Web 3.0 म्हणजे नक्की काय? ।। What is Web 3.0 in Marathi?

Web 3.0 म्हणजे नक्की काय? ।। What is Web 3.0 in Marathi?

आज आपण  web 3.0 विषयी माहिती जाणून घेणार आहोत.

तुमच्या मोबाईल वर कोणतेही अँप डाउनलोड केले तर ते तुम्हाला फोटो गॅलरी, मेसेजेस, लोकेशन आणि कॉन्टॅक्ट साठी परमिशन मागत असते. या सर्व गोष्टींसोबत तुम्हाला कॅमेरा साठी देखील ऍक्सेस मागितला जातो. तुम्ही जर हा ऍक्सेस नाही दिला तर तुमच्या मोबाईलचा उपयोग हा कॉल करणे आणि जे ऍप्स परमिशन घेत नाही ते वापरणे सोडून काहीच नसेल!

Web 3.0 म्हणजे नक्की काय? ।। What is Web 3.0 in Marathi?

एक प्रयोग करून बघुयात का? मोबाईल वर गुगल ला जाऊन कोणत्याही वेबसाईटवर जाऊन तुम्हाला हवी ती वस्तू शोधा. मग ती वस्तू एखादा शर्ट असेल, टीव्ही असेल किंवा एखादी इलेक्ट्रॉनिक गोष्ट असेल. आता आपण फक्त सर्च केलेले आहे आणि आपण कोणतीही गोष्ट खरेदी केलेली नाही. काही काळानंतर तुम्ही ते सर्व बंद करून पुन्हा जरी गुगल किंवा कोणतीही साईट ओपन केली तर तुम्हाला तुम्ही जी गोष्ट सर्च केली तीच ऍड बघायला मिळेल.  तुम्ही जर truecaller जर वापरत असाल तर एखाद्याला कॉल केल्यानंतर खाली जी जाहिरात येते त्यामध्ये देखील तुम्हाला जी वस्तू तुम्ही सर्च केली तीच दिसेल.

तुम्हाला हे सर्व बघून चांगलं वाटलं असेल मात्र खोलवर जाऊन विचार केला तर या सर्व परमिशन आणि ऍक्सेस देऊन आपण काही लोकांना आपल्या व्यक्तिगत आयुष्यात डोकवण्याची संधी देत असतो. या सर्वांमुळे प्रायव्हसी नावाची जी गोष्ट आहे ती संपुष्टात येण्याची वेळ आली आहे.

आपण इंटरनेट विश्वात जे काही ब्राऊझ केलेले आहे त्याचा डेटा काही कंपन्या इतर कंपन्यांना विकत आहेत. यामधून या कंपन्या मोठ्या प्रमाणात नफा देखील कमवत आहेत. 

गुगल सारख प्लॅटफॉर्म फ्री का आहे? युट्युब सारखे अँप्स फ्री का आहेत? याचे उत्तर कधी शोधण्याचा प्रयत्न तुम्ही केला का? आपण हा प्रयत्न कधीच केला नसेल. जेव्हा काही लोकांनी या प्रश्नाचे उत्तर शोधण्यास सुरुवात केली तेव्हा त्या लोकांना उत्तर सापडलं आणि ते म्हणजे web 3.0 होय.

आज या लेखाच्या माध्यमातून आपण हीच माहिती जाणून घेणार आहोत की नक्की हे web 3.0 आहे तरी काय? अनेक लोक असे देखील सांगत आहेत की web 3.0 मधूज तुम्ही आम्ही सर्वजण पैसे कमवू शकतो, तर मग नेमका हा विषय काय आहे याविषयी अधिक जाणून घेऊयात.

Web 3.0 कडे जाण्याआधी web 1.0 आणि web 2.0 विषयी देखील माहिती जाणून घेऊयात.


एक काळ असा होता जेव्हा आपल्याला एखादी माहिती मिळवायची असेल तर वर्तमानपत्र आणि पुस्तके यांचाच आपल्याला आधार होता. आधी मोबाईल आणि इंटरनेट या गोष्टी उपलब्ध नव्हत्या.

Web 1.0 म्हणजे Dos चा काळ. तेव्हा आपल्याला सर्व काही बघता यायचं पण त्यासोबत जास्त काही इन्ट्रॅक्ट होता येत नव्हते. 

पुढे जाऊन Orkut आल्यानंतर हा काळ झपाट्याने बदलत गेला. Orkut चा काळ संपल्यानंतर फेसबुक, ट्विटर, युट्युब सारख्या कंपन्या आल्या आणि आता असा काळ आलेला आहे जिथे आपण आधी फक्त या कंपन्यांसाठी प्रेक्षक होतो तिथे आपण कंटेंट प्रोव्हायडर झालेलो आहोत. 

इन्स्टाग्राम वर तुम्ही एखादा रील अपलोड केला किंवा फेसबुक वर एखादा फोटो टाकला तर तुम्ही त्यात तुमची भावना आणि लोकेशन टाकत असतात. इथून तुम्ही त्या कंपन्यांना तुमची लोकेशन, तुमच्या भावना आणि तुमचा प्रवास हा शेअर करत असतात. आता हा सर्व कंटेंट तुमचा आहे. मात्र हे तुम्ही त्या कंपनीला देत असतात. या सर्व गोष्टी web 2.0 मध्ये येत असतात.

सर्व काही चांगले सुरू होते मात्र काळ बदलत गेला. तुम्ही जर एखादा शर्ट घ्यायला गेलात तर तुम्हाला खाली Peoples also Buy असा एक पर्याय दिसतो आणि त्यातून तुम्हाला अनेक गोष्टी सजेस्ट केल्या जातात. मग ते इतर रंगांचे शर्ट असतील किंवा पॅण्ट असतील. 

तुम्हाला आणखी एक उदाहरण द्यायचे झाल्यास जर समजा तुम्ही एखाद्या हॉटेलमध्ये गेला आणि घरी येऊन बघितले तर तुम्हाला त्या हॉटेल विषयी लगेच रेटिंग देण्यासाठी विचारले जाते. अजून सांगायचे झाले तर तुम्ही समजा आज एखाद्या व्यक्तीचा नंबर घेतला आणि लगेच फेसबुक वर जाऊन बघितले तर तुम्हाला तिथे Peoples Might You Know मध्ये तुम्हाला त्या व्यक्तीचे नाव दिसायला सुरुवात होईल.

हे सर्व काही कसे घडते आहे? याला एकच उत्तर आहे आणि ते म्हणजे आपण आपल्या मोबाईल मध्ये असलेल्या असंख्य ऍप्स ला दिलेला ऍक्सेस होय. आपलं आयुष्य सुलभ आणि सोपे व्हावे म्हणून आपण हा ऍक्सेस देत असतो. 

आपण कधी हा विचार देखील केला नसेल की आपली माहिती आणि आपण काय करतोय हे त्या कंपन्या एखाद्या ठिकाणी जाऊन साठवून ठेवत असतील आणि हीच माहिती पुढे विक्री करून त्यातून पैसे कमवत असतील. तुम्ही जेव्हा आपण आधी काय सर्च केलं आहे हे शोधता तेव्हा मग तुम्हाला येणाऱ्या ऍड विषयी कळायला सुरुवात होईल.

तुम्हाला जाहिराती दाखविण्यापर्यंत ठीक होते मात्र आता या कंपन्यांनी तुमचे आमचे राजकीय मत देखील बनवायला सुरुवात केली आहे. तुम्ही जर एखाद्या विचारधारेचे असाल तर तुम्हाला अगदी त्यासंबंधित व्हिडीओ सजेशन मध्ये दिसायला लागतात. हे पुढे जाऊन धोकादायक ठरणार आहे.

आता या सर्व गोष्टींच्या विरोधात कोण बोलणार? याची तक्रार कोण करणार आणि कोठे करणार? अशा अनेक प्रश्नाचे उत्तर म्हणजे web 3.0

Web 3.0 ही डिसेंट्रलाईझड सिस्टम असणार आहे आणि यावर कोणा एकट्या व्यक्तीची मक्तेदारी कधीच नसणार आहे. युट्युबवर आपण काहीतरी कंटेंट टाकत असतो आणि त्यातून आपल्याला पैसे मिळावेत अशी आपल्याला आशा असते. तरी युट्युब आपल्याला काही subscriber वैगेरे असावेत अशा अटी घालते आणि तोपर्यंत तुमचा वापरच करून घेते. आपले चॅनल मोनेटाईझ व्हावे असे प्रत्येकाला वाटत असते मात्र यामध्ये कालावधी खूप जातो.

ट्विट साठी मोठ्या व्यक्तींना पैसे मिळतात मात्र सामान्य व्यक्तींना का नाहीत? कदाचित पुढे जाऊन सामान्य व्यक्तींना देखील इंटरनेट वर ब्राऊझिंग साठी आणि ट्विट्स साठी पैसे मिळू शकतात. एखादी व्हिडीओ तुम्ही बघितली तरी तुम्हाला त्याचे पैसे मिळू शकतात. हे सर्व काही web 3.0 द्वारे घडणार आहे.


Web 3.0 आणि ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी

वेब 3.0 हे ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी वर आधारित असणार आहे. यावरील डेटा हा विखुरलेला असणार आहे. त्यामुळे हा डेटा एका ठिकाणावरून delete केला तरी देखील तो कुठेही गायब होणार नाही. 

बिटकोईन चा मालक कोण आहे याविषयी अजून पण कोणाला सत्यता नाहीये आणि त्याच प्रमाणे वेब 3.0 मध्ये तुमची माहिती ही दडलेली असणार आहे. वेब 3.0 हे पूर्णपणे ओपन सोर्स असेल आणि यावर NFT, CRYPTO सारखे डेटा असणार आहेत. 

वेब 3.0 ची गरज नक्की काय आहे? आपल्या मध्ये जो मध्यस्ती असतो त्याला काढून टाकण्यासाठी हे वेब 3.0 काम करणार आहे. आता हे कधी येईल याविषयी शंका आहे कारण यासाठी अजून डेव्हलपमेंट सुरू आहे. 

आता सध्या तुम्ही वेबसाईट बनविण्यासाठी एखाद्या डोमेन प्रोव्हायडर कडे जातात आणि तिथून ते डोमेन घेतात. मात्र हे डोमेन ICANN कडे हे रजिस्टर केले जाते. म्हणजे पूर्ण कंट्रोल हे ICANN कडेच असते. जेव्हा कधी आपल्याला हे घेतलेले डोमेन नेम renew करायचे असते तेव्हा तुम्हाला परत पैसे द्यावे लागतात. 

Web 3.0 मध्ये हीच प्रक्रिया अशी होईल की तुम्ही एखादा डोमेन नेम घेतले म्हणजे घेतले. त्याला पुन्हा renew वैगेरे करावे लागणार नाही. यामध्ये कोना एकाची मक्तेदारी नसणार आहे.

ब्लॉकचेन मध्ये डेटा हा वेगवेगळ्या सर्व्हर वर स्टोअर केलेला असतो. त्यामुळे एखाद्याने हॅक करण्याचा प्रयत्न जरी केला तरी देखील आपल्या वेबसाईट्स या हॅक होणार नाहीत किंवा त्यांचा डेटा आपल्याला सहज परत मिळवता येणार आहे.

सध्या आपण जे .com ,.org सारखे डोमेन एक्सटेंशन बघतो त्यासोबत येणाऱ्या काळात .nft ,.bitcoin सारखे काही एक्सटेंशन आपल्याला बघायला मिळतील. हे सर्व डोमेन ICANN कडे रजिस्टर होणार नाहीत. येणारा काळ हा सर्व ब्लॉकचेन चा असणार आहे यात काही शंका नाही.

 

Web 3.0 चे फायदे - Benefits of web 3.0

सर्व्हर शिवाय होस्टिंग शक्य आहे.

सिक्युरिटी देखील चांगली आहे.

प्रायव्हसी सगळ्यात जास्त जपली जाणार आहे.


Web 3.0 चे तोटे - Cons of Web 3.0

फायद्यांशीवाय वेब 3.0 चे काही तोटे देखील आहेत आणि ते हळूहळू समोर येत राहतील.

वेब 3.0 मुळे सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ होऊ शकते.

हरासमेंट सारख्या गोष्टी वाढू शकतात. कारण यात ओळख समोर येत नसते.

प्रक्षोभक भाषणे यातून वाढू शकतात.

हे सर्व तोटे किंवा धोके शोधून त्यांच्यावर निर्बंध आणण्यासाठी नक्कीच काही पाऊले पुढे येतील यात मात्र शंका नाही.


वेब 3.0 हा येणाऱ्या काळात चर्चेचा विषय असनार आहे हे मात्र नक्कीच! त्यामुळे तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा.


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने