फ्लेक्स फ्युअल इंजिन म्हणजे काय? || What is Flex Fuel Engine in Marathi?

फ्लेक्स फ्युअल इंजिन म्हणजे काय? || What is Flex Fuel Engine in Marathi?

पुढील काही महिन्यांनंतर येणाऱ्या प्रत्येक गाडीला फ्लेक्स फ्युअल इंजिन हे आता बंधनकारक करण्यात येणार असल्याची बातमी सर्वत्र पसरत आहे. पण हे फ्लेक्स फ्युअल इंजिन म्हणजेच फ्लेक्सिबल फ्युअल इंजिन नक्की कसे आहे ते आपल्याला आजच्या लेखाच्या माध्यमातून जाणून घ्यायचे आहे.

फ्लेक्स फ्युअल इंजिन म्हणजे काय? || What is Flex Fuel Engine in Marathi?

सध्या आपण ज्या गाड्या वापरतो आहे त्यांचे इंजिन एकतर पेट्रोलवर चालते किंवा डिझेलवर किंवा सीएनजी वर! पण फ्लेक्स फ्युअल इंजिन हे एकापेक्षा जास्त प्रकारच्या इंधनांवर चालू शकते. म्हणजेच ते गॅसोलिन किंवा इथेनॉल वर चालू शकते. 

म्हणजे गाडीत तुम्ही गॅसोलिन (पेट्रोल) टाकले आहे किंवा इथेनॉल टाकले आहे यानुसार ते इंजिन स्वतःला ऍडजस्ट करून घेते. त्यामुळे जर असे इंजिन आपल्या गाडीत असेल तर पेट्रोल आणि डिझेल इंधनांवर असलेला भर कमी होऊन तो मिळेल तिथे इथेनॉल कडे जाऊ शकतो. त्यामुळे पेट्रोलचे दर देखील कमी व्हायला मदत होऊ शकते.

Flex Fuel Engine म्हणजे काय?

फ्लेक्स फ्युअल इंजिन मध्ये एकाच इंजिनचा वापर करून 2 वेगवेगळ्या प्रकारचे फ्युअल आपण इंधन म्हणून वापरू शकतो. हे इंजिन असलेल्या गाड्यांमध्ये आपण E85 इथनॉल वापरू शकतो. म्हणजे पेट्रोल मध्ये 85% इथेनॉल असलेली गाडी आणि 10% इथेनॉल मिश्रित पेट्रोल असलेली गाडी काहीही बदल न करता चालू शकते. 

इथेनॉल म्हणजे काय?

इथेनॉल हे एक प्रकारचे अल्कोहोल आहे. इथि अल्कोहोल असे त्याचे नाव आहे. याचा वापर आपण पेट्रोल मध्ये मिसळून करत आलो आहे. काही कालावधी पासून हे इंधन म्हणून वापरले देखील जात आहे. इथेनॉलची निर्मिती ही उसापासून होते. 

पुढील काही काळात इथेनॉलचा वापर वाढविण्यासाठी फ्लेक्स फ्युअल इंजिन गाड्यांमध्ये देण्याचा सरकारचा प्रयत्न सुरू आहे. इथेनॉल हे सर्वसामान्य जनतेला परवडेल असे इंधन आहे. त्याचा वापर विमानासाठी इंधन म्हणून देखील यशस्वी ठरला आहे. 

खनिज तेल म्हणजेच पेट्रोल, डिझेल हे वाहतुकीसाठी खूप मोठ्या प्रमाणात वापरले जाते आहे मात्र याचा पुरवठा  मर्यादित आहे. पेट्रोल सध्या 114 रुपयांहून अधिक वर गेले आहे. पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किंमती लक्षात घेता एका पर्यायी इंधनाची गरज नक्कीच आहे असे वाटते. 

या सर्वांवर पर्याय म्हणून इथेनॉल, बायोफ्युअल, सीएनजी, इलेक्ट्रिक वाहन आहेत. इथेनॉलची किंमत ही 60 ते 62 रुपये प्रति लिटर इतकी असणार आहे. त्यामुळे तुमची 40 रुपयांची बचत ही होणार आहे.

आता तुम्ही जे पेट्रोल वापरता त्यात 5.8% इथेनॉल मिसळले जाते. 2014 साली हे प्रमाण फक्त 1 ते 1.5% होते.  

1932 मध्ये ब्राझील येथे सर्वात आधी इथेनॉलचा वापर केला गेला. त्यानंतर सध्या कॅनडा आणि अमेरिका इथे देखील या इंधनाचा यशस्वी आणि नियमित वापर सुरू आहे. इथेनॉल वापराने प्रदूषण होत नाही त्यामुळे हे पेट्रोल पेक्षा खूप जास्त चांगले इंधन आहे.  

इथेनॉल हे पूर्णपणे भारतात निर्माण होणार असल्याने यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे. आपल्याकडे जे जास्त झालेले धान्य आहे किंवा ऊस आहे त्यांचा वापर करून इथेनॉल तयार केले जाते. मका आणि इतर धान्यापासून सरकार इथेनॉल बनवायला बघत आहे. सध्या 50% इथेनॉल हे साखर उद्योग तर 50% इथेनॉल हे धान्यापासून बनते. सध्याच्या घडीला भारतात 684 कोटी लिटर इथेनॉल तयार होऊ शकते. ही क्षमता 1000 कोटी लिटर पर्यंत नेण्याची सरकारची तयारी आहे. 

इथेनॉल वापर वाढविण्याच्या सोबत सरकार आता इथेनॉल निर्मितीसाठी उद्योगांना हवी ती आणि शक्य ती मदत करत आहे. त्यांना इथेनॉल उत्पादन वाढविण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे.

केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाच्या 25 मार्च 2015 च्या आदेशानुसार पेट्रोलमध्ये 10% पर्यंत इथेनॉल मिसळण्यात येते आहे. जगभरात सर्व देशांमध्ये E10 या प्रमाणात इथेनॉल मिश्रित पेट्रोल विकले जाते. ई10 म्हणजेच इथेनॉल 10% होय. E10 ते E85 पर्यंत इथेनॉल पेट्रोलमध्ये मिसळण्यात येते आहे. 

इथेनॉलचा पेट्रोलमध्ये वापर केल्याने अमेरिकेत वर्षाला 4.3 अब्ज डॉलर्सचे इंधन बचत होते आहे. याशिवाय इथेनॉल जर आपण पेट्रोल मध्ये मिसळले तर कार्बन मोनॉक्साईड उत्सर्जन हे 35% ने कमी होऊ शकते.

इथेनॉल वापरून चालवलेली कार ही पेट्रोल पेक्षा कमी गरम होते. याचे कारण म्हणचे अल्कोहोलचे लवकर बाष्पीभवन होऊन इंजिन गरम होत नाही. 

पुढील काळात सरकारचे पेट्रोल मध्ये 20% इथेनॉल मिक्स करण्याचे उद्दिष्ट आहे. 2025 पर्यंत हे लक्ष सरकार पूर्ण करणार होते मात्र पेट्रोलच्या आणि डिझेलच्या वाढत्या किंमती लक्षात घेता हे लवकर पूर्ण करण्याचे सरकारचे धोरण आहे.

ज्या धान्यात किंवा फळांमध्ये साखर आहे त्यांचा वापर हा इथेनॉल निर्मितीसाठी केला जातो आहे. याचा फायदा शेतकऱ्यांना कसा करून देता येईल ही बघण्यासारखी गोष्ट असेल. आपल्या देशात सध्या जवळपास सर्व धान्य आणि पिके ही सरप्लस आहेत. म्हणजे गरजेपेक्षा जास्त आपण उत्पादन घेतो आहे. याचा परिणाम असा होतो आहे की शेतकऱ्यांना कमी भाव मिळतो आहे. जर यापासून इथेनॉल निर्मिती सुरू झाली तर शेतकऱ्यांना जास्तीत जास्त भाव देणे देखील शक्य होऊ शकेल. 

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने