पुष्पा : द राईझ चित्रपट रिव्ह्यू || Pushpa : The Rise Movie Review Marathi

पुष्पा : द राईझ चित्रपट रिव्ह्यू || Pushpa : The Rise Movie Review Marathi 

पुष्पा चित्रपट जेवहा येणार अशी चर्चा सुरू झाली तेव्हा मात्र पुष्पा विषयी सर्व भाषांमध्ये उत्साह होता मात्र हिंदीकडे थोडंस दुर्लक्ष झाल्याचे बघायला मिळत होते. मात्र आता सर्वांच्या नजरा या पुष्पा चित्रपटाकडे लागून आहेत. आज याच पुष्पा चित्रपटाचा रिव्ह्यू आपण बघणार आहोत. यामध्ये चित्रपटाविषयी सर्व काही माहिती आहे. पुष्पा चित्रपटातील पात्र, कलाकार, कथा आणि प्रेक्षकांचा प्रतिसाद या सर्व गोष्टी आपण जाणून घेणार आहोत. Pushpa Part 1 the rise Movie review, Casting, actors, Director, costing, duration review Marathi

Pushpa Movie Marathi Review

पुष्पा चित्रपटाची कथा - Pushpa Part 1 Film Story

पुष्पा चित्रपटात अल्लू अर्जुन आणि रश्मीका मंदाना हे दोघे मुख्य भूमिकेत आहेत. चित्रपटाची कथा पुढे सांगतो आहे-

पुष्पा चित्रपटात पुष्पा राज नावाचा एक लाल चंदन तस्कर असतो. त्याची चोरी करण्याची ही एक स्टोरी आहे. तो लाला चंदन चोरून आणि विक्री करून एक मोठा व्यक्ती बनतो.

लाल चंदनाची तस्करी करत असताना त्याचा सामना पोलिसांशी देखील होतो. अनेक मोठे लोक लाल चंदनाची झाडे असलेले भाग हस्तगत करू बघत असतात. त्या सर्वांचा सामना पुष्पा कसा करतो हे बघण्यासाठी तुम्ही हा चित्रपट नक्कीच बघायला हवा.

चित्रपटाचे कलर कॉम्बिनेशन अगदी उत्तम आहे. ज्या पद्धतीने कलर कॉम्बिनेशन चित्रपटात दाखविले गेले आहे त्यामुळे लोकांना ते खूप आवडलेले दिसते. 

चित्रपटात ऍक्शन सिन छान चित्रित केलेले आहेत. तुम्हाला हे बघून खूपच छान वाटलं कारण हे ऍक्शन सिन शूट करताना योग्य ते कॅमेरा अँगल वापरलेले आहेत. त्याबद्दल दिग्दर्शकाचे खरच कौतुक करायला हवे.

चित्रपटात अल्लू अर्जुन आणि रश्मीका मंधना यांची प्रेम कथा देखील दाखवलेली आहे. यामुळे चित्रपटात आणखी रंजकता येते. यात रश्मीका ही अल्लू अर्जुनच्या पत्नीचे पात्र साकारत आहे.

चित्रपटाची कथा खूप रंजक असल्याने तुम्हाला यामध्ये कोणत्याही प्रकारे बोर होईल असे चित्रीकरण आणि डायलॉगस नाहीत. चित्रपटात अल्लू अर्जुन यांचा अभिनय हा अजून जास्त उत्तुंग लेव्हल ला पोहोचलेला आहे. चित्रपटात असलेला अल्लू अर्जुन यांचा लूक लोकांना जास्त आवडत आहे.

पुष्पा चित्रपटातील कलाकार - Pushpa Film Casting

अल्लू अर्जुन as पुष्पा राज

रश्मीका मंदाना as श्रीवल्ली

फरहाद फासिल as भंवर शिखावत

जगपति बाबू

प्रकाश राज

धनंजय as जॉली रेड्डी

सुनील as मंगलम श्रीनू

अनसूया भरद्वाज as दक्षयनी

हरीश उथमन

शत्रू

वेनेला किशोर

श्रीतेज

माईम गोपी

राव उमेश

अजय घोष

मालविका वेल्स

सामंथा रूत प्रभू


पुष्पा चित्रपटाचे दिग्दर्शन- Director of Film Pushpa

पुष्पा चित्रपटाचे दिग्दर्शन हे सुकुमार द्वार यांनी केलेलं आहे. डायरेक्टर ने चित्रपटात त्याच्याकडून जीव ओतण्याचे काम केलेले आपल्याला दिसते. चित्रपटाला ज्या प्रमाणे दाखविले आहे त्यानुसार या डायरेक्टर ला 10 पैकी 10 गुण आपण देऊ शकतो.

प्रत्येक पात्राला खूप चांगल्या प्रकारे रंगविण्यात आलेले आहे. ऍकटिंग आणि त्यांचे डायलॉग हे इतके परफेक्ट आहेत की चित्रपटात मध्ये एखाद्याला बोर होईल असा क्षण सापडणार नाही.

चित्रपटाचा वेळ हा थोडा जास्त आहे. काही लोकांसाठी हा वेळ जास्त वाटू शकतो मात्र अल्लू अर्जुन फॅन्स साठी हाही वेळ कमीच आहे! जे अल्लू अर्जुनला पहिल्यांदा बघत आहेत त्यांना हा चित्रपट थोडा मोठा वाटू शकतो. 

Time Duration: 2 तास 59 मिनिटे

Release date: 17 डिसेंबर 2021

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने