Radha Sagar Biography Marathi | राधा सागर मराठी अभिनेत्री बायोग्राफी
आज
आपण मराठीतील एका हरहुन्नरी अभिनेत्री विषयी जाणून घेणार आहोत ज्यानी आपल्या विलनच्या
रोलने मराठी मालिका क्षेत्रात आपले एक वेगळीच छाप सोडलेले आहे. जेवढ्या त्या ऑन स्क्रीन
गोड दिसतात तेवढ्याच त्या ऑफ स्क्रीन बोल्ड आणि ब्युटीफूल आहेत.
त्या म्हणजे वेरी टॅलेंटेड आणि व्हेरी ब्युटीफूल राधा सागर कुलकर्णी Radha Sagar Kulkarni. आज आपण राधा सागर कुलकर्णी यांची पूर्ण बायोग्राफी (Radha Sagar Biography Marathi) बघणार आहोत. इंडस्ट्रीमध्ये त्या आपले आडनाव न वापरता फक्त राधा सागर हे नाव वापरतात. आता आपण जाणून घेणार आहोत राधा सागर यांचा डान्स कोरिओग्राफर ते यशस्वी अभिनेत्री होण्यापर्यंतचा पूर्ण प्रवास.
राधा सागर यांचा जन्म 27 मे 1989 रोजी महाराष्ट्र राज्यातील पुणे शहरात झाला.राधा सागर यांनी आपले शालेय शिक्षण पुणेतील एमआयटी शाळेमध्ये पूर्ण केले. त्यांनी आपले कॉलेजचे शिक्षण हे अभिनव कला महाविद्यालय पुणे येथून पूर्ण केले.
राधाने
बॅचलर कमर्शियल फायनान्स यामधून डिग्री घेतली.राधा सागर यांच्या वडिलांच्या नाव सदाशिव
कुलकर्णी असून त्यांचे आईचे नाव स्वाती कुलकर्णी आहे.
राधा
सागर यांच्या अभिनय कारकीर्दीला त्यांच्या आईचा खारीचा वाटा आहे असे त्या नेहमी सांगतात.आयुष्यात
प्रत्येक वेळेस आईचे मार्गदर्शन आणि सपोर्ट खूप कामी आला हे आवर्जून प्रत्येक इंटरव्यू
मध्ये त्या सांगतात.
राधा सागर सुरुवातीचे आयुष्य - Radha Sagar Early Life
राधा
सागर यांना लहानपणापासूनच नृत्याची आवड होती.अगदी इयत्ता पाचवी पासून शाळेत होणारे
स्नेहसंमेलन,नृत्य स्पर्धा, नाट्य स्पर्धा या स्पर्धांमध्ये राधा अत्यंत आवडीने भाग
घेत असे. तसेच कॉलेजमध्ये असताना कॉलेज फेस्ट,अंतर महाविद्यालयीन स्पर्धा या सर्व स्पर्धांमध्ये
त्या भाग घेऊ लागल्या.
त्यांच्या
कार्यकीर्ती ची सुरुवात ही एज अ डान्स आणि एज अ कोरिओग्राफर झाली. सुरुवातीला वेगवेगळ्या
स्पर्धांसाठी कोरोग्राफी करणे यातूनच त्यांचा अभिनय क्षेत्राकडे कल वाढू लागला. राधासागर
यांनी अभिनय कार्यकीर्ती ची सुरुवात मराठी रंगभूमीपासून केली.राधा सागर यांनी घाशीराम
कोतवाल या नाटकापासून अभिनव क्षेत्रात पाऊल ठेवले. हे त्यांचे पहिले पहिले नाटक त्यामध्ये
त्यांनी गुलाबी हे पात्र स्वीकारले होते.त्यानंतर त्यांनी लगेचच राधासागर यांना दुसरे
देखील नाटक भेटले ते म्हणजे 'आई रिटायर होते'. या नाटकातील त्यांच्या अभिनयाची विशेष
कौतुक देखील झाले.
राधा सागर छोट्या पडद्यावर - Radha Sagar Television Career
राधासागर
यांनी आपले टेलिव्हिजन क्षेत्रातील म्हणजेच मालिका क्षेत्रातील डेब्युट हा 'एक मोहोर
अबोल' या तत्कालीन ई टीव्ही आणि आत्ताच्या कलर्स मराठी वरील मालिकेतून केला. राधा सागर
यांनी आजवर कन्यादान,जयस्तुते,लक्ष, अस्मिता,चाहूल या सर्व मालिकांमध्ये कामे केलेली
आहेत, आणि या त्यांच्या भूमिका देखील उल्लेखनीय ठरलेल्या आहेत.
राधा
सागर यांना संपूर्ण महाराष्ट्रात आणि घराघरात ओळख भेटली ती म्हणजे त्यांनी साकारलेल्या
'आई कुठे काय करते' या मालिकेतील अंकिता या भूमिकेमुळे, त्यांच्या अंकिताच्या ग्रे
शेड असलेल्या पात्राचे लोकांना चांगलीच पसंती भेटली आणि या भूमिकेची देखील फार कौतुक
झाले. याच भूमिकेतून त्यांचा महाराष्ट्रात सेपरेट फॅन बेस तयार झाला. सध्या संपूर्ण
महाराष्ट्रात गाजत असलेल्या 'सुंदरा मनामध्ये भरली' या मालिकेमध्ये देखील त्या काम
करत आहेत.यात त्यांनी साकारलेल्या अभिलाषा ग्रे शेड म्हणजेच संपूर्ण खलनायक असलेली
भूमिका प्रेक्षकांना फार आवडलेले आहे.
