सॉफ्टवेअर डेव्हलपर कसे बनतात? | Learn Software Development Online

सॉफ्टवेअर डेव्हलपर कसे बनतात? | Learn Software Development Online

एका रिपोर्ट नुसार बघितले तर 2019 ते 2029 या काळात सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट वाढणार आहे. जॉब च्या दृष्टीकोनातून ही गोष्ट खूप जास्त चांगली आहे. जॉब करायचा नसेल तर फ्रीलांसिंग मध्ये तुम्हाला सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून $250 प्रति तास ते $800 प्रति तास इतकी किंमत सहज मिळू शकते. जर तुम्ही या क्षेत्रात आपले करियर करू इच्छित असाल आणि तुम्हाला सॉफ्टवेअर डेव्हलपर बनायचे असेल तर तुमच्यासाठी या लेखाच्या माध्यमातून आम्ही खूप सारी माहिती आणि 3 मोफत सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट शिकविणारे कोर्स देखील घेऊन आलो आहोत.

सॉफ्टवेअर डेव्हलपर कसे बनतात? | Learn Software Development Online

आपण जे फ्री मिळणारे कोर्स आज बघणार आहोत ते गुगल वर उपलब्ध असणारे फ्री कोर्सेस पैकी उत्तम कोर्स आहेत. याशिवाय आज आम्ही या लेखाच्या माध्यमातून अनेक युट्युब चॅनल देखील सांगितले आहेत ज्यांच्या माध्यमातून तुम्ही सहज बऱ्याच नवनवीन गोष्टी देखील शिकू शकता.

सॉफ्टवेअर डेव्हलपर कसे बनतात? - How to Ne come Software Developer in Marathi?

सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट क्षेत्रात जाण्यासाठी अनेक लोक घाबरतात किंवा क्षेत्रात जाण्याआधी त्यांना वाटते की आपले करियर त्या क्षेत्रात झालेले नाहीये तर आपल्याला ते शक्य होईल का? तुम्हाला एक सांगायला आनंद वाटतो की आता कंपन्या एखाद्या सर्टिफिकेट किंवा डिग्री वर जॉब देत नाहीत कारण आता ते दुय्यम झाले असून तुमच्याकडे काय स्किल्स आहेत हे महत्वाचे बनले आहे. 

एक सर्व्हे नुसार सध्या कंपन्यांची हायरिंग प्रोसेस बदलत आहे आणि त्यातील सर्वात महत्वाचा मुद्दा हा शिकण्यासाठी तो व्यक्ती किती इच्छुक आहे हे बघितले जाते. हायरिंग मॅनेजर हे तुमच्याकडे असणाऱ्या स्किल्स आणि नवीन येणाऱ्या टेक्नॉलॉजी सोबत तुम्ही स्वतःला कसे अपग्रेड करतात हे बघतात.

सॉफ्टवेअर डेव्हलपर कोण असतात? Who is Software Developer?

सॉफ्टवेअर डेव्हलपर हे एखाद्या कंपनीच्या गरजांना जाणून घेऊन त्यांच्यासाठी एखादे सॉफ्टवेअर किंवा application बनवून देत असतो. सॉफ्टवेअर बनवणारे आणि कॉम्प्युटर ज्या ऑपरेटिंग सिस्टम वर काम करत असतात त्यावर काम करणाऱ्या व्यक्तीला सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणले जाते. 

सॉफ्टवेअर डेव्हलपर ला सॉफ्टवेअर बनवत असताना सिस्टम एफिशियनसी कडे लक्ष द्यावे लागते. बनवलेले सॉफ्टवेअर हे युझर फ्रेंडली असले पाहिजे आणि त्याला वेळेनुसार अपडेट देखील केले पाहिजे हे सॉफ्टवेअर डेव्हलपरचे काम असते. त्यामुळेच आज एखाद्या व्यवसायासाठी किंवा कंपनीसाठी सॉफ्टवेअर डेव्हलपर्स हे खुप महत्वाची भूमिका बजावत असतात.

सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट मध्ये देखील अनेक वेगवेगळे भाग असतात जे त्या सॉफ्टवेअर डेव्हलपरला त्याच्या स्किल्स नुसार आणि आवडीनुसार निवडायचे असतात. यात सांगायचे झाले तर खालील वेगवेगळे विभाग येतात,

1 System Developer

2 Front End Developer

3 Back End Developer

4 Android Developer

5 Full Stack Developer

सॉफ्टवेअर डेव्हलपर vs वेब डेव्हलपर

सॉफ्टवेअर डेव्हलपर हे मुख्यतः मोबाईल आणि डेस्कटॉप सॉफ्टवेअर बनवण्यासाठी काम करतात. तर वेब डेव्हलपर हे वेबसाईट आणि वेब अँप्लिकेशन्स बनवतात जे इंटरनेट ब्राउझर मध्ये चालतात. 

सॉफ्टवेअर डेव्हलपर पगार - Salary for Software Developers

सॉफ्टवेअर डेव्हलपर हे त्यांच्या अनुभवानुसार पागर घेतात. सुरुवातीच्या काळात म्हणजेच beginner म्हणून 4 लाख प्रति वर्ष पगार भेटू शकतो. पुढे जाऊन तुमच्या अनुभवानुसार 7 ते 8 लाख प्रति वर्ष सॅलरी मिळू शकते.

सॉफ्टवेअर डेव्हलपर्स साठी लागणाऱ्या स्किल्स 

आता आम्ही ज्या स्किल्स सांगतोय या तुम्ही अनेक लोकांकडून ऐकल्या असतील. अनेक लोक सुरुवात करत असताना या स्किल्स वाचून घाबरून जातात. परंतु तुम्हाला एक सांगू इच्छितो की जगभरातील अनेक सॉफ्टवेअर डेव्हलपर हे स्वशिक्षित आहेत. त्यांची इंजिनीअरिंग जरी झालेली असेल तरी देखील सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट साठी लागणाऱ्या स्किल्स त्यांनी स्वतः शिकून घेतल्या आहेत. तुम्हाला सॉफ्टवेअर डेव्हलपर बनण्यासाठी खालील स्किल्स शिकून घ्याव्या लागतील,

1 Computer Programming and Coding

ही सॉफ्टवेअर डेव्हलपर बनायचे असेल तर सर्वात महत्वाची स्किल आहे. यात तुम्हाला काही महत्वाच्या प्रोग्रामिंग लँग्वेज या चांगल्या प्रकारे आत्मसात करायच्या असतात. Javascript, Python, Java, HTML, CSS, C++, Ruby या काही महत्वाच्या प्रोग्रामिंग लँग्वेज आहेत. या सर्व लँग्वेज मधून Javascript  ही लँग्वेज जास्तीत जास्त वापरली जाते.

2 Data Structures and Algorithms

या स्किल्स मधून तुमची कोडिंग आणि प्रॉब्लेम सॉलव्हींग क्षमता समजून येते. त्यामुळे ही गोष्ट कंपनी हायर करताना त्या व्यक्तीकडून एक्सपेक्ट करत असते. तुम्हाला हे शिकायचे असेल तर याविषयी अनेक गोष्टी सध्या इंटरनेट वर उपलब्ध आहेत. 

3 Operating System Knowledge

4 Testing and Networking Basics

5 Databases

6 Statistics and Mathematics

या काही मुख्य स्किल्स असतात आणि त्याशिवाय काही सॉफ्ट स्किल्स देखील गरजेच्या असतात. यात Logical thinking, Good Communications आणि Problem Solving यांची गरज असते.

स्किल्स डेव्हलप करत असताना यात अनेक छोट्या छोट्या गोष्टी येतात. जेव्हा आपण सुरवात करतो तेव्हाच य काय गरजेचे आहे हे कळायला वेळ लागतो. त्यामुळे काही असे कोर्स आज आम्ही सांगणार आहोत हे तुम्हाला एक सॉफ्टवेअर डेव्हलपर बनण्यासाठी उपयुक्त ठरतील.


सॉफ्टवेअर डेव्हलपर स्किल्ससाठी फ्री 3 कोर्सेस - 3 Free Courses For Software Developer Skills

1 Coursera

Coursera वर तुम्हाला University of Minnesota ही Software Development Lifecycle हा फ्री कोर्स देते. यात तुम्हाला डेव्हलपमेंट साठी लागणारे प्रोसेस आणि मेथड्स विषयी ज्ञान मिळेल. या कोर्सशी निगडित 4 इतर कोर्स ची सिरीज देखील Coursera वर उपलब्ध आहे. 

Course Link: https://www.coursera.org/learn/software-processes

सॉफ्टवेअर डेव्हलपर बनण्यासाठी सुरुवात करायची असेल तर तुम्ही सहज या कोर्सच्या माध्यमातून सुरुवात करू शकता. तुम्हाला यातून अनेक मूलभूत संकल्पना समजून येतील व पुढे जाऊन अधिक काही शिकण्यासाठी देखील मदत होईल.

2 Code Academy

ही कंपनी वेबसाईट आणि सॉफ्टवेअर क्षेत्रात अनेक चांगले कोर्सेस देते. यात तुम्हाला बेसिक प्रोग्रामिंग लँग्वेज जसे की Java, C#, CSS, Python शिकण्यासाठी कोर्सेस मिळतील. तुम्हाला यात app developement आणि testing शी निगडित कोर्सेस देखील बघायला मिळतील. वेबसाईटवर तुम्हाला बेसिक आणि मध्यम लेव्हलचे कोर्स मिळतील. यामध्ये तुम्हाला काही फ्री कोर्स मिळतात तरी देखील जेव्हा काही कोर्स तुम्ही सुरू करता त्याआधी त्याच्याशी लागणारे pre requisite देखील वाचून घेत जा.

Website Link: https://www.codecademy.com/

3 W3Schools

जर तुम्हाला प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये जास्तीत जास्त ज्ञान मिळवायचे असेल तर या वेबसाईटवर कोर्सेस बघू शकतात.  इथे तुम्हाला व्हिडीओ लेक्चर नाही तर टेक्स्ट ग्राफिक्स माध्यमातून शिकायला मिळेल. इथे तुम्हाला सोपी भाषा आणि उदाहरणे आहेत त्यातून शिकणे जास्तीत जास्त सोपे होते.

Try it youself मधून तुम्ही वेबसाईटवरच सगळे काही try करून बघू शकता. इथे सर्व काही फ्री आहे.

Website Link: https://www.w3schools.com/

Youtube Channel for Software Developer Skills

1 Code With Harry

हा युट्युब चॅनल तुम्हाला हिंदी भाषेत सर्व काही माहिती पुरवते. इथे तुम्हाला प्रत्येक प्रोग्रामिंग लँग्वेज शिकायला तर मिळेलच परंतु त्यासोबत नोट्स देखील मिळतात.

2 Gate Smashers

Operating systems, data structures, dbms, discrete mathematics याविषयी तुम्हाला अनेक व्हिडीओ बघायला मिळतील.

 

युट्युब वर तुम्ही सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट विषयी जास्तीत जास्त जाणून घ्या आणि मग तुम्हाला ज्या स्किल्स ची गरज आहे त्या तुम्हाला या ठिकाणी मिळून जातील.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने