मिर्झापुर सिरीज मधील गाव खरंच अस्तित्वात आहे का? । मिर्झापुर कालीन व्यवसाय (Mirzapur Kalin Business)
आपण मिर्झापुर ही वेबसिरीज बघितलेली असेल तर त्यातील कालीन चा व्यवसाय तुम्हाला माहिती असेलच? हे मिर्झापूर आणि कालीन म्हणजेच गालीचे किंवा रग यांचे नाते खरोखर भारतात आहे. याच मिर्झापुर विषयी आज आपण जाणून घेणार आहोत.
उत्तर प्रदेश राज्यात मिर्झापुर नावाचे एक ठिकाण आहे. वाराणसी पासून हे शहर साधारण 76 किलोमीटर अंतरावर आहे.
मिर्झापुर शहर आणि कालीन हे नाते ऐतिहासिक कालखंडापासून आहे. आजच्या घडीला मिर्झापुरची सर्व आर्थिक उलाढाल ही या कालीन व्यवसायात होते. आज प्रत्येक घरात अशा प्रकारे कार्पेट बनविण्याचा व्यवसाय केला जातो.
मिर्झापुर शहरात दुसरा मोठा उद्योग हा पितळाच्या भांड्यांचा आहे. पारंपरिक पद्धतीने हा व्यवसाय खूप वर्षांपासून मिर्झापुर मध्ये सुरू आहे. इथे पारंपरिक पद्धतीने हंडाझ घागर, परात, थाळी, लोटा, कटोरी यांना बनविले जात होते.
गालीचे म्हणजेच कालीन बनविण्यासाठी लागणारा धागा हा बाहेरून मागविला जातो. त्यांनतर त्या धाग्याला चरख्यावर प्रकिया केली जाते. याला कट केले जाते आणि मग त्यावर डाय केला जातो. त्यानंतर त्या धाग्याचा विणण्यासाठी वापर केला जातो.
एकदा विणण्याचे काम झाल्यानंतर मग जे धागे वर असतात ते कात्रीच्या साहाय्याने कट केले जातात. तयार गालिचा हा धुतला जातो. बाजूने त्याला शिवण्याचे काम केले जाते. आगीचा वापर करून त्याला शेवटची फिनिशिंग दिली जाते.
त्यामुळे आता कालीन भैया ज्या मिर्झापुर सिरीज मधून फेमस झालेत त्या मिर्झापुर गावाला देखील एक ओळख निर्माण झाली आहे.