पार्टनर पुस्तक परीक्षण ।। Partner Marathi Book Review
प्रसिद्ध लेखक वपु काळे यांच्या लेखणीची जादू काही वेगळीच आहे. हे त्यांच्या प्रत्येक पुस्तकातून जाणवते. असच एक त्यांचं पुस्तक म्हणजे पार्टनर! आज आपण याच पार्टनर पुस्तकाचे परीक्षण करणार आहोत.
पार्टनर या पुस्तकाची कथा ही युनिव्हर्सल आहे. As you write more and more personal it becomes more and more universal!
पुस्तकाचे नाव - पार्टनर (Partner)
लेखकाचे नाव - व पू काळे (V P Kale)
प्रकाशकाचे नाव - मेहता पब्लिशिंग हाऊस (Mehta Publishing House)
ही कथा दादर मधल्या चाळीतील लहानश्या खोलीत राहणाऱ्या श्री ची आहे. मोठा भाऊ अरविंद हा premature baby म्हणुन लहान पणापासून आई वडिलांचं त्याच्यावर जास्त जीव. याच गोस्टीचा अरविंद नेहमी फायदा घेत असत यामुळे श्री ला नेहमी दुय्यम वागणूक मिळे.
अरविंदचे त्याच्याच ऑफिसमधल्या मनोरमाशी लग्न होत. श्री ची आई,अरविंद, मनोरमा हे श्री शी दुटप्पी वागत असे . अरविंद च लग्न झाल्यावर अरविंद श्री ला सांगतो तुला झोपायची व्यवस्था दुसरीकडे करावी लागेल आणि तेव्हा श्री ची ओळख होते पार्टनरशी!
पार्टनर हे त्याचं खर नाव होतं. पार्टनर हा श्री च्या खोलीत झोपायला जागा देतो आणि तेव्हा पासून पार्टनर हा श्री च्या आयुष्याचा एक भाग बनला . या कथेतील पार्टनर हे एक अजब व्रत आहे. हो नेमही श्री ला सल्ले देतो, व्रत करतो ,श्री ला आयुष्याबद्दल पडलेल्या सर्व प्रश्नांची उत्तर देतो.
पार्टनर ही फिलॉसॉफी श्रींच्या मनावर छाप पाडते तसेच ती आपल्या मनावर ही छाप पडते . पार्टनर म्हणतो "there is not single example of happy phelosofer" हे त्याला सुद्धा लागू पडत .
अशातच श्रीच्या आयुष्यात एक तरुणी येते . तीच नाव किरण. श्री च लक नेहमी त्याला साथ देत. श्री च्या लग्नानंतर आई भाऊ वहिनी यांच्या दुटप्पी वागण्यामुळे श्री आणि किरण मध्ये नेहमी वाद होत असे.
एम आणि डब्लू याच्या मध्ये श्री अडकवून जातो. आता M आणि W काय प्रकार आहे ; हे माहीत करून घ्यायला तुम्हाला पुस्तक वाचावं लागेल. श्री आणि किरण ला एक बाळ सुद्धा होत पण ते नंतर मरण पावत. या सगळ्या घटनांमध्ये त्याला पार्टनर ची साथ नेहमी लाभते. पार्टनरला आयुष्याकडे बघण्याचा वेगळा दृष्टिकोन हा त्याला वेगळा बनवतो.
कथेमध्ये पार्टनर जरी कमी वेळा येत असला. तरी तो श्री ला आणि आयुष्याला सुद्धा आयुष्याकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन देतो. यामुळे पार्टनर सारखा मित्र आपल्याला सुद्धा हवा अस नेहमी वाटत.
या कथेवर आधारित चित्रपट सुद्धा प्रदर्शित झालाय. पुस्तकाचं मुखपृस्ट सुभाष औचट यांनी केलं आहे. मुखपृष्टवर वरच्या बाजुस पुस्तकाचं नाव आहे आणि लेखकाचं नाव लिहिलेलं आहे. खाली पत्याच चित्र आहे. त्यात एक श्री आणि पुरुषाचं चित्र आहे.मागील बाजुस पुस्तकातील पार्टनर ची काही वाक्य लिहिलेली आहे.
तुला मी हाक कशी मारू?
पार्टनर याच नावाने
आपल्याला खर तर नावच नसत.
बारशाला नाव ठेवतात ते देहाचं.
पोरगी म्हणजे झुळूक
अंगावरून जाते.
अमाप सुख देऊन जाते.
पण धरून ठेवता येत नाही.
आपल्याला हवा तेव्हा.
तिसरा माणुस न जाणे.
हाच नरक!
लक्षात ठेव दोस्त
तुला मी हवा आहे
म्हणून मला तू हवा आहेस.
as you write
more and more
personal
it becomes
more and more
universal....
अप्रतिम पुस्तक सगळ्यांनी आवर्जून वाचावं अस हे पुस्तक. या पुस्तकाबद्दल वेगळं अस काय बोलणार, हे पुस्तक च वेगळं आहे. यात दोन पार्टनर आहे .एक म्हणजे श्रीचा मित्र आणि दुसरा म्हणजे किरण श्रीची पत्नी या तिघांभोवती ही कथा फिरते . प्रत्येकाने हे पुस्तक एकदा नक्की वाचावे हाच आमचा सल्ला असेल.