भारतीय सैन्याचा नवीन गणवेश ।। Indian Army New Uniform 2022
1949 पासून 15 जानेवारी हा दिवस दरवर्षी लष्कर दिन म्हणून साजरा केला जातो. जनरल के एम करिअप्पा यांनी याच दिवशी भारतीय सैन्याच्या पहिले भारतीय कमांडर इन चीफ म्हणून कार्यभार सांभाळला होता. या दिवसाच्या आठवणीत आपण दरवर्षी लष्कर दिन साजरा करत असतो.
2022 साली देखील हा दिवस साजरा करण्यात आला मात्र यावेळी भारतीय सैन्याने संपूर्ण देशाला एक गुड न्यूज दिली. 74 व्या लष्कर दिनाच्या परेड दरम्यान पहिल्यांदाच भारतीय लष्कराने आपल्या लढाऊ गणवेश जगाला दाखवला.
राजधानी दिल्लीच्या केंट मध्ये परेड करताना पॅराशूट रेजिमेंटचे कमांडो हा नवीन गणवेश परिधान करून मार्च पास करताना दिसले. आता भारतीय सैनिक युद्धभूमी आणि फिल्ड पोस्टिंग दरम्यान हाच गणवेश परिधान करणार आहेत.
भारतीय लष्कराचा हा नवा युनिफॉर्म कसा आहे, जुन्या युनिफॉर्म पेक्षा या मध्ये काय बदल आहेत आणि हा खास का ठरणार आहे हेच जाणून घेऊयात.
गेल्या अनेक दिवसांपासून भारतीय सैन्याचे निगडीत अनेक गोष्टी चर्चेत आहेत. भारताने रशियासोबत डिल करत अनेक नवीन क्षेपणास्त्रे आपल्या ताफ्यात घेतली आहेत. सोबतच एके 47 या जुन्या बंदुका जाऊन लवकरच एके 203 या अद्ययावत आणि डेली बंदुका देखील जवानांना मिळणार आहेत. या बंदुका भारतातच तयार होणार असल्याने सैन्याचा नक्कीच वाढणार आहे.
भारताला चीन आणि पाकिस्तान या शेजारी राष्ट्रांकडून असणारा धोका लक्षात घेऊन सीमेलगत भागात क्षेपणास्त्र देखील तैनात करण्यात आलेली आहेत. युद्धनौकांच्या बाबतीत देखील भारत देश अधिक समृद्ध होतो आहे.
या सर्व गोष्टींसोबत आणखी एक गोष्ट भारतीय सैन्याने बदलली आहे आणि ती म्हणजे सैन्याचा युनिफॉर्म! गेल्या महिन्यातच नवीन युनिफॉर्म येणार अशी घोषणा केली गेली होती.
नवीन आर्मी युनिफॉर्म मध्ये राखाडी आणि हिरव्या रंगाचा वापर करून पॅटर्न तयार करण्यात आलेले आहेत. डिजिटल पॅटर्न सारखे याचे स्वरूप असून जुन्या रंगामध्ये काहीही बदल करण्यात आलेले नाहीत. राखाडी, करड्या आणि हिरव्या रंगाचा पट्ट्या आणि जंगलात चटकन ओळखू येणार नाहीत असेच रंग यात वापरण्यात आलेले आहेत. हा मल्टीटेरेन पॅटर्न असलेला युनिफॉर्म देशातील वेगवेगळे भूप्रदेश जसे की वाळवंट, जंगल आणि पर्वत यासारख्या भौगोलिक परिस्थिती लक्षात घेऊन तयार करण्यात आलेला आहे.
सैनिकांच्या युनिफॉर्म साठीचे कापड बाजारात मिळते आणि त्यानंतर सैनिक त्यांच्या हुद्द्यानुसार नियुक्त असलेला युनिफॉर्म शिवून घेतात. असच काही या नवीन युनिफॉर्म बद्दल होणार आहे फक्त फरक हाच असेल की नवीन गणवेश हा डजनभर प्री स्टीच केलेल्या सँडविच मध्ये येईल. युनिफॉर्म चे वेगळेपण टिकविण्यासाठी बार कोड आणि QR कोड केलेले असतील. हे फक्त मिलिटरी कॅन्टीन मध्येच उपलब्ध असतील.
यामुळे बाजारात जे काही कापड मिळेल ते सैनिकांच्या युनिफॉर्म सोबत मॅच होणार नाही. लष्करातील जवळपास 12 लाख जवानांना टप्प्याटप्प्याने हे गणवेश उपलब्ध करून दिले जाणार आहेत.
हा युनिफॉर्म शक्यतो युद्ध आणि कारवाईच्या प्रसंगी वापरला जाणार असल्याने वजनाने हलका असणार आहे. सैनिकांच्या सुविधेसाठी युनिफॉर्म मधील पँटला जास्त खिसे देण्यात आलेले आहेत. कापड हलके जरी असले तरी देखील ते जाड असेल आणि उन्हाळा व हिवाळा या दोन्ही ऋतू साठी ते उपयुक्त असेल. सैनिकांना शर्टला पॅण्ट मध्ये इन करण्याची गरज असणार नाही त्यामुळे साहजिकच ते जास्त मोकळेपणाने वावरू शकतील. नवीन फॅब्रिक हे सैनिकांना वेगवेगळ्या प्रदेशात सोयीस्कर होईल अशाच प्रकारे बनविण्यात आलेले आहे.
युनिफॉर्म चेंज करण्याचा महत्वाचा उद्देश हा सैनिकांना एक हलका आणि आरामदायक युनिफॉर्म वापरता येईल हाच आहे.
नवा आर्मी युनिफॉर्म डिझाईन करण्याचे काम नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी ने भारतीय सैन्यासोबत मिळून केले आहे. सुमारे दीड वर्षांपूर्वी भारतीय सैन्याने एक गटाची निर्मिती युनिफॉर्म डिझाईन साठी केली होती. महू येथे स्थित आर्मी वॉर कॉलेज मध्ये हा गट तयार करण्यात आला होता.
मागील वर्षभरात अनेक देशांच्या लष्कराच्या गणवेषांचा अभ्यास करून या गटाने नवा लढाऊ गणवेश तयार केला आहे. हा नवीन गणवेश लष्कराचा लढाऊ गणवेश असून बाकी कार्यालयीन आणि औपचारिक गणवेश हे पूर्वीप्रमाणेच असतील.
दिल्लीतील लष्कराच्या मुख्यालयात आठवड्यातून एक दिवस सगळे सैनिक आणि अधिकारी हा गणवेश परिधान करतील.
सैन्यात जाण्यासाठी उत्सुक असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या दृष्टीने हा गणवेश म्हणजे जिव्हाळ्याचा विषय असतो. एक वेगळाच रुबाब या युनिफॉर्म मध्ये असतो. आता आलेल्या या नवीन युनिफॉर्म ने या रुबाबात चार चांद लागले आहेत.