सब्जाचे आरोग्यदायी फायदे || Health Benefits of Sweat Basil Seeds in Marathi

सब्जाचे आरोग्यदायी फायदे || Health Benefits of Sweat Basil Seeds in Marathi

उन्हाळ्यात आपली शरीराची होणारी दाह थांबविण्यासाठी आपण कधी फालुदा तर कधी सरबत सेवन करत असतो. या दोन्ही खाद्य पेयांमध्ये सब्जा या वनस्पतीचा वापर केलेला असतो. या सब्जाचे आपल्या शरीराला अनेक फायदे होऊ शकतात. याच फायद्यांविषयी आज आपण जाणून घेणार आहोत.

सब्जाचे आरोग्यदायी फायदे || Health Benefits of Sweat Basil Seeds in Marathi

आपण आज सब्जा म्हणजेच Sweat Basil Seeds या वनस्पतीचे शरीराला होणारे फायदे जाणून घेणार आहोत.

सब्जामध्ये अँटी ऑक्सिडन्ट, अँटी इंफ्लेमेट्री, अँटी बॅक्टरीअल आणि अँटी कँसर गुणधर्म आहेत. त्यामुळे सब्जाचा आपल्या आहारात नियमित वापर हा असणे गरजेचे आहे.

सब्जामधील अँटी इंफ्लेमेट्री प्रॉपर्टी मुळे आपल्या आतड्यांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. पचन संस्थेच्या अनेक तक्रारी जसे अपचन, गॅसेस, ऍसिडिटी, अल्सर, मलावरोध, मूळव्याधी यावर सब्जा अत्यंत परिणामकारक आहे. 

सब्जाचा वापर आहारात असेल तर आपले मेटाबॉलिझम सुधारण्यास मदत होते. सब्जामध्ये प्रोटीन आणि फायबर्स चे प्रमाण चांगले असते. सब्जाचा वापर केल्याने वजन नियंत्रणात राहते. 

जेवणाच्या अर्ध्या तास आधी लिंबू पाण्यामधून एक चमचा सब्जा दिवसातून 2 ते 3 वेळा घ्यावे. याने पोट भरल्यासारखे वाटेल आणि आपण जास्त खाणार नाही. यामुळे आपले जेवणावर आणि परिणामतः वजनावर नियंत्रण राहील. 

सब्जाच्या बियांमध्ये प्रोटीन, आयर्न आणि व्हिटॅमिन के चे प्रमाण खूप चांगले आहे. याचा फायदा केसांना होऊन त्यांची मुळे खूप मजबूत होतात. केसांचे गळणे थांबून यातून केसांची वाढ चांगली होते. केस दाट आणि काळेभोर होतात. 

अँटी ऑक्सिडन्ट प्रॉपर्टी असल्यामुळे याचा फायदा त्वचेवरील डेड सेल निघून जाण्यास होतो. याशिवाय नवीन त्वचेचे सेल्स देखीक तयार होण्यास मदत मिळते. अनेक त्वचाविकार मुळापासून नष्ट करण्यासाठी सब्जा अतिशय गुणकारी आहे.

सब्जामध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियम चांगल्या प्रमाणात असल्याने हाड मजबूत होण्यास आणि स्नायूंचे आरोग्य राखण्यास मदत मिळते. आपल्या शरीरात कॅल्शियमची कमतरता होत नाही. यामध्ये आयर्न (लोहाचे) प्रमाण खूप चांगले आहे. त्यामुळे अनेमिया, शरीरातील रक्त कमी होणे असे त्रास आपल्याला होत नाहीत. 

सब्जाच्या नियमित सेवनाने रोगप्रतिकारक शक्ती वाढते. त्यामुळे सर्दी खोकला आणि अस्थमा सारखे त्रास आपल्याला होत नाहीत. रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी सब्जा हा गुणकारी आहे. डायबेटीज सारख्या आजारावर सब्जा परिणामकारक आहे.

यासोबत कॅन्सर, हृदयविकार, हाय ब्लड प्रेशर, हाय कोलेस्ट्रॉल या आजारांसाठी सब्जाचे सेवन परिणामकारक ठरते. सब्जा खाल्ल्याने शरीराला थंडावा मिळतो. तुम्हाला जर उष्णतेसंबंधी विकार असतील तर सब्जा अत्यंत परिणामकारक ठरतो. अंगावर पिंपल्स येणे, पित्त उठणे, घामोळ्या, हातापायांची आग होणे, लघवीच्या जागेवर आग होणे, लघवी थेंब थेंब होणे, डोकेदुखी, मायग्रेन, निद्रानाश अशा अनेक उष्णतेच्या विकारांवर ते परिणामकारक आहे. 

सब्जाच्या सेवनाने तुमचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुस्थितीत राहते. त्यामुळे नियमित आपल्या आहारात सब्जाचा समावेश करा जेणेकरून तुमचे आरोग्य सुस्थितीत राहील.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने