कोथिंबिरीचे आरोग्यासाठी लाभ || Health Benefits of Coriander in Marathi

कोथिंबिरीचे आरोग्यासाठी लाभ || Health Benefits of Coriander in Marathi

आपण आपल्या रोजच्या जेवणात वापरत असलेली कोथंबीर आपल्या आरोग्यासाठी किती उपयुक्त आहे याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. आज आपण कोथंबीरीचे काय औषधी गुणधर्म आहेत याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

कोथिंबिरीचे आरोग्यासाठी लाभ || Health Benefits of Coriander in Marathi

कोथिंबीर या वनस्पतीच्या पानांमध्ये, देठामध्ये, मुळामध्ये आणि बियांमध्ये भरपूर पोषकतत्वे आहेत. यामध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी 1, व्हिटॅमिन बी 2, व्हिटॅमिन बी 9, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन के, आयर्न, कॅल्शियम, फॉस्फरस, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि प्रोटीन असते. इतके सर्व घटक या कोथिंबिरीमध्ये असल्याने अनेक आजारांपासून आपले रक्षण देखील होते.

कोथिंबिरीत अँटी ऑक्सिडंट्सचे प्रमाण चांगले असल्याने आपल्या पेशींचे फ्री रेदीकल्स पासून रक्षण होते. पेशींचे आरोग्य चांगले राहिल्याने आपली रोग प्रतिकारशक्ती वाढते. आपल्या आरोग्याला याचा भरपूर फायदा होतो.

कोथिंबीर पचनसंस्थेच्या अनेक विकारांवर प्रभावी ठरते. जर अपचन, पोटदुखी, पोटात गॅसेस होणे, मूळव्याधी, आव पडणं, जंत होणे, जुलाब किंवा टायफॉईड असे पोटाचे कोणतेही विकार जर तुम्हाला होत असतील तर ताकासोबत कोथंबीरीचा दोन चमचे रस घ्यावा. याशिवाय कोथिंबीर पाण्यात उकळून त्याला एक उकळी देऊन ते पाणी सेवन केले तरी याचा फायदा होईल. 

पित्ताचे ऍसिडिटी, डोकेदुखी, उलटी, ताप किंवा लघवी साफ न होणे या आजारांवर कोथिंबिरीच्या बिया म्हणजेच धने फायदेशीर ठरतात. घरात तुम्ही 1 भाग धन्याची पूड आणि 2 भाग खडीसाखर यांचे मिश्रण करून ठेवू शकता. हे मिश्रण जेव्हा पित्ताचे त्रास होतील तेव्हा कोमट पाण्यासोबत घ्यावे. याचा फायदा लगेच आपल्याला दिसतो आणि आपला त्रास कमी होतो.

वजन कमी करण्यासाठी सुद्धा कोथिंबीर अत्यंत परिणामकारक ठरते. कोथिंबिरीच्या सेवनाने मेटाबॉलिझम सुधारते, कोलेस्ट्रॉल कमी होऊन वजन कमी होण्यास मदत होते. यासाठी आपण रोज सकाळी कोथिंबिरीचे एक ते दीड कप पान, मूळ, देठ म्हणजे संपूर्ण कोथिंबीरीचा रस घेतला पाहिजे. 

मासिकपाळीच्या अनेक त्रासांवर म्हणजेच यात पोटदुखी, अनियमित पाळी, अंगावरून स्त्राव जास्त जाणे यावर देखील कोथिंबीर परिणामकारक ठरते. एक चमचा धने अर्ध्या लिटर पाण्यात घालून ते पाणी उकळून अर्धे करावे. या पाण्याचे सेवन मासिकपाळीच्या आजारांवर उपयुक्त ठरते. 

कोथिंबिरीच्या सेवनाने आपल्या शरीरातील हार्मफुल असणारे घटक बाहेर टाकले जातात. यामुळे मूत्रपिंड आणि यकृत यांचे कार्य सुधारते. आपल्या बॉडीला क्लीन ठेवण्यासाठी कोथिंबीर आपल्या आहारात असावी.

गरम मसाला किंवा सजावट आणि सुप्स मध्ये कोथिंबीर टाकून वापरता येते. कोथिंबीर चिरल्याने तिचे गुणधर्म पाण्यात सहज मिसळतात. कोथिंबीर चिरून पाण्यात घालून तिला उकळी द्यावी. हे पाणी तुम्ही सेवन करु शकता किंवा जेवण बनवायला हे पाणी वापरता येते. 

आरोग्य उत्तम ठेवायचे असेल तर कोथिंबीरीचा समावेश आपल्या जेवणात असणे गरजेचे आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने