अंगूरी गुलाब जामुन रबडी शॉट्स || Anguri Gulab Jamun Rabadi Shots Recipe Marathi

अंगूरी गुलाब जामुन रबडी शॉट्स || Anguri Gulab Jamun Rabadi Shots Recipe Marathi

आज आपण अंगूरी गुलाब जामुन रबडी शॉट (Anguri Gulab jamun Rabadi Shots Marathi Recipe) कसे बनवायचे ते पाहणार आहोत तर त्यासाठी लागणारे साहित्य आणि कृती पुढील प्रमाणे. 

anguri gulab jamun rabadi shots

साहित्य:
२५० ग्रॅम गुलाब जमून पीठ,पाणी, इलायची पावडर,साखर,बदाम,दूध,दूध पावडर,तूप,केशर,तेल.

कृती: एका बाऊलमध्ये गुलाब जामुन चे२५० ग्रॅम तयार पीठ घ्यावे त्यामध्ये साडेसात चमचे पाणी घालावे आणि एम एल मध्ये 112 एम एल पाणी घालावे आणि पीठ मळून घ्यावे. आणि हे पीठ पाच मिनिटे बाजूला ठेवून द्यावे.

पाक करण्यासाठी एका भांड्यामध्ये एक लिटर पाणी घालावे यामध्ये एक किलो साखर घालावी उकळी येऊ द्यावी. उकळी आल्यानंतर यामध्ये एक चमचा इलायची पावडर घालून मिक्स करावे आणि पाच ते सात मिनिटे उकळी येऊ द्यावी आणि त्यानंतर गॅस बंद करावे.

रबडी करण्यासाठी पसरट भांडे वापरावे. गॅस वरती एक पसरट भांडे ठेवावे त्यामध्ये तीन कप फुल फॅट दूध घालावे, एक कप मिल्क पावडर थोडी थोडी घालत हलवत राहावे त्यामुळे याच्या गुठळ्या होत नाहीत. त्याला एक उकळी येऊ द्यावी. दुधावर येणारी मलई भांड्याला कडेला लावून घ्यावी. यामध्ये अर्धा कप साखर,कापलेले बदाम,एक चमचा इलायची पावडर घालून हे मिक्स करून पाच ते सात मिनिटे उकळून द्यावे. शॉर्ट बनवण्यासाठी रबडी जास्त घट्ट करायची नाही. पाच ते सात मिनिटे उकळी आल्यानंतर यामध्ये एक चमचा तूप आणि केशर घालावे. आणि जी साईडला मलाई लावली होती ती यामध्ये टाकावी जेणेकरून रबडी खाताना मलई चे लम्स चवीला छान लागतात हे मिक्स करावे आणि गॅस बंद करावे. आणि रबडी थंड करण्यासाठी ठेवावी.

गुलाब जामुन करण्यासाठी पाच मिनिटे बाजूला ठेवून दिलेल्या पिठाचे छोटे छोटे गोळे करून घ्यावेत. गॅस वरती भांड्यामध्ये तेल घालावे तेल थोडेसे गरम झाल्यानंतर यामध्ये गुलाब जामुन चे गोळे घालावे आणि लो फ्लेम वरती गुलाब जामुन तळून घ्यावे.हे तळलेले गुलाब जामुन पाकामध्ये घालावे. आणि गुलाब जामुन अर्धा तास मुरवत ठेवावेत.

प्लेटिंग साठी ग्लासमध्ये बदामाचे काप घालावेत त्यामध्ये रबडी घालावी त्यावरती गुलाब जामुन, बारीक कापलेले ड्रायफ्रूट्स घालावे आणि अशाप्रकारे आपले अंगूरी गुलाब जामुन रबरी शॉट्स तयार होतात.

 

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने