Facebook चे नवीन नाव काय असेल? || Facebook New Name Revealed
Facebook Name Change
तुम्ही मागील 17 वर्षांपासून ज्या फेसबुक app चा वापर करता आहात, ज्यावर तुमच्या असंख्य आठवणी जोडलेल्या आहेत त्या फेसबुक अँप चे नाव आता बदलणार आहे, अशा चर्चा सर्वत्र सुरू आहेत. फेसबुक चे नाव बदलले जाणार असून ते नाव काय असू शकते याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. याशिवाय मार्क झुकरबर्ग हे फेसबुकचे मालक असून ते फेसबुकचे नाव का बदलू इच्छित आहेत? याविषयी देखील जाणून घेऊयात.
फेसबुक हे नाव सोशल मीडिया मध्ये सर्वात आधी घेतले जाते. एखाद्याला तुम्ही सोशल मीडिया ऍप्स ची नावे विचारली तर त्यांच्या तोंडातून फेसबुक हे आधी बाहेर येते. जे 90's चे युवा आहेत त्यांना फेसबुक हे सर्वात आधी माहीत झाले असेल ज्याच्या माध्यमातून तर एकमेकांसोबत जोडले गेले आहेत.
Facebook Name Change का करत आहे?
फेसबुक हे नाव अनेकांच्या मुखावर असताना देखील आज फेसबुक हे नाव बदलण्याविषयी चर्चा होत आहेत. यामागे खरे कारण काय आहे हे जाणण्यासाठी तुम्ही देखील इच्छूक असलाच.
The Verge मध्ये आलेल्या एका रिपोर्ट नुसार Facebook, instagram आणि whatsapp यांच्यातील दुवा तसाच ठेवण्यासाठी एक नवीन नावाने कंपनी बनविली जात आहे. या कंपनीचा हेतू हा पूर्णपणे काहीतरी वेगळा असणार आहे.
याशिवाय इतरही काही कारण असू शकते. कदाचित मार्क झुकेरबर्ग हे त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुक ला एक मेटावर्स बनवू इच्छित असतील. आता हे मेटावर्स म्हणजे नक्की काय असते याविषयी देखील आपण माहिती जाणून घेऊयात.
मेटावर्स म्हणजे नक्की काय?
मेटावर्स म्हणजे हे एक असे व्हर्च्युअल इन्व्हायरमेंट असेल ज्यामध्ये जगभरातील लोक एकमेकांशी संवाद साधू शकतील. हे एक वेगळ्या प्रकारचे आभासी विश्व असेल. यासाठी AR आणि AI यांचा वापर केला जात आहे. इथे असणारे विश्व हे पूर्णपणे आपल्या दैनंदिन जीवनासारखेच बनविण्याचा प्रयत्न केला जातो आहे.
मार्क झुकेरबर्ग यांनी मेटावर्स प्रोजेक्ट साठी 10 हजार लोकांची एक टीम देखील बनविलेली आहे. त्यामुळे फेसबुकला मेटावर्स बनविले जाते की दुसरे काही APP बनविले जाते याविषयी अजून माहिती उपलब्ध नाही.
Facebook चे नवीन नाव काय असू शकते?
आतापर्यंत याविषयी कोणत्याही प्रकारे खात्री झालेली नाहीये मात्र काही अंदाज बांधण्यात आले आहेत त्यानुसार आम्ही आपल्याला फेसबुकचे नवीन नाव काय असेल याविषयी सांगतो आहोत. 28 ऑक्टोबर 2021 रोजी फेसबुक एक वार्षिक सभा घेणार आहे आणि यामध्ये फेसबुक कडून या नावाविषयी किंवा app मध्ये होणाऱ्या बदलांविषयी माहिती समोर येऊ शकते.
काही काळापूर्वी फेसबुक गेमिंग हे नाव बदलून Horizon Gaming असे करण्यात आले. त्यामुळे फेसबुक ऐवजी Horizon हे नाव देखील आपल्याला बघायला मिळू शकते. याशिवाय AR आणि AI यांच्यामुळे या APP चे नाव मेटावर्स असू शकते असाही अंदाज बांधला जातो आहे.
तुम्हाला काय वाटते, फेसबुकचे नवीन नाव काय असेल? आम्हाला नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा जेणेकरून आम्हाला देखील अधिक माहिती होईल.