प्रतीक्षा शिवणकर बायोग्राफी मराठी | Pratiksha Shivankar Biography Marathi
आज आपण मराठीतील अत्यंत सुंदर आणि तितकीच देखनी अभिनेत्री विषयी बोलणार आहोत, त्यांची सध्या संपूर्ण महाराष्ट्रात भरपूर चर्चा चाललेली आहे. आपल्या कानडी लुक मुळे आणि आपल्या सुंदर अशा चेहऱ्यामुळे त्या संपूर्ण महाराष्ट्रात फेमस झालेल्या आहेत. आपलं देखणं रूप आणि तितकाच दमदार अभिनयाने संपूर्ण महाराष्ट्रात घराघरात चर्चेचा विषय त्यांचा बनलेला आहे. त्या दुसर कोणी नसून प्रतीक्षा शिवणकर- Pratiksha Shivankar आहेत.
आज प्रतीक्षा शिवणकर यांची संपूर्ण बायोग्राफी अगदी थोडक्यात जाणून घेणार आहोत.
Pratiksha Shivankar Biography Marathi, Pratiksha Shivankar Abhinetri Charitra, Pratiksha Shivankar Information Marathi, Pratiksha Shivankar Childhood, Education, Family, Career, Movies, Television Shows, Marathi
प्रतीक्षा शिवणकर बालपण – Pratiksha Shivankar Childhood
प्रतीक्षा
शिवणकर यांचा जन्म महाराष्ट्र राज्यातील गडचिरोली जिल्ह्यातील 20 एप्रिल रोजी झाला.
प्रतीक्षांच्या वडिलांचे नाव हे सुनील शिवणकर असून, प्रतीक्षा शिवणकरांना छोटीशी बहीण
देखील आहे.तिचे नाव संस्कृती शिवणकर असून ती एमपीएससीची तयारी करत आहे.
प्रतिक्षा शिवणकर करिअर – Pratiksha Shivankar Career
प्रतीक्षा
ला IAS होण्याची फार इच्छा होती, तिची हीच इच्छा तिला गडचिरोलीतून पुण्यात घेऊन आली.आणि
तिच्या आत दडलेला हरहुन्नरी कलाकार तिला घेऊन पोचला ते प्रशांत दामले सरांच्या टी स्कूल
टीचर आर्ट केंद्रात. 28 एप्रिल 2017 रोजी तेथून पास झाल्यानंतर प्रशांत दामले सर आणि
कविता लाड यांच्या एका लग्नाची पुढची गोष्ट या नाटकांमध्ये प्रतीक्षाला संधी भेटली
ते तिच्या अभिनयाच्या जोरावरच.एका लग्नाची पुढची गोष्ट हे नाटक रंगभूमीवर प्रचंड गाजले
या नाटकाचे तब्बल 500 पेक्षा जास्त प्रयोग झाले.त्यात प्रदेश प्दौरे देखील आले लंडन,ऑस्ट्रेलिया,कॅलिफोर्निया
या वेगवेगळ्या ठिकाणी या नाटकाचे प्रयोग झाले आणि त्या ठिकाणी हे नाटक हाउसफुल देखील
ठरले. आपला दमदार अभिनयाच्या जोरावर गडचिरोलीच्या या कन्नेने विदेश दौरा देखील केला.
आपण
प्रतीक्षा शिवणकर यांना स्टार प्रवाह वरील सुप्रसिद्ध कॉमेडी शो कॉमेडी बाइमदी या
देखील प्रवरसन करताना बघितले
आहे या तिने दिग्गज कलाकारांसोबत स्क्रीन शेअर केली होती. आपला कॉमेडी टाइमिंगच्या
जोरावर तिने प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन केले आणि त्यांना खळखळून हसवले.
प्रतीक्षा
शिवणकर यांनी 2019 साली आलेल्या कॉलेज डायरी या मराठी चित्रपटात पासून मराठी चित्रपट
सृष्टीत पदार्पण केले हा प्रतीक्षा चा पहिला चित्रपट होता. या चित्रपटात हे मन माझे
या गाणे खूप गाजले होते.प्रतीक्षा आपल्याला प्रथमच मुख्य अभिनेत्री च्या रूपात दिसत
आहे ती म्हणजे सोनी मराठीवरील जीवाची होतीया कायली या 2022 साली आलेल्या मालिकेतून.
प्रतीक्षा ची ही पहिली वहिली मालिका असून मालिका क्षेत्रात तिने दमदार पदार्पण याच
मालिकेतून केले.
संपूर्ण
महाराष्ट्रात सध्या प्रतीक्षा शिवनगर या नावाची चर्चा आहे.अगदी घराघरात प्रतीक्षा चा
विषय चाललेला आहे फारच कमी कालावधीत ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली असून प्रतीक्षा
चे कानडी लुक्स ची चर्चा सर्वत्र होत आहे.
प्रतिक्षा शिवणकर पती आणि कुटुंब – Pratiksha Shivankar Husband & Family
फार
कमी लोकांना माहिती आहे की ही प्रतीक्षा ही विवाहित असून प्रतीक्षा ने 14 नोव्हेंबर
२०१९ रोजी आपली लग्नगाठ डॉक्टर अभिषेक साळुंखे यांच्याशी बांधली. डॉक्टर अभिषेक हे
रेडिओलॉजी असून त्यांना गाण्याचा देखील छंद आहे.
प्रतीक्षा
शिवणकर यांचा यूट्यूब चैनल देखील आहे,त्यावर त्यांनी दहा व्हिडिओज टाकलेले असून त्यांना
151 सबस्क्राईब आहेत.प्रतीक्षा शिवणकर यांच्या हातावर एक पर्मनंट टॅटू देखील आहे. बी
ब्रेव अशा नावाचा पर्मनंट टॅटू काढला आहे. प्रतीक्षा यांना नृत्याची देखील प्रचंड आवड
आहे.
प्रतीक्षा
शिवणकर यांना सुशांत सिंग राजपूत,इरफान खान,नाना पाटेकर आणि रणवीर सिंग प्रचंड आवडतात,तसेच
मृणाल कुलकर्णी मराठी अभिनेत्री देखील प्रचंड आवडतात. प्रतीक्षा शिवणकर यांचे जीवाची
होतिया कायली यातील रेवती हे कानडी पात्र प्रेक्षकांच्या फार पसंतीस उतरलेले आहे.
आपल्या
अशा या देखण्या आणि अतिशय सुंदर अभिनेत्रीला दीपस्तंभ परिवाराकडून भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि
खूप सदिच्छा.