार देखील भेटला आहे. तसेच महाराष्ट्र नाट्य मोहोउत्सवामधील पुरस्कार त्यांना भेटलेला आहे.अक्षय हे एक अत्यंत हरहुन्नरी नट असून ते मालिका आणि नाटक या दोन्ही क्षेत्रात आपल्याला ठसा उमटवत आहेत. 

तसेच अक्षय यांनी हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेतलेले आहे.त्यांनी हॉटेल मॅनेजमेंट मध्ये मास्टर इन पर्सनल मॅनेजमेंट ही डिग्री घेतलेली आहे.अक्षय हे नोकरी करत असतानाच आपल्या अॅक्टींग ची कला देखील जोपासत होते. नोकरी आणि अॅक्टींग या दोघांचा ते समतोल राखत होते. परंतु एक वेळ अशी आली की त्यांना दोघांपैकी एकच गोष्ट नीवडाची होती. अक्षय यांनी फार विचार केल्यानंतर आपल्या दहा वर्षे चालू असलेला नोकरीला कायमचा राम राम ढोकला आणि आपल्या अक्टिंग करिअर कडे लक्ष दिले.

अक्षय मुडावदकर यांनी द लास्ट व्हॉइस रॉय या नाटकात देखील काम केलेले आहे.व या नाटकाने 59 वा महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत नाशिक केंद्रातून प्रथम क्रमांक पटकावला होता ,यात अक्षय यांनी साकारलेल्या भूमिकेचे विशेष कौतुक झाले होते. तसेच अक्षय यांनी गांधी हत्या आणि मी या प्रायोगिक नाटकात देखील काम केले आहे.या नाटकात त्यांच्यासोबत रूपाली भोसले यादेखील होत्या.गांधी हत्या आणि मी या नाटकाचे भरपूर प्रयोग झाले.

 

अक्षय मुडावदकर टीव्हीवरील डेब्युट

अक्षय यांचा टीव्हीवरील डेब्युट हा सोनी मराठीवरील स्वराज्य जननी जिजामाता या मालिकेतून झाला होता. तसेच अक्षय यांनी आपल्या करिअरमधील पहिली शॉर्ट फिल्म ही 2019 साली केली.ती अ पीस ऑफ पेपर या शॉर्ट फिल्म मध्ये झळकले होते. 

परंतु अक्षय यांना सर्वात जास्त, सर्वात तुफान प्रसिद्धी मिळाली ती आत्ता चालू असलेल्या कलर्स मराठी वरील जय जय स्वामी समर्थ या मालिकेतून. या मालिकेत अक्षय यांनी साकारलेली ब्रम्हांडनायक श्री स्वामी समर्थ महाराज यांची भूमिका प्रेक्षकांना विशेष आवडले आणि प्रेक्षकांच्या मनाला साथ या भूमीकेने घातली. अगदी अल्पावधीतच प्रेक्षकांना अक्षय हे फार आवडू लागले आणि भरपूर स्तरावरून अक्षय यांचे फॅन तयार झाले. अगदी अक्षय ने आपल्या हरहुन्नरी अभयानयाने सर्वांना आपलेसे केलेले आहे आणि अक्षय यांच्या स्वामी रूपातील भूमिकेचा खूप मोठे फॅन झालेले आहेत.

 

अक्षय मुडावदकर लग्न

अक्षय मुडावदकर यांनी 2012 साली आपली लग्न गाठ बांधली,ती म्हणजे आपली मैत्रीण नेहा हवालदार यांच्यासोबत. अक्षय यांच्या एक्टिंग करिअरला त्यांची वाइफ नेहा आणि आजी यांचा खूप जास्त सपोर्ट भेटला.अक्षय हे पूर्णपणे निर्व्यसनी असून अक्षय हे न मद्यपान करत, ना मांसाहार करत. अक्षय यांची आजी ही स्वामींचे फार मोठी सेवेकरी आणि फार मोठी भक्त आहे.

 

अक्षय यांना भेटलेल्या स्वामींच्या रोल विषयी

अक्षय आपल्याला भेटलेल्या रोल विषयी सांगतात की ही भूमिका मला भेटली ही एक स्वामींची प्रचितीच आहे. याबद्दल बोलताना ते सांगतात की लोकडाऊन चा पिरेड होता आणि तेच काय संपूर्ण लोक हे देवाचा धावा करत होते. की देवा पुढे काय होईल ,आयुष्यात काय होईल ,कोण जगेल कोण राहील ,आपला काही बर वाईट होणार की नाही याविषयी प्रत्येक लोक बोलत होते देवाजवळ. 

त्याचप्रमाणे अक्षय देखील ऐका असेच संध्याकाळी बसलेले असताना लॉकडाऊन चालू होता आणि ते देखील सतत स्वामी समोर बोलायचे की स्वामी पुढे काय होईल ,करिअरचे काय होईल आणि अक्षय यांना संध्याकाळी एक फोन येतो आणि ते फोनवर बोलतात की इथून इथून आम्ही प्रोडक्शन मधून बोलत आहोत ,आम्ही श्री स्वामी समर्थांवर मालिका करत आहोत आणि तुम्ही हा रोल करू इच्छिता का. हे  एकूण अक्षय यांच्या अंगावर अक्षरशः काटा आला आणि ते पूर्णपणे आश्चर्यचकित झाले.अगदी लहानपणापासूनच स्वामींचे भक्त असलेले आणि स्वामी मय वातावरणात वाढलेले अक्षय यानी भूमिकेसाठी लगेच होकार दिला.

अक्षय म्हणतात ही मालिका भेटणे देखील स्वामींची एक लीलाच होती. या रोलसाठी अक्षय यांनी भरपूर मेहनत घेतली अक्षय हे जिम लवर होते.तर स्वामींच्या रोलला न्याय देण्यासाठी अक्षय यांनी आपली डायट आणि जीम पूर्णपणे बंद करून टाकली होती आणि चमचमीत पदार्थांवर ताव मारून आपले वजन वाढवत होते. त्यानंतर त्यांनी एक लुक टेस्ट दिला आणि एक छोटीशी ऑडिशन दिली आणि शेवटी अक्षय यांच्या नावावर शिक्का मुहूर्तप झालाअक्षय यांनी त्यानंतर गुरुचरित्र, स्वामी चरित्र, पूखर या सर्व गोष्टी स्वामिनी विषयी जी जी माहिती घरातून अजिंकडून भेटेल सर्व गोष्टी लेखकांकडून या सर्व गोष्टींचा अभ्यास केला आणि या भूमिकेसाठी योग्य तो न्याय दिला. 

जय जय स्वामी समर्थ ही मालिका लोकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलेली आहे आणि त्यातील स्वामींची भूमिका ही लोकांना अक्षरशः आपल्या घरातील आणि जसं काय स्वामीच आपल्यासमोर आहेत असे वाटत आहे.रात्री आठ नंतर घरातील वातावरण हे स्वामीमय होऊन जात आहे.

 

अक्षय मुडावदकर सोशल मीडिया आणि फॅन्स

अक्षय हे सध्या सोशल मीडिया साईटवर फार जास्त ऍक्टिव्ह असतात.अक्षय यांना instagram वर 21.7 के म्हणजे 21 हजार 700 फॉलोवर्स आहेत. अक्षय मुडावदकर यांचा अक्षय मुडावदकर या नावाने एक यूट्यूब चैनल देखील आहे. त्या चॅनेलवर त्यांनी सोहळा व्हिडिओ अपलोड केलेले असून त्या चॅनलला टोटल viesw हे 66 हजारापेक्षा जास्त आहेत. तसेच त्या चॅनल वरती 1320 पेक्षा जास्त सबस्क्राईबरस  देखील आहेत. अक्षय हे आपल्या चॅनेलवर वेगवेगळ्या गोष्टी शेअर करत असतात .अक्टिंग चे अनुभव देखील शेअर करतात. तसेच वेगवेगळ्या संभाषणामधून ते कॉमेडी देखील करत असतात.

अक्षय मुडावदकर यांना आत्ताच जय जय स्वामी समर्थ या मालिकेसाठी लोकप्रिय व्यक्तिरेखा पदार्पण 2020 हा पुरस्कार भेटला आहे.अक्षय यांनी बायको अशी हवी या मालिकेत देखील एक छोटीसी भूमिका साकारली होती.आज या मालिकेला जवळजवळ 275 पेक्षा जास्त भाग प्रदर्शित झाले असून अगदीच ही मालिका लोकांच्या आवडतीची ,भावनेची आणि भक्तीची जोडली गेलेली आहे. 

त्याचप्रमाणे अक्षय मुडावदकर हे एक साधारण व्यक्ती राहिलेला नसून लोकांसाठी ते स्वामी झालेले आहेत. शूटिंगच्या वेळी देखील भरपूर लोक त्यांना भेटायला येतात. त्यांच्या पाया पडू इच्छितात ,परंतु अक्षय हे नकार देऊन टाकतात .अक्षय म्हणतात पाया पडायचे आहे तर स्वामींच्या पडा. मी देखील एक स्वामी भक्त आहे माझ्या पाया पडण्यापेक्षा तुम्ही स्वामींच्या पाया पडत जा.तर असा होता श्री स्वामी समर्थांची भूमिका निभावणाऱ्या आपल्या सर्वांच्या मनामधे स्वामींची प्रतिमा उमटवणारे ज्यांना बघून स्वामी आपल्यासमोर असल्याचे भास होणारे एवढी अस्सल भूमिका करणारे अक्षय मुडावदकर यांचा जीवन प्रवास. 

अक्षय मुडावदकर यांच्या पुढील प्रवासासाठी दीपस्तंभ परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने