प्राजक्तप्रभा कविता संग्रह पुस्तक परीक्षण । Prajaktaprabha Book Review Marathi

प्राजक्तप्रभा कविता संग्रह पुस्तक परीक्षण । Prajaktaprabha Book Review Marathi


आपण सर्वजण प्राजक्ता माळी या अभिनेत्रीला नक्कीच ओळखत असू. त्यांनीच एक कविता संग्रह आणला आहे. 

त्याविषयीच आज या लेखातून जाणून घेऊयात. 

प्राजक्तप्रभा कविता संग्रह पुस्तक परीक्षण । Prajaktaprabha Book Review Marathi


कला 

'कलेकलेने' वाढत जावे 

'कल्लाकाराला' घडवते…

ती तिच्याच 'कलान' घ्यायला लावते…


'कला' ही कला असते…

ती तिच्याच 'कलान' घ्यायला लावते


'कालाच' बंधन नसतं तिला…

'लक' मात्र बरोबरीने बाळगते…

जळुन आलं सगळं व्यवस्थित तर 'कलाकंद'

नाहीतर सगळ्याचा 'काला' करून जाते…

ती तिच्याच 'कलान' घ्यायला लावते


'कललात' एकदा तिच्याकडे 

की पुन्हा स्वतःला सावरता येणं महाकठीण…

आणि वेळोवेळी स्वतःला सावरुन नाही घेता आलं 

तर 'क्लेश' मात्र देऊन जाते

ती तिच्याच 'कलान' घ्यायला लावते…


जीवनाच्या 'कलकलाटात'

आयुष्याला 'कल्हई' करून जाते

बेरंग,बेचव आयुष्याला

'कलाटणी' देऊन जाते...

ती तिच्याच 'कलान' घ्यायला लावते…


पडली ऐखाद्याच्या पदरात तर तो म्हणवतो 'कलासंपन्न'

अन् नाही झेपली तर त्याला 'कलंकित' मात्र करुन जाते...

कला ही कला असते...

ती तिच्याच 'कलान' घ्यायला लावते…


पुस्तकाचे नाव - प्राजक्तप्रभा(prajaktaprabha) 

लेखकाचे नाव - प्राजक्ता माळी (prajakta mali)

प्रकाशन - ग्रंथाळी पब्लिकेशन (granthali publications)


प्राजक्ता माळी अभिनेत्री, नृत्यांगना, सूत्रसंचालिका अशी तिची ओळख आपल्या सर्वांना माहितीये. पण आता कवयित्री म्हणुन ती आपल्या सर्वांच्या भेटीला आली. 

पुस्तकाचं नाव आहे प्राजजक्तप्रभा. तिने जे अनुभवलं जे पाहिलं जे जाणवलं अशा भावना काव्य रूपाने लिहिल्या आहे. त्या निवडक कवितांचा हा काव्य संग्रह या पुस्तकाच्या मनोगतात ती म्हणते मी कवयित्री नाही , कोण्याचा मानस मोह ही नाही आग्यात वाचन जिभेवर नाचती सरस्वती मनात शांताबाई, ग्रेस, कुसुमाग्रज अशी काही माझी गत नाही, मी कवयित्री नाही.  जे सुचलं स्फुरल तरळल कळलं समजलं झिरपल, ते कविता रुपांन  प्रकटल सामोरी आलं सगळ्यांना ते आवडलं च पाहिजे असं माझा अट्टहास नाही.

मी कवयित्री नाही. ती कवयित्री नसली तरी धनंजय गगल प्रस्तावनेत म्हणतात तस, कविता वाचल्या नंतर लक्षात येत की तीच हे पहिलं पाऊल दमदार आणि भाव्य अपेक्षा निर्माण करणार आहे. तीन मनपूर्वक प्रयत्न केला आणि पुरेसा वेळ दिला. तर पुढील वाटचालीची सुक्त विजय या संग्रहात आहे. या कवीता संग्रहात बत्तीस कविता आहेत. आणि त्या नुसत्या मराठी भाषेत च नाही तर हिंदी आणि इंग्रजी भाषेत सुद्धा आहेत. 

प्रेम कला कलाकार विरह रोजच्या जीवनातील अनुभव अश्या वेगवेगळ्या  विषयांवर या कविता आहेत. पारिजातकाची फुले  जशी सुगंधानी भरलेली असतात तश्याच प्रजक्तांच्या कविता आहेत.  त्या कविता संग्रहातील प्राजक्तप्रभा ती पहिली भेट फकीर प्रेम आठवत असेल न त्याला मानवी दुनिया सत्या दिसुदे कितना अच्छा होता समज नही आता प्यार इशक मोहोबत या कविता मला आवडल्या आहेत. आणि या कविता संग्रहातील तुम्हाला कोणती कविता आवडली हे आम्हाला कमेंट करून सांगा.  ग्रंथाली प्रकाशक हे या पुस्तकाचे प्रकाशक आहेत. पुस्तकाची किंमत शंभर रुपये आहे. पुस्तकाचा मुखपृष्ठ हे मंगेश सावंत यांनी आणि छायाचित्र काढलंय ते  तेजस नेरुलकर यांनी काढले आहे. 

कवितेला समर्पक  चित्र रेखाटली आहेत. सायली  देवीदार बुरसे यांनी  पुस्तकाच्या मागील बाजुस लिहिलय, प्रिय प्राजक्ता प्रजक्तप्रभा या आपल्या काव्यसंग्रहास हार्दिक शुभेच्छा प्राजक्ताची संन्यस्त तरलता आज समर्पित वृत्तीतील प्रभा आपल्या उत्कट कवितांमधून मला जाणवली म्हणुनच अभिनंदन! मनापासुन ह्या कवितांबद्दल एक  काव्यरसिक म्हणून मला विशेष उत्सुकता वाटली. कारण अभिनय आणि नृत्य या श्रेत्रांत रसिकप्रियता मिळवणाऱ्या आपल्यासारख्या अभिनेत्रीस कविता बरे लिहावीशी वाटते.  

ह्या कुतूहलाचे संवेदनशील उत्तर प्रजक्तप्रभा मधील अनेक कविता देतात रंगभूषा प्रकाशझोत संहिता रसिकांचे प्रेम या जत्रेपालिकडेही कलावंताला मन असते अंतर्मन असते. त्या मौनाची अक्षरे होत कविता प्रकट होते. कविता ही एक कधीच साथ न सोडणारी जिवलग सखी असते. आपण ह्या सखेचे बोट धरून कधी उमलू पाहणारी प्रीती कधी त्या पथावरील अनपेक्षित आघात कधी एकाकीपणा व्यक्त करीत जीवनावरील उदंड प्रेम व्यक्त केले आहे.  

प्रस्तुत काव्यासंग्रहातुन व्यक्त झालेली कवयित्री ही भूमिकाही सच्ची म्हणूनच स्वागतार्ह आहे. आपला प्रवीण दिवे सुंदर असा हा कविता संग्रह तुम्ही वाचला नसेल तर नक्की वाचा आणि आणि वाचला असेल तर तुम्हाला या कविता कश्या वाटल्या हे कमेंट  करा.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने