अहमदाबाद संघाविषयी माहिती ।। Ahmedabad IPL Team Information in Marathi

अहमदाबाद संघाविषयी माहिती ।। Ahmedabad IPL Team Information in Marathi

अहमदाबाद संघाला आता बीसीसीआय कडून परमिशन मिळालेली आहे. त्यामुळे अहमदाबाद हा संघ आयपीएल चा 10 वा संघ असेल. आज आपण या लेखाच्या माध्यमातून अहमदाबाद संघाविषयी माहिती जाणून घेणार आहोत. यामध्ये अहमदाबाद संघाचा कर्णधार नक्की कोण असेल? प्रशिक्षक म्हणजेच कोच कोण असतील? आणि सर्वात महत्वाचे म्हणजे या संघाचे नाव काय असू शकते? याबद्दल सर्व काही जाणून घेणार आहोत.

अहमदाबाद संघाविषयी माहिती ।। Ahmedabad IPL Team Information in Marathi

अहमदाबाद संघाचा कर्णधार कोण असेल? (Captain of Ahmedabad IPL Team)

सुरुवातच आपण कॅप्टन म्हणजेच कर्णधारापासून करूयात. अहमदाबाद संघाचा कर्णधार कोण असेल याविषयी कोणी माहिती दिलेली नसेल तरी देखील सर्व काही जवळपास स्पष्ट झालेले आहे. खेळाडू निवडण्याचा पहिला अधिकार हा लखनऊ ला असेल आणि ते कर्णधार म्हणून के एल राहुलची निवड करणार आहेत. अहमदाबाद संघाला दुसरा अधिकार असणार आहे त्यामुळे ते श्रेयस अय्यर ची निवड करतील. श्रेयस अय्यर हा अहमदाबाद संघाचा कर्णधार असेल. 

के एल राहुलला लखनऊ संघ नक्कीच घेणार आहे आणि त्यामुळे अहमदाबाद संघसमोर एकमेव चांगला उपलब्ध असलेला भारतीय पर्याय म्हणजे श्रेयस अय्यर होय. 

अहमदाबाद संघाचा उपकर्णधार कोण असेल? (Vice Captain of Ahmedabad IPL Team)

उपकर्णधार म्हणून अहमदाबाद संघ हा हार्दिक पंड्या ला घेऊ शकतो. त्यांनी हार्दिक पंड्याला घेतल्यानंतर काही काळासाठी तरी त्याची उपकर्णधार म्हणून निवड होणे साहजिक आहे. भारतीय संघात खेळताना हार्दिक पंड्याची भूमिका चांगली राहिलेली आहे. त्यामुळेच त्याचे उपकर्णधार होणे जास्त ठाम पणे बोलता येते.

अहमदाबाद संघाचे प्रशिक्षक / कोच कोण असतील? (Coach of Ahmedabad IPL Team)

अहमदाबाद संघसमोर प्रशिक्षक निवडीसाठी अनेक पर्याय आहेत. त्यातून त्यांचे कोच हे गॅरी कस्टर्न हे असतील. गॅरी यांनी 2011 साली भारतीय संघासाठी कोच म्हणून भूमिका बजावली होती. गॅरी कस्टर्न हे दिल्ली डेअरडेव्हील्स संघाचे देखील काही दिवस प्रशिक्षक होते. 

अहमदाबाद संघाचे मेंटर कोण असतील? (Ahmedabad IPL Team Mentor)

लखनऊ संघाविषयी माहिती इथे जाणून घ्या

लखनऊ संघाने गौतम गंभीर यांना मेंटर बनविले आहे त्यामुळे आपण इथे अहमदाबाद संघाविषयी अंदाज लावू शकतो की व्ही व्ही एस लक्ष्मण किंवा युवराज सिंग यापैकी एक मेंटर असेल. व्ही व्ही एस लक्ष्मण यांनी सनरायझर्स संघ सोडला आहे. 

अहमदाबाद संघाचा सहाय्यक प्रशिक्षक कोण असेल? (Assistant Coach of Ahmedabad IPL Team)

लखनऊ संघाने विजय दहिया यांना सहाय्यक प्रशिक्षक म्हणून निवडले आहे. अहमदाबाद संघाचा सहाय्यक प्रशिक्षक हा आशिष नेहरा असू शकतो. 

अहमदाबाद संघाची जर्सी कशी असेल?

BCCI च्या Guidelines नुसार जुन्या संघाच्या जर्सीचा रंग पुन्हा घेता येणार नाही. आयपीएल दरम्यान मुंबई आणि दिल्ली संघाच्या जर्सीचा रंग सारखा असल्याने खेळाचा आनंद नीट लुटता येत नाही. त्यामुळे BCCI चा हा नियम आहे. अहमदाबाद संघाची जर्सी ही केसरी रंगांची असू शकते कारण जांभळा रंग हा आता लखनऊ संघ वापरणार आहे. 

अहमदाबाद संघाचे होम ग्राउंड कोणते असेल? (Ahmedabad IPL team home ground)

अहमदाबाद संघाचे अहमदाबाद हेच होम ग्राउंड असणार आहे. इथून त्यांना सर्वात जास्त आर्थिक फायदा होणार आहे. हे ग्राउंड जगातील सर्वात मोठे मैदान असल्याने तिकिटांच्या माध्यमातून त्यांची कमाई इथे सर्वात जास्त होणार आहे. भारतात आयपीएल चे सामने सध्या तरी होतील की नाही यात शंका आहेत मात्र भविष्यात अहमदाबाद संघाला याचा फायदा हा नक्कीच होणार आहे. 

अहमदाबाद संघातील खेळाडू

अहमदाबाद संघात श्रेयस अय्यर, हार्दिक पंड्या हे खेळाडू आहेत. याशिवाय त्यांच्याकडे डेव्हिड वॉर्नर सारखा धडाकेबाज खेळाडू घेण्याचा पर्याय आहे. राबाडा सारखा गोलंदाज देखील एक पर्याय आहे मात्र हे खेळाडू कमी किंमतीत येऊ इच्छित नाही त्यामुळे त्यांना मेगा लिलाव मध्ये भाग घ्यायचा आहे. वॉर्नर सारखा खेळाडू अहमदाबाद संघ 7 ते 8 कोटी देऊन इथे घेईल मात्र वॉर्नर ला मेगा लिलावात त्याहून खूप अधिक किंमत ही मिळणार असल्याने तो या संघाकडे असाच जाणार नाही हे मात्र नक्की! 

अहमदाबाद संघाचे नाव काय असेल? (Ahmedabad IPL Team Official Name)

याआधी देखील गुजरात लायन्स नावाने एक संघ आयपीएल मध्ये आला होता. लायन्स हे नाव गुजरात राज्याशी जोडलेले आहे त्यामुळे अहमदाबाद संघासोबत देखील हे नाव असू शकते. लखनऊचे नाव जसे आम्ही कन्फर्म सांगितले तसे जरी हे नसले तरी देखील अहमदाबाद लायन्स हे नाव या संघाचे असू शकते. 

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने