IPO काय आहे? IPO विषयी सविस्तर संपूर्ण माहिती ।। What is IPO in Marathi
IPO काय आहे? हा प्रश्न अनेकांच्या मनात येत असेल. मधल्या काळात PAYTM IPO मध्ये झालेला लोकांना तोटा हा IPO विषय जास्त वर घेऊन आला. पैसे कोणाला आवडत नाहीत? आवडत जरी नसले तरी देखील त्याशिवाय आयुष्यात काही पुढे जात नाही. आता हेच पैसे जर आपण एखाद्या ठिकाणी गुंतवणूक करून त्यातून जर जास्त पैसे कमवता येत असतील तर मग त्यात तुम्हाला सहज पैसे मिळतील. अनेक छोट्या मोठ्या कंपन्या देखील एखाद्या ठिकाणी गुंतवणूक करत असतात आणि त्यांच्या गुंतवणुकीसाठी एक भाग म्हणजे IPO होय. याच IPO विषयी आज आपण या लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. याशिवाय एक चांगला IPO काय असतो आणि त्यातून तुम्हाला जास्तीत जास्त रिटर्न कसा मिळू शकतो याविषयी देखील आपण आज माहिती जाणून घेणार आहोत.
प्रत्येक आठवड्याला एक तरी नवीन आणि चांगला रिटर्न देणारा IPO येत असतो आणि लगेच त्यातून पैसा भरपूर जास्त रिटर्न मिळत असतो त्यामुळे यामध्ये गुंतवणूक करणे कधीही योग्यच असते.
IPO काय आहे?
IPO म्हणजे Initial Public Offering होय. जेव्हा एखादी कंपनी स्वतःचे काही स्टॉक किंवा शेअर सर्वसामान्य लोकांसाठी जाहीर केले जातात तेव्हा त्याला आयपीओ म्हणजेच इनिशीयल पब्लिक ऑफरिंग असे म्हणतात. लिमिटेड असणाऱ्या कंपन्या हे आयपीओ जारी करत असतात जेणेकरून त्यांची शेअर बाजारात लिस्टिंग होऊ शकते. एकदा आयपीओ मधून कंपनी शेअर मार्केट मध्ये लिस्ट झाल्यानंतर त्या कंपनीचे शेअर खरेदी करता येतात.
शेअर मार्केटचा आयपीओ हा एक भाग आहे. जेव्हा एखादी कंपनी आपले सामान्य स्टॉक (Common Stock) किंवा शेअर पहिल्यांदा सामान्य जनतेसमोर म्हणजेच नॉर्मल पब्लिक साठी जारी करतात तेव्हा त्याला IPO म्हणजेच INITIAL PUBLIC OFFERING म्हणले जाते.
एखाद्या कंपनीला स्वतःचा व्यवसाय मोठा करण्यासाठी काही रक्कम (capital) गरजेची असते. त्यासाठी अनेक छोट्या कंपनी स्वतःचे IPO हे फंडिंग गोळा करण्यासाठी लॉन्च करत असतात. शक्यतो या सर्व कंपन्या प्रायव्हेट असतात जे सार्वजनिक बाजारात आपला व्यवसाय वाढविण्यासाठी येतात.
तुम्ही जर एखादा IPO घेत असाल तर तो शक्यतो त्याची गुंतवणूक ही बँकांच्या सिंडिकेट द्वारे अंडरराईट केला जातो. या सर्व IPO चे नेतृत्व हे एक मोठी बँक किंवा एक पेक्षा अधिक बँका करत असतात. त्या कंपनीचे सर्व शेअर हे अंडररायटर द्वारे विक्री केले जातात. हे अंडररायटर आपल्या शेअर्स वरील कमिशन घेत असतात. ज्या अंडररायटर कडे जास्त शेअर आहेत त्यांना कमिशन देखील जास्त मिळत असते. हे कमिशन जवळपास 8% पर्यंत जात असते.
IPO कसा काम करतो?
जोपर्यंत एखाद्या कंपनीचा आयपीओ येत नाही तोपर्यंत त्या कंपनीला प्रायव्हेट म्हणले जाते. एखादी प्रायव्हेट कंपनी जेव्हा सुरू होते तेव्हा ती कमीत कमी शेअर होल्डर्स सोबत सुरू होते. यामध्ये सुरुवातीला गुंतवणूक करणारे गुंतवणूकदार संस्थापक, कुटुंब आणि मित्रांसोबत काही गुंतवणूक करणारे असतात. यामध्ये एखादे व्यावसायिक देखील गुंतवणूक करत असतात.
जेव्हा एखादी कंपनी एका चांगल्या स्तरावर पोहोचते आणि त्यांना आता सार्वजनिक व्हायचे असते तेव्हा मग ते त्यासाठी हालचाली सुरू करतात. त्याकाळात त्या कंपनीला सार्वजनिक शेअर धारकांना लाभ आणि जबाबदारी सांभाळण्यास सक्षम आहे असे दाखवावे लागते.
कंपनीला अशी स्थिती तेव्हा मिळते जेव्हा एका कंपनीचे मूल्यांकन हे 1 बिलियन डॉलर्स पेक्षा जास्त असते तेव्हा त्या कंपनीला सार्वजनिक होण्यासाठी सक्षम समजले जाते. या स्थितीला त्या कंपनीला युनिकॉर्न चा दर्जा दिला जातो. आयपीओ साठी त्या कंपनीची पात्रता काय आहे हे देखील तपासले जाते. यामध्ये अनेक वेगवेगळे फॅक्टर्स असतात ज्यांच्या आधारावर त्या कंपनीला आयपीओ साठी सक्षम समजले जाते.
एखाद्या कंपनीचा आयपीओ जर येत असेल तर मग त्या कंपनीसाठी ती गौरवाची गोष्ट असते. यातून त्या कंपनीला पुढे ग्रोथ साठी एक मोठा फंड गोळा करण्याची संधी असते. यातून कंपनीला विकसित होण्यासाठी आणि आणखी विस्तार करण्यासाठी संधी मिळत जातात. अनेक लोकांना त्या कंपनीवर विश्वास बसायला सुरुवात होते आणि गुंतवूनक करणारे लोक त्या कंपनी मध्ये गुंतवणूक करायला सुरुवात करतात.
IPO विषयी काही महत्वाच्या गोष्टी
IPO हा एखाद्या प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला सार्वजनिक स्वरूपात तिचे शेअर्स बाजारात आणायला मदत करते.
कंपनीला IPO लॉन्च करण्यासाठी एक्सचेंज आणि एसइसि द्वारे दिलेल्या नियमांची पूर्तता करावी लागते.
एका आयपीओ ला आपण त्या कंपनीच्या संस्थापकांसाठी आणि सुरुवातीला गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूक दारांसाठी चांगली पैसे मिळविण्याची आणि कंपनीला समोर आणण्याची एक संधी म्हणू शकतो.
ज्या कंपनी शेअर जारी करतात त्यांना जारीकर्ता असे म्हणले जाते. हे शेअर बाजारात आणण्यासाठी मदत करतात.
एकदा आयपीओ आल्यानंतर त्या कंपनीचे शेअर बाजारात उपलब्ध होतात.
हे बाजारात आलेले शेअर ब्रोकर्स च्या माध्यमातून बाजारात विक्री केले जातात.
IPO घेऊन यायचे कारण काय आहे?
जेव्हा एखाद्या कंपनीला अधिकाधिक रक्कमेची गरज असते तेव्हा ती कंपनी आयपीओ बाजारात आणत असतात. जेव्हा एखाद्या कंपनीला पैशांची गरज असते मात्र त्यांना आता बँकेकडून कर्ज घ्यायचे नसते तर मग त्यामुळे ते पैसे गोळा करण्यासाठी IPO बाजारात घेऊन येऊ शकतात. एखाद्या कंपनीला तिचा स्वतःचा विकास करायचा असेल तर मग ते आयपीओ सुरू करतात. पुढे जाऊन देखील त्या कंपनीचे शेअर आल्यानंतर त्या कंपनीला इतर ठिकाणी ते गुंतवता येतात.
