वाशिम जिल्ह्याची संपूर्ण माहिती | Washim District Information in Marathi
विदर्भातील एक महत्वाचा जिल्हा म्हणजे वाशिम जिल्हा!
वाशिम जिल्ह्याचा इतिहास - History of Washim District
इ स पूर्व 300 पासून इथे सातवाहन राजघराण्याची सत्ता होती. पुढे जाऊन वाशिम चा उल्लेख हा वाकाटकांची राजधानी होती. वत्स ऋषींची ही तपोभूमी होती. वाशिम शहराचे प्राचीन नाव वत्सगुल्म असे होते. या ठिकाणी पुढे जाऊन चालुक्य आणि त्यानंतर यादवांची सत्ता आली. वाशिम जिल्ह्याला इतिहासात खूप महत्व होते कारण त्याकाळात निजामाची टाकसाळ ही वाशिम जिल्ह्यातच होती. इंग्रजांच्या काळात वऱ्हाड हा मुलुख ताब्यात आल्यावर त्यांनी वाशिमला जिल्ह्याचे ठिकाण बनविले.
जिल्हा- वाशिम
मुख्यालय- वाशिम
क्षेत्रफळ- 5,196 चौ किलोमीटर
महाराष्ट्रातील जिल्ह्याच्या 1905 मध्ये झालेल्या पुनर्रचनेत हा भाग अकोला जिल्ह्यात गेला. स्वातंत्र्योत्तर काळात 1 जुलै 1998 मध्ये हा जिल्हा अकोला जिल्ह्याचे विभाजन झाले आणि मग वाशिम या नवीन जिल्ह्याची निर्मिती झाली.
वाशिम जिल्ह्याची भौगोलिक माहिती - Geographical Information about Washim District
वाशिम जिल्ह्याला अमरावती, यवतमाळ, हिंगोली, बुलढाणा आणि अकोला या जिल्ह्यांच्या सीमा लागलेल्या आहेत. वाशिम जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ हे 5,196 चौरस किलोमीटर इतके आहे.
वाशिम जिल्ह्यात एकूण 6 तालुके आहेत. यामध्ये कारंजा, मंगळूरपीर, मानोरा, मालेगाव, रिसोड आणि वाशिम यांचा समावेश आहे. 2011 च्या जनगणनेच्या अनुसार येथील लोकसंख्या 12 लाख 97 हजार 160 इतकी आहे.
वाशिम जिल्ह्यातील नद्या व धरणे - Rivers and Dams in Washim District
पैनगंगा नदी, कास नदी, अरुणावती नदी, बेंबळा नदी, अराण नदी आणि काटेपूर्णा नदी या काही या जिल्ह्यातील महत्वाच्या नद्या आहेत. वाशिम जिल्ह्यात एकूण 4 धरणे आहेत. यात एकबुर्जी धरण, अदण धरण, अडोल धरण, सोनल धरण आणि वाठोड जलाशय यांचा समावेश होतो. वाशिम जिल्ह्यात गणेशपुर, उमरी, सावरगाव, बोरगाव, कळंबा, चिखली, रिसोड, धानोरा हे काही तलाव देखील आहेत.
वाशिम जिल्ह्यातील हवामान हे उन्हाळ्यात उष्ण व कोरडे असते तर हिवाळ्यात थंड असते.
वाशिम जिल्ह्यातील शेती - Crops in Washim District
वाशिम जिल्ह्यात सोयाबीन, गहू, ज्वारी, बाजरी, तूर, कापूस, ऊस आणि हळद ही महत्वाची पिके आहेत. काही भागात आपल्याला काळी सुपीक मृदा आढळून येते. जिथे डोंगरी भाग आहे किंवा पठारी भागा आहे तिथे मात्र मध्यम प्रतिची मृदा आढळते.
वाशिम जिल्ह्यात काटे पूर्णा वन्यजीव अभयारण्य आणि कारंजा सोहोल वन्यजीव अभयारण्य आहेत.
वाशिम जिल्ह्यातील शिक्षण सुविधा - Education in Washim District
वाशिम जिल्हा शालेय आणि उच्च शिक्षण संस्थांच्या बाबतीत देखील प्रसिद्ध आहे. वाशिम येथे शासकीय पॉलिटेक्निक कॉलेज, विदर्भ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी कॉलेज, प्रताप व्यवस्थापन व तंत्रज्ञान संस्था, आदर्श शिक्षण संस्था, माँ वैष्णवी नावाने पॉलिटेक्निक, फार्मसी कॉलेज, नाजरेन नर्सिंग प्रशिक्षण महाविद्यालय, श्री नरसिंह सरस्वती वेड विद्यालय- कारंजा, रिसॉड कॉलेज ऑफ ऍग्रीकल्चर- रिसोड, महिला उत्कर्ष प्रतिष्ठान इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी- देगाव हे काही महत्वाच्या शैक्षणिक संस्था आणि संकुल आहेत.
वाशिम जिल्ह्यातील धार्मिक स्थळे - Temples in Washim District
श्री संत अमरदास बाबा मंदिर ऋषीवट (रिसोड)
श्री अमरदास बाबा यांना योगी आणि शिवस्वरूप मानले जाते. जवळपास 50 वर्षे त्यांनी निरंतर साधना केली. दूरवरून अनेक भाविक भक्त आशीर्वाद घेण्यासाठी इथे येतात. 1958 मध्ये भक्तांनी भव्य असे मंदिर उभारले आहे. इथे दररोज अन्नदान केले जाते.
श्री नृसिंह सरस्वती मंदिर (कारंजा)
वाशिम या जिल्ह्याच्या ठिकाणापासून 70 किलोमीटर अंतरावर करंज ऋषींच्या पवित्र कार्याने पुनित झालेली कारंज नगरी भगवान दत्तात्रयांचा दुसरा अवतार असणाऱ्या श्री नृसिंह सरस्वतीचे जन्मस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. या ठिकाणी नृसिंह सरस्वती स्वामी महाराज हे शके 1300 च्या सुमारास जन्मास आले.
श्री आप्पा स्वामी मंदिर (रिसोड)
रिसोड या शहराच्या पश्चिमेला हे श्री अप्पा स्वामी संस्थांना आहे. या ठिकाणी महाराजांची संजीवन समाधी आहे.
श्री पिंगलाक्षी देवी (रिसोड)
वाशिम पासून 44 किलोमीटर अंतरावर रिसोड म्हणजेच ऋषिवट येथे श्री पिंगलाक्षी देवीचे सुंदर मंदिर आहे. एका तळ्याच्या शेजारी हे मंदिर आहे. तांदळा स्वरूपात असलेली ही देवी भक्तांच्या नवसाला पावते असे हे भक्त सांगतात.
श्री क्षेत्र पोहरादेवी (मानोरा)
मानोरा तालुक्यात श्री क्षेत्र पोहरादेवी हे ठिकाण बंजारा समाज बांधवांसाठी काशी म्हणून प्रसिद्ध आहे. इथे जगद्गुरू संत सेवालाल महाराज यांचे समाधीस्थळ आहे. सेवालाल महाराज हे बंजारा समाजाचे आराध्य दैवत आहेत. इथेच संत बाबूलाल महाराजांचे समाधीस्थळ आहे.
श्री चामुंडा देवी (वाशिम)
वाशिमची ग्रामदेवी आणि या लोकांची कुलस्वामिनी ही चामुंडा देवी आहे. चंड-मुंड या दोन राक्षसांचा वध करण्यासाठी चामुंडा देवीने येथे अवतार घेतला.
श्री गणपती मंदिर -नवसाचा गणपती (हिवरा)
गणपती बाप्पा आणि पार्वती माता यांचे एकाच ठिकाणी असलेले हे एकमेव मंदिर आहे.
श्री मध्यमेश्वर मंदिर (वाशिम)
असे म्हणतात की या ठिकाणी पौराणिक काळी वेधशाळा होती. वेदांग ज्योतिषाकरता श्रीलंका ते मेरूपर्वत पर्यंत एक रेषा कल्पकतेने आखलेली होती. त्याच्या अगदी मध्यभागी ऋषींनी मध्यमेश्वराची स्थापना केली. या ठिकाणी मध्यमेश्वराचे खूप मोठे शिवालय होते. मुघली आक्रमणात मंदिर नष्ट झाले. काही वर्षांपूर्वी इथे उत्खनन केले असता नक्षीकाम केलेले शिल्प मोठ्या प्रमाणात इथे सापडले. 1961 साली इथे श्री मध्यमेश्वराची पुन्हा स्थापना करण्यात आली.
श्री बालाजी मंदिर (वाशीम)
वाशिम करांचे हे ग्रामदैवत आहे. भोसल्यांचे सरदार सरसेनापती दिवाण भवानी काळू यांनी 22 ऑगस्ट 1783 मध्ये इथे बालाजी देवाची प्राणप्रतिष्ठापना केली.
या काही मुख्य ठिकानासोबत अनेक धार्मिक ठिकाणे या जिल्ह्यात आहेत. यात श्री पद्मतीर्थ शिवमंदिर, श्री सखाराम महाराज मंदिर यांचा समावेश होतो.
वाशिम जिल्ह्यातील पर्यटन स्थळे- Tourist Places in Washim District
कारंजा -सोहोळ अभयारण्य-
हे अभयारण्य काळवीट प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे.