क्रिप्टोकरन्सी म्हणजे काय? Cryptocurrency in Marathi

क्रिप्टोकरन्सी म्हणजे काय? Cryptocurrency in Marathi

सुरुवातीला बिटकोईन नंतर मग इथेरियम आणि आता काही काळापूर्वी एलोन मस्क यांच्या ट्विट्स मुळे चर्चेत आलेल्या डॉज कॉइन आणि शिबा इनू सारख्या क्रिप्टो करन्सी ची नावे तर आपण ऐकलेली असतीलच. भारतीय बाजारात देखील मग आता क्रिप्टोकरन्सी लीगल आहे की नाही याविषयी चर्चा सुरूच आहे. भारत सरकारने देखील आता क्रिप्टोकरन्सी सेबी अंतर्गत आणण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. स्वतःची भारताची एखादी क्रिप्टोकरन्सी आता बाजारात येऊ शकते त्यामुळे नक्की हे क्रिप्टोकरन्सी प्रकरण काय आहे आणि क्रिप्टोकरन्सी चा अर्थ काय आहे? यात गुंतवणूक करून आपल्याला फायदा कसा होऊ शकतो? याविषयी आपण जाणून घेणार आहोत.

क्रिप्टोकरन्सी म्हणजे काय? Cryptocurrency in Marathi

सर्वात आधी आपण क्रिप्टोकरन्सी विषयी दिग्गजांची काय मते आहेत ते जाणून घेऊयात जेणेकरून तुम्हाला क्रिप्टोकरन्सी वर विश्वास निर्माण होण्यास मदत होईल. एलोन मस्क म्हणजेच टेस्ला सारख्या इनोव्हेटिव्ह कंपनीचे मालक स्वतः क्रिप्टोकरन्सी मध्ये गुंतवणूक करतात. त्यांनी त्यांच्या कंपनीत आता गाडी घेताना सर्वात आधी बिटकोईन आणि नंतर आता डॉज कॉइन एक चलन म्हणून वापरास परवानगी दिली आहे. भविष्यात या चलनाचा वापर आपले फिजिकल चलन बदलण्यास होईल यात त्यामुळे काही शंका उरत नाही. आपल्या भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी देखील क्रिप्टो करन्सीला भविष्यातील आपल्या भारतीय चलनाच्या बदल्यात वापरले जाऊ शकणारे चलन म्हणले आहे.

क्रिप्टोकरन्सी म्हणजे काय? - Cryptocurrency Meaning in Marathi

तुम्ही आभासी किंवा डिजिटल चलन ही संकल्पना ऐकलेली असेल तर मग क्रिप्टोकरन्सी ही देखील एक डिजिटल करन्सी आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारचा फिजिकल चलनाचा संबंध नसल्याने या करन्सीला आभासी चलन (Virtual Currency) म्हणून ओळखले जाते.

तुम्ही भारतीय रुपया किंवा डॉलर्स हे जसे खिशात घेऊन फिरतात तशी तुम्हाला ही क्रिप्टोकरन्सी खिशात घेऊन फिरावी लागणार नाही. तुमची क्रिप्टोकरन्सी तुमच्या क्रिप्टो खात्यात पडलेली असेल आणि तिच्या मागणी नुसार तिची किंमत वाढत जाते. 

आपण आता सध्या ज्या प्रमाणे आपले पैसे एखाद्या बँकेत असतात आणि आपण upi च्या माध्यमातून एखादी वस्तू घेताना पैसे देतो त्याचप्रमाणे पुढे जाऊन याच क्रिप्टो खात्यातून तुम्ही वस्तू विकत घेऊ शकाल.

क्रिप्टोकरन्सी हे असे डिजिटल चलन आहे ज्यावर कोणत्याही एका संस्थेचे नियंत्रण नाहीये त्यामुळे यावरून अनेक देशांच्या सरकारांनी वाद विवाद केलेले आहेत. भारतात देखील त्यामुळेच याविषयावर सरकार कडून काही निर्बंध घालता येतील का यावर विचार केला जात होता. आपल्या भारताचे चलन हे भारतीय रिझर्व्ह बँकेद्वारे नियंत्रित केले जाते. त्यामुळे आता भारतात जी क्रिप्टोकरन्सी भविष्यात येईल ती सरकारच्या नियंत्रणात असेल हे मात्र नक्की आहे.

क्रिप्टोकरन्सी चे प्रकार - Types of Cryptocurrency in Marathi

सध्या बाजारात बिटकॉइन, इथेरियम, लाईटकॉइन, डॉजकॉइन, शिबा इनू, इत्यादी सारख्या अनेक क्रिप्टोकरन्सी जगभरात उपलब्ध आहेत. सुरुवात करणारी व्हर्च्युअल करन्सी म्हणजे बिटकोईन होय. तुम्हाला जगभरात 2 हजारांहून अधिक क्रिप्टो करन्सी बघायला मिळतील. यापैकी सर्वच क्रिप्टोकरन्सी या गुंतवणूक करण्यासाठी योग्य नाहीत. त्यामुळे क्रिप्टोकरन्सी मध्ये गुंतवणूक करताना नेहमी त्या क्रिप्टो करन्सी विषयी सुरुवातीला माहिती घेऊनच मग त्यात गुंतवणूक करावी.

क्रिप्टोकरन्सी कायदेशीर आहे का? - Cryptocurrency is Legal or Not in Marathi

क्रिप्टोकरन्सी कायदेशीर आहे किंवा नाही हा प्रश्न अनेकांच्या मनात असेल. आपण आधी जगाविषयी बोलूयात, जगभरात प्रत्येक देशानुसार क्रिप्टोकरन्सी लीगल की इल्लीगल हे अवलंबून आहे. काही देशांमध्ये क्रिप्टोकरन्सी वापरला पूर्णपणे मान्यता दिलेली आहे आणि तिथे क्रिप्टोकरन्सी चा वापर सर्वसामान्य पणे केला जातो आहे. भारतासारख्या देशांमध्ये या क्रिप्टोकरन्सी ला मान्यता द्यावी किंवा नाही यावरून अजूनही वाद आहेत. तर काही देशांनी क्रिप्टोकरन्सी पूर्णपणे गैरकायदेशीर आहे असे जाहीर केलेलं आहे.

अमेरिका, जपान, जर्मनी आणि फ्रांस यासारख्या मोठ्या देशांमध्ये क्रिप्टो करन्सी वापराल मान्यता देण्यात आलेली आहे. या देशांमध्ये UPI सारखेच क्रिप्टो करन्सी वापरून वस्तूंची खरेदी विक्री केली जाते. शक्यतो या देशांनी बिटकोईन या क्रिप्टोकरन्सीला मान्यता दिलेली आहे.

भारतात आपण इतिहास बघितला तर 2018 साली क्रिप्टोकरन्सी कायदेशीर नाही अशी नोटीस आली होती आणि भारतात तेव्हा क्रिप्टो करन्सी पूर्णपणे बंद होती. मात्र 2020 साली ही बंदी उठवण्यात आलेली आहे त्यामुळे आज तुम्ही क्रिप्टोकरन्सी खरेदी विक्री भारतात करू शकतात. आता काही कालावधी पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विधान केले होते की आपण भारतात क्रिप्टोकरन्सी बंद करत आहोत. मात्र क्रिप्टो मध्ये गुंतवणूक केलेल्या लोकांनी निषेध केल्यानंतर मग अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी क्रिप्टोला बंद न करता त्याला सेबी अंतर्गत आणण्याचा प्रस्ताव मांडला आहे. त्यामुळे आता भारतात देखील क्रिप्टोकरन्सी पूर्णपणे कायदेशीर असणार आहे. 

क्रिप्टोकरन्सी वर रिटर्न किती मिळतो? Cryptocurrency return in marathi

आपल्याला आता मनात हा प्रश्न आला असेल की अरे हे तर चलन आहे तर मग यात गुंतवणूक कशी आणि का? आपल्याला सांगू इच्छितो की एखादी क्रिप्टोकरन्सी जेव्हा येते तेव्हा तिची संख्या म्हणजे आपले जसे रुपये आहेत ते ठरलेले असतात. म्हणजेच त्याची quantity फिक्स असते. त्यामुळे वाढत्या मागणी सोबत त्याची किंमत वाढत जाते.

आपण सोन्यामध्ये जर गुंतवणूक करत आहोत तर मग तिथे त्याचे भाव कमी जास्त होत असतात आणि आपल्याला रिटर्न कमी मिळतो. तो रिटर्न वर्षाला 2 ते 3% मिळू शकतो. अनेक मार्ग आहेत त्यात तुम्हाला रिटर्न मिळतो परंतु तो तितका जास्त मिळू शकत नाही. क्रिप्टोकरन्सी सारख्या ठिकाणी जर तुम्ही गुंतवणूक करत असाल तर मग तुम्हाला तिथून 60% किंवा त्याहून खुप अधिक रिटर्न मिळू शकतो. 

जेव्हढा फायदा क्रिप्टोकरन्सी मधून होत असतो त्याचप्रमाणे यातून एका क्षणात पूर्णपणे आपण कंगाल होऊ शकतो. तुम्ही जर करोडपती होण्याचे स्वप्न बघत असाल तर क्रिप्टोकरन्सी मध्ये गुंतवणूक करणे तुम्हाला नक्कीच फायद्याचे ठरेल. मात्र आपण नेहमी गुंतवणूक करताना विचार करायला हवा हे मात्र नक्की!


क्रिप्टोकरन्सी मध्ये गुंतवणूक कशी करावी? - How to invest in Cryptocurrency?

आता भारतातून देखील क्रिप्टोकरन्सी मध्ये आपण गुंतवणूक करू शकतो. आता मग प्रश्न समोर येतो की आपण क्रिप्टो करन्सी मध्ये गुंतवणूक कशी करू शकतो?

क्रिप्टो करन्सी मध्ये गुंतवणूक करणे हे शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करण्यापेक्षा देखील सोपे आहे. आपल्याला यासाठी कोणतेही खाते लागत नाही. तुम्हाला फक्त कॉइनस्विच कुबेर, वझिर एक्स सारख्या प्लॅटफॉर्म वर जाऊन तुमचे खाते उघडायचे आहे. हे ऍप्स तुम्हाला मोबाईल वर उपलब्ध आहेत किंवा तुम्ही त्यांच्या वेबसाईटवर जाऊन देखील तुमचे खाते खोलु आणि वापरू शकतात. सर्व क्रिप्टो एक्सचेंज ऍप्स हे iOs आणि android दोन्ही ऑपरेटिंग सिस्टम साठी उपलब्ध आहेत.

क्रिप्टो करन्सी मध्ये गुंतवणूक करण्यासाठी आधी तुम्हाला तुमची KYC पूर्ण करावी लागते. एकदा तुमची Kyc पूर्ण झाली की मग तुम्ही या ऍप्स च्या माध्यमातून कमीत कमी 100 रुपयांपासून क्रिप्टोकरन्सी मध्ये गुंतवणूक करू शकतात.


क्रिप्टोकरन्सी म्हणजे काय ही गोष्ट अनेकांना माहीत नसते त्यामुळे आमचा हा प्रयत्न तुम्हाला माहिती देण्याचा होता. क्रिप्टोकरन्सी विषयी जवळपास सर्व काही माहिती या लेखाच्या माध्यमातून आम्ही देण्याचा प्रयत्न केला. 

क्रिप्टो करन्सी मध्ये गुंतवणूक करणे हे सोपे आहे मात्र त्यामध्ये रिस्क देखील खूप आहे. जेव्हड्या पटकन तुमचा पैसा वाढतो तितक्याच लवकर तो खाली देखील येतो. यावर कोणाचेही नियंत्रण नसल्याने (decentralized असल्याने) यामध्ये आजही यावर पूर्णपणे विश्वास ठेवता येत नाही. त्यामुळे जर तुम्ही एखादी क्रिप्टोकरन्सी खरेदी करत असाल तर त्या करन्सी विषयी एकदा चौकशी करून घ्या जेणेकरून मग पुढे जाऊन तुम्हाला इतर धोक्यांपासून दूर राहता येईल.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने