पुण्यातील 10 सर्वोत्तम नॉनव्हेज हॉटेल्स || Best 10 Non Veg Special Hotels in Pune
रविवारी रात्री जेवणात मटण किंवा चिकण खायचंच ठरलेलं असत. त्यात तुम्ही जर पुण्यामधल्या पेठांमध्ये राहत असल तर प्रश्नच नाय! एक से बढकर एक खानावळी आहेत इथल्या हॉटेलात आणी खानावळीत महाराष्ट्रातल्या सगळ्या भागातल्या चवीचा आनंद मिळतो आणि तेही परवडणाऱ्या किमतीत! पण कुठे? सांगतो की हे पुण्यामधल्या चिकण आणी मटण मिळणाऱ्या चांगल्या 10 ठिकांनाची नावं…
मिलन खानावळ
पहिलं आहे मिलन खानावळ! पुण्यातल्या मध्यभागी असणाऱ्या सदाशिव पेठेत कुंठेकर रस्त्यावर मिलन खानावळ आहे. इथल्या मेनूत तुम्हाला चिकनमटण बरोबर फिशथाळी पण मिळते. इथली मटण राईस प्लेट, मटण फ्राय राईस प्लेट,मटण मसाला राईस प्लेट,चिकण राईस प्लेट,चिकण फ्राय राईस प्लेट,चिकण मसाला राईस प्लेट ह्या सगळया थाळ्या खास आहेत.आणी त्याच्यासोबत तांबडा पांढरा रस्सा मिळणं इथली ओळख आहे.तुम्हाला चपाती किंवा भाकरीचा ऑपशन असतो. ‘मारुती दळवी’ ह्यांनी ही खानावळ सुरु केली.ते मूळचे कोल्हापूर जिल्हातील चंदगड चे आहेत.1993 पासून ते पुण्यातल्या सातारा रस्ता जवळच्या हॉटेलात ते कामाला होते. नंतर २००० साली त्यांनी मिनल खानावळीची स्थापना केली.संध्याकाळी तुम्ही खानावळीजवळ फेरफटका जरी मारला तरी मिनल खानावळी समोरची गर्दी पाहून तुमच्या लक्ष्यात येईल की, हे हॉटेल किती फेमस आहे.
साईनाथ खानावळ
दुसरी आहे साईनाथ खानावळ! ‘नादखुळ अस्सल मराठमोळ जेवण’ ह्या टॅगखाली साईनाथ खानावळ फेमस आहे.
मटण थाळी,मटण फ्राय थाळी,मटणकरी थाळी,चिकण मसाला थाळी,चिकण करी ह्या थाळ्या म्हणजे इथली ओळख आहे.थाळीत तांबडा-पांढरा रस्सा त्याचबरोबर सुक चिकण- मटण देण्यात येत. मराठावाड्याचा स्पेशल मसाला इथे वापरण्यात येतो. तुपात इंद्रायणी भात देण्यात येतो. मटण भाकरी स्पेशल ही साईनाथ खानावळची खासियत आहे.स्पेशल घरी बनविण्यात आलेल्या मसाल्यात इथे मटण चिकण तयार करण्यात येत. ‘अमोल निकम’ हे साईनाथ खानावळीचे मालक असून खानावळीची सुरवात २०१६ मधे करण्यात आली.अलका चौकात कुंठेकर रस्त्याला लागूनच ही साईनाथ खानावळ आहे.
आवारे मराठा खानावळ
Google Map Link for Aaware Maratha Khanawal
तिसरी आहे आवरे मराठा खानावळ! सदाशिवपेठेतली अजून एक खानावळ चिकण आणी मटणसाठी फेमस आहे.चिकण हंडी, चिकण मसाला थाळी,मटण मसाला थाळी, मटण करी थाळी,मटण थाळी इथे फेमस आहे.खानावळीत घरी बनवलेल्या मसाल्यातून सगळे पदार्थ बनविण्यात येतात. कोल्हापूर पद्धतीने बनविण्यात येणारा तांबडा पांढरा रस्सा थाळीसोबत देण्यात येतो.५०० रुपयांमध्ये दोघांचं चिकण आणी मटण खाऊन होत.आवारे मराठा खानावळीची सुरवात १९०१ पासून ‘बाळा रघु आवारे’ यांनी केली.आता त्यांची चौथी पिढी नरेंद्र आवारे आता ही खानावळ सांभाळतात.
हॉटेल जगदंबा
चौथं आहे हॉटेल जगदंब! इथ काळ्या मसाल्यातलं मटण खूप फेमस आहे. लोक ५०-१०० किलोमीटर ट्रॅव्हल करून मटण खायला येतात. हॉटेल जगदंब मधले सर्वच पदार्थ साजूक तुपातले असतात.मटण हड्डी,मालवणी मटण खर्डा,मटण मसाला,चिकन करी,चिकन हड्डी,चिकन मसाला सगळ इथे मिळत.त्याचबरोबर स्पेशल मटण भाकरी,गावरान चिकन भाकरी थाळी,बॉयलर ताट हे थाळीचे पदार्थ आहेत. खेड शिवापूरला राहणाऱ्या ‘गणेश पायगुडे’ यांनी २०१२ मध्ये हॉटेल जगदंब सुरु केलं काळ्या मसाल्यातील मटण ही जगदंब हॉटेलची खरी ओळख आहे.पुणे सातारा हायवे वर खेड शिवापूर टोलनाक्याजवळ हॉटेल जगदंब आहे.इथ मोठ्या प्रमाणात वेटिंग असतं.वीकएंड वगळता इतरदिवशी सुद्धा इथे तास तास थांबव लागत.
हॉटेल संदीप
पाचव आहे हॉटेल संदीप! अहमदनगरच हॉटेल संदीप उकडलेल सुक मटण काळ्या मसाल्यात बनवण्यात येणाऱ्या मटणामुळे प्रसिद्ध आहे.बोल्हाई मातेच मंदिर हे पुणे जिल्हातल्या हवेली तालुक्यातल्या वाडेबोलाई इथे आहे.यामुळे या जिल्ह्यात बोकड्याचं मटण खात नाही.मात्र संदीप हॉटेल मध्ये बोकडाच मटण मिळत.म्हणून पुण्याच्या बाहेरून आलेल्या अनेकांची पसंती संदीपला असते.संदीप हॉटेलच्या मेनुवर चिकन उकड,चिकन हंडी,चिकन फ्राय,चिकन रोस्ट,मटण हंडी,मटण उकड,मटण फ्राय हे पदार्थ फेमस आहे.हॉटेल चार मजली असून सुद्धा हॉटेलला वेटिंग केल्याशिवाय जागा मिळत नाय.हॉटेलचे मालक कोतकर आहेत. सप्टेंबर २०२० मधे हॉटेल संदीपचा ब्रँड जंगली महाराजरोडवर सुरु झाला.
जय भवानी मटन भाकरी हॉटेल
सहाव आहे जय भवानी मटण भाकरी हॉटेल! मटण भाकरी हे नवीनच फूड कल्चर आलंय.तरी त्यासाठी ५० किमीचा प्रवास करावा लागला तरी अनेकांची ना नसते.खेड शिवापूर येथील हॉटेल जगदंब प्रमाणेच मटन भाकरी साठी जय भवानी हॉटेल प्रसिद्ध आहे.इथे घरी तयार केलेल्या मसाल्यात मटन चिकन बनवण्यात येते.मटन मसाला,मटन आळणी,मटन सुक्का,मालवणी चिकन हंडी हे पदार्थ हॉटेल भवानीचे फेमस आहेत.जय भवानी हॉटेल मधे मटन चिकन प्रमाणे तुपातील दम बिर्याणी आवडीने खाल्ली जाते. हॉटेलचे मालक शंकर कोंडी देशमुख हे आहेत आणी २००० साली हे हॉटेल सुरु करण्यात आल. पुणे सातारा रस्त्यावरच्या खेड शिवापूर टोल नाक्या जवळ हे हॉटेल आहे.
हॉटेल भुजबळ बंधू - हॉटेल आपुलकी
सातवा आहे हॉटेल भुजबळ बंधू हॉटेल आपुलकी! १९९६ पासून हे हॉटेल सुरु झाल.घरी बनवलेल्या काळ्या मसाल्यात चिकन मटन बनवण्यात येत.येथे खर्डा मटन फ्राय,मटन दम खिमा,खार चिकन फ्राय बरोबर मटन आणी चिकन थाळी इथे फेमस आहे.कपिल भुजबळ हे ह्या हॉटेलचे मालक असून गणेशनगर,कर्वेनगर आहे.
हॉटेल नागपूर
आठव आहे हॉटेल नागपूर ,हो नागपूर हेच हॉटेलच नाव आहे.नावाप्रमाणे नागपूरकडे वापरण्यात येणारा साऊजी मसाला वापरून हॉटेल नागपूर मध्ये चिकन आणी मटन बनवण्यात येत.चुलीवर जुन्या पद्धतीने हे चिकन मटन शिजवण्यात येत.मटन करी,मटन फ्राय,मटन पुलाव,भेजा फ्राय,चिकन फ्राय,चिकन पुलाव अश्या ह्या हॉटेल नागपूरच्या ह्या फेमस गोष्टी आहेत.इथे बसायला टेबल खुर्च्या नाही तर भिंतींना लागूनच बेंच आहेत आणी बसायला येथे स्टुल देण्यात येतो.महेश पार्लिवलीकर हे हॉटेलचे मालक असून त्याची सुरवात १९८० मधे करण्यात आली टिळक स्मारकसमोरच्या पेरू गेटजवळ हॉटेल नागपूर आहे.
हॉटेल चूल मटन
नवव हॉटेल आहे चूल मटन! नावाप्रमाणेच येथे चुलीवरच चिकन मटन बनवलं जातं.इथ चिकन थाळी,मटन थाळी बरोबर मटन दालचा फेमस आहे.स्पेशल तांबड्या मसाल्यात हे पदार्थ बनवले जातात.विनोद तांबे हे हॉटेल चुल मटन चे मालक असून २०१७ मधे ह्या हॉटेलची सुरवात झाली.डीपी रोड,कृष्णा लॉन्स समोर हॉटेल चुल मटन आहे.
हॉटेल सुर्वेज
दहावं आहे हॉटेल सुर्वेज! प्यूयर नॉन व्हेज अशी ओळख असणार हॉटेल सुर्वेज मूळच साताऱ्यातलं आहे इथ मटन उकड,मटन भजी,मटन फ्राय,चिकन लेगपिस,पकोडा,मटन थाळी,चिकन मटन रोस्ट हे पदार्थ फेमस आहेत.हॉटेल सुर्वेश ची स्पेशल ओळख म्हणजे मटन दालच्या आहे.सुर्वेज हॉटेल ३० जानेवारी २०१६ पासून पुण्यात सुरु आहे.तुकाराम पादुका चौक,फरग्यूसन कॉलेज रोडवर आहे.
तुमच्या तोंडाला पाणी सुटलं असेल… आता हळू हळू एक एक हॉटेल पालथ घालायला सुरवात करा.