सर्व IPO हे सेबी अंतर्गत येतात. म्हणजेच IPO ला पूर्णपणे सरकारी सेवा सेबी कडून रेग्युलेट केले जाते. SEBI पूर्णपणे IPO वर नियंत्रण ठेवून त्यांच्यावर कडक नियम टाकते. कंपनीला सर्व काही माहिती ही सतत सेबी ला द्यावी लागते. आयपीओ मधून कंपनीला अधिकाधिक संपत्ती मिळते. या संपत्तीचा वापर कंपनी विस्तार करण्यासाठी, टेक्निकल विकासासाठी, नविन काहीतरी खरेदी करण्यासाठी, कर्ज मिटविण्यासाठी करत असते.
IPO मध्ये गुंतवणूक कशी करायची?
आयपीओ सुरू करणाऱ्या कंपनी आपल्या आयपीओ ला 3 ते 10 दिवसांसाठी सुरु ठेवतात. म्हणजे जेव्हा कधी आयपीओ येतो त्यानंतर गुंतवणूक करणारे हा आयपीओ 3 ते 10 दिवसामध्ये खरेदी करू शकतात. हा कालावधी कंपनीवर अवलंबून आहे.
तुम्ही त्या कालावधीत कंपनीच्या साईटवर जाऊन किंवा एखाद्या एक्सचेंज ब्रोकरेज अँप वरून इन्व्हेस्ट करू शकतात.
आयपीओ चे मुख्य दोन प्रकार असतात. प्रिक्स प्राईस इश्यू आणि बुक बिल्डिंग इश्यू! तुमचा आयपीओ ज्या प्रकारचा असेल त्याच प्रकारे तुम्हाला बुक बिल्डिंग इश्यू बीड किंवा प्रिक्स प्राईस बीड लावावी लागेल.
पुढे जाऊन मग आपल्याला IPO अलॉटमेंट केली जाते. जेव्हा आईपीओ ओपनिंग क्लोज होऊन जाते त्यानंतर ती कंपनी आईपीओ चे अलॉटमेंट करते. एकदा प्रोसेस मधील सर्व आयपीओ अलॉट केले जातात आणि मग नंतर मग त्या कंपनीचे शेअर बाजारात उपलब्ध करून दिले जातात.
स्टॉक ची खरेदी आणि विक्री ही शेअर मार्केट मध्ये केली जाते. हे स्टॉक IPO अलॉटमेंट झाल्यानंतरच मग खरेदी किंवा विक्री करता येतात.
IPO मध्ये गुंतवणूक करणे चांगले आहे का?
आयपीओ मध्ये गुंतवणूक करणे हा एक चांगला पर्याय आहे मात्र प्रत्येक आयपीओ मध्ये गुंतवणूक करत असाल तर आधी नक्की विचार करा. प्रत्येक आयपीओ जसा लॉन्च होतो तेव्हा त्याचे असेट्स आणि स्टेज वेगवेगळ्या असतात. अनेकांना यात चांगला फायदा होण्याची शक्यता असते मात्र यात कधी कधी खुप जास्त तोटा देखील होत असतो. तुम्हाला जास्त काळासाठी एका बेसिक किंमतीत बाजारात प्रवेश करायचा असेल तर IPO मध्ये गुंतवणूक करणे योग्य असते.
आज या लेखाच्या माध्यमातून आपण IPO काय आहे आणि IPO विषयी सविस्तर माहिती आपण जाणून घेतली आहे. आम्ही आयपीओ विषयी जवळपास सर्व माहिती देण्याचा प्रयत्न आपण केला आहे.