CNG चा फुल फॉर्म काय आहे? || CNG Full Form in Marathi
आज आपण जाणून घेणार आहोत CNG Full Form in Marathi आणि CNG म्हणजे मराठी भाषेत नक्की काय असते? यासोबतच CNG विषयी अधिकाधिक माहिती तुम्हाला या लेखाच्या माध्यमातून आम्ही देणार आहोत.
जेव्हा कधी आपण एखादी गाडी खरेदी करायला जातो तेव्हा तुम्हाला 3 प्रकारच्या गाड्या दाखविल्या जातात. पहिली म्हणजे पेट्रोल, दुसरी म्हणजे डिझेल आणि तिसरी म्हणजे CNG. अशा वेळी आपण पेट्रोल आणि डिझेल यांच्याविषयी जास्त विचार करतो मात्र CNG विषयी कधी विचारही करत नाही? याचे कारण म्हणजे आपल्याकडे काही काळापर्यंत CNG स्टेशन नव्हते मात्र आता सर्वत्र CNG स्टेशन निर्मितीला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे आता CNG हा पर्याय विचारात घ्यायला काहीही हरकत नाही.
तुम्ही देखील आता CNG गाडी घेण्याचा विचार करायला लागला असाल तर मग एकदा हे आर्टिकल पूर्ण वाचा जेणेकरून तुम्हाला CNG चा फुल फॉर्म, CNG चे फायदे, नुकसान, इत्यादी विषयी माहिती मिळेल.
CNG FULL FORM आणि मराठी अर्थ
CNG चा फुल फॉर्म हा Compressed Natural Gas असा होतो. पेट्रोल पेक्षा कमीत कमी प्रदूषण CNG वापराने होते. काही लोकांच्या मते पेट्रोल गाडी ही CNG गाडीपेक्षा कधीही चांगली असते. मात्र हे कशा प्रकारे चुकीचे आहे हे आपण आज पुढे जाणून घेणार आहोत.
CNG मराठी अर्थ- सीएनजी हे एक वायुरूप इंधन आहे. इंग्रजी मध्ये कॉम्प्रेसड नेच्युरल गॅस म्हणजेच मराठीत दाबाखाली असलेला नैसर्गिक वायू होय. CNG चा वापर आजकाल सर्व गाड्यांमध्ये केला जातो आहे आणि यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या तुलनेत खूप कमी प्रदूषण होत असते.
CNG काय असतो?
वर सांगितल्या प्रमाणे CNG हा एक वायुरूप इंधन प्रकार आहे. CNG गाडीच्या पाठीमागील डिक्की मध्ये एक सिलेंडर ठेवलेला आपल्याला दिसतो. त्यामध्ये CNG गॅस भरलेला असतो. नवीन ज्या गाड्या येत आहेत त्यांचे सिलेंडर डिक्की मध्ये जरी असले तरी देखील ते दिसत नाही.
भारतात आता CNG गॅस वर चालणारी वाहने ही जास्त निर्माण होत आहेत कारण पेट्रोल डिझेलच्या किमती या गगनाला भिडल्या आहेत. या किमती तुम्ही पाहिल्या आणि CNG ची किंमत पाहिली तर तुम्हाला CNG वाहन घ्यावे असे वाटेल.
CNG च्या सध्या ऑक्टोबर 2021 महिन्यात किमती या 65 च्या आसपास आहेत. तुमची गाडी पेट्रोल आणि डिझेलपेक्षा सीएनजी वापरल्याने जास्त मायलेज देखील देईल.
1930 च्या सुमारास या CNG चा वापर गाड्यांमध्ये पहिल्यांदा यशस्वीपणे केला गेला. या गॅसचे वैशिष्ट्य म्हणजे हा गॅस पूर्णपणे रंगहीन असतो. वातावरणातील हवेच्या पेक्षा हा CNG गॅस 40% अधिक हलका असतो.
तुम्हाला जर हे सगळं ऐकून जुन्या डिझेल किंवा पेट्रोल गाडीमध्ये CNG किट बसवावी असे वाटत असेल तर तुम्हाला ते पर्याय देखील शासनाने उपलब्ध करून दिलेले आहेत.
CNG गॅस विषयी इतिहास
CNG गॅस विषयी फुल फॉर्म हा हमखास अनेक स्पर्धा परीक्षांसाठी विचारलेला असतो. आता आपण या CNG गॅस चा शोध कोणी लावला याविषयी जाणून घेऊयात.
अमेरिकन वैज्ञानिक विल्यम हर्ट यांनी CNG गॅसचा शोध लावला. 1626 मध्ये त्यांनी निसर्गाचा बिघडत चाललेला समतोल लक्षात घेता आपण कशा प्रकारे वातावरण शुद्ध ठेवू शकतो याविषयी विचार करत असताना हा शोध लावला.
