लता मंगेशकर जीवन चरित्र मराठी ।। Lata Mangeshkar Biography Marathi
भारताची गानकोकिळा या नावाने प्रसिद्ध असलेल्या लता दीदी म्हणजेच लता मंगेशकर यांचे काही काळापूर्वी नुकतेच निधन झाले. आजच्या या लेखाच्या माध्यमातून या गान सम्राज्ञी विषयी आपण माहिती जाणून घेणार आहोत. लता दिदींचा जीवनपट उलगडण्याचा एक छोटासा प्रयत्न!
लता मंगेशकर यांचा जन्म 28 सप्टेंबर 1929 मध्ये मध्यप्रदेश राज्यातील इंदोर येथे झाला. त्यांचे वडील दीनानाथ मंगेशकर यांच्याकडे रंगमंचावरील कामाचा आणि संगीताचा अनुभव होता. जेव्हा लता दीदी पाच वर्षांच्या होत्या तेव्हापासूनच त्यांच्या वडिलांनी त्यांना संगीत शिकवायला सुरुवात केली होती. लता दीदी यांच्या बहिणी म्हणजेच आशा, उषा आणि मीना देखील त्यांच्यासोबत संगीताचे धडे घेत होत्या.
लता मंगेशकर बायोग्राफी मराठी
संगीताचे सुरुवातीचे शिक्षण
लता दिदींचे सुरुवातीला संगीताचे शिक्षण हे अमान अली खान साहिब आणि अमानत खान यांच्याकडे झाले. लता दीदी या पहिल्यापासूनच परमेश्वराने दिलेल्या गोड सुरेल आवजाचे एक उदाहरण आहेत. त्यांच्या आवाजाने त्यांना खूप लवकर एक लोकप्रियता मिळवून दिली.
त्यांनी वयाच्या 5 व्या वर्षीच एका नाटकात देखील काम केले. त्यांची सुरुवात जरी अभिनयाने झालेली असली तरी देखील त्यांची आवड ही संगीतातच होती.
1942 साली त्यांच्या वडिलांचे म्हणजेच दीनानाथ मंगेशकर यांचे निधन झाले. तेव्हा लता दीदी केवळ 13 वर्षांच्या होत्या. नवयुग फिल्म निर्माता कंपनी चे सर्वेसर्वा आणि त्यांच्या वडिलांचे अगदी जवळचे मित्र मास्टर विनायक म्हणजेच विनायक दामोदर कर्नाटकी यांनी लता दिदींचा परिवाराचा सांभाळ केला. त्यांनीच लता दिदींना एक गायक बनण्यासाठी मोलाची मदत केली.
गायकी मध्ये करियर
आपल्याला माहीत आहे की यशाचा मार्ग हा कधीच सोपा नसतो. लता दिदींना देखील गायकी क्षेत्रात स्थान निर्माण करण्यासाठी अनेक आव्हानांना सामोरे जावे लागले. अनेक संगीतकारांनी तर लता दिदींना त्यांच्या कमी आवाजामुळे काम देण्यासाठी नकार दिला होता. त्यावेळी नूरजहाँ या प्रसिद्ध गायिका होत्या. त्यांच्यासोबत लता मंगेशकर यांची तुलना केली जात असे. पुढे जाऊन हळूहळू स्वतःच्या वेगळ्या शैलीमुळे लता दिदींना कामे मिळायला लागली. लता दिदींचा यशाने पुढे त्यांना चित्रपट क्षेत्रातील एक भक्कम आणि यशस्वी महिला बनविले होते.
लता दिदींना सर्वाधिक गाने रेकॉर्ड करण्याचा सन्मान देखील मिळालेला आहे. चित्रपटांतील गान्यांशीवाय इतरही अल्बम साठी लता दीदींनी गानी गायली आहेत. लता दिदींचा आवाज हा पहिल्यांदा आपकी सेवा में या चित्रपटात असलेल्या गान्याने लोकांपर्यंत पोहोचला. त्यानंतर मात्र लता दिदीं ने कधीही मागे वळून बघितले नाही.
पुरस्कार
लता मंगेशकर यांना भारत सरकार तसेच इतरही संस्थांनी अनेक सर्वोच्च सन्मानाने सन्मानित केले होते. त्यांनी अनेकदा पुरस्कार नाकारले देखील कारण त्यांना असे वाटत होते की हे पुरस्कार इतर नवीन युवा पिढीला मिळावेत.
भारत सरकारने दिलेले पुरस्कार
1969- पद्मभूषण
1989- दादासाहेब फाळके पुरस्कार
1999- पद्मविभूषण
2001- भारत रत्न
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार
1972- चित्रपट परी मधील गान्यांसाठी सर्वोत्कृष्ट महिला पार्श्व गायिका राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार
1974- चित्रपट कोरा कागज मधील गान्यांसाठी सर्वोत्कृष्ट महिला पार्श्व गायिका राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार
1990- चित्रपट लेकीन मधील गान्यांसाठी सर्वोत्कृष्ट महिला पार्श्व गायिका राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार
फिल्मफेअर अवॉर्डस
1959- आजा रे परदेसी (मधुमती)
1963- कही दीप जले कही दिलं (बिस साल बाद)
1966- तुम मेरे मंदिर तुम मेरी पूजा (खानदान)
1970- आप मुझसे अच्छे लगते है (जिने की राह से)
1993- फिल्मफेअर लाईफटाईम अचिवमेंट अवॉर्ड
1994- दीदी तेरा देवर दिवाना (हम आपके है कौन)
2004- फिल्मफेअर स्पेशल अवॉर्ड - गोल्डन ट्रॉफी
महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार
1966- सर्वश्रेष्ठ पार्श्वगायिका
1966 - सर्वश्रेष्ठ संगीत निर्देशक
1977- जैत रे जैत साठी सर्वश्रेष्ठ पार्श्व गायिका
1997- महाराष्ट्र भूषण
2001- महाराष्ट्र रत्न
लता मंगेशकर निधन ।। Lata Mangeshkar death news
वयाच्या 92 व्या वर्षी लता दीदी यांचे 6 फेब्रुवारी 2022 रोजी निधन झाले. सकाळी 8 वाजून 12 मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ब्रीच कॅण्डी रुग्णालयात त्यांच्यावर अनेक दिवस उपचार सुरू होते मात्र अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. लता दिदींच्या निधनाने संपूर्ण कला विश्वावर आणि महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे.