भारतातील पहिले हेरिटेज ट्रान्सपोर्ट म्युझियम || Heritage Transport Museum in Marathi
लहान असल्यापासून आपल्याला काहीतरी गोळा करण्याची हौस असते आणि पुढे जाऊन अनेकांची त्या गोष्टींसोबत एक बॉंडिंग देखील बनत जाते. लहानपण गेल्यानंतर अनेकांना हे छंद जोपासणे कठीण जाते आणि ते त्याकडे दुर्लक्ष करतात. मात्र काही लोक या छंदाला एक वेगळे रूप देण्याचा प्रयत्न करतात.
हरियाणा राज्यातील गुरगाव येथे असणाऱ्या तरुण ठकराल यांनी आपल्या छंदाला जोपासत भारतातील पहिले आणि एकुलते एक असे "हेरिटेज ट्रान्सपोर्ट म्युझियम" बनविले. अनेक देशांमध्ये ट्रान्सपोर्ट म्युझियम आहेत मात्र इंडियन ट्रान्सपोर्टेशन चा इतिहास जगाला दाखविण्यासाठी तरुण यांनी हा प्रयत्न केला.
त्यांच्या या हेरिटेज ट्रान्सपोर्ट म्युझियम मध्ये प्रत्येक प्रकारच्या वाहतुकीची साधने आहे. यात बैलगाडी पासून जुन्या काळात मोटारीच्या आधी येणारे प्री मेकॅनाईझड वाहतुकीची साधने, रेल्वे, कार आणि बसेस सर्व काही आहे.
म्युझियम विषयी तरुण यांचे ध्येय नक्कीच प्रशंसनीय आहे. सध्याच्या काळात लोक एखाद्या संग्रहालयात जावं म्हणून काम बघत नाहीत मात्र त्यांचा हाच प्रयत्न आहे की लोकांनी पुन्हा एकदा म्युझियम मध्ये जावे.
हेरिटेज ट्रान्सपोर्ट म्युझियम मध्ये 4 मजले आहेत. इथे एकूण 1 लाख sq ft एरिआ आहे. यामध्ये 40 क्लासिक आणि विंटेज कार, जवळपास 15 स्कुटर, 25 प्री मेकॅनाईझड ट्रान्सपोर्ट व्हेईकल (पालखी, टांगा, बैलगाडी), वर्ल्ड वॉर 2 मध्ये पायलटला ट्रेन करण्यासाठी वापरत असलेले पायपर कब J3C एअरक्राफ्ट, 1930 मधील एक रेल्वे सलून ज्याचा वापर जोधपूरच्या महाराजांनी केला असे अनेक आश्चर्य आहेत.
हेरिटेज ट्रान्सपोर्ट म्युझियम मध्ये भारतीय रस्त्यांवरील राजा म्हणून ओळख असलेली अँबेसिडर कार, ओल्ड लिमोझिन, तीन चाकांची गाडी म्हणून ओळख असलेली बादल अशा जवळपास 120 गाड्या या संग्रहालयात आहेत. यामध्ये दिवसेंदिवस अनेक गाड्या देखील ऍड होत आहेत.
तुम्ही शाहरुख खानचा दिल तो पागल है बघितला असेल तर त्यातील ती लाल गाडी देखील इथे आहे. राजस्थान सारख्या प्रांतात वापरली जाणारी ट्रान्सपोर्ट ट्रक (जुगाड) देखील इथे आहेत.
हेरिटेज ट्रान्सपोर्ट म्युझियम मध्ये शेवरोलेट फिटन (Chevrolet Phaeton) ही सर्वात जुनी म्हणजे 1932 सालची गाडी आहे. यासोबत 1980 सालची पद्मिनी डिलक्स फियेट ही गाडी देखील इथे आहे.
या संग्रहालयात असलेली सर्वात जुनी वस्तू म्हणजे 1500 BC मधील इंडस व्हॅली सिव्हीलायझेशन मधील एक खेळणे आहे. याला ठेवण्यामागील कारण म्हणजे त्यांना हे सांगायचे आहे की त्याकाळात सुद्धा चाकाचा शोध लागलेला होता.
म्युझियम मधील डेकोरेशन वर देखील खूप चांगल्या प्रकारे लक्ष दिलेले बघायला मिळते. जुन्या मॉरिस कारचा वापर करून काउंटर बनविलेले आहे. सायकलच्या रिम्स वापरूम सोफ्याची निर्मिती केलेली आहे. तरुण यांच्याकडे एक वर्कशॉप देखील आहे. इथे राहून ते जुन्या गाड्यांना एक नवीन लूक देण्याचे काम देखील करत आहेत.
फोर्डचे एक मॉडेल ज्याला क्रिएटिव्ह लूक देण्याचा प्रयत्न केलेला आहे.
एक कार तर कोईन्स चा वापर करून डेकोरेट केलेली आहे.
डिसेंबर 2013 मध्ये हे म्युझियम सुरू झाले आहे. ट्रास्पोर्ट हा असा मुद्दा आहे ज्यांच्याशी तुम्ही लगेच कनेक्ट होऊन जाता. आपण कायम माझी पहिली गाडी, माझी पहिली स्कुटर असे बोलून जातो.
तरुण हे आता त्यांच्या संग्रहात 1925 ची एक वाफेवर चालणारी गाडी आणि 1951 सालची एक गाडी घेण्यास उत्सुक आहेत. यामध्ये आता काही आणखी गाड्या देखील वेळेनुसार ऍड झालेल्या असतील.