इ स 1800 मध्ये अमेरिकेत याचा वापर होऊ लागला मात्र दुसऱ्या महायुद्धानंतर सर्व जगभरात CNG वापरला जाऊ लागला.
CNG Gas कसा तयार होतो?
CNG हा गॅस तुम्हाला नैसर्गिक रित्या जमिनीत मिळतो. या गॅस ला बाहेर काढण्यासाठी ऑइल डिपॉझिट रिफायनरी चा वापर केला जातो. CNG मध्ये 85% नायट्रोजन ऑक्साईड आणि 70% रिएक्टिव्ह हायड्रोकार्बन असतो. (टक्केवारी ही त्या पदार्थाचे काँसंट्रेशन दर्शविते) जमिनीतून बाहेर येणारा हा Methane CH4 गॅस कॉम्प्रेस करून एका सिलेंडर मध्ये 20-25 MPa दाबावर भरला जातो. CNG गॅस हा मुख्यतः 3 गॅसचे मिश्रण असतो. यात Methane CH4 चे प्रमाण हे सर्वात जास्त असते व त्याचा सोबतीला Propen आणि Ethane गॅस देखील असतात.
CNG गॅसचे फायदे
1 CNG हा पेट्रोल पेक्षा स्वस्त आहे.
2 CNG बसविलेल्या गाड्या या पेट्रोल गाडीपेक्षा जास्त मायलेज देतात आणि पेट्रोल पेक्षा CNG स्वस्त देखील आहे.
3 पेट्रोल गाडीने खूप जास्त प्रमाणात प्रदूषण होते मात्र CNG ने खूप कमी प्रमाणात प्रदूषण हे होत असते आणि त्यामुळेच सरकार देखील CNG वापराला चालना देत आहे.
4 पेट्रोल गाडीत इंजिनचा आवाज आणि कंपन जाणवते मात्र CNG गाडीमध्ये ते खूप कमी किंवा जाणवतच नाही.
5 CNG हा गॅस जरी असला तरी तो ज्वलनशील नाही. त्यामुळे CNG असलेली गाडी पेट घेत नाही.
6 पेट्रोल मध्ये भेसळ ही करता येते मात्र CNG मध्ये कुठल्याही प्रकारे भेसळ करता येत नाही.
CNG गॅसचे नुकसान/ तोटे
1 CNG गाडी ही पेट्रोल गाडीपेक्षा कमी पिकअप घेते आणि त्यामुळे पिकअप आणि परफॉर्मन्स विषयी समस्याच या गाडीमध्ये येऊ शकतात.
2 तुम्हाला CNG किट बसविण्यासाठी 30 ते 40 हजार रुपये लागतात मात्र जर तुमच्या गाडीचा दररोजचा प्रवास हा खूप कमी असेल तर मात्र तुम्हाला पेट्रोलचा वापर योग्य ठरेल.
3 अजूनही भारतात CNG स्टेशन कमी आहेत मात्र गाड्यांची संख्या वाढलेली आहे. त्यामुळे तुम्हाला स्टेशनवर जास्त वेळ रांगेत उभे राहावे लागू शकते.
4 CNG गाडीमध्ये एक्झॉस्ट व्हॉल्व्ह खराब लवकर होतात.
5 गाडीमध्ये CNG किट टाकल्यानंतर गाडीच्या डिक्किचा स्पेस कमी होतो.
6 गाडीतील इंजिन ऑइल आणि एअर फिल्टर हे वेळोवेळी बदलावे लागते.
CNG Car vs Petrol Car: कोणती योग्य असेल?
तुम्ही गाडी घेत असताना कोणते इंधन असलेली घ्यावी याविषयी संभ्रमात असाल तर हा मुद्दा तुमची मदत नक्की करेल. तुम्हाला कोणती गाडी घ्यावी याविषयी सल्ला देताना तुमची गाडी दिवसाला किती किलोमीटर फिरणार आहे हे सर्वात जास्त महत्वाचे आहे. तुमच्या गाडीचा दिवसाचा प्रवास हा 40 किलोमीटरच्या आत असेल तर तुम्ही पेट्रोल गाडीसोबत जावे. यासाठी तुम्ही डिझेल कार सोबत देखील जाऊ शकता.
यापलीकडे जर तुमचा दिवसाला रन होत असेल तर कधीही CNG किट बसविणे योग्य ठरेल. परंतु तुमच्या परिसरात CNG स्टेशन किती आहेत याविषयी देखील तुम्ही आधी जाणून घ्यायला हवे. अन्यथा CNG गॅस भरण्यासाठी मोठ्या रांगेत उभे राहण्याची वेळ येऊ शकते.
आज आपण CNG चा फुल फॉर्म आणि त्यासोबत CNG विषयी अधिक माहिती जाणून घेतली. आता CNG चे फायदे आणि तोटे बघून तुम्हाला ठरवायचे आहे की तुम्हाला CNG गाडी घेणे योग्य ठरेल किंवा नाही!