WhatsApp वरून फोटो क्वालिटी कमी न होता कसे पाठवतात? || How to Send Photo from WhatsApp without Loosing Quality in Marathi?

WhatsApp वरून फोटो क्वालिटी कमी न होता कसे पाठवतात? || How to Send Photo from WhatsApp without Loosing Quality in Marathi?

Whatsapp वरून जेव्हा कधी आपण आपले फोटो पाठविण्यासाठी जातो तेव्हा त्याची साईझ तर कमी होतेच मात्र त्यासोबत त्याची क्वालिटी (Quality) देखील कमी होत असते. ही समस्या आज पर्यंत अनेकांनी अनुभवली असेल आणि याच्यावर पर्यायी उपाय आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत जेणेकरून Whatsapp वरून शेअर होणारे फोटो हे क्वालिटी कमी न होता आणि साईझ देखील कमी न होता पाठवता येतील.


Whatsapp व्यतिरिक्त अनेक असे उपाय आहेत ज्यांचा वापर करून तुम्ही फोटो पाठवू शकता. यामध्ये ईमेल, गुगल ड्राइव्ह, टेलिग्राम सारखे ऑप्शन आहेत मात्र whatsapp यामध्ये सर्वात सोपे आणि सोयीस्कर असे माध्यम आहे.

Whatsapp वरून तुम्हाला क्वालिटी मेंटेन करत जर फोटो पाठवायचे असतील तर काही वेगवेगळ्या पद्धती आहेत. खाली दिलेल्या पद्धती वापरून तुम्ही Quality कमी न होता फोटो whatsapp वरून पाठवू शकता.

सेटिंग मध्ये बदल करून

1) Whatsapp App मधील Setting मध्ये जाऊन  Storage and Data हा पर्याय निवडा.

2) तुम्हाला यामध्ये Photo Upload Quality हा पर्याय दिसेल.

3) त्यावर Click करून Best Upload Quality हा पर्याय निवडा.

4) या पर्यायाचा बदल केल्यानंतर तुम्ही सहजपणे जास्त रिजोल्युशन आणि क्वालिटी असलेले फोटो पाठवू शकता.

डॉक्युमेंट ऑप्शन वापर करून

Document या पर्यायाचा वापर करून देखील तुम्ही Whatsapp वरून कोणताही फोटो त्याची क्वालिटी आणि साईझ कमी न होता पाठवू शकता.

1) Whatsapp मध्ये आपण फोटो पाठवायला जे attach बटन वापरतो त्यावर जाऊन Gallery हे ऑप्शन न निवडता document ऑप्शन निवडावे.

2) तुम्ही मोबाईल मधील files या पर्यायावर पोहोचाल. इथे आल्यानंतर तुम्हाला जो फोटो पाठवायचा आहे त्याला निवडायचे आहे.

3) त्यावर क्लीक केल्यानंतर Send ऑप्शन क्लीक केले की तुमचा तो फोटो डॉक्युमेंट ने दुसऱ्याला पाठविला जाईल.


तुम्ही जर iPhone वापरकर्ता असाल तर मग तुमच्याकडे हे files सारखे ऑप्शन नसते. त्यामुळे तुम्हाला अशावेळी पहिल्या पर्यायाकडे जावे लागेल.

iPhone साठी ऑप्शन

1) Setting मध्ये Storage and Data या पर्यायात तुम्हाला Media Upload Quality वर जायचे आहे.

2) यामध्ये Best Quality हा पर्याय निवडून तुम्ही Whatsapp वरून चांगल्या Quality चे आणि साईझ चे फोटो पाठवू शकता.

iCloud वापरून 

1) iPhone मधील फोटो app मध्ये जाऊन जो फोटो पाठवायचा आहे त्यावर क्लीक करा.  

2) खालून येणाऱ्या पॉप अप वर जाऊन तुम्हाला Share पर्याय निवडायचा आहे. 

3) समोर येणाऱ्या लिस्ट मध्ये तुम्हाला Save Files हा पर्याय निवडायचा आहे. 

4) तुम्हाला iCloud Drive वर जाऊन हा फोटो सेव्ह करायचा आहे. 

5) त्यांनतर Chat मध्ये जाऊन Plus वर क्लीक करून डॉक्युमेंट मधून iCloud मध्ये जावे.

6) त्यातून तुम्ही Upload केलेला फोटो निवडून पाठवायचा आहे.


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने