आधुनिक जीवन शैलीत आपल्या प्रकृतीकडे कसे लक्ष द्याल? || Health Care in Modern Lifestyle in Marathi?

आधुनिक जीवन शैलीत आपल्या प्रकृतीकडे कसे लक्ष द्याल? ||Health Care in Modern Lifestyle in Marathi?

आधुनिक जीवन शैली चे जीवन सध्या आपण जगतो आहोत मात्र या आधुनिक जीवन शैलीचा आपल्या आरोग्यावर काय परिणाम होतो? याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत.

आधुनिक जीवन शैलीत आपल्या प्रकृतीकडे कसे लक्ष द्याल? || How to Care Health in Modern Lifestyle in Marathi?

आपण आज बघत आहोत की आयुष्य दगदगीचे आहे आणि वेगाने जाणारे आहे.  प्रत्येक व्यक्ती काही ना काही कारणासाठी धावतच असतो. असे करत असताना मात्र निसर्गाने आपल्याला जे काही नियम घालून दिलेले आहेत त्यात आपण थोडेसे जाऊन आपल्या जीवनाला अधिक सुलभ बनवू शकतो का? हा देखील विचार आपण केला पाहिजे.

आपण आज यासाठी काही 3 महत्वाच्या गोष्टी बघणार आहोत.

1 आहाराकडे लक्ष दिले पाहिजे

आहारात आपण प्रथिने, स्निग्ध पदार्थ, मिनरल्स, फळे, भाजीपाला यांचा समावेश केला पाहिजे. महिलांमध्ये एकदा चाळीशी ओलांडली की कॅल्शियम कमतरता जाणवते. अशावेळी त्यांनी आपल्या आहारात दूध, दही, ताक यासारख्या कॅल्शियमचे प्रमाण चांगले असलेल्या पदार्थांचा समावेश आहारात करावा. 

2 व्यायाम करा

आपल्याला धावपळीच्या आयुष्यात जेव्हा कधी थोडा वेळ मिळतो तेव्हा आपण थोडा वेळ स्वतःसाठी काढून योगासन, स्विमिंग, चालणे किंवा जिम करणे याने तुम्हाला नक्कीच फायदा होईल. दिवसातून 20 मिनिटांसाठी चालणे हे देखील तुमच्या आरोग्यासाठी लाभदायक असते. योगासनात प्राणायम सारखे आसने नित्यनेमाने करत जा. स्विमिंग सारख्या व्यायामात तुमची पूर्ण बॉडी कार्यरत असल्याने त्याचा देखील तुम्हाला चांगल्या प्रकारे दैनंदिन जीवनात फायदा होईल.

3 मानसिक स्वास्थ्य राखा

आपण कायम शरीराचा विचार करत असतो मात्र आपण शरीराबरोबर मनाची देखील तयारी ठेवायला हवी. त्याला तंदुरुस्त बनविणे गरजेचे असते. आपल्यामध्ये ज्या काही नकारात्मक गोष्टी आहेत त्यांना बाजूला करण्यासाठी प्राणायाम किंवा मेडिटेशन करावे. मनाची आणि इमोशनल Quotient ची काळजी घेणे यामध्ये गरजेचे असते.

आपण थोड्यावेळ दिवसातून मेडिटेशन केले तर ते फायदेशीर ठरेल. आपण जर कायम सकारात्मक विचार ठेवले तर तुमच्यासमोर येणारे पहाडी दुःख देखील काही क्षणात कमी होतात. आयुष्यात येणाऱ्या बऱ्याच अडचणी तुम्ही फक्त पोसिटीव्ह विचारांनी संपवू शकतो. 


आपल्याला जीवनाचा सध्या सुरू असलेला वेग तर बदलता येणार नाहीये मात्र जर आपण हाच वेळ तसाच ठेवून स्वतःला थोडं बदलल तर मग आपण या धावपळीच्या आयुष्यात देखील आपल्या आरोग्याकडे लक्ष देई शकतो. बऱ्याचदा काळजी करण्याचे कारण देखील शिल्लक रहात नाही कारण तुम्ही त्याचा सामना करण्यासाठी तयार असतात. 

आपण आपल्यासोबत दुसऱ्या लोकांना देखील आनंदी ठेवू शकतो त्यामुळे आपल्या मध्ये थोडेसे बदल करण्यासाठी काही हरकत नसावी!

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने