भारताचा नकाशा लक्षात ठेवण्याच्या ट्रिक्स ।। State Map Of India MPSC UPSC Tricks
आजच्या या लेखाच्या माध्यमातून आपण भारताचा राज्य नकाशा म्हणजेच स्टेट मॅप ऑफ इंडिया काही सोप्या ट्रिक्स च्या माध्यमातून लक्षात कसा ठेवू शकतो याविषयी माहिती घेणार आहोत. यामध्ये आपण भारताच्या नकाशा विषयी देखील सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
भारताचा नकाशा सर्वांनी बघितलेला असलेच. भारतात एकूण 29 राज्ये आणि 7 केंद्रशासित प्रदेश आहेत.
आपण आपल्या ट्रिकला सुरुवात करण्याआधी जाणून घेऊयात की आपल्याला कोणकोणते राज्य आधीच माहिती असायला हवेत. जम्मू काश्मीर, राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश ही राज्ये तुम्हाला माहिती असावीत. शक्यतो हे राज्य अनेकांना माहिती असतात. आपल्याला भारताच्या नकाशात पूर्वेकडील राज्य, दक्षिणेकडील राज्य आणि दिल्लीच्या आसपासची राज्ये यात संभ्रम होत असतो. आज आपण आपल्या ट्रिकच्या माध्यमातून आपल्यामध्ये असणारे कन्फ्युजन दूर करण्याचा प्रयत्न करणार आहोत.
उत्तरेकडील राज्य
आपल्याला सर्वात उत्तरेला असलेले जम्मू काश्मीर हे राज्य माहिती आहे. त्याच्या खाली लगेच चित्रात गुलाबी रंगात दाखविलेले 3 राज्य आहेत. या तीन राज्यांना एकत्रित आपण बघितले तर त्यांचा आकार काहीसा फुलांच्या तीन पाकळ्यासारखा दिसतो आहे. जर आपल्याला हे तीन राज्य लक्षात ठेवायचे असतील तर आपण फुल लक्षात ठेवुयात.
फुल ला आपण इंग्रजी भाषेत लिहिले तर ते होत PHUL. आता या शब्दातून आपल्याला तीन राज्य लक्षात ठेवायची आहेत.
P - पंजाब
H - हिमाचल प्रदेश
U - उत्तराखंड
फुलांच्या खाली एक दांडी असते. ज्याच्या माध्यमातून फुल उभे असते किंवा आपण ते फुल पकडत असतो. त्या दांडीचा रंग कोणता असतो? हिरवा. हिंदी मध्ये हिरवा म्हणजे हरा रंग! आणि त्यामुळे मग या तीन फुलांच्या पाकळ्यांच्या खाली असलेले राज्य म्हणजे हरियाणा होय.
आता हरियाणा जवळील राज्य जर बघतीले तर त्याचा आकार हा एखाद्या गेंड्या सारखा आहे. त्याचे तोंड किंवा दात हा उत्तर दिशेला आहे. तुम्ही इथे हत्ती चा आकार देखील कल्पना करू शकतात. आपण या हत्तीला जर एखादा प्रश्न विचारला तर तो उत्तरेकडे आपली सोंड करतो म्हणून या राज्याचे नाव म्हणजे उत्तर प्रदेश होय.
मधली राज्ये
राजस्थान आपल्या सर्वांना माहिती असतोच. त्याच्या खाली असलेले राज्य म्हणजे गुजरात. भारताच्या मध्यावर जे राज्य आहे ते म्हणजे मध्य प्रदेश! आता आपण चित्रात जाऊयात. आपल्याला जो डायनसोर सारखा अजस्त्र प्राणी दिसतोय त्याचे तोंड आणि पुढील पाय म्हणजे गुजरात, मधले धड म्हणजे मध्यप्रदेश होय. आता डायनोसॉर चा मागील पाय खूप मोठा आणि वजनदार असतो. याचे वजन किती आहे तर ते म्हणजे 36 किलो होय. म्हणजेच छत्तीस किलो वजनी पायाचे छत्तीसगड होय. या डायनोसॉर ची शेपटी ही झाडाझुडुपांमध्ये फसलेली आहे. त्यामुळे त्याला तिथून बाहेर पडता येत नाहीये. आता ही झाडेझुडपे म्हणजे झारखंड राज्य होय.
डायनोसॉर ची शेपटी ज्या झाडांमध्ये अडकून बसलेली आहे ते ठिकाण एक जंगल आहे. या जंगलात एक वाघ राहतो. आता सर्वात घातक वाघ कुठे आहेत? तर बंगाल... त्यामुळे हे शेपटी अडकलेले झाडांच्या मागे लपलेले राज्य म्हणजे पश्चिम बंगाल होय.
जंगलातून तुम्हाला बाहेर पडायचे आहे. एका बाजूला हत्ती किंवा गेंडा असलेले उत्तर प्रदेश आणि एका बाजूला वाघ असलेले पश्चिम बंगाल आहे. आता जर मला बाहेर पडायला उत्तरेकडे एकच मार्ग आहे. बाहेर ज्यातून पडायचे ते राज्य म्हणजे बिहार होय. किंवा आपण यूपी बिहार सोबत सोबत बोलतो त्यामुळे यूपी जवळ असलेले राज्य म्हणजे बिहार असे देखील लक्षात ठेवता येईल.
दक्षिणेकडील राज्ये
पिवळ्या रंगाचा एक विना आपल्याला दिसतो आहे. हा विना जादुई विना आहे आणि याला फक्त आंधळे लोक वाजवू शकतात. त्यामुळे हे विण्याच्या आकाराचे राज्य असेल आंध्रप्रदेश. आंध्रप्रदेश मधून एक हिस्सा बाजूला होऊन तेलंगणा राज्य तयार झाले आहे. आपल्याला हे माहीत आहे की तेलंगणा महाराष्ट्र राज्याला लागून आहे आणि त्यामुळे आंध्रप्रदेश राज्याच्या वरील टोपीसारखे राज्य म्हणजे तेलंगणा होय. आपण टोपी कुठे घालतो? डोक्यावर... डोक्याला काय लावतो? तेल... त्यामुळे आंध्रप्रदेश राज्याच्या टोपी सारखे राज्य म्हणजे तेलंगणा होय.
जेव्हा आंध्रप्रदेश राज्यात विना वाजविला जातो तेव्हा त्याचे दूर उडत उत्तरेला जातात. त्यामुळे आपल्या डायनोसॉर च्या शेपटीच्या आणि मागच्या पायाच्या मधील राज्य म्हणजे उडीसा होय.
महाराष्ट्र राज्य सर्वांना माहीत असते. आपला विना जो वाजवत आहे ते राज्य आपल्याला त्या विण्याच्या डाव्या बाजूला दिसते आहे. मात्र आता भरपूर वेळ विना वाजवून देखील उडीसा राज्याला अजून काही वेळ विना ऐकायचा आहे. मात्र विना वाजविणारे आता नाटक करत आहेत की आम्ही विना नाही वाजविणार. हे नाटक करणारे आणि विना वाजविणारे राज्य म्हणजे कर्नाटक होय.
आपल्याला कारले माहीत आहे. त्याच्या आकाराचे एक राज्य आहे. आपण कारल्याला इंग्रजीत करेला म्हणतो. याचाच संबंध लावून आपण केरळ हे राज्य लक्षात ठेवू शकतो. आपले सर्वात शेवटचे म्हणजे दक्षिणेकडील राज्य म्हणजे तामिळनाडू होय. तामिळनाडू लक्षात ठेवायचे असेल तर भारताचे खालील टोक इंग्रजी यु (U) सारखे आहे. मग तिथले राज्य म्हणजे तमिळनाडू (tamilnadU).
उत्तर पूर्वेकडील राज्ये
उत्तर पूर्वेकडील राज्य लक्षात ठेवणे हे सर्वात त्रासदायक काम आहे. आपण यात 7 बहिणी आणि एक त्यांचा भाऊ बघणार आहोत.
आपण इथे एक व्यक्ती घेणार आहोत. ज्याने हात वर केलेले आहेत. त्याने खाली जीन्स घातलेली आहे आणि त्याचे पाय देखील आपल्याला दिसत आहेत. जेव्हा आपण हात वर करतो तेव्हा ते हात आपले आकाशाकडे जातात. आकाश म्हणजे हिंदी मध्ये आसमान... आणि त्यामुळे हात वर केलेला मनुष्य म्हणजे आसाम राज्य होय.
आपल्याला मध्ये वर आलेला एक छोटासा भाग दिसेल. आपल्याकडे छोटे शिक्के असतात आणि त्यातून मग हे राज्य सिक्कीम होय. किंवा त्या व्यक्तीने त्याच्या डाव्या हातात एक शिक्का पकडला आहे आणि त्याच्या हातातील शिक्का म्हणजे सिक्कीम राज्य होय. भारताचे सर्वात पूर्वेकडील राज्य म्हणून तुम्हाला अरुणाचल प्रदेश राज्य माहीत असायलाच हवे.
आता फक्त 3 राज्य पूर्वेला शिल्लक आहेत. यासाठी आपण 3 अक्षरी शब्द लक्षात ठेवुयात. नमामी - म्हणजेच नमस्कार होय.
न (N)- नागालँड (Nagaland)
मा (MA) - मणिपूर (MAnipur)
मी (MI) - मिझोराम (MIzoram)
आता आपण पुन्हा त्या व्यक्तीकडे येऊयात. त्याच्या एका पायाला म्हणून मोकळ्या उजव्या पायाला आपण मिझोराम दिले आहे. मात्र डावा पाय अजून मोकळा आहे. त्याचा हा पाय छोटा आहे कारण काही पाय जमिनीत गेलेला आहे. जमिनीतून वर उगते ते म्हणजे झाड आणि झाडाला आपण इंग्रजीत म्हणतो ट्री! हेच ट्री म्हणजे त्रिपुरा होय.
आपल्याला चित्रात जो व्यक्ती दिसतोय त्याच्या डाव्या हाताखाली अनेक पावसाचे ढग एकत्र आले आहेत. ढग म्हणजे बादल आणि बादल मधून पाऊस येतो म्हणून मेघालय हे राज्य डाव्या हाताखाली.
आता सर्वात छोटे राज्य शिल्लक आहे. गोवा कुठे आहे? गोवा हे सर्वात छोटे राज्य आहे आणि ते पश्चिम किनारपट्टीला लागून आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्या मध्ये अरबी समुद्राला शेजारी गोवा हे छोटेसे राज्य आहे.
ही होती भारतातील 29 राज्ये लक्षात ठेवण्याची ट्रिक... आपण भारताच्या नकाशात कोणते राज्य कुठे आहे हे आज सांगितलेल्या ट्रिक्स च्या माध्यमातून सहज लक्षात ठेऊ शकतो.