जांभूळ फळाचे आरोग्याला फायदे । Benefits of Java Plum in Marathi

जांभूळ फळाचे आरोग्याला फायदे । Benefits of Java Plum in Marathi

आज आपण या लेखाच्या माध्यमातून सर्वदूर महाराष्ट्रात मिळणाऱ्या एका रुचकर, गुणकारी आणि औषधी अशा जांभूळ या फळाच्या फायद्यांविषयी जाणून घेणार आहोत. या जांभूळ फळांचे आपल्या शरीराला अनेक फायदे होतात त्यांच्याविषयी सविस्तर माहिती देखील जाणून घेणार आहोत. 

जांभूळ खाण्याचे आरोग्याला फायदे (Health Benefits of Java Plum in Marathi)

जांभूळ फळाचे आरोग्याला फायदे । Benefits of Java Plum in Marathi

जांभूळ फळात व्हिटॅमिन ए, बी, सी, कॅल्शियम, आयर्न, फॉलिक ऍसिड, कॉलिन, फॉस्फरस, मॅग्नेशियम, इत्यादी घटकांचे प्रमाण खूपच चांगले आहे. त्यामुळे ते आपल्या शरीरासाठी अत्यंत परिणामकारक ठरते. 

जांभूळ फळांचे नियमित सेवन केल्यास त्याने आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि अनेक आजारांपासून आपले रक्षण होते. 

जांभुळची फळे, बिया, पाने, झाडाची साल हे सर्व खूप औषधी आहे. त्यामुळे यांचा आजारांवर उपचार म्हणून वापर केला जातो. डायबेटीज सारख्या आजारावर जांभूळ हे एक रामबाण उपाय ठरते. डायबेटीज झालेल्या रुग्णांना लघवी जास्त लागते. अनेकदा लघवी द्वारे साखरेचा जास्त प्रमाणात निचरा होऊन त्यांना भूक लागते. मात्र असे असून देखील अशक्तपणा येत असतो. मधुमेहाच्या या समस्येवर उपाय म्हणून रात्री झोपण्याच्या आधी एक ते दोन चमचा जांभळाच्या बियांचे चूर्ण कोमट पाण्यातून घ्यावे. या सेवनाने तुमच्या लघवीमधून बाहेर पडणारे साखरेचे प्रमाण कमी होईल. रक्तातील साखरेचे प्रमाण देखील कमी होऊन डायबेटीज नियंत्रणात राहण्यास मदत मिळेल. 

जांभळाच्या सीझनमध्ये डायबेटीज असलेल्या रुग्णांनी दररोज एक मूठ तरी जांभळं खाल्ली पाहिजे. जांभळाचा रस किंवा आसव घेतल्याने देखील आपल्याला फायदा होईल. याचा फायदा रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास देखील होतो. 

स्त्रियांना अंगावरून पांढरे पाणी जात असेल किंवा पाळीच्या वेळी अति रक्तस्त्राव होत असेल किंवा लघवीच्या जागी जळजळ होत असेल किंवा युटेरस संबंधित काही त्रास होत असेल तर जांभळं अत्यंत परिणामकारक ठरतात. आपण दररोज जांभळाच्या बियांचे चूर्ण दोन वेळा कोमट पाणी किंवा मध यांच्याबरोबर घेतले पाहिजे. याने आपल्याला आराम मिळेल.

जांभळाच्या झाडाच्या आंतरसाली चा काढा बनवून त्यात थोडंस मध घालून देखील घेऊ शकतो. जांभळाचे आसव घेणे हे सर्वात जास्त फायदेशीर असते. 

लिव्हरचे कार्य जर बिघडले तर शरीरात रक्तविकार होतात. त्यामुळे अशक्तपणा येऊन अनेमिया आणि कावीळ देखील होऊ शकते. अशा स्थितीत आपण रोज जांभळं खाल्ली पाहिजेत. जांभूळ सेवनाने आपल्या शरीरातील रक्त आणि हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते. यामुळे अनेमिया आणि यकृताचे विकार दूर होतात. जांभळाने कावीळ देखील लवकर आटोक्यात येण्यास मदत होते. 

जांभूळ खाल्ल्याने आपले रक्त शुद्ध होते. त्यामुळे अनेक प्रकारच्या त्वचा विकारांवर जांभूळ अत्यंत परिणामकारक ठरते. त्वचेवर जर मुरूम, पिंपल्स किंवा ऍकने आले असतील, काळे डाग पडले असतील किंवा सुरकुत्या पडल्या असतील तर त्यावर आपण जांभळाच्या बियांचे चूर्ण लावले पाहिजे. आपण जांभळाच्या बिया दुधामध्ये उगाळून त्याचा लेप देखील त्वचेवर लावू शकतो. या कृतीने त्वचेवरील काळे डाग, पिंपल्स निघून जातात. त्वचा उजळण्यास याची मदत होते. यासोबत आपण जांभळाचा रस देखील त्वचेवर लावू शकतो. याने त्वचेवरून खाज, खरूज यासारखे त्रास निघून जातात आणि त्वचा तजेलदार बनते. 

जर मुळव्याधीतून रक्त पडत असेल तर रोज जेवल्यानंतर मूठभर जांभळं खाल्ली पाहिजे. तुम्ही जांभळाचे सरबत देखील घेऊ शकता. याचा फायदा हा रक्तस्त्राव थांबण्यास व पोट साफ होण्यास होईल. 

जर आव पडत असेल तर जांभळाच्या बियांचे चूर्ण एक चमचा आणि दही, मध आणि पाणी यापैकी एकसोबत घेऊ शकतो. याने आव पडणे थांबेल आणि आपल्याला लवकर आराम मिळेल. 

ऍसिडिटी, पोटदुखी, पोटफुगी, गॅसेस किंवा पोटाचे आणि पचनसंस्थेचे कोणतेही विकार असतील तरी आपण जांभळाचे सरबत घेतले पाहिजे. हे अत्यंत परिणामकारक असून लवकर आराम देखील मिळतो. 

या सर्वांबरोबर हृदयरोग, अर्थायटीस, अस्थमा, कँसर, किडनी स्टोन, अल्सर अशा अनेक विकारांवर जांभूळ अत्यंत परिणामकारक ठरते. जांभूळ सेवनाने आपल्या हाडांचे आरोग्य सुधारते. तसेच आपली स्मरणशक्ती वाढण्यास देखील मत होते. जांभूळ नियमित खाल्ल्याने आपले मेंदूचे कार्य सुधारते. 

यासाठी आपण नियमित जांभूळ, जांभळाचे सरबत किंवा जांभळाचा रस, आसव हे घेतलेच पाहिजे. आपल्याला शारीरिक आणि मानसिक शक्ती वाढवायची असेल तर नियमित जांभळाचा समावेश आपल्या आहारात करा आणि आपले आरोग्य उत्तम ठेवा!

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने