अंकित मोहन बायोग्राफी || Ankit Mohan Biography Marathi
आपल्या
पिळदार शरीराने आणि दमदार अभिनयाने सर्वांनाच भुरळ घालणारे तसेच आपल्या मस्क्युलर शरीर
यष्ठीच्या जोरावर बॉलीवुड, टॉलीवूड अभिनेत्यांपेक्षा कितेक पटीने सरस दिसणारे अंकित
मोहन यांच्या विषयी आज आपण जाणून घेणार आहोत.
Ankit
Mohan Biography Marathi, Ankit Mohan Information Marathi, Ankit Mohan Details
marathi, Ankit mohan aka Kondaji Farzand, Ankit Mohan aka Yesaji Kank, Ankit
Mohan Aka Rayaji Bandal, Ankit Mohan Lifestyle Marathi
अंकित
मोहन हे नाव ऐकताच आपल्या सर्वांच्या डोळ्यासमोर त्यांनी साकारलेल्या सरदार कोंडाजी
फर्जंद ,सरसेनापती यसाजी कंक आणि आत्ताच नुकताच रिलीज झालेला पावनखिंड चित्रपटातील
श्रीमंत रायाजीराव बांदल या भूमिका आपल्या डोळ्यासमोर चटकन उभ्या राहतात.आपल्या पिळदार
शरीराच्या आणि दर्जेदार अभिनयाच्या जोरावर अंकित मोहन यांनी मराठी चित्रपट सृष्टीत,
त्याचबरोबर हिंदी मालिका क्षेत्रात आपला जोरदार ठसा उमटवला आहे. अंकित मोहन यांचा दिल्लीतील
सुप्रसिद्ध चांदणी चौक ते महाराष्ट्रातील एक कट्टर शिवप्रेमी मराठी सुपरस्टार होण्याचे
स्वप्न प्रवास आज आपण जाणून घेणार आहोत.
अंकित मोहन जन्म आणि शिक्षण (Ankit Mohan Birth and Education)
अंकित
मोहन यांचा जन्म 20 जानेवारी 1988 रोजी आपल्या भारताची राजधानी दिल्ली येथे झाला.अंकित
यांनी आपले शालेय शिक्षण हे नॅशनल पब्लिक स्कूल दिल्ली येथून पूर्ण केले.तर आपले ग्रॅज्युएशनचे
शिक्षण त्यांनी दिल्ली युनिव्हर्सिटी मधून पूर्ण केले.अंकित हे ओल्ड दिल्ली म्हणजेच
जुने दिल्ली येथील प्रसिद्ध असलेल्या चांदणी चौक येथे लहानाची मोठे झालेले आहेत. अंकित
यांच्या वडिलांचे नाव हे विकास मोहन असून ते एक प्रसिद्ध उद्योजक आहेत.तसेच त्यांच्या
आईचे नाव मोहिनी मोहन असून त्या गृहिणी आहेत.
अंकित
यांच्या अभिनय कारकीर्दीला त्यांच्या घरच्यांचा आणि आई-वडिलांचा खूप सपोर्ट होता. अंकित
यांनी सुरुवातीच्या काळात मॉडेल म्हणून भरपूर कामे केलेली आहेत.
अंकित मोहन अभिनय
कारकिर्दीची सुरुवात (Ankit Mohan Film Career)
अंकित
यांनी आपल्या अभिनय कारकीर्दीची सुरुवात ही अत्यंत दमदारपणे केली ती म्हणजे 2006 झाली
आलेल्या एम टीव्ही रोडिज च्या चौथ्या सीजन मध्ये अंकित झळकले होते आणि तेथूनच त्यांनी
आपल्या अभिनय कारकीर्दीची सुरुवात केली. त्यानंतर 2008 साली आलेल्या मिले जब हम तुम
या स्टार वन वरील मालिकेतून अंकित मोहन यांनी टीव्ही मालिका क्षेत्रात पदार्पण केले.
यात त्यांनी एक छोटीशी भूमिका साकारली होती. त्यानंतर अंकित मोहन यांनी नमक हराम,बसेरा,
शोभा सोमनाथ की या मालिका केल्या. यानंतर उजाडले ते 2011 हे वर्ष 2011 हे वर्ष अंकित
मोहन यांच्या कारकिर्दीला कलाटने देणारे ठरले. ते म्हणजे 2011 साली शाहिद कपूर यांचा
मौसन या चित्रपटात शफक हुसेन ही भूमिका अंकित मोहन यांनी साकारले. हिंदी चित्रपट सृष्टीत
अंकित मोहन यांचा मौसम या चित्रपटातून डेब्युट झाला.मौसम या चित्रपटातील अभिनयासाठी
अंकित यांची तब्बल 800 जणांमधून निवड करण्यात आली होती. या त्यांनी शहीद कपूरचा बेस्ट
फ्रेंड चा रोल साकारला आहे.
2011
सोबतच 2013 हे वर्ष हे देखील अंकित मोहन यांच्या करियर साठी फार महत्त्वाचे ठरले. अंकित
मोहन यांनी 2013 साली आलेल्या सुपर डुपर हिट ब्लॉकबस्टर महाभारतामध्ये काम केलेले होते.
महाभारत या कार्यक्रमांमध्ये त्यांनी गुरु द्रोणाचार्यांची सुपुत्र अश्वधामा ही भूमिका
साकारली होती. या भूमिकेमुळे अंकित मोहन हे नाव आणि अंकित मोहन यांचा चेहरा संपूर्ण
भारतात ओळखला जाऊ लागला होता. महाभारतात भारतासोबतच इंडोनेशियामध्ये देखील सुपर डुपर
हिट ठरलेले होते.यास कार्यक्रमानंतर अंकित मोहन यांना खूप मोठ मोठे प्रोडक्शन हाऊस
मध्ये सिरीयल साठी वेगवेगळ्या ऑफर येऊ लागल्या होत्या. अंकित मोहन यांनी आजपर्यंत एमटीवी
रोडीज, मिले जब हम तुम,बसेरा, शोभा सोमनाथ की, तेरी मेरी लव्ह स्टोरी, घर आजा परदेसी
,महाभारत, कुमकुम भाग्य, बेगुसराय, नागिन 3, हैवान,जगत जननी मा वैष्णवी देवी, काटे
लाल अँड सन्स या मालिकेमध्ये कामे केलेले आहेत.
अंकित मोहन लग्न आणि फॅमिली (Ankit Mohan Marriage and Family)
अंकित
मोहन यांनी आपली लग्न गाठ 2 डिसेंबर 2015 रोजी बांधली ती म्हणजे आपली मराठमोळी प्रेयसी
रुची सवरणा यांच्यासोबत, त्यांनी नागपूर येथे विवाह गाठ बांधली. रुची सवरणा आणि अंकित
मोहन यांची पहिली भेट ही 2013 साली आलेल्या घर आजा परदेसी या मालिकेच्या सेटवर झाली
होती. दोन वर्ष एकमेकांसोबत रिलेशनशिप मध्ये राहिल्यानंतर 2015 साली त्यांनी लग्न बंधनात
अडकण्याचे ठरवले.7 डिसेंबर 2021 रोजी अंकित आणि रुची यांना पुत्ररत्न प्राप्त झाला
आणि त्याचं नाव त्यांनी रुवानसे ठेवले. अंकित आणि रुची यांनी घर आजा परदेसी, कुमकुम
भाग्य या मालिकांमध्ये तर फत्तेशिकस्त आणि पावनखिंड या चित्रपटांमध्ये एकत्र कामे केलेली
आहेत.
अंकित मोहन चित्रपटामधील
कमबॅक (Ankit Mohan Comeback)
अंकित
मोहन यांनी 2011 नंतर तब्बल सात वर्षांनी मोठा पडद्यावर म्हणजे चित्रपटांमध्ये कमबॅक
केले.ते म्हणजे 2018 साले आलेल्या फर्जंद य मराठी चित्रपटापासून.यात त्यांनी साकारलेली
सरदार कोंडाजी फर्जंद ही भूमिका खूप गाजली. प्रेक्षकांनी अक्षरशः या चित्रपटाला आणि
या भूमिकेला डोक्यावर घेतले.फर्जंद या मराठी चित्रपटापासून अंकित मोहन यांची मराठी
चित्रपटसृष्टीत दिमागदार आणि दमदार डेब्युट झाला. त्यानंतर 2019 साली आलेल्या फक्त्तेशिकस्त
या चित्रपटात देखील अंकित यांनी सरसेनापती यसाजी कंक यांची भूमिका साकारली होती.या
चित्रपटात अंकित मोहन यांच पिळदार शरीर बघून भले भले अभिनेते आणि अभिनेत्राना घाम फुटला
होता.एवढी खतरनाक फिजिक्स यांनी बनवली.कशी 2020 साली अंकित यांनी मन फकीरा या मराठी
चित्रपटात काम केले यात त्यांनी नचिकेत हे पात्र साकारले होते.2022 म्हणजे म्हणजे आत्ताच
आलेल्या पावनखिंड या चित्रपटात श्रीमंत सयाजीराव बांदल ही भूमिका देखील अंकित मोहन
यांनी साकारलेले आहे. या भूमिकेमुळे देखील आज सर्वत्र स्तरावरून अंकित मोहन यांच्यावर
कौतुकाचा वर्षाव होत आहे. अंकित यांच्या पुढील येणाऱ्या बाबू या चित्रपताचा देखील नुकताच
ट्रेलर रिलीज झाला आहे.
अंकित
मोहन यांच्याकडे लॅब्रो डॉग प्रजातीचा कुत्रा आहे त्याचे नाव थोर आहे. अंकित हे थोरला
आपल्या घरच्या सदस्याप्रमाणे वागणूक देतात व थोर सोबत चे फोटो आपल्या सोशल मीडिया साइटवर
पोस्ट करताना दिसत असतात. तसेच अंकित यांना आजवर सेकंड मजा डिजिटल अवॉर्डचा फर्जंद
मूवी साठी बेस्ट देब्युत आणि ॲक्टर हा अवॉर्ड भेटलेला आहे, तर रेडिओ सिटीचा बेस्ट डेब्यूट
ॲक्टर फर्जंद मूव्ही साठीच हा अवॉर्ड भेटलेला आहे. आणि झी रिश्ते अवॉर्डचा खलनायक जोडी
हा हैवान या सिरीयल साठी अवॉर्ड भेटला आहे.
2022 मधील रिलीज होणारे चित्रपट-
तसेच
2022 मध्ये अंकित यांचे बाबू, हवाहवाई आणि केविन नाईफ असे तब्बल तीन चित्रपट यावर्षी
अंकित यांचे प्रदर्शित होणार आहेत.म्हणजेच 2022 हे वर्ष खऱ्या अर्थाने अंकित मोहन यांच्यासाठी
खूप महत्त्वाचे ठरणार आहे. अंकित हे पूर्णपणे फिटनेस प्रेमी असून आपला आहार आणि आपला
व्यायाम ते नित्य नियमाने न चुकवता अत्यंत कटाक्षाने करतात.अंकित यांची भगवान श्री
गणेशावर आणि देवांचे देव महादेव याच्यावर निस्सीम भक्ती आहे. अंकित दरवर्षी मोठ्या
उत्साहाने वाजत गाजत गणपती त्यांच्या घरी बसवतात. अंकित हे शिवप्रेमी देखील आहेत .त्यांचा
शिवरायांची पूजा करतानाचा प्रेरणा मंत्र पठण करतानाचा व्हिडिओ खूप व्हायरल झाला होता.
आयुष्याच्या कठीण प्रसंगात ते छत्रपती शिवाजी महाराजांकडून प्रेरणा घेतात असे ते सांगतात.
आयुष्यात कुठला कठीण प्रसंग आला, काही बिकट परिस्थिती आली तर अत्यंत संयमाने आणि अत्यंत
धीराने ती परिस्थिती ते हाताळतात हा नियम ते छत्रपती शिवरायांकडून शिकतात असे ते सांगतात.
अंकित मोहन डिजिटल क्षेत्रातील डेब्यू (Ankit Mohan Digital Web Debut)
अंकित
मोहन यांनी आपल्या डिजिटल क्षेत्रातील डेब्युट हा 2020 आली आलेल्या या एक थी बेगम या
वेब सिरीज मधून केला होता. तसेच अंकित यांनी यांची 2022 साली डबल गेम ही मराठी वेब
सिरीज देखील येत आहे.अंकित हे 2020 सालच्या टाइम्स ऑफ इंडियाच्या टॉप ट्वेंटी मोस्ट
डिझायरेबल मेन ऑफ महाराष्ट्राच्या लिस्टमध्ये 18 व्या स्थानी होते. अंकित हे फार कसलेले
नट आहेत. त्यांनी फर्जंद आणि फत्तेशिकस्त या चित्रपटांमध्ये तलवारबाजीचे प्रशिक्षण
घेतले होते.तर आज आत्ताच आलेल्या पावनखिंड या चित्रपटासाठी फलंदाजी शिकण्यासाठी त्यांनी
खूप मेहनत देखील घेतली आहे.
अंकित मोहन सोशल
मीडिया आणि फॅन्स
अंकित
हे सोशल मीडिया साइटवर प्रचंड ऍक्टिव्ह असतात.अंकित यांनी आजवर इंस्टाग्राम वर
1400 पेक्षा जास्त पोस्ट अपलोड केल्या असून त्यांना 277 के म्हणजे दोन लाख 77 हजार
फॉलोवर्स आहेत .अशा या कसलेल्या दमदार अभिनेत्याला दीपस्तंभ परिवाराकडून पुढील वाटचालीसाठी
खूप खूप शुभेच्छा. अशी होती एक आर्टिस्ट,एक अभिनेता, एक फिटनेस प्रेमी, एक शिवप्रेमी
आणि एक शिवभक्त असलेल्या अंकित मोहन यांची बायोग्राफी. येणारे संपूर्ण पुढील काळात
अंकित मोहन यांच्या नावाची भरपूर चर्चा होणार आहे आणि यांच्या नावाचा धबधबा असणार आहे
हे खात्रीशीर सांगता येईल.