धूम्रपानाचे शरीरावर होणारे दुष्परिणाम | Adverse Effects of Smoking on body in Marathi
सध्याच्या काळात तरुण पिढीमध्ये स्मोकिंग म्हणजेच धुम्रपानाचे प्रमाण वाढत आहे. या सोबत दारू सेवन करण्याचे प्रमाण वाढत आहे. धुम्रपानाचे शरीरावर अनेक दुष्परिणाम होतात आणि याच विषयी आज आपण या लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.
धूम्रपान केल्याने श्वसनाचे आजार होतात. आपल्या फुफुसांवर याचा परीणाम होऊन आपल्याला अनेक व्याधी जडतात.
हे सर्व नॉर्मल स्मोकिंग ने होणारे आजार आहेत मात्र जर तुम्हाला चेन स्मोकिंगची सवय असेल तर मग मात्र त्यातून हाड ठिसूळ होणे, इरिटेशन होणे, कॅन्सरचा धोका वाढणे, इत्यादी आजार होतातव्यसन कुठलेही चांगले नाहीये मात्र जरी आपण धुम्रपान कमी प्रमाणात करत असू तर महिलांना अनेक त्रास सुरू होतात. यामध्ये महिलांना मासिक पाळीच्या वेळी त्रास होणे, हार्मोनल संतुलन बिघडणे या समस्या जाणवतात. स्मोकिंग केल्याने गर्भधारणा क्षमता कमी होते किंवा अधिक किचकट बनते. महिलांना गर्भधारणा झालीच आणि त्यांची धुम्रपानाची सवय तशीच राहिली तर मात्र होणाऱ्या बाळावर त्याचे वाईट दुष्परिणाम होतात. गर्भधारणा झाल्यानंतर स्मोकिंग पूर्णपणे बंद असले पाहिजे कारण स्मोकिंग केल्याने रक्तवाहिन्यांचे आकुंचन होते. यामुळे बाळाला अन्न आणि रक्ताचा पुरवठा योग्य प्रकारे होत नाही. यामुळे बाळाची वाढ योग्य प्रमाणे होत नाही आणि कदाचित पहिल्या काही महिन्यात बाळाचे अबोर्शन होऊ शकते.
स्मोकिंग केल्याने महिलांच्या आरोग्यावर परिणाम होतोच मात्र त्यासोबत त्या बाळाचे आयुष्य देखील संपू शकते. बाळाच्या वाढीवर मोठ्या प्रमाणात परिणाम स्मोकिंग मुले होतो. बाळ योग्य प्रकारे न वाढणे ही स्मोकिंग मुळे उद्भवनारी समस्या आहे.
आपल्या आयुष्यात स्मोकिंग खूप काही वाईट घडवू शकते.
आता या समस्येवर उपाय काय? हाच तुमचा प्रश्न असेल तर याचे उत्तर म्हणजे स्मोकिंग बंद करणे होय. कोणतेही व्यसन हे चांगले कधीच नाहीये. तुम्हाला बाळासाठी आणि स्वतःच्या आरोग्यासाठी स्मोकिंग सोडावीच लागेल. मानसिक तयारी असणे ही सर्वात जमेची बाजू यामध्ये ठरेल.
अनेक समुपदेशन प्रोग्रॅम असतात. त्यामध्ये सहभागी होऊन तुम्ही या समस्येतून सुटका मिळवू शकता.