अंड्याच्या विविध 5 पाककृती | 5 Different Egg Recipes in Marathi

अंड्याच्या विविध 5 पाककृती | 5 Different Egg Recipes in Marathi

आज आपण ब्रेकफास्ट साठी ५ प्रकारच्या egg रेसिपीज कशा बनवायच्या ते पाहणार आहोत तर त्यासाठी लागणारे साहित्य आणि कृती पुढील प्रमाणे.

अंड्याच्या विविध 5 पाककृती | 5 Different Egg Recipes in Marathi

साहित्य:

१)अंडा बुर्जी सँडविच- तेल,४ egg, आले लसूण पेस्ट, कांदे,कोथिंबीर,मिरची पावडर,पाव.

२)egg रोल- ५ egg, कांदा,हिरवी मिरची,बटर,तेल, चपाती ,मेयोनिज,टोमॅटो केचप,चिली सॉस,कोथिंबीर, लाल,पिवळी शिमला मिरची.

३)अंडा मॅगी - २ अंडे,तेल,लसूण,हिरवी मिरची,कांदा, टोमॅटो,हळद,लाल तिखट,तंदुरी मसाला,मॅगी मसाला, मॅगी,शिमला मिरची.

४)अंडा घोटाला - २ उकडलेली अंडी,४ कच्ची अंडी, तेल,बटर,कांदा,टोमॅटो,हळद,लाल तिखट,हिरवी मिरची, आले लसूण पेस्ट,पावभाजी मसाला,कोथिंबीर,चीज.

५)अंडा पराठा - ४ उकडलेली अंडी,तेल,हिरवी मिरची, कोथिंबीर, आले लसूण कोथिंबीर पेस्ट,कोथिंबीर,कांदा, टोमॅटो, गव्हाचे पीठ,मीठ,काळी मिरी पावडर.

 

कृती:

अंडा बुर्जी सँडविच (Anda Bhurji Sandwitch)

बुर्जी करण्यासाठी गॅस वरती कढईमध्ये तीन चमचे तेल घ्यावे तेल गरम झाल्यानंतर एक चमचा आलं लसूण पेस्ट, बारीक चिरलेली कोथिंबीर, दोन बारीक चिरलेले कांदे आणि चवीनुसार मीठ घालून कांदा मऊ होपर्यंत परतून घ्यावे. त्यानंतर त्यामध्ये चार अंडी, एक चमचा मिरची पावडर घालून मिक्स करून घ्यावे. आणि बूर्जी थोडीशी परतून घ्यावी. त्यानंतर ती एका प्लेटमध्ये काढावी आणि ती थंड होण्यासाठी ठेवावी. बूर्जी थंड झाल्यानंतर त्यामध्ये दोन चिमूट किचन किंग मसाला,बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मॅशरने नाही ते मॅश करून घ्यावे.

गॅस वरती पॅन गरम करण्यासाठी ठेवावा त्यामध्ये थोडे तेल घालावे.त्यानंतर पाव घ्यावा त्याला बुर्जि लावून घ्यावी त्यावरती परत एक पाव ठेवावा अशाप्रकारे बाकीचे सँडविच देखील करून घ्यावे. आणि हे पॅनमध्ये घालावे खालच्या बाजूने पाव थोडासा फ्राय झाल्यानंतर सँडविच परतून घ्यावे आणि दोन्ही साईडने सँडविच भाजून घ्यावे आणि अशाप्रकारे आपले egg सँडविच तयार होते.

 

egg रोल (Egg Role)

एका बाऊलमध्ये पाच अंडी फोडून घ्यावी ही अंडी फेटून घ्यावीत,त्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा,हिरवी मिरची घालून मिक्स करून घ्यावे. गॅस वरती पॅनमध्ये थोडेसे तेल आणि बटर घालावे आणि अंड्याचे थोडेसे मिश्रण त्यामध्ये घालावे. त्यानंतर चपाती घ्यावी चपाती आदल्या दिवशीची किंवा आता तयार केलेली देखील चालते.त्याला सर्व बाजूला मेयोनिज लावून घ्यावे,त्यावर त्यावरती टोमॅटो केचप, थोडासा चिली सॉस आणि ही चपाती ऑम्लेट वरती टाकावे आणि हलक्या हाताने चपाती प्रेस करावी त्यामुळे अंड्याची पोळी चपातीला चिकटते. त्यानंतर चपाती पलटून घ्यावी त्यामुळे चपाती देखील थोडीशी कुरकुरीत होते त्यानंतर हे एका प्लेटमध्ये काढावे अशाप्रकारे बाकीचे देखील तयार करून घ्यावे. या पोळीवरती लाल आणि पिवळा कलरची उभी कापलेली सिमला मिरची घालावी,बारीक चिरलेली कोथिंबीर  आणि थोडीशे चीज घालून रोल करून घ्यावा आणि अशाप्रकारे आपले egg रोल तयार होतात.

 

अंडा मॅगी (Anda Maggie)

गॅस वरती पॅन गरम करण्यासाठी ठेवावा त्यामध्ये एक चमचा तेल घालावे त्यामध्ये एक चमचा बारीक चिरलेला लसूण घालून परतून घ्यावे त्यामध्ये एक बारीक चिरलेली हिरवी मिरची,एक चमचा बारीक चिरलेली शिमला मिरची,एक बारीक चिरलेला कांदा घालून कांदा परतून घ्यावा. कांदा थोडासा गुलाबी झाल्यानंतर त्यामध्ये एक बारीक चिरलेला टोमॅटो घालून परतून घ्यावे. टोमॅटो थोडा शिजल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा हळद, एक चमचा लाल मिरची पावडर,एक चमचा तंदुरी मसाला, एक चमचा मॅगी मसाला घालून मिक्स करावे त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून मिक्स करावे. त्यानंतर त्यामध्ये दोन फोडून अंडी घालावी आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यावे. अंडे शिजल्यानंतर त्यामध्ये अडीच कप पाणी घालावे आणि हे मिक्स करावे आणि याला उकळी येऊ द्यावी.त्यानंतर त्यामध्ये मॅगी घालावी आणि मॅगी शिजवून घ्यावी. आणि ही मॅगी एका बाऊलमध्ये काढावी आणि अशाप्रकारे आपली अंडा मॅगी तयार होते.

 

अंडा घोटाळा (Anda Ghotala)

गॅस वरती एका कढईमध्ये चार चमचे तेल घालावे. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये तीन बारीक चिरलेले कांदे घालून कांदा सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यावा. त्यानंतर त्यामध्ये एक चमचा आल्याची पेस्ट,एक चमचा लसणीची पेस्ट घालून याचा कच्चापणा जाईपर्यंत परतून घ्यावे.त्यानंतर त्यामध्ये तीन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, दोन किसून घेतलेले टोमॅटो घालून मिक्स करावे त्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा हळद,दोन चमचे लाल तिखट,पावभाजीचा मसाला घालून हे सर्व मिक्स करून व्यवस्थित परतून घ्यावे. त्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा बटर आणि चवीनुसार मीठ,दोन उकडलेली अंडी किसून यामध्ये घालावी, आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करावे. त्यानंतर त्यामध्ये दोन अंडी फोडून घालावी आणि हे सर्व मिक्स करून परतून घ्यावे आणि अंडे थोडेसे शिजवून घ्यावे. त्यानंतर त्यामध्ये थोडासा लिंबू मिळावा आणि परत दोन फोडून अंडी घालावी, त्यावर ती किसलेले चीज, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि थोडेसे साईडने बटर घालावे. त्यानंतर चार गोल पाव घ्यावे त्याला आतल्या बाजूने बटर लावावे आणि कढईच्या बाजूला ते पाव ठेवून द्यावे आणि अशा प्रकारे आपला अंड्याचा घोटाळा तयार होतो.

 

अंडा पराठा (Anda Paratha)

गॅस वरती पॅनमध्ये दोन चमचे तेल घ्यावे तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये तीन ते चार बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, कोथिंबीर,१ चमचा आले लसूण आणि कोथिंबीर याची पेस्ट, बारीक चिरलेला एक टोमॅटो,बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ, अर्धा चमचा काळीमिरी पावडर घालून व्यवस्थित मिक्स करून परतून घ्यावे, टोमॅटो थोडा शिजल्यानंतर त्यामध्ये ४ उकडलेली अंडी किसून घालावी,त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मिक्स करून व्यवस्थित परतून घ्यावे. मिश्रण ड्राय झाले असेल तर त्यामध्ये थोडेसे पाणी घालावे. हे मिश्रन एका प्लेटमध्ये काढून घ्यावे. आणि हे मिश्रण थंड करण्यासाठी ठेवावे.

पीठ मळण्यासाठी त्यामध्ये १ वाटी गव्हाचे पीठ, चवीनुसार मीठ,एक चमचा तेल घालून थोडे थोडे पाणी घालून पीठ मळून घ्यावे.

कणकेचा एक गोळा घ्यावा त्याला थोडेसे कोरडे पीठ लावून चपाती लाटून घ्यावी. चपाती लाटून झाल्यानंतर त्याला वरच्या बाजूने तेल लावावे त्यानंतर तयार करून घेतलेले मिश्रण घालावे आणि चपाती चारही बाजूंनी फोल्ड करून घ्यावी. आणि त्यानंतर ही चपाती हलक्या हाताने थोडीशी लाटून घ्यावी. गॅस वरती पॅन गरम करण्यासाठी ठेवावा त्यावरती थोडेसे तेल घालावे आणि त्यावरती हा लाटलेला पराठा घालावा खालच्या बाजूने पराठा थोडा भाजल्यानंतर पराठा परतून घ्यावा. आणि मंद आचेवरती दोन्ही बाजूंनी लालसर रंग येईपर्यंत पराठा परतून घ्यावा आणि अशाप्रकारे सर्व पराठे तयार करून घ्यावेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने