भाग्यश्री लिमये बायोग्राफी | Bhagyashree Limaye Biography Marathi
आज आपण मराठीतील सर्वात गोंडस आणि सर्वात क्युट अभिनेत्री विषयी जाणून घेणार आहोत, जिने न्यूज रिपोर्टर टू प्रायव्हेट सेक्टर मधील जॉब ते मॉडलिंग ते आज एक यशस्वी अभिनेत्री असा भला मोठ्या प्रवास केला आहे. आपल्या हरहुन्नरी अभिनयाने आणि आपल्या क्युट लुक्सने आपल्या तरुणाईच्या मनात आपले एक स्थान निर्माण केले आहे,ती म्हणजे तुमची आमची सर्वांची लाडकी द ब्यूटिफुल भाग्यश्री लिमये.
आज आपण भाग्यश्री लिमये यांची पूर्ण बायोग्राफी पाहणार आहोत.आज आपण दि ब्युटीफूल भाग्यश्री यांची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत, कसा होता त्यांचा न्यूज रिपोर्ट, एक आयटी कंपनीतील प्रायव्हेट सेक्टर मधील जॉब ते आज यशस्वी अभिनेत्री होण्या पर्यंतचा संपूर्ण प्रवास आज आपण पाहणार आहोत.
Bhagyashree Limaye Biography Marathi,
Bhagyashri Limaye marathi information, Bhagyashree Limaye Career, Jobs, Family,
Personal Details in Marathi
Bhangyashree Limaye Early Life & Education | भाग्यश्री लिमये
बालपण आणि शिक्षण
भाग्यश्री
लिमये यांचा जन्म 7 नोव्हेंबर 1993 रोजी महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यात झाला.
भाग्यश्री लिमये यांनी संपूर्ण शिक्षण हे इंग्रजी माध्यमातून पूर्ण केले.त्यांनी आपले
प्राथमिक म्हणजे चौथीपर्यंतचे शिक्षण हे लिटल फ्लावर्स कॉन्व्हेंट स्कूल सोलापूर इथून
पूर्ण केले.तर त्यांनी आपले जुनिअर कॉलेज समंजस बारावीपर्यंत शिक्षण हे इंडियन मॉडर्न
स्कूल सोलापूर येथून पूर्ण केले. त्यानंतर भाग्यश्री हिने मंगळवेढा इन्स्टिट्यूट ऑफ
मॅनेजमेंट सोलापूर येथून बीसीएची डिग्री घेतली. तर आपले पुढील शिक्षणासाठी भाग्यश्री
हिने पुणे गाठले. भाग्यश्री हिने पुण्याच्या सिम्बॉयसिस कॉलेजमधून एमसीएची डिग्री घेतली.
भाग्यश्री लिमये न्यूज रिपोर्टर
| Bhagyashree Limaye News Reporter
भाग्यश्रीने
इन सोलापूर या न्यूज चैनल साठी न्यूज अँकर, न्यूज रिपोर्टर म्हणून देखील काम केले आहे.
आपले एमसीएचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर भाग्यश्रीने पुण्यातील सुप्रसिद्ध आयटी कंपनीमध्ये
काही काळ जॉब देखील केला. भाग्यश्री च्या वडिलांचे नाव हे माधव लिमये असून त्यांच्या
आईचे नाव अनुराधा लिमये आहे.
भाग्यश्री
यांच्यासाठी करियर पॉईंट ठरला तो म्हणजे 2014 साली महाराष्ट्र टाइम्स ने आयोजित केलेली
महाराष्ट्र टाइम्स श्रावण क्वीन ही स्पर्धा. ही स्पर्धा भाग्यश्री लिमये यांनी जिंकली
आणि त्यानंतर त्यांनी वेगवेगळ्या स्टुडिओसाठी ऑडिशन देणे, मॉडेलिंग करणे, फोटोग्राफी
करणे हे चालू ठेवलं .भाग्यश्री लिमये यांनी तब्बल 30 पेक्षा जास्त जाहिरातींमध्ये काम
केलेले आहे. त्यात प्रामुख्याने त्यांनी तनिष्क,पेटीएम,मॅगी या जगप्रसिद्ध ब्रँड चा
समावेश देखील आहे.
भाग्यश्री
लिमये यांना गाण्याची प्रचंड आवड आहे. तसेच त्या फार उत्तम हार्मोनियम देखील वाजवतात.महाराष्ट्र
श्रावण क्वीन या स्पर्धेत देखील आपल्या गायिकेने सर्वांना मंत्रमुग्ध केले होते. भाग्यश्री
लिमये ह्या अत्यंत हाडाच्या माऊप्रेमी आहेत, म्हणजेच मांजर प्रेमी आहेत. त्यांच्याकडे
स्वतःच्या चार मांजरी आहेत.
आपल्या
आयुष्यात आनंद देण्यामागे प्राण्यांचा खूप मोलाचा वाटा असतो असे त्या नेहमी म्हणतात.
त्या नेहमी त्यांच्या मांजरीन सोबत चे व्हिडिओज आणि फोटोज आपल्या सोशल मीडिया अकाउंट
वरती शेअर करत असतात. बाहेर पडल्यावर रस्त्यावरती किंवा शूटिंगच्या सेटवर त्यांना कुठेही
मांजर किंवा कुत्रा दिसलास त्या त्यांना खाऊ घातल्याशिवाय पुढे जात नाहीत. एवढा त्यांचा
प्राणी मित्रांवर जीव आहे.
भाग्यश्री लिमये अभिनयातील
करिअर | Bhagyahsree Limaye Glamorous
Career
भाग्यश्री
लिमये यांच्यासाठी 2017 हे खूप महत्त्वाचे वर्ष ठरले 2017 साली आलेल्या कलर्स मराठी
वरील घाडगे अँड सून्स या मालिकेतून भाग्यश्री लिमये यांनी मालिकाक्षेत्रात दमदार पदार्पण
केले. ही त्यांची पहिलीच मालिका होती. आपल्या पहिल्याच मालिकेतून भाग्यश्री या घराघरात
आणि संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध झाल्या आणि त्यांच्या या मालिकेतून खूप मोठा फॅन
बेस देखील तयार झाला.
तब्बल
साडेतीन वर्षापेक्षा जास्त त्यांच्या त्यांची ही पहिली मालिका चालली आणि त्यांचे
774 भाग देखील प्रसिद्ध झाले. भाग्यश्री लिमये यांनी आपला हिंदी म्हणजेच बॉलीवूड डेब्यूट
2021 साली आलेल्या जॉन अब्राहम यांच्या सत्यमेव जयते२ या चित्रपटापासून केला. यात त्यांनी
डॉक्टरची भूमिका साकारली होती. तसेच भाग्यश्री हिने मराठी चित्रपट डेब्यूट केलेला आहे
असे देखील म्हणता येईल कारण त्यांनी ज्या चित्रपटाच्या शूटिंग पूर्ण केले आहे किंवा
ज्याची अनाउन्समेंट केलेली आहे त्याचे रिलीज डेट जाऊन तो होल्ड वर ठेवण्यात आलेले आहे.
भाग्यश्री
लिमये यांनी 2021 साली आपला डेब्यूट केला ते म्हणजे मेडली या मराठी चित्रपटापासून.
हा चित्रपट 25 डिसेंबर 2021 रोजी प्रदर्शित होणार होता यात प्रार्थना बहिरे देखील आहे
परंतु तो होल्ड वर ठेवण्यात आलेला आहे.
भाग्यश्री
लिमये यांना करिअरची दुसरी मालिका भेटली ती 2022 मध्ये आलेली सोनी मराठी वरील बॉस माझी
लाडाची. यातील त्यांच्या बॉसच्या भूमिकेचे विशेष कौतुक होत आहे आणि या मालिकेतून त्यांचे
मांजर प्रेम म्हणजेच माऊ प्रेम हे देखील सर्व प्रेक्षकांना बघायला भेटत आहे जे त्यांचे
रिल लाईफ आहे तेच रियल लाईफ देखील मांजर प्रेम आहे.ही मालिका देखील संपूर्ण महाराष्ट्रात
सुपरहिट होत आहे आणि घराघरात बघितली जात आहे.
भाग्यश्री लिमये आणि सोशल लाईफ
| Bhagyashree Limaye Social Life
भाग्यश्री
लिमये या यूट्यूब सेन्सेशन देखील आहेत.भाग्यश्री आपल्याला भारतीय डिजिटल पार्टी म्हणजेच
भाडीपाच्या वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये दिसतात. तसेच इम्पॅक्ट मोशन या यूट्यूब व्हिडिओमध्ये
देखील ते आपल्याला बघायला मिळतात.भाग्यश्री यांच्या reels देखील सर्वांना खूप आवडत
असतात. भाग्यश्री लिमये ह्या लेहरे या म्युझिक व्हिडिओमध्ये देखील दिसत आहेत आणि त्यांचा
हा व्हिडिओ देखील प्रेक्षकांना फार पसंतीस उतरत आहे.
भाग्यश्री
या सोशल मीडिया साईटवर प्रचंड ऍक्टिव्ह असतात त्यांना इंस्टाग्राम आणि सोशल मीडिया
साइटवर 345 के म्हणजेच तीन लाख 45 हजार फॉलोवर्स आहेत. भाग्यश्री या चमक नावाच्या सुती
कपडे असणारा ब्रँड सोबत collaborate देखील केलेला आहे. अशा या गोड गुणी आणि हरहुन्नरी
अभिनेत्री भाग्यश्री लिमये यांना दीपस्तंभ या परिवाराकडून
पुढील वाटचालीसाठी खूप खूप
शुभेच्छा आणि खूप सदिच्छा.