राधासागर यांना एक ग्लॅमरस आणि बोल्ड खलनायका म्हणून विशेष लोकांचे पसंती भेटत आहे.राधा सागर यांचे हिंदी मालिका क्षेत्रात देखील आपली छाप पडलेली आहे. राधा सागर यांनी स्टार प्रवाह वरील ये 'रिश्ता क्या कहलाता है', कलर्स हिंदी वरील 'बावरा दील' आणि अँड पिक्चर्स वरील 'एक महानायक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर' या हिंदी मालिकांमध्ये कामे केलेली आहेत आणि आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे.
राधा सागर यांनी आपला बॉलीवूड डेबु हा 2019 साली आलेल्या 'मलाल्या' या हिंदी चित्रपटा पासून केलेला आहे. यात त्यांनी स्वाती ही भूमिका साकारली आहे.तसेच त्यांचा आणखी एक हिंदी चित्रपट देखील लवकरच प्रदर्शित होणार आहे. राधा सागर यांनी आपले मराठी सृष्टीतील डेबुट हा 2016 साली आलेल्या 'एक अलबेला' या चित्रपटापासून केला. या चित्रपटापासूनच विद्या बालन यांनी मराठी चित्रपटदृष्टीत पदार्पण केले.
त्यानंतर 2017 साली आलेल्या 'नाती खेळ' या चित्रपट देखील चांगला चालला. या चित्रपटासाठी राधासागर यांना बेस्ट फीमेल एक्टर्स, इंटरनॅशनल गोल्डन गेट अवॉर्ड देखील भेटला जो की यूएसए मध्ये सोहळा झाला होता राधास्वागरी आणि वजनदार कालचक्र कंडिशन्स अप्लाय आणि ठाकरे या चित्रपटांमध्ये देखील कामे केलेली आहे
2020 च्या सुरुवातीला प्रदर्शित झालेल्या
विकून टाक या चित्रपटात देखील प्राधासागर यांनी काम केले होते त्यांच्या भूमिकेचे या
चित्रपटात विशेष कौतुक करण्यात आले होते हा चित्रपट फार चर्चेत राहिला होता कारण या
चित्रपटापासूनच चंकी पांडे हे मराठी चित्रपटसृष्टी त पदार्पण करत होते.
2022
हे वर्ष राधासागर यांच्यासाठी खूपच खास ठरले आणि आणि महत्त्वाचे ठरले याच वर्षी त्यांचे
एकापाठोपाठ तीन तीन सुपरहिट चित्रपट रिलीज झाले ते म्हणजे बेनवाड भिरकिट आणि 2022 चा
मराठी सुपरहिट ब्लॉकबस्टर चंद्रमुखी. चंद्रमुखी या चित्रपटांमध्ये राधासागर यांनी शेवंता
ही भूमिका साकारली होती राधा सागर या महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेच्या पुणे शहर
उपाध्यक्ष देखील आहेत. मराठी कलाकारांवर कुठे अन्याय झाला मराठी चित्रपट बाबतीत कुठे
गैर घडले, कुणाला थेटर भेटले नाही प्राईम शो भेटला नाही याच्या विरुद्ध कायम त्या लढताना
दिसतात आणि समाजसेवा करताना दिसतात.
राधा सागर पती आणि कुटुंब - Radha Sagar Husband and Family
खूप
कमी लोकांना माहित आहे की या विवाहित आहेत राधासागर यांनी ७ डिसेंबर 2012 रोजी सागर
कुलकर्णी यांच्याशी आपले लग्न गाठ बांधली. राधासागर यांनी यांचे पती सागर कुलकर्णी हे महाराष्ट्र नवनिर्माण
कामगार सेनेचे महाराष्ट्र राज्याचे उपचिटणीस आहेत.
राधा
यांचा लवकरच हार्दिक जोशी यांच्यासोबत डाव हा चित्रपट येणार आहे तसेच त्यांचा लोणचे
हा चित्रपट देखील येणार आहे.
राधा सागर टॅटू - Radha Sagar Tattoo
राधा सागर यांनी आपल्या हातावर परमनंट टॅटू काढलेला आहे. सागरची परी या नावाचा तो टॅटू आहे.
राधा सागर यूट्यूब चैनल - Radha Sagar YouTube Channel
राधा सागर यांचा यूट्यूब चैनल देखील आहे त्यावर त्यांनी आपल्या अभिनय संदर्भातील व्हिडिओ टाकलेले आहेत त्यांनी त्यावर टोटल 92 व्हिडिओज टाकले असून त्यांच्या चॅनलला २००२७५ सबस्क्राईबर्स आहेत राधासागर या सोशल मीडियावर प्रचंड ऍक्टिव्ह असतात त्यांना इंस्टाग्राम या सोशल मीडिया साइटवर 87 पॉईंट चार के म्हणजेच 87000400 असून त्यांना फेसबुक पेजवर 7.4 के लाईक म्हणजेच ७४०० लाईक आहेत.
राधा सागर या आपल्या फिटनेसच्या
बाबतीत कमालीच्या जागरूक असून त्या नियमितपणे योगा आणि जिम वर. कोट करतात तसेच आपल्या
शरीराला सूचक असलेला समतोल असा आहार खाऊन त्या आपल्या शरीराचे निगादेखील राखतात अशा
या बोर्ड ब्युटीफूल आणि ग्लॅमरस आणि सर्वांना हव्याहव्याशा वाटणाऱ्या अभिनेत्रीला दीपस्तंभ
परिवाराकडून खूप
खूप शुभेच्छा आणि खूप सदिच्छा.