परी बनल्या भूत -मराठी परीकथा|| Fairy Becomes Ghost - Marathi Fairy Tails

परी बनल्या भूत -मराठी परीकथा|| Fairy Becomes Ghost - Marathi Fairy Tails

एका शाळेतील शिक्षक त्यांच्या शाळेत शिकणाऱ्या 5 वि मधील मुलांना घेऊन प्रदर्शन दाखवायला गेले. त्या वर्गातील बंटीने पैसे दिले नव्हते त्यामुळे तो काही जाऊ शकला नाही.

बंटी खूप विचार करू लागला. तो देवघरात गेला. तो देवाकडे प्रार्थना करू लागला. बंटी देवाला म्हणाला "देवा मला आत्ताच प्रदर्शनात घेऊन चल!"  

परी बनल्या भूत -मराठी परीकथा|| Fairy Becomes Ghost - Marathi Fairy Tails

मराठी परीकथा - Marathi Fairy Tails

देवाने बंटीने ऐकले. त्याच्या समोर दोन परी येऊन उभ्या राहिल्या. त्यांनी बंटीला त्यांच्या पंखांवर बसवले. बंटीला घेऊन त्या प्रदर्शनात गेल्या. प्रदर्शनात बंटी त्याच्या मित्रांसोबत खूप खेळला. 

संध्याकाळी परीनं त्याला त्याच्या घरी सोडवले. त्या जायला निघाल्या तेव्हाच बंटी रडायला लागला. बंटी म्हणाला, "मला अस सोडून नका ना जाऊ!" त्या परीनं देवाकडून परवानगी घेतली. त्या बंटी सोबतच राहू लागल्या. 

रोज संध्याकाळी बंटी त्यांच्यासोबत खेळत असे. एके दिवशी अभ्यास करत असताना बंटीच्या पोटात अचानक दुखायला लागले. त्याचे त्या दिवशी अभ्यासात लक्षच लागत नव्हते. 

दुसऱ्या दिवशी शिक्षक त्याची वही तपासत होते. बंटीने काल अभ्यास तर पूर्ण केला नव्हता परंतु शिक्षकांना दिसले की त्याचा अभ्यास पूर्ण झालेला आहे. बंटी विचारात पडला की त्याचा अभ्यास कोणी पूर्ण केला असेल?

घरी गेल्यावर त्याने परीना विचारले तेव्हाच त्यांनी अभ्यास पूर्ण केला असे सांगितले. त्या परी बंटीला मदत करायच्या. त्याला भेटवस्तू देखील भेट द्यायच्या.  

एके दिवशी बंटी आणि त्या परी शाळेतून घरी येत होत्या. त्यांना रस्त्यात एक गरीब म्हातारा माणूस पडलेला दिसला. हे सर्व पाहून बंटी जोरात हसला. बंटीला हसताना पाहून तो म्हातारा माणूस बंटीवर रागावला. 

बंटी घरी आला. त्याने परीना त्याच्या शाळेचा गृहपाठ करायला सांगितला. परीने त्याचा गृहपाठ न करता त्याच्या वहिवर शाई ओतली.  बंटीने काही बघितले नाही. त्याला वाटले परीने अभ्यास पूर्ण केला असेल म्हणून त्याने वही तशीच बॅगेत ठेवली. 

बंटी दुसऱ्या दिवशी शाळेत गेला. शिक्षकांना गृहपाठ दाखवत असताना बंटी आश्चर्यचकित झाला. त्याच्या वहीत शाई सांडलेली होती. त्याला वाटले की शाई बघून आता शिक्षक मारणार म्हणून तो परीना म्हणाला, "तुम्ही असे का केले?"

यावर परी म्हणाली की, "आतापासून आम्ही परी नसणार आहोत, आम्ही भूत आहोत. तुला त्रास देणार आहोत." यावर बंटी त्यांना विचारतो, "तुम्ही तर परी होता ना मग अचानक भूत कशा झालात?" 

परी म्हणाल्या, "काल तू रस्त्यावर पडलेल्या म्हाताऱ्या माणसावर हसलास ना? त्यांनी आम्हाला भुर बनवलं." असे बोलून त्या दोघी परी गायब झाल्या. भूत बनून त्या बंटीला त्रास देऊ लागल्या.

त्याला कळू न देता त्या बंटीच्या वह्या घ्यायच्या आणि त्याचा गृहपाठ खोडून टाकायच्या. बंटी खेळत असताना त्या मुद्दाम त्याला पाडायच्या.

बंटी या गोष्टींमुळे रोज रडायचा. बंटीला कळत नव्हते की या भुतांपासून सुटका कशी करायची? बंटी यातून बाहेर पडण्यासाठी देवघरात देवाची प्रार्थना करायला गेला. 

देव बंटीला म्हणाले, "तो म्हातारा रस्त्यावर पडलेला बघून तू त्याच्यावर हसलास. तू त्या म्हाताऱ्या माणसाकडे जाऊन माफी मगितलीस तर ते भूत पुन्हा परी होतील." देव हे बोलून गायब झाले.

बंटी लगेच त्या म्हाताऱ्या माणसाकडे गेला. बंटीने त्या म्हाताऱ्या माणसाची माफी मागितली. म्हाताऱ्या माणसाने त्याला माफ केले. भूत झालेल्या परी पुन्हा एकदा परी बनल्या. तेव्हापासून बंटी मोठ्या माणसांचा आदर करू लागला. तो आनंदात राहू लागला!

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने