Google मध्ये जॉब कसा मिळवतात? 4 Ways to get job in Google LLC (marathi)

Google मध्ये जॉब कसा मिळवतात? 4 Ways to get job in Google LLC (marathi)

गुगल म्हणजे टेक जायंट असे म्हणायला काही हरकत नाही कारण जवळपास मागील 20 वर्षात म्हणजे 2001 पासून गुगलने जवळपास 127 हुन अधिक कंपन्या विकत घेतल्या आहेत. आज आपल्या आयुष्यात गुगलला आणि त्याच्या इतर प्रोडक्ट्सला खूप जास्त महत्वाचे स्थान आहे. आजच्या घडीला प्रत्येक लहान मुलाला देखील माहीत आहे की गुगल काय आहे? 

Google मध्ये जॉब कसा मिळवतात? 4 Ways to get job in Google LLC (marathi)

Google LLC मध्ये जॉब मिळविणे हे प्रत्येक जॉब शोधणाऱ्याचे स्वप्न असते. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की प्रत्येक वर्षी 20 लाखाहून अधिक लोक गुगल कडे जॉबसाठी apply करतात परंतु यातील फक्त 0.2% लोक निवडले जातात. इतर सर्व कंपनी पेक्षा गुगलची Hiering प्रोसेस ही खूप वेगळी आहे. आज आपण जाणून घेणार आहोत गुगल मध्ये जॉब कसा मिळवता येतो? (How to get Job in Google) आणि सर्वात महत्वाचा प्रश्न अनेकांच्या मनात असतो की तुमच्याकडे डिग्री नसेल तरी देखील तुमच्या स्किल्स च्या बेसिस वर गुगल तुम्हाला जॉब देते का? आणि जर देत असेल तर त्याची प्रक्रिया काय आहे? याविषयी सर्व काही माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.

तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की गुगल कधीच रुल्स पाळत नाही. त्यामुळे जेव्हा एखाद्याला जॉब द्यायचा असेल तेव्हाच त्याला hier करत असताना गुगल recrutment rules पाळत नाही. गुगल त्या व्यक्तीनुसार त्याला जॉब देण्यासाठी प्रयत्नशील असते. त्यामुळे तुम्ही जर बघितले तर गुगलचे कर्मचारी हे इतर कंपनीच्या कर्मचार्यांपेक्षा खूप वेगळे असतात. तो प्रत्येक कर्मचारी हा एका कक्षेच्या बाहेर जाऊन विचार करत असतो. त्यांच्याकडे खूप आत्मविश्वास आणि काहीतरी नवीन करण्याची क्षमता असते. 

गुगल हायरिंग टीम ला क्रिएटिव्ह आणि जे लोक आऊट ऑफ द बॉक्स विचार करतात ते खूप आवडतात. तुमच्याकडे एखादी गोष्ट जाणून घेण्याची जिज्ञासा असेल आणि त्यासाठी कष्ट घेण्याची तयारी असेल तर मग मात्र तुम्ही गुगलमध्ये जॉब करण्यासाठी जाऊ शकता.

गुगल मधील वर्क कल्चर हे खूप अप्रतिम असल्याने लोक या कंपनीमध्ये जॉब मिळवू इच्छित असतात. इथे तुम्हाला जास्तीत जास्त पगार तर मिळतोच परंतु त्यासोबत जास्तीत जास्त शिकायला देखील मिळते. फ्री अनलिमिटेड फूड, हॉबी, रिलॅक्स हाऊस, स्विमिंग पूल, एम्प्लॉय डेथ बेनिफिट्स, 12 आठवड्यांची पगारी रजा यासारख्या अनेक कमालीच्या सुविधा गुगल कर्मचाऱ्यांना मिळतात. त्यामुळे इथे काम करणारे लोक हे खूप समाधानी असतात व त्यांचा आनंद देखील सतत दिसून येत असतो.

बिझनेस इंसाईडर नुसार गुगलला अमेरिकेतील एक सर्वात चांगले काम करण्याचे ठिकाण मानले जाते. सर्वात महत्वाचे म्हणजेच दुसरी कोणतीही कंपनी गुगल इतक्या सुविधा तुम्हाला देत नाही आणि त्यामुळे गुगल काम करण्यासाठी एक बेस्ट जागा आहे यात शंकाच नाही.

How to get job at Google?

गुगल ही जगातील सर्वात मोठ्या टेक कंपन्यांच्या यादीत चौथ्या क्रमांकाला येते. गुगल कंपनीचे जगभरात 4.3 बिलियन वापरकर्ते आहेत. फक्त भारतात जवळपास 750 मिलियन गुगल वापरकर्ते आहेत. यावरून गुगल च्या लोकप्रियतेचा अंदाज येतो. यात Gmail, Youtube, Google Map, Google Play Store, Chrome हे सर्व आपल्या दैनंदिन वापरातील apps गुगलचे आहेत. गुगल प्रत्येक वर्षी नवीन नवीन छोटे स्टार्टअप विकत घेत असतो. 

Alphabet हे नाव तुम्ही ऐकले नसेल परंतु ही गुगलची पालक कंपनी आहे. कॅलिफोर्निया, युनायटेड स्टेट्स मध्ये गुगलचे हेड ऑफिस आहे. जवळपास जगभरातील सर्व मोठ्या देशांमध्ये गुगलच्या शाखा देखील आहेत. भारतात हैद्राबाद, मुंबई, बंगलोर आणि गुरगाव इथे गुगलचे ऑफिस आहेत.

गुगल कोणाला जॉब देते? 

गुगल मुख्यतः खालील तीन शैक्षणिक पात्रता असलेल्या लोकांना नोकरी देते. 

इंजिनिअरिंग, बिझनेस आणि डिझाइन

इंजिनिअरिंग मध्ये काही टेक्निकल पोस्ट असतात जसे की सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग, STA इंजिनिअरिंग, application development आणि product management, इत्यादी

बिझनेस मध्ये नॉन टेक्निकल जॉब्स असतात जसे की Quantitative Business analysis, Business Operations Management, Sales Strategy, इत्यादी.

डिझाइन मध्ये UI/ UX डिझाईनर, UX Writer, Visual Designer, UX Researcher या पोस्ट असतात.

Google मध्ये असणाऱ्या जॉब ओपनिंग कुठे समजतात?

Careers.google.com वर तुम्हाला Google मध्ये वर सांगितलेल्या जॉब ओपनिंग आणि त्यासोबत इतरही जॉब ओपनिंग विषयी माहिती मिळेल. इथे असलेल्या जॉब या ऑप्शन वर क्लिक करून तुम्ही तुमचे स्किल्स आणि क्वालिफिकेशन यावर आधारित जॉब्स सर्च करू शकतात. 

गुगल मध्ये जॉब मिळविण्यासाठी डिग्री लागते का?

तुम्ही जर वर दिलेल्या साईटवर जाऊन बघाल तर तुम्हाला सुरुवातीला डिग्री कोणती लागते ते दिलेले असेल परंतु त्याला पर्याय म्हणून त्यांनी तुमच्याकडे स्किल्स असतील आणि थोडाफार अनुभव असेल तरी तुम्ही Apply करू शकतात हे देखील नमूद केलेले असेल. 

तुमच्याकडे जर एका विषयाशी निगडित माहिती नाहीये परंतु अनेक विषयांशी निगडित थोडीफार बेसिक माहिती आणि ज्ञान असेल तर गुगल तुम्हाला गुगल टी शेप व्यक्ती म्हणेल. अशा लोकांमध्ये गुगलचे हायरिंग मॅनेजर जास्त इंटरेस्टड असतात. त्यांना असे वाटते की असे लोक नवीन गोष्टी करण्यासाठी जास्त प्रयत्न करतात. तुम्हाला देखील अनुभव आलेला असेल की असे लोक एका सीमेच्या पलीकडे जाऊन विचार करत असतात. 

गुगल जॉब्स साठी लागणारी पात्रता - Eligibility for Google Jobs

तुम्ही अशा एखाद्या ठिकाणाच्या शोधात असाल जिथे तुमच्या जिज्ञासा, तुमच्या कल्पना आणि तुमची शिकण्याची इच्छा या गोष्टींना महत्व देत असेल तर गुगल ही बेस्ट कंपनी असेल. 

तुम्ही कोणत्याही मोठ्या विद्यापीठ मधून शिक्षण घेतलेले असो किंवा 12 वि पास असो परंतु तुमच्याकडे जर योग्य ते स्किल्स आणि अनुभव असेल तर तुम्ही गुगलमध्ये जॉब करण्यासाठी पात्र आहात. 

गुगल जॉब साठी Apply कसे करतात? How to Apply for Google Jobs?

गुगल कर्मचाऱ्यांची निवड कशी करते हे महत्वाचे आहे. गुगल 4 वेगवेगळ्या प्रकारे कर्मचाऱ्यांची निवड करत असते. 

1 Apply Online

याविषयी आपण आधी देखील थोडी माहिती घेतली आहे. career.google.com वर जाऊन तुम्ही Apply करू शकता. यातील जॉब विभागात तुम्ही तुमच्या नुसार फिल्टर टाकून तुम्ही पात्र असलेले जॉब बघू शकता. तुम्हाला तिथे जॉब निवडल्यानंतर Apply करायचे ऑप्शन देखील मिळेल. 

Apply करत असताना तुमचा resume चांगला असला पाहिजे. यात तुमचे Qualification, Hobbies, Skills आणि Experience म्हणजे जवळपास सर्व काही चांगल्या प्रकारे लिहिलेले असायला हवे.

Apply करत असताना फक्त त्याच ठिकाणी Apply करा जिथे तुम्ही पात्र आहात. याचे कारण हेच आहे की जर तुम्ही एकदा रिजेक्ट झालात तर 90 दिवसानंतर तुम्हाला पुन्हा apply करता येते. Resume मध्ये जे येत आहे तेच टाका कारण तुमची मुलाखत ही पूर्णपणे त्यावरून घेतली जाते. 

Resume एकदा select झाला की मग पुढे तुम्हाला तीन फेज मधून जावे लागते. 

Phase 1: ऑनलाइन असेसमेंट

यामध्ये कोडींग quiz असते आणि त्यासोबत अनेक प्रश्न देखील असू शकतात. 

Phase 2: शॉर्ट व्हर्च्युअल चॅट

तुम्ही फेज 1 पास झाला तर तुम्हाला दुसऱ्या फेज मध्ये संधी मिळते. यामध्ये तुमच्याशी फोनवर किंवा व्हिडिओ कॉल वर चर्चा केली जाते. 

Phase 3: प्रोजेक्ट वर्क

सविस्तर मुलाखत म्हणजेच in depth interview आधी तुम्हाला प्रोजेक्ट दिला जातो. यात जास्त घाबरायचे काही कारण नाही. ही गोष्ट तुम्ही कसा विचार करता याविषयी जाणण्यासाठी असते. त्यांना यातून हे जाणून घ्यायचे असते की तुम्ही विचार कसा करता आणि तुम्ही प्रॉब्लेम्स कसे सोडवतात. फक्त एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची असते ती म्हणजे सोप्यात सोप्या कोड मध्ये तुम्हाला तो प्रोजेक्ट पूर्ण करायचा असतो.

In Depth Interview

ही मुलाखत ऑफलाईन किंवा ऑनलाइन कशीही होऊ शकते. तुम्ही गुगलच्या मुलाखतीत आहेत तर मग साधे question तुम्हाला नसणार आहे. तुम्हाला या दरम्यान अनेक वेगवेगळे प्रश्न विचारले जातात त्यातून त्यांना तुमचे ज्ञान आणि स्किल्स विषयी समजते. 

तुम्हाला यात अनेक कोड्यात टाकणारे प्रश्न देखील विचारले जाऊ शकतात. इंटरव्ह्यू वरूनच तुमचे सर्व काही ठरते.

जरी तुम्ही रिजेक्ट झाला तरी देखील 90 दिवासानी पुन्हा apply करू शकतात. जर तुमच्याकडे 12 ते 18 महिन्यांचा अनुभव असेल तर त्याला resume मध्ये नक्की लिहा. 30 दिवसांमध्ये तुम्ही 3 जॉब्स ला apply करू शकता. परंतु तुम्ही ज्यात आवड ठेवता त्या एकाच जॉब ला apply केलेले कधीही चांगलेच असेल.

2 Employee Reference

जर तुमचा एखादा मित्र गुगल मध्ये काम करत असेल किंवा तुम्ही गुगल कर्मचाऱ्यांशी linkedin ने जोडलेले असाल तर ते लोक तुमचे application हे हायरिंग मॅनेजर पर्यंत पोहोचवू शकतात. यामधून तुमचा इंटरव्ह्यू होऊ शकतो.

3 Campus Placement

गुगल प्रत्येक वर्षी काही कॉलेज आणि विद्यापीठात कॅम्पस प्लेसमेंट साठी येत असते. IIT, NIT आणि DTU या ठिकाणी गुगल मुख्यतः येते. तुमच्या कॉलेजला जर गुगल येत असेल तर मग तुम्ही कॅम्पस प्लेसमेंट मधून apply करू शकता. 

4 APAC Test

गुगल प्रत्येक वर्षी Coding Contest आयोजित करत असते. ही स्पर्धा आशिया पॅसिफिक देशांमध्ये आयोजित केली जाते. जर तुम्हाला कोडिंग येत असेल तर तुम्ही या स्पर्धेसाठी रजिस्टर करू शकतात. जे टॉप मध्ये येणारे कोडर्स असतात त्यांना टेक्निकल पोस्ट साठी मुलाखत द्यायची संधी गुगल देत असते. याद्वारे देखील तुम्ही गुगल मध्ये जॉब मिळवू शकतात.

गुगल कर्मचाऱ्यांचा पगार- Salary for Google Employee

तुम्ही पगाराविषयी विचार करत असाल तर ती चिंता करू नका कारण इथे तुम्हाला तुमच्या अपेक्षेच्या खूप जास्त काही मिळते. तुम्हाला फक्त तयारी करायची असते ती मुलाखत द्यायची आणि जॉब मिळवायची. मग तुमचे बाकीचे सर्व स्वप्न तुम्ही पूर्ण करू शकाल इतका पगार गुगल नक्कीच देते.  

गुगल च्या कर्मचाऱ्यांची सरासरी सॅलरी ही 1 करोड प्रति वर्ष इतकी असते. 

पगाराव्यतिरिक्त मिळणाऱ्या सुविधा - Facilities for Google Employee

गुगल मध्ये पगार तर आपल्याला भरपूर मिळतोच परंतु त्यासोबत अनेक सुविधा देखील मिळतात. त्यातील काही महत्वाच्या सुविधा आपण जाणून घेऊयात.

1 मोफत अनलिमिटेड जेवण (Unlimited Free Food)

इथे तुम्हाला दिवसातून 3 वेळा मोफत जेवण मिळते.

2 स्विमिंग पूल

तुम्ही इथे स्विमिंग पुलची देखील मजा घेऊ शकता.

3 रिलॅक्स हाऊस

गुगल मध्ये तुम्हाला रिलॅक्स हाऊस आणि गार्डन यासारख्या सुविधा देखील मिळतात.

4 Great Culture

गुगल मध्ये काम करत असताना तुम्हाला खूप चांगले वातावरण अनुभवता येते. म्हणजे गुगल मध्ये काम करणारे कर्मचारी तर सांगतात की त्यांना असे जाणवत सुद्धा नाही की ते एखाद्या कंपनीत काम करत आहेत.

5 मोफत व्यायाम प्रशिक्षण

गुगल फक्त कामावर नव्हे तर त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या कामावर देखील लक्ष देते. त्यामुळे इथे जिम आणि प्रशिक्षक या दोन्ही सुविधा असतात.

6 मेडिकल सुविधा

तुम्ही जिथे काम करताय तिथे तुम्हाला काही लागले किन्वाआ तुम्हाला काही त्रास होत असेल तर तिथेच मेडिकल सुविधा देण्यासाठी एक बेस्ट मेडिकल स्टाफ गुगलने ठेवलेला असतो. तुम्ही तुमच्यासाठी त्या मेडिकल स्टाफ कडे अपॉइंटमेंट देखील घेऊ शकता.

7 ऑनलाइन गुगल जॉब्स

तुम्ही तुमच्या घरूनच काम करू इच्छित असाल तर तुम्हाला ही सुविधा देखील गुगल देते. जवळपास गुगलचे 20% कर्मचारी हे घरी बसून काम करतात.

8 डेथ बेनिफिट

ही सुविधा तुम्हाला भारतीय सैन्यानंतर इथेच बघायला मिळेल. जेव्हा गुगलच्या कर्मचाऱ्याचा मृत्यू होतो त्यांनतर गुगल त्यांच्या कुटुंबियांना पुढील 10 वर्षांपर्यंत 50% पगार देते. त्याच्या कुटुंबात फक्त मुलगा किंवा कोणी मुलगी असेल तर त्याला देखील त्याचे वय 19 वर्ष होउपर्यंत 1000$ दिले जातात. याशिवाय त्या मुलाला 23 वर्षांपर्यंत मोफत शिक्षण दिले जाते.  

9 Paternity आणि Maternity Leave

मित्रानो तुम्हाला कंपनी 5 ते 10 आठवड्यांची सुट्टी देखील देते आहे आणि सोबतच सॅलरी देखील मिळत आहे तर मग ती कंपनी किती चांगली असेल ना? गुगल 7 आठवड्यांची Paternity तर 12 आठवड्यांची Maternity leave देते. याशिवाय कर्मचाऱ्याच्या घरी एखादे आपत्य जन्माला आले तर गुगल त्या कर्मचाऱ्याला कॅश गिफ्ट देते. 

10 छंद

गुगलचे असे म्हणणे आहे की त्यांच्या कर्मचाऱ्यांची ज्या गोष्टी आवड आहे त्यांनी त्यात आनंद घेतलाच पाहिजे. याचे कारण म्हणजे जर त्या कर्मचाऱ्याच्या लाईफ बॅलन्स असेल तर तो त्या कामाला अधिक चांगल्या प्रकारे करू शकतो.

हे सर्व फायदे आणि सुविधा तुम्हाला गुगल मध्ये जॉब मिळाल्यानंतर मिळतात त्यामुळे आधी जॉब मिळविण्यासाठी मेहनत करायला हवी! 

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने