स्टीव्ह जॉब्स : एक झपाटलेला तंत्रज्ञ पुस्तक परीक्षण || Steve Jobs Marathi Biography Book Review

स्टीव्ह जॉब्स : एक झपाटलेला तंत्रज्ञ पुस्तक परीक्षण || Steve Jobs Marathi Biography Book Review

स्टीव्ह जॉब्स यांना कोण नाही ओळखत? Apple कंपनीचे Co-founder आणि CEO असलेले स्टीव्ह जॉब्स हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक होते. कॉम्प्युटर आणि मोबाईल यांच्यामध्ये झालेल्या क्रांतीत स्टीव्ह जॉब्स यांचे मोलाचे योगदान आहे. त्यांचे व्यक्तिगत आयुष्य देखील तितकेच जास्त इंटरेसटिंग आणि प्रेरणादायी आहे.

स्टीव्ह जॉब्स : एक झपाटलेला तंत्रज्ञ पुस्तक परीक्षण || Steve Jobs Marathi Biography Book Review

आज आपण लेखक अच्युत गोडबोले आणि अतुल कहाते लिखित स्टीव्ह जॉब्स यांचे चरित्र “स्टीव्ह जॉब्स, एक झपाटलेला तंत्रज्ञ” या पुस्तकाचे परीक्षण करणार आहोत. लेखकांनी स्टीव्ह यांना एक झपाटलेला तंत्रद्न्य का म्हणले आहे हे तुम्हाला हे पुस्तक वाचल्यानंतर नक्कीच कळेल.


पुस्तकाचे नाव- स्टीव्ह जॉब्स: एक झपाटलेला तंत्रज्ञ

लेखकाचे नाव- अच्युत गोडबोले आणि अतुल कहाते

पृष्ठ संख्या- 162


हे पुस्तक म्हणजे स्टीव्ह जॉब्स यांचे छोटेसे चरित्र आहे. पुस्तक पहिल्यांदा 2011 साली प्रकाशित झाले होते. तसे बघायाल गेले तर भारतात apple कंपनीचे खूप जास्त वापरकर्ते नाहीत, तरी देखील स्टीव्ह जॉब्स या माणसाबद्दल भारतीयांच्या मनामध्ये कमालीचे आकर्षण आणि आत्मियता आहे. 

पुस्तकाची सुरुवात स्टीव्ह जॉब्स यांच्या जन्मापासून होते. स्टीव्ह जॉब्स यांचे आई वडील अविवाहित होते. म्हणून मग त्यांनी स्टीव्ह जॉब्स यांना पॉल जॉब्स आणि क्लारा जोबास यांना दत्तक दिले. स्टीव्ह यांचे वडील मेकॅनिक होते. स्टीव्ह लहान असल्यापासून तो त्यांना गरेज मध्ये मदत करत असे. इथूनच त्यांना मशीन्स आणि तंत्रज्ञान यामध्ये आवड निर्माण झाली. 

लहानपणापासून स्टीव्ह इतका खोड्या करायचा कि एकदा त्याने डूप्लिकेट बॉम्ब बनवून स्वतःच्याच शाळेत फिट केला होता. यामुळे स्टीव्ह याना तेव्हा एका दिवसासाठी बाल सुधारगृहात देखील ठेवण्यात आले. इथे देखील स्टीव्ह बाल सुधारगृहातील मुलांना पंख्याची वायर कट करून इतरांना शॉक कसा द्यायचा हे शिकवून आला.

पुढे जाऊन स्टीव्ह यांनी असा फोन बनविला ज्याचा वापर करून आपण इतरांचे कनेक्शन वापरून फ्री मध्ये call करू शकत होतो. हा फोन स्टीव्ह ने घरोघरी जाऊन  विकला आणि त्यातून देखील भरपूर पैसे कमविले.

याच काळात स्टीव्ह जॉब्स कॉलेजला देखील जाऊ लागले. कॉलेज मधील पुस्तकी शिक्षण त्यांना आवडत नव्हते. यात स्टीव्ह कॉलेजची फी देखील भरू शकला नाही. फक्त 6 महिन्यात त्यांनी कायमचे कॉलेज सोडून दिले. स्टीव्ह हिप्पी लाइफस्टाइल जगायला लागला.

हिप्पी लाइफस्टाइल म्हणजे खूप लांब दाढी, केस वाढविणे, दारू आणि ड्रग्स चे व्यसन करणे, जोरात आवाजात संगीत ऐकत बेफिकीरपणे जगणे. अशा विचित्र प्रकारे स्टीव्ह जॉब्स जगत होता. अमेरिकेत 70 च्या दशकात हि हिप्पी लाइफस्टाइल खूप प्रसिद्ध झाली होती. पुढे स्टीव्ह याला देखील कंटाळून गेला.काही काळासाठी तो गेम डेव्हलप करणाऱ्या कंपनीत स्टीव्ह जॉब करायला लागला. तिथेही तो थोडा विचित्रच वागायचा. कित्येक दिवस अंघोळ न करता तो ऑफिसला यायचा. बाकीचे इतर लोक त्याला कंटाळून गेले होते मात्र त्याचे काम बघता कोणीही त्याला कामावरून  काढू शकले नाही. 

काही काल जॉब केल्यानंतर तो मनाच्या शांती आणि आत्मिक समाधानासाठी भारतात आला. इथे त्याला निम करोली बाबा यांना भेटायचे होते. परंतु स्टीव्ह भारतात येण्याच्या आधीच निम करोली बाबा चा मृत्यू झाला होता. यामुळे स्टीव्ह खूपच निराश झाला. त्याने भारतातील धार्मिक स्थळे फिरायला सुरुवात केली. हिमालयात जाऊन त्याने काही काल मेडीटेशन देखील केले. भारतातील दारिद्र्य आणि गरिबी बघून मनाच्या शांतीऐवजी तो अधिकच अस्वस्थ झाला. त्याने आपल्या देशात परत जाण्याचा निर्णय घेतला.

तो मायदेशी गेला असला तरी देखील त्याच्यावर भारतीय संस्कृतीचा परिणाम झाला. तो पूर्णपणे शाकाहारी झाला. या काळात स्टीव्ह जॉब्स याच्याकडे खाण्यापुरते देखील पैसे नसायचे. तिथल्या एका स्थानिक इस्कॉन मंदिरात त्याला आठवड्यातून एक दिवस पोटभर जेवायला मिळायचे. आणि फक्त ते जीवन मिळावे म्हणून स्टीव्ह दर आठवड्याला 7  किलोमीटर चालत तिथे जात असे.   

पुढील काळात स्टीव्ह जॉब्स याने स्टीव्ह वोझनियाक सोबत मिळून apple कंपनीची सुरुवात केली. त्याकाळी कॉम्प्युटर्स खूप मोठे आणि ओबडधोबड होते. स्टीव्ह णे पहिल्यांदा दिसायला सुंदर आणि compact असे कॉम्प्युटर बनवायला सुरुवात केली. त्यांनी जगातील पहिला pc बनविला. त्यालाच apple 1 असे नाव दिले. Apple 1 जरी चालला नसला तरी देखील पुढे आलेला Apple 2 मात्र खूप यशस्वी ठरला. त्यानंतर स्टीव्ह हे बिलीनियर झाले. तरी देखील apple कंपनी सोबत IBM आणि Microsoft या कंपन्यांची स्पर्धा सुरु होती. Apple चे लिसा आणि मर्कीतोष हे कॉम्प्युटर अपयशी ठरले. यामुळे apple चे नुकसान होत होते. अशा स्थितीत देखील स्टीव्ह यांची वागणूक अजूनही विचित्र होती. त्यांची अंघोळ न करण्याची सवय अजूनही तशीच होती.

खूप मोठ्या मिटींग्स मध्ये स्टीव्ह टी-शर्ट घालून जात असे. दुसऱ्या कोणाच्याही आयडिया स्वतःची आहे असे सांगून तो वापरून घ्यायचा. या सर्व प्रकारमुळे स्टीव्ह जॉब्स यांना apple कंपनीतून बाहेर काढण्यात आले. 

स्वतः उभ्या केलेल्या कंपनीतून बाहेर काढल्यामुळे स्टीव्ह जॉब्स खूप निराश झाले. त्यांनी खचून न जाता स्वतःची NEXT नावाची कॉम्प्युटर सोफ्टवेअर बनविणारी कंपनी सुरु केली. सोबतच त्यांनी PIXAR नावाची एक कंपनी देखील विकत घेतली. हीच PIXAR आज देखील अनिमेशन फिल्म्स मधील एक मोठे नाव आहे. 

स्टीव्ह यांनी apple सोडल्यानंतर apple कंपनी खूप जास्त नुकसानीत गेली. Apple ने खूप सारे CEO बदलून बघितले मात्र त्यांचे नुकसान वाढतच होते. स्टीव्ह जॉब्स यांची नेक्स्ट हि कंपनी देखील apple ची स्पर्धक झाली होती. त्यामुळे नाईलाजाने apple च्या बोर्ड मेम्बर्सला विनंती करून स्टीव्ह जॉब्स यांना apple मध्ये परत आणावे लागले. पुन्हा एकदा apple चे CEO म्हणून स्टीव्ह जॉब्स यांची नियुक्ती करण्यात आली.

त्यानंतर मात्र इतिहासच घडला.स्टीव्ह जॉब्स यांनी apple मध्ये खूप सारे बदल केले आणि एकानंतर एक product ते बाजारात आणत गेले. iMac, iPad, iPhone, iPod यासारखे उतपादन त्यांनी केले ज्यांचा कोणी आधी विचार देखील केलेला नव्हता. त्यामुळे apple जगातील सर्वात वेगाने पहिली 2 ट्रिलीयन ची कंपनी बनली. त्यानंतर आजपर्यंत apple ने कधी मागे वळून बघितले नाही. जगातील सर्वात top ब्रांड म्हणून apple ओळखला जातो. 

पुढे स्टीव्ह यांना स्वादुपिंडाचा कॅन्सर झाला. तो वाढतच गेला, स्टीव्ह देखील अशक्त होत गेले. स्वादुपिंडाच्या कर्करोगाने त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्युच्या एक दिवस आधी iPhone 4 लौंच झाला होता. जो indirectly त्यांना श्रद्धांजली म्हणून खूप जास्त विकला गेला. 

आजही खूप सारे लोक स्टीव्ह यांना आयडीअल मानतात. त्यांचे शेवटचे भाषण हे जगातील सर्वाधिक लोकप्रिय भाषानांपैकी एक आहे. स्टीव्ह मध्ये अनेक व्यक्तिमत्व दडलेली होती. विक्षिप्तपणा, उद्योजकता, कल्पकता, कठोर परिश्रम,हट्टीपणा, आत्मविश्वास आणि एक विचित्र असा वेडेपणा यांचे मिश्रण स्टीव्ह मध्ये होते. आणि म्हणूनच ते जगातील सर्वात यशस्वी लोकांपैकी एक होते. तुम्हाला जर सुपर सक्सेसफुल आणि मिलीनियर माणसांबद्दल वाचायची आवड असेल तर हे पुस्तक तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन ठरेल. 

फक्त 162 पानांचे हे पुस्तक तुम्हाला स्टीव्ह जॉब्स सोबत कॉम्प्युटर्स आणि मोबाइल या क्षेत्रात होत गेलेल्या बदलांची माहिती देते. कॉम्प्युटर मधील क्रांती आणि टेक्नोलॉजी मध्ये होत गेलेले बदल, कंपन्यांतील स्पर्धा आणि हेवेदावे यासारख्या बऱ्याच गोष्टींची माहिती तुम्हाला या पुस्तकात मिळते. 


तुम्ही apple ची उत्पादने वापरत असाल किंवा नसाल तरी हे पुस्तक एकवेळ नक्की वाचा. 

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने