गुणकारी तुरडाळीचे आरोग्यासाठी फायदे || Tur Dal Health Benefits in Marathi
आपल्या आहारात असणारी तुरडाळ ही मोठ्या आजारांवर कशी गुणकारी ठरू शकते, तुमचे आरोग्य आणि शरीराला त्याचे काय फायदे होतात याविषयी आज आपण माहिती जाणून घेणार आहोत.
टीप- सर्व फायदे हे नैसर्गिक पद्धतीने पिकविलेल्या आणि बनविलेल्या व पॉलिश न केलेल्या तुरडाळीचे हे सर्व फायदे आहेत.
नैसर्गिक पद्धतीने पिकविलेल्या या तुरडाळीत कोणत्याही प्रकारच्या रासायनिक कीटकनाशके किंवा रसायने यांचा वापर केलेला नसतो. पुढे जाऊन त्याला पोलिश देखील न केल्यास त्यातील जे पोषकत्व असते ते भरपूर प्रमाणात टिकून राहते. या डाळीचे आपल्या शरीरावर कोणत्याही प्रकारचे दुष्परिणाम हे दिसत नाहीत.
तुरडाळीत अँटी ऑक्सिडंट्सचे प्रमाण खूप चांगले असते. यामध्ये व्हिटॅमिन सी, पोटॅशियम फायबर्स आणि कार्ब्स देखील असतात. याचा फायदा आपली रोगप्रतिकारक शक्ती म्हणजेच इम्युनिटी पॉवर वाढायला होतो. हृदयरोग, कर्करोग, उच्च रक्तदाब, मधुमेह यासारख्या मोठ्या आजारांवर आपल्याला या डाळीचा फायदा होतो.
आपल्या शरीरातील हार्मोनल बॅलन्स राखण्यासाठी ही तुरीची डाळ उपयुक्त ठरते. थायरॉईड, पी सी ओ डी, वंध्यत्व यासारख्या आजारांना दूर करण्यासाठी ही डाळ खूप मदत करते.
नैसर्गिक रित्या पिकविल्याने या डाळीत मोठ्या प्रमाणात अँटी इंफ्लेमेट्री प्रॉपर्टी असतात. तुमचा घसा दुखत असेल, तोंड आले असेल (माऊथ अल्सर) तर रात्री तुरीची डाळ भिजत घालून सकाळी त्या पाण्याने गुळण्या कराव्यात. असे केल्याने लवकरच आराम मिळेल.
आपल्या शरीरात कुठेही सूज आली असेल तर ही डाळ भिजत घालून तिचा लेप त्या जागेवर वरून लावावा. हा लेप लावल्याने सूज उतरण्यासाठी मदत होते.
तूर डाळीत प्रोटीन, फायबर, आयर्न, कॅल्शियम, बी कॉम्प्लेक्स व्हिटॅमिन, व्हिटॅमिन सी चे प्रमाण खूप चांगले आहे. पचनसंस्थेचे विकार, मेंदूचे विकार, हाडांचे विकार, स्नायूंचे विकार, दातांचे विकार, अनेमिया, स्त्रियांना होणारे त्रास आणि मासिक पाळीच्या त्रासांवर ही तूर डाळ गुणकारी ठरते.
महिलांच्या आरोग्यासाठी फायदे-
तुरीची डाळ आपण आपल्या जेवणात सतत घेत असतो आणि याच तुरीच्या डाळीचे स्त्रियांसाठी काय फायदे आहेत याविषयी आपण जाणून घेणार आहोत.
महिलांमध्ये आपल्याला हिमोग्लोबिन लेव्हलची कमतरता ही सतत जाणवत असते. तुरीच्या डाळीत लोह आणि फोलिक यांचे प्रमाण चांगले असते. यामुळे आपल्या रक्तातील हिमोग्लोबिन आणि लाल रक्तपेशी म्हणजे RBC वाढायला मदत होते. ज्यांच्या शरीरात रक्ताची कमतरता असेल त्यांनी तर दररोजच्या आहारात तुरीच्या डाळीचा समावेश हा केला पाहिजे.
गरोदर असताना स्त्रियांना मलावरोध, मूळव्याध आणि अपचन होणे यासारख्या समस्या जाणवतात. या समस्यांवर तुरीची डाळ ही गुणकारी असते. तुरीच्या डाळीत फॉलिक ऍसिडचे प्रमाण जास्त असते आणि याचा फायदा मुलांच्या मेंदूची आणि शरीराची योग्य वाढ होण्यास होते.
रजोनिवृत्ती च्या वेळी स्त्रियांना हार्मोनल इमबॅलन्स झाल्याने अनेक त्रास जाणवतात. यामध्ये चिडचिड होणे, मूड स्विंग, डोकेदुखी, कंबर दुखी, गुडघेदुखी, हृदयविकार, मधुमेह यांचा समावेश होतो. यावर देखील तुरीची डाळ अत्यंत परिणामकारक ठरते. नियमित तूर डाळीचे सेवन तुम्हाला या त्रासांपासून दूर ठेवेल.
तुरीच्या डाळीत व्हिटॅमिन सी आणि लायसीन यांचे प्रमाण चांगले असते. त्वचेत असणारे कॉलॉजन यामुळे वाढायला मदत होते. यासोबत केसांचे आरोग्य देखील सुधारते. त्वचा मऊ आणि तेजस्वी होते. केस गळती होत असेल तर ती थांबून केस काळेभोर दाट होतात.
हे सर्व फायदे तुम्हाला पूर्णपणे नैसर्गिकरित्या पिकविलेली आणि पॉलिश न केलेली तुरीची डाळ खाल्ल्याने होत असतात. अशी तुरडाळ तुम्ही खाल्ली तर पोटाचे विकार म्हणजे जसे की गॅसेस होणे, पोट दुखणे, इत्यादी त्रास होत नाहीत. त्यामुळे जर तुम्हाला हे सर्व फायदे अनुभवायचे असतील आणि आरोग्य सुधारवायचे असेल तर पॉलिश न केलेली तुरीची डाळ आहारात वापरत जा.