शेअर मार्केट संबंधित मराठी पुस्तके ।। Marathi Books related to Share Market

शेअर मार्केट संबंधित मराठी पुस्तके ।। Marathi Books related to Share Market

आपण शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला सर्वात आधी त्याविषयी परिपूर्ण माहिती असायला हवी. याशिवाय आपल्याला आर्थिक व्यवस्थापन कसे करावे हे देखील समजायला हवे. यासाठी आज आम्ही शेअर मार्केट विषयी संपूर्ण माहिती देणारी मराठी पुस्तके (Marathi Books on share market) खास तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

शेअर मार्केट संबंधित मराठी पुस्तके ।। Marathi Books related to Share Market

सुरुवातीला पुस्तकांकडे जाण्याआधी थोडक्यात शेअर मार्केट विषयी काही बेसिक गोष्टी जाणून घेऊयात.

शेअर मार्केट म्हणजे काय? (What is Share Market in Marathi)

मार्केट म्हणजे अशी जागा जिथे कोणत्याही वस्तूची खरेदी किंवा विक्री केली जाते. शेअर मार्केट म्हणजे असे मार्केट जिथे शेअर्सची खरेदी आणि विक्री केली जाते.  खूप साऱ्या कंपन्यांना आपले प्रोडक्शन वाढविण्यासाठी किंवा लॉस कमी करण्यासाठी गुंतवणुकीची गरज असते. त्यामुळे या कंपन्या आपले शेअर्स विकून पैसा उभा करतात. आपल्या प्रॉफिट मधील काही भाग ते या शेअर्स होल्डर्सला देखील देत असतात. 

एखादी कंपनी जेव्हा शेअर मार्केटला लिस्ट होते तेव्हा तिचे शेअर्स केले जातात. शेअर्स म्हणजे कंपनीचे समभाग किंवा हिस्सा होय. हे समभाग विक्रीसाठी शेअर मार्केट मध्ये ठेवले जातात. हे शेअर्स कोणी पण विकत घेऊ शकतो. ज्या व्यक्तीने जितके शेअर्स विकत घेतले तो त्या कंपनीचा तेव्हढ्या भागाचा मालक होतो. 

भविष्यात कंपनीला प्रॉफिट झाला ना तर मग त्या शेअर होल्डर्सला देखील नफा होतो. पण मात्र जर कंपनीला नुकसान झाले तर शेअर होल्डर्सला देखील तोटा सहन करावा लागतो. त्यामुळेच शेअर मार्केटला एक रिस्की गेम म्हणले जाते.

जर समजा तुम्ही A कंपनीच्या शेअर्स मध्ये 1000 रुपये गुंतवले आणि भविष्यात कंपनीला फायदा झाला तर तुमचा पण फायदा होईल. पण कंपनी जर लॉस मध्ये गेली तर तुम्हाला पण नुकसान सहन करावे लागेल. 

शेअर मार्केट काम कसे करते? (How share market works in marathi)

शेअर मार्केटचे सर्व काम हे स्टॉक एक्सचेंज मार्फत होते. आपल्या भारतात BSE म्हणजे Bombay Stock Exchange आणि NSE म्हणजे National Stock Exchange हे दोन स्टॉक एक्सचेंज आहेत. इथून शेअर्सची सर्व खरेदी आणि विक्री केली जाते.

हे सर्व व्यवहार आणि भारतीय स्टॉक मार्केटला सेबी कंट्रोल करत असते. सेबी ही शासकीय संस्था आहे. म्हणजे हे सर्व व्यवहार सरकार कडून नियंत्रित केले जातात. 

शेअर्स मध्ये गुंतवणूक कशी करावी? (How to invest in share market in marathi)

आधीच्या काळात शेअर्स विकत घेणे ही किचकट प्रोसेस होती. त्यावेळी विकत घेतलेले शेअर्स हे कागदाच्या रुपात कुरियरने आपल्या घरी पाठविले जात. 1996 नंतर शेअर्सचे डिजिटलायझेशन झाले आणि त्यामुळे आता शेअर्स मध्ये गुंतवणूक करण्याची प्रक्रिया अधिकच सोपी झालेली आहे. 

स्टॉक मार्केट म्हणजेच शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करण्यासाठी तुम्हाला 3 गोष्टी लागतात. 

1. बँक खाते - याद्वारे तुमचे पैसे debit आणि credit होतात.

2. पॅन कार्ड - 

3. डिमॅट अकाउंट - हे डिमॅट खाते लॉकरचे काम करते. यामध्ये तुमचे विकत घेतलेले शेअर्स जमा राहतात. डिमॅट खात्यासोबत तुम्हाला ट्रेडिंग खाते देखील मिळते. ट्रेडिंग अकाउंट मधून तुम्ही तुमच्या शेअर्सची खरेदी आणि विक्री करू शकतात. हे सर्व डिमॅट अकाउंट मध्ये सेव्ह राहते.

सध्या खूप साऱ्या कंपन्या app द्वारे फ्री मध्ये डिमॅट अकाउंट ओपन करून देतात. तुम्हाला युट्युबवर apps विषयी माहिती मिळेल. यातील एखाद्या app चा वापर करून तुम्ही फ्री मध्ये डिमॅट खाते सुरू करू शकतात.

सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे डिमॅट अकाउंट ओपन करणे फ्री जरी असले तरी देखील काही कंपन्या ब्रोकरेज आणि मेंटेनन्स चार्ज म्हणून काही कमिशन घेतात. त्यामुळे अकाउंट ओपन करण्यापूर्वी चार्जेस बद्दल सविस्तर माहिती घ्या.

तुम्हाला जर डिमॅट अकाउंट ओपन करायचे असेल तर खाली दिलेल्या फ्री डिमॅट अकाउंट लिंक वर जाऊन तुम्ही फ्री मध्ये डिमॅट अकाउंट ओपन करू शकतात.

फ्री डिमॅट अकाउंट - Free Demat Account


शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करावी का? (Should I invest in Share Market in marathi)

शेअर मार्केटला रिस्की गेम म्हणले जाते. खूप सारे लोक शेअर मार्केटला जुगार देखील म्हणतात. तुम्ही जर रिसर्च न करता, कोणाचेही न ऐकता जर गुंतवणूक केली तर हा जुगारच आहे. तुम्ही सविस्तर आणि स्वतः रिसर्च करून कंपनीचे रेकॉर्ड चेक केले आणि मग शेअर्स विकत घेतले तर तुम्हाला खूप चांगला रिटर्न मिळू शकतो. 

आमच्या मते तुम्ही थोडी का होईना पण शेअर्स मध्ये गुंतवणूक नक्की करावी. तुमची आर्थिक स्थिती ठीकठाक असेल तर सुरुवातीला नुकसान सहन होईल. तुम्ही तितकेच पैसे गुंतवा जितके बुडल्यानंतर देखील तुम्हाला काही वाटणार नाही. 

तुमचा जसा अनुभव वाढत जाईल तसे आणखी गुंतवणूक वाढवत राहा. 


शेअर मार्केट संबंधित पुस्तके (Marathi Books related to share market)

शेअर मार्केट विषयी मराठी भाषेत खूप जास्त पुस्तके उपलब्ध नाहीत. तरी काही पुस्तके आहेत जी तुम्ही वाचू शकतात.

1. शेअर बाजाराची ओळख (लेखक- जितेंद्र गाला)

2. गाईड टू इन्व्हेस्टिंग (लेखक- रॉबर्ट टी कियोसाकी)

3. वॉरेन बफे (लेखक - अतुल कहाते)

4. रिच डॅड पुअर डॅड

5. द रीचेस्ट मॅन इन बॅबिलोन

6. द सायकॉलॉजी ऑफ मनी (पैशाचे मानसशास्त्र)

7. द इंटेलिजेंट इन्व्हेस्टर


ही काही पुस्तके तुम्ही वाचू शकतात. ही पुस्तके आपल्याला गुंतवणूक आणि आर्थिक व्यवस्थापन याविषयी माहिती देतील. या लिस्ट मध्ये शेअर मार्केट मधील स्ट्रॅटेजी आणि वरचढ माहिती देणारी पुस्तके आम्ही घेतलेली नाहीत. आम्ही तुम्हाला एक गोष्ट सांगू की कधीच आयती स्ट्रॅटेजी सांगणारे पुस्तक वाचू नका. स्वतः रिसर्च करा आणि स्वतःची एक स्ट्रॅटेजी बनवा. 

तुम्हाला आता शेअर मार्केट विषयी बेसिक माहिती झाली असेल. तुमचे अजून काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की विचारा, आम्ही तुम्हाला त्याची उत्तरे देण्याचा नक्की प्रयत्न करू. 

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने