अंडा पॅटीस पाककृती || Anda Patties Marathi recipe

अंडा पॅटीस पाककृती || Anda Patties Marathi recipe

आज आपण अंडा पॅटीस (Anda Patties Marathi recipe) कसे बनवायचे ते पाहणार आहोत तर त्यासाठी लागणारे साहित्य आणि कृती पुढील प्रमाणे. 

anda patties

साहित्य:
४अंडी,कोथिंबीर,टोमॅटो,कांदा,हिरव्या मिरच्या, मीठ, हळद,लाल तिखट,तेल.

कृती: एका बाऊलमध्ये चार अंडे फोडून घ्यावे त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर, बारीक चिरलेला टोमॅटो, बारीक चिरलेला कांदा,बारीक चिरलेला दोन हिरव्या मिरच्या, चवीनुसार मीठ,अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यावे.

 

गॅस वरती पॅनमध्ये एक ते दोन चमचे तेल घालावे आणि त्यावरती पाव ठेवावा त्यावरती अंड्याचे तयार केलेले बॅटर घालावे, त्यानंतर पाव पलटी करून घ्यावा आणि दुसऱ्या बाजूला देखील अंड्याचे बॅटर पावावरती लावावे. दोन्ही बाजूंनी पाव व्यवस्थित भाजून घ्यावा. आणि हा पाव एका प्लेटमध्ये काढावा. अशाप्रकारे बाकीचे अंडा पॅटीस करून घ्यावे. अशाप्रकारे सोप्या पद्धतीने अंडा पॅटीस तयार होते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने