सुर्यवंशी : मुव्ही रिव्ह्यू मराठी || Sooryavanshi Movie Review in Marathi

सुर्यवंशी : मुव्ही रिव्ह्यू मराठी || Sooryavanshi Movie Review in Marathi

सुर्यवंशी बॉलिवूड हिंदी चित्रपट रिव्ह्यू, कास्ट, खर्च, रिलीज डेट (Sooryavanshi Bollywood Hindi movie review, budget, cast, role, story, release date, special cast, director, Release Date in marathi)

सुर्यवंशी : मुव्ही रिव्ह्यू मराठी || Sooryavanshi Movie Review in Marathi

जवळपास 20 महिन्यांच्या मोठ्या अंतरानंतर शुक्रवारी रोहित शेट्टी यांचा सिनेमा सूर्यवंशी हा सिनेमागृहात रिलीज झाला. रोहित शेट्टी म्हणले की पोलिसांवर चित्रपट हे जणू समीकरणच बनले आहे. त्यांच्या चित्रपटात गाडी उडवून भौतिकशास्त्राचा नियमांची वाट लावली जाते! यालाच मसाला सिनेमा असं नाव आपल्या बॉलिवूड इंडस्ट्री मध्ये पडलेलं आहे.

सूर्यवंशी या चित्रपटाची कथा वीर सूर्यवंशी नावाच्या एका पोलीस ऑफिसरची आहे. हे अँटी टेररिझम स्क्वाड म्हणजेच एटीएस मध्ये DCP आहेत. 

चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये दाखविल्याप्रमाणे 1993 मध्ये मुंबई मध्ये जवळपास 1 टन RDX आले होते. 93 साली झालेल्या ब्लास्ट मध्ये फक्त 400 किलो RDX ब्लास्ट झाले होते. बाकी शिल्लक असलेला 600 किलो RDX अजूनही मुंबई मध्येच कुठेतरी पुरून ठेवलेले आहे. 

अशा स्थितीत आपल्या जवळील मुलखातील काही लोक एक अजून मोठा हल्ला करण्याच्या तयारीत आहेत. हे सर्व ऐकून तुम्हाला हे नक्कीच कळले असेल की हा हल्ला फक्त एकच व्यक्ती थांबवू शकतो आणि तो म्हणजे वीर सूर्यवंशी!

सूर्यवंशी चित्रपटात अनेक व्हिलन आहेत. त्यांचा आकडा न संपणारा आहे. यामध्ये फिल्मने देखील एका व्हिलनला जास्त महत्व दिले नाही आणि त्यामुळे वीर सुर्यवंशी देखील त्यांना तशीच वागणूक देतो. तुम्ही इथे बघून असे नक्कीच म्हणू शकता की Quantity ठेवण्याच्या नादात Quality कुठेतरी कमी झालेली आहे.

चित्रपटाची कथा ही खूप जास्त रंगवून दाखविण्याचा प्रयत्न झालेला आपल्याला दिसतो. चित्रपटात प्रत्येक व्हिलन सोबत तुमची ओळख करून दिली जाते आणि वीर सुर्यवंशी यांच्या भूतकाळातील एक कथा देखील तुम्हाला इथे ऐकायला आणि बघायला मिळेल. यामध्ये अनेक कॉमेडी सिन आणि ऍक्शन सिन दाखवून प्रेक्षकांना दुसऱ्या हाल्फ साठी खिळवून ठेवण्याची ताकद या चित्रपटात नक्की आहे. 

सर्व काही दुसऱ्या हाल्फ मध्ये सुरू होणार असते. काही ऍक्शन सिन तर असे आहेत ज्यामध्ये अनेक पैसे, ऊर्जा आणि डोक्याचा वापर केलेला आहे. आपण फॅन्सी म्हणतो ना त्या प्रमाणे सर्व काही घडत असते. न

जेव्हा आपण दुसऱ्या हाल्फ मध्ये पोहोचतो तेव्हा आपल्याला कळते की कथेच्या भोवती ऍक्शन सिन नाही तर ऍक्शन सीनच्या भोवती कथा दाखवलेली आहे. इथे तुम्हाला थोडी निराशा येऊ शकते. मात्र रोहीत शेट्टी म्हणले की हे सर्व येणारच आहे!

या चित्रपटात हिंदू मुस्लिम हा विषय देखील हाताळला गेला आहे. एका दृष्यात गणेशजींची मूर्ती उचलायला हिंदू बांधवांची मदत मुस्लिम बांधव करतात. पार्श्वसंगीत म्हणून जुन्या हिंदू मुस्लिम एकता दर्शविणाऱ्या गाण्यांचे नवीन व्हर्जन देखील ऐकायला मिळते.

त्यानंतर महिला सबलीकरण हा मुद्दा देखील येतो. अशा वेळी मग कॅटरिना कैफ या येतात. त्यांनी वीर सुर्यवंशी यांच्या पत्नीचा म्हणजे रियाचा रोल केलेला आहे. अक्षय बाबू चित्रपटात एक पेक्षा जास्त वेळा आपल्या पत्नीचे नाव विसरून जातात. गोलमाल चित्रपट तुम्ही बघितलाच असेल आणि त्यात जॉनी लिव्हर जसे भुलक्कड दाखविले आहेत तसेच हे वीर सुर्यवंशी देखील आहेत. 

एका भयानक प्रसंगानंतर रिया तिच्या मुलासोबत भारत सोडून जाण्याचा प्लॅन करते. रिया सुर्यवंशी यांच्या निष्काळजीपणा ने त्रासलेली असते. तरी देखील अनेकदा चुका करून सुद्धा शेवटी रियाच चित्रपटाच्या शेवटी सुर्यवंशीची माफी मागून भारत सोडण्याचा प्लॅन रद्द करते.

सुर्यवंशी चित्रपटाच्या पटकथेत टीप टीप बरसा या गाण्याचा रिमिक्स बघायला मिळेल. कथेत कुठेच सूट होत नाही अशा ठिकाणी हे व्हर्जन बसविलेले आहे. 

बऱ्याच कमतरता असून देखील आपण फिल्म पूर्णपणे वाईटच आहे असे म्हणू शकत नाही. कारण रोहित शेट्टी म्हणले की त्यांच्या जुन्या चित्रपटांसारखे काही तरी तुम्हाला बघायला मिळणार हे तुम्हाला माहीत आहे. सुर्यवंशीला तुम्ही ब्रेनलेस कॉप ऍक्शन ड्रामा म्हणूनच बघू शकता. या चित्रपटात लॉजिक न शोधता मनोरंजन शोधण्यासाठी बघावे. 

सुर्यवंशी का बघावा? - Why to Watch Sooryavanshi Movie?

1. अक्षय कुमार आणि रोहित शेट्टी यांचे पहिले एकत्र काम बघण्यासाठी चित्रपट बघावा.

2. रोहित शेट्टी यांच्या सिंघम सारख्या चित्रपटांना तुम्ही मिस करत असाल तर सुर्यवंशी बघावा.

3. मनोरंजन म्हणून बघावा, लॉजिक म्हणून नाही!

4. अनेक दिवसांनंतर सिनेमागृह सुरू झालेली आहेत त्यामुळे सुरुवात बघण्यासाठी नक्की जावे.

5. अजय देवगण आणि रणवीर सिंग यांना या चित्रपटात पॉकेट डायनामाईट म्हणून वापरलेले आहे.


निर्माता- हिरू यश जौहर, कारण जौहर, अरुणा भाटिया, अपूर्व मेहता, रोहित शेट्टी

निर्देशक- रोहित शेट्टी

कलाकार-  अक्षय कुमार, कॅटरिना कैफ, जॅकी श्रॉफ, गुलशन ग्रोवर, जावेद जाफरी, अभिमन्यू सिंह, निकीतीन धीर, कुमुद मिश्रा, सिकंदर खैर, राजेंद्र गुप्ता, विवान भटेना

स्पेशल रोल- अजय देवगण आणि रणवीर सिंग

फिल्मची वेळ- 2 तास 25 मिनिट

सेन्सर सर्टिफिकेट- UA

दीप रेटिंग- 8/10


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने