वरुण चक्रवर्ती बायोग्राफी | Varun Chakravarthy Biography in Marathi

वरुण चक्रवर्ती बायोग्राफी | Varun Chakravarthy Biography in Marathi

वरुण चक्रवर्ती बायोग्राफी मराठी

Varun Chakravarthy Biography in Marathi

आयपीएल 2021 मध्ये आपली चांगली छाप सोडणारे आणि आता टी 20 वर्ल्ड कप मध्ये भारतीय संघात स्थान मिळविलेल्या वरुण चक्रवर्ती यांच्या जीवनाविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. वरुण चक्रवर्ती हे एक आर्किटेक्ट म्हणून नोकरी करत होते. त्यांनी त्यासोबत क्रिकेटची आवड देखील जोपासली. वरुण यांना 2019 साली आयपीएल साठी किंग्स इलेव्हन पंजाब संघाने सर्वाधिक बोली लावून खरेदी केले होते. चला तर मग वरुण चक्रवर्ती यांच्या जीवन संघर्षाविषयी जाणून घेऊयात...

वरुण चक्रवर्ती बायोग्राफी | Varun Chakravarthy Biography in Marathi

पूर्ण नाव (Full Name)-
वरुण चक्रवर्ती

वडिलांचे नाव (Fathers Name)- 

आईचे नाव (Mothers Name)- 

जन्म तारीख (Birth Date)- 29 ऑगस्ट 1991

शिक्षण (Education)- B. Arch (आर्किटेक्ट)

विद्यापीठ (University)- SRM युनिव्हर्सिटी चेन्नई

खेळ (Sports)- क्रिकेट

खेळाचा प्रकार (Cricket Role)- स्पिन बॉलिंग / ऑल राउंडर

धर्म (Religion)- हिंदू

जात (Caste)- 

वरुण चक्रवर्ती याचा जन्म व बालपण - Birth and Childhood of Varun Chakravarthy

वरुण चक्रवर्ती हे भारतीय क्रिकेट संघाचा भाग असलेले एक तामिळनाडू येथील खेळाडू आहेत. वरुण यांचा जन्म 29 ऑगस्ट 1991 रोजी तामिळनाडू येथे झाला. त्यांचे कुटुंब हे एक सामान्य कुटुंब होते. शाळेत असताना त्यांनी क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली.

वरुण चक्रवर्ती हे 13 वर्षांचे असताना एक विकेट किपर खेळाडू म्हणून त्यांनी क्रिकेट खेळायला सुरुवात केली. त्यांनी पुढेही 17 वर्ष वय होईपर्यंत काहीही फळ न मिळता देखील खेळ सुरू ठेवला. एखाद्याचे नशीब किती खराब असते हे वरुण यांनी अनुभवले. या वयात त्यांना अनेकदा नकार मिळाला परंतु त्यांनी प्रयत्न सोडले नाही. 

वरुण चक्रवर्ती यांचे शिक्षण - Education of Varun Chakravarthy

जेव्हा क्रिकेट मध्ये यश मिळत नाही हे सर्वांना दिसत होते तेव्हा मात्र घरच्यांनी अभ्यासात लक्ष द्यायला जास्त फोर्स केला. शिक्षणामुळे वरुण यांना क्रिकेट कडे दुर्लक्ष करावे लागले. त्यानंतर वरुण यांनी चेन्नई इथे स्थित SRM युनिव्हर्सिटी मधून पदवीचे शिक्षण पूर्ण केले.

वरुण चक्रवर्ती यांचे सुरुवातीचे करियर - Starting Career of Varun Chakravarthy

वरुण यांचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते एक आर्किटेक्ट म्हणून काम करू लागले. त्यांनी जवळपास 2 वर्षे नोकरी देखील केली.  नोकरी करत असताना देखील वरुण हे आठवड्याच्या शेवटी किंवा वेळ मिळेल तेव्हाच त्यांच्या क्रिकेटची आवड ही जोपासत होते.

अखेर नोकरीवर आवडीने विजय मिळविला. वयाच्या 25 व्या वर्षी वरुण यांनी नोकरी सोडून पूर्णवेळ क्रिकेटला द्यायचे ठरविले. त्यांनी क्रोमबेस्ट या क्रिकेट अकादमी मध्ये ऍडमिशन देखील घेतले.

वरुण चक्रवर्ती यांनी या अकॅडमी मध्ये एक फाटाफास्ट बॉलर आणि ऑल राउंडर म्हणून खेळायला सुरुवात केली. त्यांना इथे देखील नशिबाने साथ दिली नाही. दुसऱ्याच सामन्यात वरुण यांना दुखापत झाली. गुडघ्याला झालेल्या दुखपतीने त्यांना अनेक दिवस क्रिकेट पासून दूर राहावे लागले. पुन्हा आल्यानंतर त्यांनी स्पिन बॉलिंग करायला सुरुवात केली. वरुण यांना खेळताना 18 गज असलेल्या पिचवर टेनिस बॉल वर स्पिन बॉलिंग करायची होती. यामध्ये त्यांनी अनेक व्हेरिएशन शिकून घेतले. त्यांनी स्पिन बॉलिंग मध्ये इतकी जास्त मेहनत घेतली की त्यांना मिस्ट्री स्पिनर या नावाने ओळखले जाऊ लागले.

चेन्नई लीग सिझन 4 मध्ये त्यांनी जुबली क्रिकेट क्लब मध्ये स्वतःला जोडून घेतले. या टुर्नमेंट मध्ये त्यांनी फक्त 7 सामन्यांमध्ये 31 विकेट घेऊन सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.

Varun Chakravarthy Mystery Spinner

वरुण चक्रवर्ती हे लेगब्रेक, ऑफब्रेक, गुगली, कॅरोम बॉल, फ्लिपर, स्लाईडर किंवा टॉप स्पिन यासारखे वेगवेगळे बॉल टाकू शकता. वयाच्या 27 व्या वर्षी वरुण यांना तामिळनाडू प्रीमियर लीग मध्ये शिचम मधुराई पँथर संघाकडून खेळण्याची संधी मिळाली. वरुण यांच्या बॉलिंगच्या बळावर त्यांच्या संघाने ही टुर्नमेंट देखील जिंकून घेतली.  या टुर्नमेंट च्या शेवटच्या सामन्यात म्हणजे फायनल मध्ये वरुण यांनी फक्त 16 रन देत 3 विकेट देखील घेतल्या होत्या.

वरुण यांच्या या प्रदर्शनाने त्यांना चेन्नई सुपर किंग्स आणि नंतर कोलकाता नाईट रायडर्स संघासोबत खेळण्याची संधी मिळाली.

वरुण चक्रवर्ती फर्स्ट क्लास क्रिकेट - Varun Chakravarthy First Class Cricket Career

वरुण यांच्या यशानंतर 2018 मध्ये त्यांना विजय हजारे ट्रॉफीसाठी तामिळनाडू संघात स्थान मिळाले. इथे देखील या खेळाडूने 9 सामन्यांमध्ये 22 विकेट्स मिळविल्या. यामुळे त्यांच्यासाठी रणजी ट्रॉफीचे दरवाजे देखील खुले झाले. नोव्हेंबर 2019 मध्ये त्यांनी त्यांच्या रणजी करियरला सुरुवात केली.

वरुण चक्रवर्ती आयपीएल करियर - Varun Chakravarthy IPL Career

2019 मध्ये किंग्स इलेव्हन पंजाबच्या संघात सर्वाधिक रक्कम देऊन वरुण यांना घेण्यात आले परंतु एक वाईट ओव्हर त्यांना एकच सामना खेळू देऊ शकली. 2020 मध्ये वरुण यांना केकेआर ने खरेदी केले. त्यांनी 2020 मध्ये 13 मॅच मध्ये 17 विकेट्स तर 2021 मध्ये 17 सामन्यांत 18 विकेट्स मिळविल्या.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने